राज ठाकरेंचे मौन

Submitted by अविकुमार on 10 January, 2013 - 02:16

गेल्या ४-५ महिन्यांपासून राज ठाकरे 'जरा' शांत वाटताहेत. विशेषतः राज्यातील सरकारविरुद्ध त्यांनी 'ब्र'सुद्धा काढलेला नाहीये. कधीतरी 'बिहारी' म्हणून ओरडतात पण त्यातही पूर्वीसारखा 'दम' नाही वाटत.

मी मनसेच्या सुरुवातीपासून 'मनसे'चा प्रशंसक राहिलो आहे हे ईथे मुद्दाम नमुद करावे वाटते, नाहीतर निव्वळ कुरापत काढण्यासाठी काढलेला धागा अशी माझी संभावना व्हायची. मला राजकारणातलं फार काही कळत नाही. तरीही माझ्या अल्पमतीनुसार काही संभाव्य कारणांचा अंदाज केला.

१. काका गेल्याचे दु:ख ?(शक्यता फारच कमी आहे)
२. काकांनी जाण्यापुर्वी काही विनंती केली का? (शिवसेना आणि उद्धवसाठी) (अगदीच फिल्मी वाटतंय)
३. सत्ताधारीपक्ष कोणत्यातरी कारणास्तव त्यांना ब्लॅकमेल करत आहे का? (पूर्वीची कोणतीतरी खूनाची केस आहे ना?)
४. अनेक केसेसला तोंड देता देता त्यांच्या नाकी नऊ तरी आले नाहीये ना?
५. पक्षांतर्गत घडी (पक्षी अंतर्गत बंडाळी) नीट बसवत आहेत का? (हर्षवर्धन जाधव राजीनामा प्रकरण)
६. विकासाची ब्लू प्रिंट तयार करण्यात व्यस्त आहेत का?
७. .......

तुम्हाला आणखी काही कारणे असावीत असे वाटत आहे का? राजकीय विश्लेषकांनी यावर प्रकाश टाकल्यास गोष्टी चांगल्या समजतील. मला स्वत:ला अंदाज क्र. ३ बरोबर असावा असे फार वाटते आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अवांतर : राजसाहेब नक्की मौनात आहेत का? की त्यांनी जरा जरी तोंड उघडलं तरी मोठी बातमी होते...? ही बातमी बघा : http://online2.esakal.com/esakal/20130108/5399228192591138982.htm
-गा.पै.

पुढची चाल रचत आहेत ते. आता हिंदु- मुस्लिम. बाळासाहेब गेल्यावर आता रान मोकळे आहे धार्मिक तेढ माजवण्यासाठी! पाकने त्यांना आयताच विषय दिला आहे. २-३ दिवस थांबा मग बघा.

किती वेळा तेच तेच बोलत राहणार? बोलायला नवीन मुद्दे नाहीत, जुने मुद्दे ऐकुन लोक कंटाळलेले आहेत. बोलण्याच्या तुलनेत कृती काहीच नाही. त्यामुळे उगीच बोलुन स्वतःचे नुकसान करुन घेण्यापेक्षा गप्प बसणे हिताचे हे सुज्ञ राज ठाकरे यांनी ओळखले असावे.

पुढची चाल रचत आहेत ते. आता हिंदु- मुस्लिम.>>> भारतीय, हिंदु-मुस्लिमच करायचं असतं तर त्या अकबरुद्दिन ओवेसीच्या रुपात तर चांगलीच संधी होती की. पण त्यावरुन तर काहीच बोलले नाहीत. कसं काय बुवा?

हे पहा त्या ओवेसीचे हिरवे फुत्कार. (http://www.youtube.com/watch?v=OIZgCH7oC0A)

भारतीय, हिंदु-मुस्लिमच करायचं असतं तर त्या अकबरुद्दिन ओवेसीच्या रुपात तर चांगलीच संधी होती की. पण त्यावरुन तर काहीच बोलले नाहीत. कसं काय बुवा?>>> ते सौफ्ट टारगेट शोधतात. ओवेसी परवडणार नाहि. कोणतरी दिलिपकुमार, अमिताभ, आशा भोसले, बोनी कपुर असल्या कोणीतरी तारे तोडायची वाट पहात आहेत राज ठाकरे.

त्यांना खरे काय पाहीजे ते त्यांना मिळाले असणार. तुम्ही मनसे चे प्रशंसक असावे असे काय कार्य तुम्हाला दिसले आहे. आता १-२ पालिके मधे ( मला वाटते नाशिक ) त्यांची सत्ता सुद्धा आहे. काही चांगले झालेले दिसले का तिथे? काही पैसे खाणे कमी झाले का त्या दोन ठिकाणी?

कशाला उगाच वेडी आशा लावुन बसला आहात?

ह्य ऑवासीला जिवंत काठेवला आहे, आणी आता बीजेपी गप्प का आहे?

बाळासाहेब अत्ता हवे होते, ओवासी वगैरे बाळासाहेबांच्या जाण्याची वाट पहात होते बहुतेक..

ते आल्यापासून नाशिक महापालिकेत आनंदी आनंद आहे.
ते येतात अन बुरख्यातून हिंडतात/ सगळ्यात फालतू पणा आहे.

ब्लु रंग संपला असेल प्रिटा काढण्यासाठीचा. म्हणुन थांबले असतील. जाउद्या नां राव, बोलले तरी काय कुणाचे भले होणारे??

पुर्वी कोणतीही योजना असली की नवीन पक्ष म्हणुन त्यांना वाटा मिळत नसावा. आताशा योजना तयार होताच विरोध होऊ नये म्हणुन मनसेचा ही वाटा तयार होत असेल.

शेवटच आंदोलन टोल नाक्यावरच होत. पुढ काय झाल ? सेटल झालच ना ?

mns - manageable noisy sena... हे असंच काहीसं म न से चं सध्या चित्र दिसतंय....

२०१४ च्या निवडणुका जवळ आल्या आहेत, त्यासाठीची मोर्चे बांधणी,तडजोड, नेत्यांची पळवा-पळवी चालु झाली आहे , राज त्यातच बिझी असतील

मटाची बाटमी वाचली.
मुम्बैच्या फूटपाथवर मर्हाटी मान्साचा हक्क खणखणीतपने सांगितल्याबद्दल सायबांचे हबिणंडण!
'साहेबांच्या' झंझावाती दौर्याला सुरुवात होणारे म्हणे १० तार्खेला फुड्ल्या म्हैन्यात. आदित्य "यांचा" देखिल दौरा सुरू होणारेय म्हणे त्याच सुमारास? (स्वगतः *श्या, तुलनेने राहूल म्हातारा झाला म्हणायचा*)

आज बोलणार उद्या बोलणार मग डिसेंबर मधे बोलणार करता करता नविन वर्षात राज यांनी काल पत्रकार परिषद घेत एकदाचे तोंड उघडले.पण पुन्हा तोच चावून चावून चोथा झालेला उत्तरभारतियांचा राग आळवला...त्यात आता पुन्हा पहिल्यासारखी आक्रमकता वगैरे दिसली नाही..अर्थात ती अपेक्षा देखिल नाही कारण मनसेच्या गोटातून ज्या बातम्या कानी पडतात त्याचा विचार केला तर बहुतांश समर्थकांनी पराकोटीचा मराठी अस्मिता ,आशावाद व आदर्शवादला भुलत आपले राजकारणातले बस्तान बसावे म्हणून राजमार्गावरुन जाण्याचा निर्णय घेत राज यांची साथ देत सेनेशी काडीमोड घेतला मनसेशी घरोबा केला तोवर सेनेने त्यांना परतीचा मार्ग बंद केला होता ...आता मात्र राज बरोबर गेलेल्या प्रामाणिक कार्यकर्त्यांचा भ्रमाचा भोपळा फुटलाय पण पर्याय उपलब्ध नसल्याने त्यांना पाय ओढत राज मागे जावे लागतेय असा निष्कर्ष काढायला हरकत नाही..बाळासाहेबांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरुन निघण केवळ अशक्य आहे..बाळासाहेबांनी उद्धवच्या आजारपणात राजला हाक का मारली असावी ?ह्याचा अंदाज सुज्ञ नक्कीच बांधू शकतात.पण तरिही बाळासाहेबांच्या पश्चात या दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये म्हणुन सेनेचे चाणक्य जंगजंग पछाडतायत....चाणक्य कोण ते कळले असेलच...
बाकी आझाद मैदान येथे ११ ऑगस्ट रोजी रझाअकादमीच्या निधर्मिवाद्यांनी घातलेला गोंधळ,हैदोस व केलेला नंगा नाच बघून राज यांनी शक्तीप्रदर्शन करण्याची नामी संधी दवडली नाही .आणि लाखभर लोकांचा मोर्चा आझादमैदानला नेत तेथे महाराष्ट्र पोलिसांचे मनोधैर्य उंचावण्यासाठी सभा घेत आवेशपुर्ण भाषण वगैरे ठोकले .अर्थात त्या भाषाणात रझाअकादमीवर उघड उघड आरोप करण्याचे धाडस सेनेच्या मुशीत तयार झालेले राज ठाकरे करु शकले नाहीत्..त्यांनी घेतलेला पावित्रा थक्क करणारा होता...राज यांच्या मते आझादमैदानवर पोलिसांवर हात उचलणारे,महिला पोलिसांशी असभ्य वर्तन करणारे ,माध्यमांच्या ओबीवॅन जाळणारे,पत्रकारांना मारहाण करणारे,मालमत्तेची नासधुस करत जाळपोळ करणारे हे सगळे परप्रांतिय अर्थात उत्तरभारतिय होते...इतका अमुलाग्र बदल राज यांच्या विचारात का झाला असावा.?.झेंडा चित्रपटातले एक इफ्तार पार्टितले दृष्य आठवा म्हणजे कळेल...राज यांनी मनसेच्या झेंड्यात हिरवा रंग का आणला असावा याची संगती लागतेय का ते पहा!
महिला पोलिसांचा विनयभंग करण्याइतपत मजल रझाअकादमीच्या गुंडांची का जाऊ शकली ते आता कळतय ना? .यावर पोलिस आयुक्त अरुप पटनाईक यांनी कारवाई करणार्‍या पोलिसांवरच आगपाखड करत अरेरावी केल्याचे विहंगम दृष्य माध्यमांनी समस्त जनतेला दाखवले...अर्थात राणा भिमदेवी थाटात कायम बोलबच्चनगीरी करणार्‍या आर आर आबांनी अरुप पटनाईक यांना पाठीशी घातलेच, नव्हे अरुप पटनाईक यांना बढती देऊन त्यांनी आंदोलनकर्त्यांवर कारवाई न केल्याच्या पटनाईकांच्या मर्दुमकीला जाहिरपणे संमती दिली...अर्थात आबा कुणाच्या बापाला घाबरत नाहीत्..फक्त हिंदीत संवाद साधताना आबांची फे फे उडते व त त प प होते इतकच.....आणि ओवेसी बद्दल तर राज यांनी काही बोलण्याचे कारणच नाही..कारण त्यांनी त्यांचे राजकारण फक्त महाराष्ट्र व मराठी पुरतच मर्यादित ठेवलय्...अर्थात राज यांना महाराष्ट्राबाहेर कुणी विचारत नाहीच म्हणा!..आणि हिंदुत्व वगैरेशी आता राज यांचा दुरान्वयानेही संबध उरलेला नाही.....त्यामुळे ओवेसी काय आझमी काय यांनी कितीही गरळ ओकली तरी राज यांच्याकडून त्यावर काही प्रतिक्रिया येईल याबद्दल अपेक्षा न केलेलीच बरी.....
आझाद मैदान प्रकरणात महिला पोलिसांशी केल्या गेलेल्या असभ्य वर्तानाला वाचा फोडण्याचे काम इन्स्पेक्टर सुजाता पाटिल यांनी केले होते...संवाद या पोलिसांच्या नियतकालिकात त्यांची सदरची कविता छापून आली होती ...
हम न समझे थे बात इतनी सी,
लाठी हाथ में थी
पिस्तौल कमर पे थी,
गाड़ियाँ फूंकी थी
आँखे नशीली थी,
... धक्का देते उनको तो भी वो जलते थे,
हम न समझे थे बात इतनी सी,
होंसला बुलंद था,
इज्जत लुट रही थी,
गिराते एक एक को,
क्या जरुरत थी इशारो की,
हम न समझे बात इतनी सी,
हम न समझे बात इतनी सी,
हिम्मत की गद्दारों ने,
अमर ज्योति को हाथ लगाने की,
काट देते हाथ उनके तो
फ़रियाद किसी की भी ना होती,
हम न समझे बात इतनी सी
भूल गये वो रमजान
भूल गये वो इंसानियत,
घात उतार देते एक एक को,
अरे, क्या जरुरत थी किसी से डरने की,
संगीन लाठी तो आपके हाथ में थी
हम न समझे थे बात इतनी सी,
हमला तो हमपे था,
जनता देख रही थी,
खेलते गोलियों की होली तो,
जरुरत न पड़ती रावण जलाने की,
रमजान के साथ दिवाली भी होती
हम न समझे थे बात इतनी सी,
सांप को दूध पिलाकर
बात करते है हम भाईचारे की,
ख्वाब अमर जवानों के,
जनता भी डरी डरी सी,
हम न समझे बात इतनी सी
हम न समझे बात इतनी सी

कवी- इन्स्पे. सुजाता पाटील.
खर तर या कवितेत आक्षेपार्ह असे काहीही नव्हते..जे त्यांनी व त्यांच्या महिला पोलिस सहकार्‍यांनी ११ऑगस्ट रोजी आझाद मैदानवर अनुभवले तेच त्यांनी कवितेतून शब्दबद्द केले होते..पण निधर्मीवादाचा बुरखा पांघरून माध्यमांवरच्या चर्चासत्रात पैसे घेऊन स्वतःचे मत विकणार्‍या जावेद अख्तर,महेश भट सारख्या भांडांनी व मुस्लिम संघटनांनी सुजाता पाटील यांच्या कवितेवर आक्षेप घेत त्यांची तक्रार केली...जावेद अख्तर यांनी तर ट्विटरवर सुजाता पाटिल यांना निलंबित करण्याची देखिल मागणी केली ..काहिही कारण नसताना सुजाता पाटील यांना लेखी माफी मागण्यास भाग पाडले गेले....
कालच्या पत्रकार परिषदेत राज सुजाता पाटील यांच्या विषयावर बोलतील अशी अपेक्षा होती .पण त्यांनी त्याबद्दल एक ब्र देखिल उच्चारला नाही...सुजाता पाटील यांच्या संदर्भातील बातमीचा दुवा

आज जर बाळासाहेब असते तर त्यांनी सुजाता पाटील यांना शाबासकी देत त्यांची पाठ थोपटत जाहिर सत्कार केला असता..बाळासाहेब गेले तेंव्हा जी अलोट गर्दी त्यांना निरोप द्यायला जमली होती त्यात बंदोबस्ताला असलेले महाराष्ट्र पोलिस देखिल होते...आपला फार मोठा आधार गेला या जाणिवेने अश्रू आवरणे त्यांना कठीण झाले होते.....कित्येकांनी तर मुक्तपणे आपल्या अश्रूंना वाट मोकळी करुन दिली होती.....१७ नोव्हेंबर २०१२ ला महाराष्ट्र पोलिसांचा वाली आणि भक्कम आधार काळाच्या पडद्याआड गेला... नुसते ठाकरे नाव लागलय ,व्यंग चित्र काढता आल आणि काकांची नक्कल करता आली म्हणुन राज मधे बाळासाहेबांचा शोध घेणार्‍यांनी जळजळीत वास्तव स्विकारलेलच बरे आमच्या एका शिवसैनिक असणार्‍या समविचारी मित्राने व्यक्त केलेले मत "बाळासाहेब बावनकाशी सोने होते... राज, म्हणजे .... स्वर्ग ज्वेलर्स दादर येथील १ ग्रॅम खरे आणि ९९ ग्रॅम बनावट..."
जय हिंद!
जय महाराष्ट्र!

ह्म्म्म्म...जयमहाराष्ट्र, सुजाता पाटील प्रकरणाची काहीच माहिती नव्हती. दुवा द्यायला विसरलात वाटतं. असो, तोपर्यंत गुगलवर शोधायचा प्रयत्न करुन पहातो.

श्री अवीकुमार,
माहिती नव्हती कमाल आहे ?महाराष्ट्रात राहताय ना?आणि हो बरोबर माध्यमांवर वागळे सारख्या थोर पत्रकारांनी या विषयावर मौन साधले आहे ,उघडा डोळे बघा नीट म्हणणार्‍यांनी सुजाता पटील प्रकरणाकडे जाणिवपुर्वक डोळेझाक केली आहे.बाकी वृत्तपत्रांबद्दल न बोललेच बर.चक्क नेहरू डायनेस्टी टिव्ही ने दखल घेतली आहात कुठे ? घ्या दुवा http://www.ndtv.com/article/india/mumbai-traffic-cop-s-poem-on-azad-maid...
फक्त नावात हिंदु असलेल्यानी पण बातमी दिली http://www.thehindu.com/news/states/other-states/mumbai-cops-poem-touche...

Pages