झुंज एकल्या वाघाची

Submitted by जागल्या on 15 November, 2012 - 15:03

३०-३५ वर्षापुर्वीचा काळ, सिमेंट्ची जंगलं नव्हती, गावागावात्,आणि नुकत्याच तयार होणार्या नवीन शहरांतुन माणुस नावाचा प्राणी मेहनतीने जगत होता. गिरण्यांचे भोंगे,गाड्यांची धावपळ चालु असे, नवीन युगाची, कामगारांची, शेतकर्याचे राज्य आल्याचे स्वप्न हळुहळु धुसर होउ लागली होती, गिरणीच्या भोंग्यंमागुन अधुन मधुन कामगारांच्या घोषणा, झुंडीतुन येणारे लाल बावट्यतले नारे यानी गिरणगाव नावाचं ते मराठी माणसांच जंगल आळोखे पिळोखे घ्यायला लागलं होत्.आप्ल्या हक्काच्या जागांवर, अन्न्,वस्त्र,निवार्यावर, बाहेरुन आलेल्यांचा जम बसयला लागल्याच समोर दिसत होत पण हे सगळं थांबणार कस?केव्हां? कुठे? या सवालांना उत्तर येत नव्हत. लाल बावट्याच्या,दाक्षिणात्य घुसखोरांचे अरेरावी वाढतच चालली होती. विचारवंताच मंथन चालु होत आणि अचानक त्यांच्यातलाच एक सहज म्हणुन गेला "ठिक, मग ठरलं हे सगळ माझा छावा बदलेले तुमच्यातला मराठी बाणा जागवेल आणि जिवनभर तुमच्यातलाच होउन राहील."
झालं सगळ जंगल मोहोरले, कधी कागदावर, तर कधी भर मैदानात चौकात खड्या आवाजात तो वाघाचा छावा समस्त लाल बावट्यांवर गुरगुरु लागला. राजाचं नाव घेवुन लाल बावट्यासमोर एक भगवं वादळच जणु उभ राहीलं, ......."भगाओ लुंगी बजाओ पुंगी" , अशी नुसती गर्जना झाली आणि सगळा लाल बावटा ईतस्ततः विखुरला गेला. या वादळाच्या पट्ट्यात मग कोणीच टिकेना...... केवळ गिरणगावच नाही तर चांद्यापासुन बांद्यापर्यंत, सगळी कडे या वाघाची फौजच जणु तयार होउ लागली..... गावागावतुन भगवं वादळं घोंगावत होतं, मराठी बाणा, जरी पटक्याचा भगवा, आणि वाघाची वट सगळी कडे पसरली.वाघही लै हुशार त्याने आपले बाकीचे साथेदार, सरदारही निवडले ते सामान्यातुनच, कोणी गिरणीतला कष्ट्करी तर कोणी शेतकरी....घरादारातुन दुवा येउ लागला.वाघाच्या नुसत्या गर्जनेची सगळ्याना दहशत बसु लागली. मध्येच अचानक धोका परत जाणवु लागला. आता हिरवा चांद तारा, उगाच आडवा आला. भगवं रक्त उसंळलं..... इथे कोणाची मिरासदारी चाल्णार नाय, टिकणार नाय, दुधात साखर नेहेमीच गोड वाटते पण जर लिंबु पडलं तर लिंबु पडत कच्ररयात आणि दुधाची किंमत मात्र दुप्प्ट होते पनीर होतं भाउ त्येचं!! हे वाघाच अभय-अरण्य वाढु लागलं, वाघाचे सहकारी वाढु लागले. सगळं राज्य पायाखाली घालीत वाघाने चांगलाच जम बसवला.रत्यावरुन, मैदानातुन वाघ सगळ्यांच्या मनातच जाउन बसला आता तयारी चालु झाली ती राज्यारोहणाची हां हां पण वाघ वचनाचा पक्का त्याने पण वाघाने पित्याच वचन पाळलं , सत्ता आली तरी राजा बनला त्याचाच सहकारी.... वाघाचा मान वाढला, बळ वाढ्लं. सरदार वाढले. छोटे छावेही आता मोठ्या मोहीमा करु लागले. दुरवर किर्ती पसरु लागली दुरदेशीचे सरदार आता वाघाची साथ सल्ला मागु लागले, वाघानेही मोठ्या मनाने लहान भावाचा मान घेत त्याना मदत केली... वाघाचा दरारा, भगव्याचा आदर वाढ्तच चालला.
पण पण अरेरे काही कुरबुरी चालु झाल्या, सरदार छावे यांच्यतच आपापसातल्या स्पर्धा सुरु झाल्या...अचानक भगव्याच्या साम्राज्याला, वाघाच्या धाकाला,तडा जावु लागल्या. काही जुने जाणते सरदार दुर झाले...छाव्यांमधील तंटे, सरदाराची नाराजी वाधु लागली.....हळुहळु वाघही म्हातारा झाला होउ लागला ...थकला.... पण मागे हटणे ना त्याच्या रक्तात, ना वृत्तीत..काही सरदार, छावे सोडुन गेले म्हणुन मोडुन पडणे त्याच्या आजवरच्या प्रतिमेत बसणारे नव्हते. मग सुरु झाली एक झुंज.... आपल्याच छाव्यांबरोबर,जुन्या सहकार्यांबरोबर,सरदारांबरोबर......अजुनही या वाघाची झुंज चालु आहे........नियती बरोबर.... आणि हे वादळ, हा वाघ ही सर्व लढाई जिकणार , पुन्हा नव्याने हे वादळ घोंगावणार....... हे नियती उगाच हे वादळ तुझ्या बरोबर नेउ नकोस...झेपणारं नाही......

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लेख चांगला आहे....
जगदंबेमाता साहेबाना उदंड आयुष्य देवो!>>>+++१११११११११११११

सेना हे चित्र कुठुन मिळालं......
कालचं बाबासाहेबांनी दिलेला मंत्र आठवला...!! उदयोस्तु !! अंबे उदयोस्तु !!
साहेबांचे प्रक्रुति आता खुपच सुधारत्ये.......

जय महाराष्ट्र !!!!!!

सेनापतीजी,
लई भारी,
साहेबाना असाच हात करुन तमाम जनतेला आशिर्वाद देताना पहायच आहे.
एक शिवसैनिक म्हणून >>>>> विभा केवळ शिवसैनिकच का..... तमाम हिंदु,मराठी अमराठी सगळेच देव पाण्यात घालुन बसेलेत ...... आणि का बसु नये.... शेवट वाघ तो वाघ च म्हतारा झाला तरी गवत खात नाही.... उगाच कोणापुढे झुकणार नाही वाकणार नाही...>>>>>खरं आहे हे घारुआण्णाजी.

बाळासाहेब....

सेनेच्या बालेकिल्ल्यात लहानाचा मोठा झालो; बर्‍याचदा साहेबांची धोरणं पटली/नाहि पटली...

बट आय मस्ट से, हि इज द ओन्ली लिडर हु हॅज गॉट बॉल्स टु से व्हॉट हि मिन्स, अँड मिन्स व्हॉट हि सेज; रिगार्डलेस ऑफ कॉन्सीक्वेंसेस...

महाराष्ट्र पोरका झाला....
बोले तैसाची चालला तो बाळ आमुचा
शान भगव्याची मान मराठ्याची
न झुकता,न वाकता ताठ मानाने चालला,
कमी न व्हावी दिंगत किर्ती..
निरंतर मिळावी त्यातुनच स्फुर्ती

बाळासाहेब गेलेत कुठे? ते तर इथेच आहेत लाखो चाहत्यांच्या हृदयात.
अत्यंत समृद्ध आयुष्य ते स्वतः जगले..इतरांचेही आयुष्य त्यानी समृद्ध करण्याचा प्रयत्न केला..
प्रत्येक वेळी मी एक्सप्रेसवे वर जेव्हा जातो तेव्हा त्यांची आठवण येतेच येते..
We should not mourn his death, We should celebrate his life..