राज ठाकरे

राज ठाकरेंचे मौन

Submitted by अविकुमार on 10 January, 2013 - 02:16

गेल्या ४-५ महिन्यांपासून राज ठाकरे 'जरा' शांत वाटताहेत. विशेषतः राज्यातील सरकारविरुद्ध त्यांनी 'ब्र'सुद्धा काढलेला नाहीये. कधीतरी 'बिहारी' म्हणून ओरडतात पण त्यातही पूर्वीसारखा 'दम' नाही वाटत.

मी मनसेच्या सुरुवातीपासून 'मनसे'चा प्रशंसक राहिलो आहे हे ईथे मुद्दाम नमुद करावे वाटते, नाहीतर निव्वळ कुरापत काढण्यासाठी काढलेला धागा अशी माझी संभावना व्हायची. मला राजकारणातलं फार काही कळत नाही. तरीही माझ्या अल्पमतीनुसार काही संभाव्य कारणांचा अंदाज केला.

१. काका गेल्याचे दु:ख ?(शक्यता फारच कमी आहे)
२. काकांनी जाण्यापुर्वी काही विनंती केली का? (शिवसेना आणि उद्धवसाठी) (अगदीच फिल्मी वाटतंय)

विषय: 

अबु आझमींचं खरंच चुकलं का?

Submitted by kanchankarai on 9 November, 2009 - 06:32

मला वाटतं घटनेनुसार जवळजवळ २२ संमत भाषांमधून आमदार शपथ घेऊ शकतात. अबू आझमींनी ’त्या’ प्रसंगानंतर पत्रकारांसमोर असे सांगितले आहे की, काही आमदारांनी इंग्रजीतून शपथा घेतल्या. जर ’ते’ चालते तर ’हे’ का नको? हे जर खरं असेल तर आझमींचं काहीच चुकलं नाही. कारण आग्रह मराठीचा आहे, त्यामुळे विरोध इंग्रजी भाषेलाही व्हायला हवा होता. वक्तव्य केल्यानंतर त्यावर कार्यवाही होणार हे मनसेचं तत्व आहे त्यामुळे ’मनसे’ने थोडं धिराने घ्यायला हवं.

विषय: 
Subscribe to RSS - राज ठाकरे