सुयुध्द त्रिनेत्री आणि एक भयानक गुहा. भाग - १२
चॅप्टर पाचवा " सामना "
चॅप्टर पाचवा " सामना "
आम्ही काही मैत्रिणी गेल्या काही दिवसांपासून मुलाच्या मित्र-मंडळींसाठी एखादा वाचनगट सुरु करण्याच्या विचारात आहोत. शाळेत असा काही उपक्रम नाही आणि जवळपास वाचनालयही नाही.
मुलांचा वयोगट ७-८ वर्षे आहे. सध्या तरी चार मेंबर तयार आहेत. उपक्रम सुरु झाल्यावर अजून मुले तयार होतिल.
वाचनाची आवड असणारी, रोज काही ना काही वाचायला हवे असणारी, कधीतरी वाचणारी आणि अजिबात न वाचणारी अशी सगळ्या प्रकारची मुले आजूबाजूला आहेत.
सगळ्यात मोठी अडचण पुस्तकांची येईल. आम्हाला माझ्या घरी असणाऱ्या आणि मी वाचनालयातून आणलेल्या पुस्तकांचा वापर करावा लागेल. एका पुस्तकाच्या अनेक आवृत्त्या मिळणार नाहीत.
स्वामी विवेकानंद म्हणजे ऊर्जा, चैतन्य, विचार यांचे तेजस्वी प्रकटीकरण. पूर्वेच्या वंगभूमीत जन्मलेला, वाढलेला हा तरुण या राष्ट्राच्या शोधासाठी घराबाहेर पडला, निरीक्षण, संवाद, अभ्यास, चिंतन करत करत देश पालथा घातला आणि सरतेशेवटी भारताच्या दक्षिणतम टोकावर जाऊन त्यांनी सर्व अनुभवांचे मनन केले तेव्हा त्यातून त्यांना त्यांच्या पुढील आयुष्याचे उद्दिष्ट गवसले. अशा ऐतिहासिक ठिकाणी साठ वर्षांनी एका समर्पित कार्यकर्त्याच्या पुढाकाराने 'देशाचे गौरवस्थान' असा लौकिक मिळवेल असे भव्य शिलास्मारक उभे राहिले. त्या स्मारकाच्या जन्माची थक्क करणारी गाथा म्हणजे प्रस्तुत पुस्तक !
मैदानात जमा झालेल्या मुलांच्या घोळक्यात सुयुध्द लढत असलेल्या त्या दोन शिष्यांना अतिशय एकाग्रतेने पाहत होता. ते दोन्ही शिष्य एक गरुडध्वज तर दुसरा निलमध्वज गटाचे होते. गरुडध्वजच्या शिष्याच्या हातात तलवार होती तर निलमध्वज शिष्याच्या हातात भाला होता. अतिशय कुशलतेने ते दोघे एकमेकांशी लढत होते. प्रत्येक वार प्रत्येक डाव विचार करुन आणि वारंवार सराव केल्याने अचुक होता. त्या दोघांना लढताना पाहुन सांगणं कठिण होतं की नक्की कोण जिंकेल. सुयुद्ध अगदी बारकाईने त्यांच्या प्रत्येक हालचाली कडे लक्षपुर्वक पणे पाहत होता. ते करत असलेल्या हालचाली सुयुध्द एकेक करुन लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत होता.
‘चरैवेति, चरैवेति’ हे मनुष्यप्राण्याच्या प्रवासाचे सूत्र आहे. तो कुठून आला आहे याची त्याला एका मर्यादेबाहेर कल्पना नसते आणि पुढे कुठे चालला आहे याबद्दल नजिकचा भविष्यकाळ वगळता खात्रीही नसते. पण तो चालायचा थांबत नाही. इच्छा, नशीब, भावना, संकट, संधी यांपैकी कुठल्याही कारणांनी तो एकीकडून दुसरीकडे जात राहतो. जाताना सोबत आकांक्षा, स्वप्ने, नैराश्य, वासना, भावना, सवयी आणि यासगळ्या गोष्टी ज्यात बांधलेल्या आहेत ते संस्कृती किंवा परंपरा या नावाचं गाठोडं असतं. त्यात कुठेतरी त्याचा देवसुद्धा असतो.मध्येच कुठेतरी श्रांत होऊन विसावतो. शिदोरी उलगडतो.
"आमच्या खेळाचे नाव आहे "विकल्प". विकल्प म्हणजे पर्याय, या खेळात तुमच्या समोर तीन पर्याय आहेत आणि तुमच्यासाठी सर्वात चांगला पर्याय आम्ही आधीच निवडलेला आहे, तो पर्याय तुम्ही ओळखायचा, बाकीचे पर्याय फक्त भुरळ घालतील पण हा एकच पर्याय तुम्हाला यशस्वी करू शकतो"
"मी परत एकदा या खेळाचे नियम सांगतो, सोपे आहेत"
१) या खेळात, तुमच्या समोर तीन माणसे आहेत, त्यांची नावे आहेत "ए", "बी" आणि "सी"
२) त्यातला एक खरे बोलतोय आणि बाकीचे दोघे खोटे बोलत आहेत.
३) जो खरे बोलतोय त्याला पैशाची सर्वात जास्त गरज आहे.
ह्या कथे तील उल्लेख् केलेले मन्त्र ऋचा अनुष्ठान योग्य अधिकारी व्यक्ति चे मार्गदर्शना खाली करावी
कथेतिल प्रसंग सत्य घटने वर आधारित असून पात्र न्यावे लोकेशन्स बदल लेले आहेत
डील
"अवि आज तुला भेटण शक्य आहे ? ", पलिकडून समीर चा घाबरा आवाज .
"पण मी कोल्हा पुरात आहे, उद्या सकाळ पर्यन्त मुम्बई स पोहोचेन" .
"काय झाल ?" .
"फ़ोन वर सांगण नाही शक्य , पण उद्या तू असशील च ना ???"
"हो रे !", फोन ठेवला पण का कुणास ठाऊक मला समीर ची काळजी वाटायला लागली होती.
सकाळी मुम्बई ला पोहोचलो फ्रेश होई पर्यन्त bell वाजली , समीर दारात उभा होता , बरोबर अजून एक जण त्यांच्याच वयाचा, घाबरलेला चेहरा अस्वस्थ.
माझ्या खेड्यात अनेक जाती धर्माची माणसं आहेत. कुंभारवाडा आहे, महारवाडा आहे, मांगवाडा आहे, बागवान मुलाण्याची घरे आहेत. टेकावर न्हाव्याची वस्ती आहे. गावच्या मध्यभागी वीस खणी ब्राह्मणवाडा आहे. परिटांची अनेक घरे आहेत. बोळात लव्हाराची बैठी घरे आहेत. सोबत गुरवांची चार दोन घरेही आहेत. अशा अठरापगड जमाती आहेत. पण आपसात कधी हेवेदावे होत नसत. मारामाऱ्या झालेल्या कधी ऐकीवात न्हवत्या.
लहान असल्यापासुन ते म्हातारं होई पर्यंत आपल्या धर्मामधे इतक्या छान छान गोष्टी सांगितलेल्या आहेत. मी लहान असताना माझ्या आईने एक श्लोक शिकवला होता. जेवायला बसलो कि म्हण असं ती म्हणायची तेव्हा मी कटकट करायचो. काय तो तोच तोच श्लोक म्हणायचा मला इथे भुक लागलेय समोर घोडा का शेरा दिसतोय पण आई आपली म्हणतेय अम्म्म्म पहिले म्हण आई हातावर फटका मारुन श्लोक म्हणवुन घ्यायची.
" वदनी कवलं घेता नाम घ्या श्री हरी चे,
सहज हवन होते नाम घेता फुका चे||
जिवन करी जिवित्वा अन्न हे पुर्ण ब्रह्म ,
उदर भरणं नोहे, जानियेजे यज्ञ कर्म || "
प्रत्येक शब्दाला एक अर्थ असतो. त्यात एक सर्वमान्य असा भाग असतोच पण त्याशिवाय त्या शब्दाच्या अनुशंगाने आलेले आपले वैयक्तीक अनुभव, एखादी विशेष घटना, एखाद्या व्यक्तीने केलेला त्या शब्दाचा खास उच्चार अशा अनेक पातळींवर तो शब्द आपल्या मेंदूत कोरला जातो. 'टाटा' याचा अर्थ एक विशेषनाम असा असला तरी माझ्याकरता त्या शब्दाचा अर्थ 'उद्योग आणि विश्वास' असा कोरला गेला आहे. टाटांचे उत्पादन खरेदी करताना कधीकधी दर्जा थोडा कमी होता असेही झाले आहे पण तरीही आपण लुबाडले गेलोय असे कधीही वाटले नाही. याचे कारण तो दर्जा सुधारत जाणार आहे याची खात्री असते.