जुन्या लेखकांची पुस्तके

देव चालले : स्थित्यंतराची गोष्ट

Submitted by झंप्या दामले on 31 December, 2016 - 07:48

‘चरैवेति, चरैवेति’ हे मनुष्यप्राण्याच्या प्रवासाचे सूत्र आहे. तो कुठून आला आहे याची त्याला एका मर्यादेबाहेर कल्पना नसते आणि पुढे कुठे चालला आहे याबद्दल नजिकचा भविष्यकाळ वगळता खात्रीही नसते. पण तो चालायचा थांबत नाही. इच्छा, नशीब, भावना, संकट, संधी यांपैकी कुठल्याही कारणांनी तो एकीकडून दुसरीकडे जात राहतो. जाताना सोबत आकांक्षा, स्वप्ने, नैराश्य, वासना, भावना, सवयी आणि यासगळ्या गोष्टी ज्यात बांधलेल्या आहेत ते संस्कृती किंवा परंपरा या नावाचं गाठोडं असतं. त्यात कुठेतरी त्याचा देवसुद्धा असतो.मध्येच कुठेतरी श्रांत होऊन विसावतो. शिदोरी उलगडतो.

विषय: 

जुन्या लेखकांची पुस्तके

Submitted by मयुरी चवाथे-शिंदे on 10 May, 2016 - 06:18

इंग्रजी साहित्यातील बरीच पुस्तके ऑनलाईन वाचता येतात, कितीतरी PDF च्या स्वरुपात उपलब्ध असतात, अशा वेळेस मराठी पुस्तके, कादंबऱ्या मात्र कितीही शोधल्या तरी वाचयला मिळत नाहीत. विशेषत: नवीन वाड्ग्मय उपलब्ध असत, पण जे धडे, कादंबऱ्या लहानपणी वाचल्या आहेत त्या मात्र शोधून सापडत नाहीत. (आणि फावल्या वेळात एकदम पुस्तक समोर उघडून ऑफिसमध्येही वाचता येत नाही)

इथे बरेच जण असावेत ज्यांना या बद्दल काही माहित असेल. काही जणांकडे pdf असतील. तर अशी पुस्तक शेअर करता येतील का इथे. किंवा इ-मेल मध्ये वाचता येतील का?

प्रांत/गाव: 
Subscribe to RSS - जुन्या लेखकांची पुस्तके