सुयुध्द त्रिनेत्री आणि एक भयानक गुहा. भाग - १२

Submitted by Suyog Shilwant on 22 January, 2017 - 21:30

चॅप्टर पाचवा " सामना "

आज सुयुध्दला आश्रमात येऊन एक आठवडा झाला होता. आश्रमाच्या वेळा त्याच्या चांगल्याच अंगी पडल्या होत्या. सकाळी ब्रम्ह मुहुर्तावर उठणे, आपला नित्यकर्म आटपुन सकाळी 5 ला बाहेर पडणे हे आता रोजचे झाले होते. तो सर्व शिष्यांच्या जोडीला शिकत असताना आपले कौशल्य दाखवत होता. योगाभ्यास करताना ध्यानस्थ होऊन तो हल्ली हरवत नसे. अनेक योगासन तर त्याला सहज जमत होती. वेदशास्त्र आणि संस्कृत पठन त्याला चांगले बोध देत होते. शस्त्राभ्यास करताना त्याने तलवारबाजी, धनुर्विद्या, भाला चालवणे व इतर काही शस्त्रांचा वापर अगदी योग्य शिकला होता. मायावी शक्ती शिकताना त्याने नविन मंत्र विद्या आत्मसात केल्या होत्या. पंचतत्व व रुपांतरविद्या त्याला चांगल्या जमत होत्या त्यातले बारकावे तो सहज शोधुन शिकत होता. वनस्पति शास्त्र व उचारकशक्ती त्याने लवकर अवगत केले होते. एक दोन शिष्यांवर त्याने ऊपचारक शक्तीचा सफल प्रयोग ही केला होता. पशुशास्त्राच्या तासाला जेव्हा ते पशूंना भेटायला बाहेर जात असत तेव्हा तो सर्व पशुंशी बोलुन अगदी सहज त्यांना आपले मित्र करुन घेत असे. त्याच्या बरोबरीच्या शिष्यांना सुयुध्दचे नवल वाटायचे कारण त्याने एका आठवड्यात त्यांच्यापेक्षा दहा पटींनी प्रगती केली होती.

सुयुध्द आता पर्यंत शिकवलेल्या प्रत्येक प्रशिक्षणात प्रविण झाला होता. वर्गात इतर हुशार शिष्य त्याचा हेवा करु लागले होते. शस्त्रकलेत त्याने ह्या थोड्याच दिवसात चांगली कुशलता प्राप्त केली होती. कपिल सुर्यवंशीने त्याला शस्त्रकलेचा वर्ग संपल्यानंतर पुन्हा एकदा गरुडध्वज गटात सामील होण्याचे आमंत्रण दिले होते. पण सुयुध्दने त्याला नकार दिला होता. त्याचा नकार ऐकुन कपिलच्या मनात द्वेष भरला होता. कपिल प्रमाणेच गरुडध्वज गटातील अजुन एक शिष्या अश्विनी देशपांडे त्याच्यावर बाराकाईने नजर ठेवुन होती. सर्व विद्या लवकर अवगत करण्याच्या कौशल्याने कपिल व अश्विनीच्या मनात त्याच्या विषयी तिरस्कार निर्माण झाला होता. पण सुयुध्दला त्याची काहीच कल्पना नव्हती.

दिवस मावळल्यावर प्रशिक्षण संपवुन सगळे शिष्य आपापल्या खोल्यांवर गेले होते. रात्रीच्या वेळी जेवण आटपुन झाल्यावर सुयुध्द त्याच्या सवंगड्या सोबत उद्या होणाऱ्या सामन्यांच्या गप्पा ऐकत बसला होता. संदिप व समीरने त्याला आत्ता पर्यंत झालेल्या सामन्यांमधे काय मजा केली हे सांगायला सुरुवात केली. एकदा गरुडध्वज गटाशी सामना करताना कसे समीरने त्यांच्या अंगावर सर्पभ्रंश मायावी विद्या वापरुन साप सोडले होते. कसे संदिपने शंखध्वज गटाला चिखलाच्या दलदलीत अडकवले होते. असे अनेक किस्से सांगुन त्यांनी खोलीत एकच हसा पिकवला होता. नवल म्हणजे महेश आणि निलेश ही त्यांना एक एक किस्सा सांगुन त्यांच्यात सामील झाले होते.

" तुला क..काय वाटतं समीर. उ…उ..उद्या परीक्षेत मला उ…उत्तीर्ण होता येईल?"
गप्पा चालु असताना हर्षदने मध्येच विचारले.

समीर ने त्याचा डगमगता आत्मविश्वास जाणाला व लगेच म्हंटलं.
" अरे …मला सहज जमलं तर तुला का नाही जमणार."

सुयुध्द सर्वांना आता चांगला ओळखु लागला होता. हर्षद मधे आत्मविश्वासाची कमी आहे ते सुयुध्दला गेल्या काही दिवसात चांगलंच कळालं होतं. पण हर्षद चांगल्या मनाचा आहे हे मात्र त्याने नक्किच टिपलं होतं. त्यांच्या सवंगड्यां पैकी महेश वाघ जरी गरुडध्वज गटात असला तरी ही आश्रमातल्या शिष्यांमध्ये गटांमुळे आपसात कोणतेही वितुष्ट नव्हतं हे देखिल तितकच खरं होतं आणि सुयुध्दला त्याचे हे खोलीतले सवंगडी फारच आवडु लागलेले.

त्यांच्या सामन्याच्या चर्चा ऐकुन सुयुध्दला हे जाणण्याची इच्छा झाली कि प्रत्येक सामन्यात गरुडध्वज गटच का जिंकतो. असं काय कारण आहे की गरुडध्वज गट नेहमी सर्वांच्या पुढे असतो. त्याने समीर कडुन सामन्यांची अजुन काही माहीती मिळवण्यासाठी त्याला विचारले.

" समीर मला सांग गरुडध्वज गट कधीच हरला नाही."

" नाही. माझ्या माहिती नुसार गेली 5 वर्ष तरी नाही."
समीरने त्याला बघत उत्तर दिले.

" तुला काय वाटतं? असं का होत असेल?"
सुयुध्द गंभिर होत म्हणाला.

सगळे जण एकमेकांच्या तोंडाकडे पाहु लागले. महेश स्वतः गरुडध्वज गटात 2 वर्षांपासुन होता. त्याला हा प्रश्न बहुतेक आवडला नव्हता. त्याचा चेहरा हे सांगु शकत होता. त्याला रहावले नाही म्हणुन तो पटकन बोलुन गेला.

"कारण आमच्या गटात सगळे कुशल योध्दा आहेत आणि त्यांना जिंकायच कसं हे माहीत आहे."

सुयुध्दला त्याचा राग कळत होता पण त्याला फक्त हे कारण माहीत करायचे होते कि असं का होत आलं आहे.

सुयुध्द त्याला पाहत विचार करत होता. पण समीरने विषय बदलला.

" उद्या तु कोणत्या गटात निवडला जातोस ते तरी ठरु दे."
सुयुध्दच्या खाटेवर बसत समीर म्हणाला.

" हो…म…मला ना. पोटात गोळाच आ..आ..आलाय."
हर्षद मधेच म्हणाला.

" तु एवढा उगाचच घाबरत आहे. तु जर स्वतःवर विश्वास ठेवलास तर नक्कीच उत्तीर्ण होशील."
सुयुध्दने हर्षदला समजावत म्हंटले.

" माझे आजोबा, बाबा, काका सुध्दा निलमध्वज मधेच होते म्हणून मी पण त्यातच निवडलो गेलो. पण मी इतर कोणत्या गटात गेलो असतो तरी चालले असते. "
समीरने त्याला म्हंटले.

एव्हाना महेश अन निलेश आपापल्या खाटांकडे वळले होते. विनित, हर्षद अन सुयुध्द तिघे ही नविन शिष्य होते. हर्षदला जी भिती होती तशी सुयुध्दला नव्हती. न जाणे का पण उद्या होणाऱ्या सामन्यांच्या गोष्टी ऐकुन त्याला अजुन उत्साह आला होता. जेव्हा हर्षद आणि विनित आपल्या खाटेवर झोपायला गेले तेव्हा पुन्हा सुयुध्दने समीरला सामन्यांचे विचारले.

" सांग ना समीर. काय कारण आहे की तुम्ही नेहमी हरता."

" तसं खरं कारण मलाही माहित नाही. पण कपिल आणि अश्विनी दरवेळेस इतर गटांना हरवायला एक नविन युक्ती वापरतात. मी गेल्या वर्षभरात झालेल्या सामन्यात कित्तेकदा त्यांचा पाठलाग करुन ध्वज मिळवण्याचा प्रयत्न केला. पण काही फायदा झाला नाही. तीन बाधा पार करेस तोवर ते नेहमी ध्वज प्राप्त करुन परतलेले असतात आणि गरुडध्वज गट दरवेळी का जिंकतो हे जर मला कळले असते तर मी निलमध्वजचा गटनायक झालो नसतो का?"

समीरच्या बोलण्याने त्याला एक गोष्ट जाणवायला लागली होती कि गरुडध्वज गटात सामील न होऊन त्याने चुक तर केली नव्हती ना.

" काय झालं? असा गप्प राहुन कसला विचार करतोयस."

" मी विचार करतोय की कपिलचं निमंत्रण मी स्विकारायला हवं होतं का?" सुयुध्द खाटेवर पडुन विचार करत म्हणाला.

" गरुडध्वज गटानेच तुला कुशल योद्धा बनवलं असतं असं काही नाही. तुझे आजोबा सुध्दा निलमध्वज मध्येच होते आणि तुझे खापर पंजोबा सुध्दा."

समीरला आपल्या घराण्याची इतकी माहिती आहे हे ऐकुन तो खाटेवर उठुन बसला व त्याला म्हणाला.
" तुला कसं माहित?"

"अरे…माझ्या आजोबांनीच सांगितलं होतं. तुझे आजोबा त्यांचे चांगले मित्र होते ना."

" अच्छा…"

आज त्याला आपल्या घराण्याची आणखिन एक गोष्ट कळली होती. त्याच्या आजोबांनी कधीच त्याला ह्या गोष्टी सांगितल्या नव्हत्या. त्याला उद्याला होणाऱ्या सामन्यांची वाट पहायची होती. आजची रात्र काढुन उद्या त्याला सर्व काही अनुभवायच होतं. समीर बरोबर अजुन काही किरकोळ गप्पा मारुन तो झोपी गेला.

सकाळी जेव्हा त्याचा डोळा उघडला तेव्हा टेकडीवरच्या मंदिरातुन पहिला घंटानाद झाला होता. पण सामने असल्याने आज कोणतेही प्रशिक्षण वर्ग होणार नव्हते. त्यात आज रविवार ही होता. सगळी जणं आपली आवराआवर करण्यात व्यस्त होते. सुयुध्दने ही आपली तयारी केली व तयार होऊन तो समीर जवळ गप्पा मारत बसला. थोड्या वेळाने तो हर्षद व समीर सोबत बाहेर मैदानात येऊन थांबला. बाहेर अजुन अंधारच होता तांबडं फुटायला अजुन अर्ध्या पाऊन तासाचा अवधी होता. समीरने त्याला सांगितले की कोणतेही वर्ग नाहीत तेव्हा त्यांनी भोजनालयात जाऊन सकाळची न्याहरी करायचे ठरवले. त्यांच्या सोबत इतर ही बरेच शिष्य आज सकाळीच भोजनालयात जमले होते. पण आज वातावरण थोडं वेगळं होतं. एकाच गटाचे बरेच शिष्य घोळक्यामध्ये जमा होऊन चर्चा करत होते. आज सामान्यांत काय करावे याची योजना प्रत्येक गटात होत असावी. असे सुयुध्दला काही जणांच्या बाजुने जाताना जाणवले. पण तो अजुन कोणत्याही गटात नव्हता. पण आज काय तो निवाडा होणार होता. समीरने एका कोपऱ्यात जागा धरली. आपापल्या न्याहरीच्या पत्रावळ्या घेऊन ते तिघे खाली बसले आणि न्याहरी करायला सुरुवात केली.

" समीर तु नाही गेलास तुझ्या गटाच्या योजना ऐकन्यासाठी."
सुयुध्दने खाता खाता त्याला विचारले.

" जाणार आहे ना. पण आमची योजना नविन शिष्यांची निवड झाल्यावरच केली जाते."
समीरने पटकन म्हंटलं.

" म…म..मला ना. एकदम पोटात ग..ग..गोळाच आला आहे."
हर्षद म्हणाला.

" अरे घाबरू नको रे हर्षद…काय नाही होत. तुला कुठल्याच गटात नाही घेतलं तर अश्वध्वज गटात नक्कीच घेतील."
समीर म्हणाला.

" नक्की न..न…ना..?"

समीर हसला व म्हणाला.
" हो…हो…नक्की…हा पण.."

"प…प..पण काय?"
हर्षद घाबरत म्हणाला.

" पण मी कुठे अश्वध्वजचा गटनायक आहे. ते तर जगदिश गुरुजी आणि भरत तांबडे बघतील ना… हा पण काळजी नको करू तु नक्कीच त्या गटात निवडला जाशील."
समीर त्याला उगाच धीर देत म्हणाला.

सुयुध्दला आपली न्याहरी सन्पवुन बाहेर जायचे होते. म्हणुन समीरला थांबवत तो म्हणाला.

" गप रे समीर… त्याला उगाच काही पण सांगु नकोस. चला संपवा लवकर बाहेर जाऊयात."

सुयुध्दने बाहेर जायच्या उत्साहात आपली न्याहरी पटापट संपवली होती. मैदानात येऊन तो सुर्योदयाची वाट पाहत ऊभा राहिला. समीर त्याच्या गटच्या मुलांसोबत एका बाजुला निघुन गेला. मैदानात मुलांचा बराच कल्ला चालु होता. काही मोठे शिष्य मल्हारी गुरुजींची मदत करत होते. मैदानात त्यांनी बरीच शस्त्र जमा केली होती. ढाल, तलवार, धनुष्यबाण, भाले इतर बरच काही मैदानात त्यांनी आणुन एका ठिकाणी ठेवलं होतं. योगकेंद्राच्या बाजुला काही मोठे शिष्य एक मंच उभारत होते. ज्यावर एक सतरंजी अंथरली गेली. आकाशात एका बाजुला हळुहळु सुर्य उदयास येताना सुयुध्दने पाहिले. हळुहळु आकाशात प्रकाश दिसु लागला होता. सुयुध्द सोबतच ऊभा राहुन हर्षद त्याला सगळी तयारी का केली जात आहे हे सांगत होता. आज गुरु विश्वेश्वर स्वतः हे सामने पहायला व नविन शिष्यांची परीक्षा घ्यायला हजर राहणार होते.

सुयुध्दला परीक्षेची विशेष काळजी होती. आता पर्यंत शिकलेल्या विद्येची आज तो पहिल्यांदा परीक्षा देणार होता. त्याच्या मनाला फक्त ह्याच एका विचाराने घेरले होते. एका लाकडाच्या बाकावर बसुन तो सामन्यासाठीच्या तयाऱ्या होताना पाहत होता. जवळ जवळ सगळेच शिष्य आपल्या गटाच्या गणवेषात फिरत होते. आज सतरा नविन शिष्य गटांमधे निवडले जाणार होते ज्यात पंधरा मुलं आणि दोन मुली होत्या. प्रत्येक नविन शिष्याच्या चेहऱ्यावर परीक्षेची चिंता त्याला स्पष्ट दिसत होती. गटाचे शिष्य मात्र त्यांना दिलेली काम करण्यात आणि सामन्यासाठी योजना करण्यात व्यस्त होती. हर्षद त्याच्याच बाजुला जप करत बसला होता. त्याची अस्वस्थता सुयुध्दला कळत होती कारण त्यालाही आता काहीसं अस्वस्थता जाणवत होता. गटांच्या शिष्यांना त्यांच्या गटनायकांनी शस्त्र घेऊन सज्ज होण्यास सांगितले. तसं सुयुध्दला आपल्या मेघराज तलवारीची आठवण झाली. तो तडख तसाच उठुन वसतिगृहाकडे निघुन गेला. त्याला आज आपल्या ह्या शस्त्राची गरज लागणार कि नाही हे त्याला माहीत नव्हतं पण तरीही त्याने तलवार सोबत घेण्याचा निर्णय घेतला. वसतिगृहातुन पुन्हा तो हर्षद ज्या बाकावर बसलेला तिथे आला आता समीर ही तिथे येऊन थांबला होता. समीरने त्याला पाहताच म्हंटले.

" कुठे होतास तु?"

" माझी तलवार आणायला गेलो होतो."
सुयुध्दने हातातली मेघराज तलवार दाखवत त्याला म्हंटलं.

" बरं ठिक आहे. चला गुरु विश्वेश्वर आता कोणत्याही क्षणी येतील. तुमची परीक्षा पहिले घेतली जाणार आहे. त्या नंतर सामन्यांची सुरुवात होईल."

" हो चल."
असं म्हणुन सुयुध्द लगबगीने मैदानात योगकेंद्राच्या बाजुला असलेल्या मंचासमोर पटांगणात जाऊन नविन शिष्यां सोबत उभा राहीला होता. त्याने बाकीच्या शिष्यांना पाहिलं ते सर्व रांगेत एकामागोमाग एक उभे होते. थोडावेळ सगळे शांत होते मग मंचावर एक आसन ठेवण्यात आले. त्यावर कोण बसणार हे स्पष्टच होते. चैतंन्य गुरुजींना त्याने मंचावर येताना पाहिले. गुरुजी आपल्या नेहमीच्या भगव्या पेहरावात आले होते. त्यांच्या मागोमाग एक एक करुन मल्हारी सुर्यवंशी, अजिंक्य गरुड, शालीनी अग्निहोत्री, समिधा वैद्य, नारायण शास्त्री, वेदांत कुलकर्णी व सर्वात शेवटी जगदिश अडसुळ ही येऊन उभे राहिले. आसना लगत सर्व आपापली जागा पकडुन उभे राहीले. ज्यावेळी गुरु विश्वेश्वर मंचावर दाखल झाले तेव्हा अजिंक्य गुरुजींनी बोलायला सुरुवात केली त्यांच्या हातात एक कागद होता.

" आज आपल्या आश्रमात नविन शिष्यांची परीक्षा घेतली जाणार आहे. मी ज्या ज्या शिष्यांचे नाव घेईन त्यांनी मंचावर यायचे आहे आणि आपल्या विद्येचे कौशल्य दाखवायचे आहे. त्यांच्या योग्यते नुसार गुरुदेव स्वतः त्यांचा निकाल सांगुन त्यांना गटामध्ये निवडणार आहेत. ही निवड पुर्ण झाल्यावर आपल्या आश्रमाच्या साप्ताहिक सामन्यांची सुरुवात केली जाईल."

सुयुध्द जसा विचार करत होता त्यापेक्षा हे अगदिच वेगळ ठरलं होतं. संपुर्ण आश्रमासमोर त्याला आपले कौशल्य दाखवुन निवडले जाणार होते. त्याच्या मनात खुप भिती दाटु लागली. पहिल्यांदाच त्याला अशा प्रसंगाला तोंड द्यावे लागत होते. एकतर त्याला आश्चर्याने पाहणाऱ्या लोकांची कमी नव्हती त्यात असं शे-दोनशे लोकांसमोर आपली परीक्षा घेणार हे तर त्यात अजुन लाजिरवान होतं. आपण खरच हे सगळं करु शकु का? असे विचार त्याला खाऊ लागले. अचानक त्याची नजर मंचाच्या बाजुला उभ्या त्याच्या परिवारावर गेली. ते देखिल आज त्याला पाहणार होते. त्याने आईला आपल्याकडेच बघताना पाहिले ती त्याला एका विश्वासाने पाहात होती. आईला पाहुन त्याला मनात विचार आला कि आज काही झालं तरी घाबरायच नाही. शेवटी तो हे सर्व आपलं दायीत्व पुर्ण करण्यासाठी करत होता. एक मोठा श्वास घेत त्याने हसुन आई कडे पाहिले. अंजिक्य गुरुजी आता नविन शिष्यांची नावं पुकारत होते. सर्वात पहिलं नाव त्यांनी अभिषेक अग्निहोत्रीच घेतलं. सुयुध्दने त्याला मंचावर अतिशय आत्मविश्वासाने आणि शांत पणे जाताना पाहिले. त्याच्या बाजुला हर्षद अजुन जपच पुटपुटत होता.

" घाबरु नकोस हर्षद तुझी निवड होईल."
त्याने हर्षदला धीर देत म्हंटलं.

" न….न…नक्की ना. अरे म..म..मला खुप भिती वाटतेय."
हर्षद कापत कापत म्हणाला.

" मला पण वाटत होती. पण मी एक दिर्घ श्वास घेतला. तु पण घे."

त्याच्या सांगण्याप्रमाणे हर्षदने एक दिर्घ श्वास घेतला. सुयुध्दने त्याला अभिषेक कडे पाहायला सांगितले जेणे करुन त्याचं लक्षं भिती पासुन दुर जाईल. अभिषेकने जाताच सर्व गुरुजनांना प्रणाम केला. शालिनी अग्निहोत्री त्याच्या जवळ जाऊन कानात काही बोलताना सुयुध्दने पाहिले. अभिषेकने पाया पडुन त्यांचा आशिर्वाद घेतला होता. शालिनी बाई अभिषेकच्या आई होत्या हे तर त्याला आधीच समीरने सांगितले होते. पुढे त्याची परीक्षा सुरु झाली. अजिंक्य गुरुजींनी पुढे येउन त्याला मायावी शक्तीने अदृश होण्यास किंवा दिशाभुल मंत्र सांगण्यास सांगितले. अभिषेकने त्यांना दिशाभुल मंत्र म्हणुन दाखवला. अजिंक्य गुरुजी नंतर मल्हारी गुरुजींनी समोर येऊन त्याला एका मोठ्या शिष्याला निशस्त्र करण्यास सांगितले. अभिषेकने चांगलाच सराव केला होता हे दिसत होते. कारण अगदी दोन मिनिटात त्याने त्या मोठ्या शिष्याला तलवारबाजी करताना निशस्त्र केले होते. त्यानंतर नारायण गुरुजींच्या प्रश्नाचे उत्तर त्याने अचुक दिले होते. एक एक करुन प्रत्येक शिक्षकाने आपापल्या विषयाची परीक्षा घेतली होती. परीक्षा घेऊन झाल्या नंतर गुरु विश्वेश्वरांनी त्याला निलमध्वज गटात निवडले होते. पहिलाच शिष्य निलमध्वज मध्ये निवडुन गेला होता. त्यानंतर मल्हारी गुरुजींनी पुढचे नाव पुकारले. पुढचे नाव सुवर्णा पाटील ह्या मुलीचे होते. ती ही मंचावर गेली. तिची परीक्षा घेऊन झाल्यावर तिला गरुडध्वज मधे निवडले गेले. त्यांनंतर दिक्षा जाधव हि मिथुनध्वज मधे निवडली गेली. त्यानंतर जे नाव पुकारले गेले त्याने हर्षदच्या तोंडातुन एक किंकाळी निघाली होती कारण आता त्याची परीक्षा द्यायची बारी आली होती. हर्षद खुपच घाबरला होता ज्याने त्याला घाम फुटु लागला होता. ज्यावेळी त्याचे नाव अजिंक्य गुरुजींनी दुसऱ्यांदा घेतले तेव्हा सुयुध्द त्याला पाठीवर थाप मारुन पुढे ढकलत एवढच म्हणाला होता.

" तु करशील घाबरु नकोस. एक दिर्घ श्वास घे."

हर्षदला त्याचे म्हणणे कदाचित पटले होते. म्हणुनच त्याने मंचावर जाताना देवाचे नाव घेत हात जोडले होते. सर्व गुरुजनांना नमस्कार करत त्याने परीक्षेची सुरुवात केली होती. एक एक करुन प्रत्येक गुरुंनी त्याची परीक्षा घेतली. अडखळत, धडपडत त्याने आपली परीक्षा पास केली. गुरु विश्वेश्वरांनी जेव्हा त्याचा निकाल सांगितला कि त्याची निवड अश्वध्वज गटात झाली आहे तेव्हा तो गुरुंच्या पाया पडून रडला होता. सुयुध्दला त्याची निवड होताना पाहुन खुपच बरे वाटले होते. समीरशी नजरा नजर करुन त्याने समीरला खुशीत हसताना पाहिले होते. हर्षद नंतर अजिंक्य गुरुजींनी सुयुध्दचे नाव पुकारले होते. जिथे शिष्यांची थोडी फार कुजबुज होती त्याचं नाव ऐकता ती ही आता थांबली होती. सुयुध्दला स्वतःच्या ह्रदयाचे ठोके सुध्दा स्पष्ट ऐकु येत होते.
त्याचे मन अगदी खिन्न झाले होते. सगळ्यांच्या नजरा आता त्याच्यावर खिळल्या होत्या. आपली जड पावलं उचलत तो मंचापर्यंत गेला. त्याची आई त्याला मंचाच्या बाजुला शिड्यांजवळ उभी राहुन पाहत होती. त्याची आज्जी, आजोबा, बाबा सगळेच तिथे येऊन थांबले होते. त्याने त्यांच्या जवळ जाऊन पाया पडुन सगळ्यांचा आशिर्वाद घेतला. आजोबांनी त्याला आशिर्वादा सोबत एक सल्ला दिला होता.

" स्वतःवर विश्वास ठेव. आपले कुळदेवता महादेवांचे स्मरण कर."

मंचावर जाण्या आधी त्याने आजोबांचा हा सल्ला मानुन अगदी तेच केले. तो गुरु विश्वेश्वरांच्या पाया पडला. गुरुंनी त्याला यशस्वी भव: असा आशिर्वाद दिला. ईतरही गुरुजनांस त्यांने प्रणाम केला. अजिंक्य गुरुजी पुढे येत त्याला म्हणाले.

" मायवी शक्तीचा वापर करुन अदृश्य होणे. दिशाभुल मायाजाल वापरणे किंवा ओळखणे. ह्यापैकी कोणतेही एक करुन दाखव."

सुयुध्दने थोडा विचार केला मग त्याने अदृश्य होण्याचे ठरवले. त्याने हात जोडुन ध्यान लावत अदृश्य मंत्राचा जाप केला व तो अदृश्य झाला. सुयुध्द सर्व शिष्यांचे आश्चर्याने भरलेले चेहरे पाहत होता. समीर तर आपले डोळे चोळत होता. अजिंक्य गुरुजींनी त्याला पुन्हा प्रकट होण्यास सांगितले तसा तो पुन्हा
दृश्य झाला. अजिंक्य गुरुजी खुप खुश होते त्यांनी त्याला हसुन पाहिले व पुन्हा मागे जाऊन आपल्या स्थानावर उभे राहिले. त्यानंतर मल्हारी गुरुजींची बारी होती. ते पुढे आले व त्याला एक धनुष्यबाण देत म्हणाले.

" हा बाण असा मार की एका दमात तु दोन झाडांवरची फळं तोडशील. पण फळं बाणात छेदली गेली पाहिजेत."

सुयुध्दने आजुबाजुला पाहत एका रेषेत असलेली झाडं शोधली. मैदानाच्या बाजुला टेकडीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजुस अशी झाडं लावलेली होती ज्याला फळं आलेली. त्याने लक्ष देऊन पाहीले अलिकडे आंब्याचे झाड तर पलिकडे पेरुचे झाड होते. ती दोन्ही झाडं अशा स्थितीत होती कि त्याने जर नेम धरुन बाण मारला तर नक्की नव्हते की दोन्ही फळांना अचुक नेम लागेलच. त्यात अशा प्रकारच्या नेमबाजी साठी धनुर्विद्येचा खुप सराव असणे फारच गरजेचे होते. त्याने अखेर खुप बाजुंनी विचार करुन बाण धनुष्याच्या प्रत्यंचेवर चढवला व नेम धरला. खुप एकाग्रतेने नेम साधलेला बाण त्याने सोडला व मनात वायुदेवतेची प्रार्थना करु लागला. काय नवल त्याचा बाण दोन्ही फळांना छेदुन पलिकडच्या झाडात जाऊन रुतला होता. 3-4 वर्ष सतत सराव करुन जी धनुर्विद्या प्राप्त केली जाते असा काही असाध्य नेम आज सुयुध्दने साधला होता. मल्हारी गुरुजींनी मोठ्या शिष्यांपैकी एकाला झाडात रुतलेला तो बाण आणायला सांगितला. त्यांनी स्वतः जेव्हा तो दोन फळांना छेदलेला बाण पाहिला तेव्हा पहिल्यांदाच मल्हारी गुरुजी सुयुध्दला खुलुन हसताना दिसले होते. पुढे त्याची परीक्षा घ्यायला चैतन्य गुरुजी आले व म्हणाले.

" पंचतत्वांपैकी कोणत्याही तिन तत्वांचा वापर करुन दाखव आणि रुपांतरविद्या वापरुन ह्या काठीला तलवारीत रुपांतरीत कर."

सुयुध्दने आपले प्रशिक्षण घेताना एक एक विद्या अगदी लक्षपुर्वक पाहुन शिकली होती. त्याने हात समोर धरुन डोळे मिटले व अग्नीदेवतेचा मंत्र म्हंटला. त्याच्या हातावर अग्नी प्रज्वलित झाली होती. दुसऱ्या वेळेस त्याने दोन्ही हात जोडत वरुणदेवतेचा मंत्र म्हंटला. ऊजवा हात अर्घ सोडतो अशा पध्दतीने खाली सोडला तसं त्याच्या हातातुन पाणी खाली पडु लागले. तिसऱ्या वेळेस त्याने पृथ्वी तत्व निवडले होते ज्यासाठी त्याने शिव शंभुंचे स्मरण केले. आपले हात समोर धरुन जसजसे त्याने हलवायला सुरुवात केली. जमिनीची माती आपोआप वर येऊ लागली व त्याला हवा तसा आकार घेऊ लागली. त्याने मातीपासुन शंकराची पिंड बनवली होती. ती मातीची पिंड हवेत तरंगत त्याच्या हातात आली व त्याने तिला मस्तकी लावुन नमस्कार केला. चैतंन्य गुरुजींनी त्याच्या कडुन ती पिंड घेतली व आपल्या हातातली काठी त्याला देत तिच्या वर रुपांतर विद्येचा वापर करण्यास सांगितले. सुयुध्दने आपली नजर काठीवर रोखुन धरली व एका क्षणात ती काठी तलवारी मधे रुपांतरीत झाली. चैतंन्य गुरुजींनी त्याच्या कडुन ती तलवार परत घेतली व तिला पुन्हा काठीत रुपांतरीत केली सुयुध्दला शाब्बसकी देऊन ते पुन्हा आपल्या जागी जाऊन उभे राहीले.

पुढे नारायण शास्त्रींनी त्याला भगवान श्रीकृष्णाने महाभारताच्या युध्दा वेळी अर्जुनाला क्षत्रीय धर्मा बद्दल काय उपदेश केला होता हे विचारले होते. सुयुध्दने एक क्षण विचार केला व म्हणाला.

" शौर्य तेजोधृति र्दाक्ष्यं युद्धे चाप्यपलायनमं।
दानमीश्वर भावश्च क्षत्रं कर्म स्वभावजम॥

अर्थात शुरविरता, तेज, धैर्य, युध्दात चतुरता, युध्दापासुन न पळणे, दान, सेवा, शास्त्रानुसार राज्यशासन, पुत्रा समान प्रजेचे पालन करणे - हे सर्व क्षत्रियाचे स्वाभाविक कर्तव्य - धर्म आहेत."

सुयुध्दचे उत्तर अगदी बरोबर होते जे ऐकुन नारायण शास्त्री खुप खुश दिसले. नारायण शास्त्री नंतर वेदांत गुरुजी आले व त्याला मयुरासन करण्यास सांगितले. सुयुध्दने पटकन करुन दाखवले. त्यानंतर शालिनी अग्निहोत्री आल्या. त्यांच्या हातात एक चाकु होता त्यांनी चाकुने आपल्या तळहातावर वार केला व त्याला ती जखम उपचारक शक्ती वापरुन बरी करण्यास सांगितली. सुयुध्दने डोळे मिटून त्यांचा हात आपल्या हातात घेतला व दोन मिनिटात त्यांची जखम बरी केली. समिधा वैद्य जेव्हा आल्या त्यांनी त्याला दोन व्याधींसाठी कोणत्या औषधी वापराव्या लागतील हे विचारले. त्याने चटकन उत्तर दिले व कसा उपचार करावा हे देखिल सांगितले. त्याच्या उत्तराने वैद्य बाई समाधानी दिसल्या व आपल्या जागी जाऊन उभ्या राहिल्या. सर्वात शेवटी जगदिश गुरुजी आले व त्यांनी सुयुध्दला तीन पशूंची माहीती विचारली जी सुयुध्दने क्षणाचाही अवधी न घेता सांगितली. त्यानंतर त्यांनी सुयुध्दला भुमिज्ञानाच एक कोडं विचारलं सुयुध्दने त्याचेही अचुक उत्तर दिले.

सगळ्या विषयांची परीक्षा घेतल्यानंतर आता वेळ होती गुरु विश्वेश्वरांनी त्याचा निकाल सांगुन गटामधे निवड करण्याची. सुयुध्दला चिंता वाटत होती की तो उत्तीर्ण होईल ना? तो फक्त निकालाची वाट पाहत होता. गुरुविश्वेश्वरांनी थोडा वेळ सर्व शिक्षकांशी चर्चा केली. सुयुध्दचा जिव अगदी टांगनीला होता. त्याच्या मनात धाकधुक होती. गुरु विश्वेश्वर चर्चा करुन त्याला पाहत होते. दोन एक क्षण त्याला पाहत गुरु गप्प राहुन विचार करत होते. जेव्हा गुरुंनी त्याला निलमध्वज गटात निवडले. मैदानात उभ्या निलमध्वजच्या शिष्यांनी कल्ला करत उत्साहात आरडाओरड केली. अजिंक्य गुरुजींनी सर्व शिष्यांना शांत केले व सुयुध्द्ला निलमध्वजचा गणवेष देऊन खाली जाउन निलमध्वज गटात सामील होण्यास सांगितले. अजुन बरेच नविन शिष्य निवडायचे होते. तेव्हा त्यांची परीक्षा एक एक करुन घेण्यात आली. उरलेल्या 12 शिष्यांपैकी अक्षय निलांबरे मिथुनध्वज मधे गेला. वसतिगृहात त्याचा सोबती विनित नांगरे सुध्दा निलमध्वज मधेच निवडला गेला. संजय लोणे शंखध्वज, नरेश दाणवे गरुडध्वज, हरीश शिंदे अश्वध्वज, कौस्तुभ बेलगावकर मिथुनध्वज, आशिष येवले अश्वध्वज, ईश्वर जाणकर शंखध्वज, ओमकार जेधे गरुडध्वज, गंधर्व मजुमदार शंखध्वज, राजेश भोसकर अश्वध्वज व सम्राट काळे जो शेवटचा नविन शिष्य होता निलमध्वज मधे निवडला गेला.

गरुडध्वज, निलमध्वज, अश्वध्वज, शंखध्वज व मिथुनध्वज
असे पाच गट आज एकमेकांशी सामना करणार होते. गरुडध्वज गटाचे प्रमुख मल्हारी सुर्यवंशी होते त्यांच्या गटाची ओळख लाल टि शर्टवर गरुडाचे चिन्ह होते. निलमध्वज गटाचे प्रमुख अंजिंक्य व चैतन्य गरुड हे दोघे भाऊ होते. त्यांच्या गटाची ओळख निळ्या टि शर्टवर ब्रम्हचक्राचे चिन्ह होते. अश्वध्वज गटाचे प्रमुख जगदिश अडसुळ होते. मातकट रंगाच्या टि शर्टवर सफेद अश्वाचे चिन्ह हे त्यांच्या गटाची ओळख होती. शंखध्वज गटाचे प्रमुख वेदांत कुलकर्णी व नारायण शास्त्री होते त्यांच्या गटाची ओळख पिवळ्या टि शर्टवर सफेद शंखाचे चिन्ह होते. मिथुनध्वज गटाच्या प्रमुख समिधा वैद्य व शालिनी अग्निहोत्री गुरुवर्या होत्या. त्यांच्या गटाची ओळख हिरव्या टि शर्टवर सफेद वर्तुळात उगवत्या रोपाचे चिन्ह होते.

नविन शिष्यांची परीक्षा व निवड झाल्यानंतर अजिंक्य गुरुजींनी नविन व जुन्या शिष्यांना सामना थोड्यावेळात सुरु होईल असे सांगितले होते. परीक्षे दरम्यान 2 तास गेले होते. सकाळचे 9 वाजत आलेले सुर्य चांगलाच आकाशात आला होता. सुयुध्द वसतिगृहात जाऊन त्याचा निलमध्वजचा निळा टी शर्ट ज्यावर ब्रम्हचक्राचे चिन्ह होते घालुन आला. मैदानात आल्यावर त्याच्या सोबत समीर, हर्षद व विनित ही होते. भले हर्षदची निवड अश्वध्वज मध्ये झाली होती पण तो खुष दिसत होता. हर्षदला अश्वध्वजच्या एका मुलाने बोलावुन त्याच्या सोबत नेले. सुयुध्दने पाहीले कि निलमध्वजचे शिष्य रस्त्यालगतच्या एका झाडाजवळ जमले होते. सुयुध्द, विनित व समीर त्या दिशेला निघाले असताना सुयुध्दने समीरला विचारले.

" आता तर मी पण निलमध्वज गटात आलोय. आता तरी सांग तुम्ही या वेळी गरुडध्वजला हरवण्यासाठी काय योजना केली आहे?"

" अरे बाबा…सांगतो शांत रहा जरा…" समीर वैतागत म्हणाला.

त्याने आजुबाजुला पाहिले कि त्याला कोणी ऐकत तर नाहीये ना. मग त्याने बोलायला सुरुवात केली.
" हे बघ ह्यावेळी निलमध्वज वेगवेगळे योध्दांचे गट करणार आहे. एक जो गरुडध्वजचा व इतर गटांचा सामना करेल व दुसरा जो दुसऱ्या गटांच्या आधी ध्वजापर्यंत पोहचेल. म्हणजे यावेळी आम्ही वेगवेगळ्या गटात विभागुन गरुडध्वज व इतर गटांचे ध्यान भटकवणार आहोत."

" हं…" सुयुध्द विचार करत उदगारला.
एवढं बोलुन होई पर्यंत ते झाडाजवळ पोहोचले होते. सुयुध्द जसा निलमध्वजच्या गटात जाऊन उभा राहिला. तसे सर्व शिष्य त्याला पाहु लागले. एक धडधाकट काळासावळा उंचसा मुलगा समोर आला व त्याला म्हणाला.

" मी सौरभ आत्माराम दिघे. मी निलमध्वजचा गटनायक आहे. सुयुध्द तुझं निलमध्वज मध्ये स्वागत आहे. आम्हाला तुझ्या सारख्याच एका योद्धयाची गरज होती."

" धन्यवाद" सुयुध्द त्याला हात जोडत म्हणाला.

सौरभने विनितचे ही स्वागत केले व त्यांना पुढे म्हणाला.

"समीरने तुला आमच्या योजने बद्दल सांगितलेच असेल. तर ह्यावेळी वेगवेगळ्या गटांपैकी एका मुख्य गटाचे नेतृत्व मी करणार आहे आणि एका गटाचे नेतृत्व मी समीरला देत आहे. माझ्या गटाचे काम ध्वजापर्यंत पोहचणे असेल. समीर तुझ्या गटाचे काम गरुडध्वज व इतर गटांशी सामना करणे व त्यांना भुलवणे असेल."

" ठिक आहे. पण माझ्या गटात मला सुयुध्द आणि विनित दोघेही हवेत."
समीर त्याला म्हणाला.

" हो..चालेल. तुला अजुन कोण हवयं ते ही सांग. कारण मला मग दुसरे गट निवडायला."
सौरभ त्याला म्हणाला.

समीर ने सात मुलं व चार मुली आपल्या गटात निवडले. सुयुध्द व विनितला पकडुन त्यांच्या गटात आता एकुण 14 जणं होती. समीरला आपल्या जबाबदारीचा बराच सराव असल्याचे सुयुध्दला दिसले कारण समीर प्रत्येकला आपली कामगिरी सांगत होता. जेव्हा ते कोणती बाधा पार करत असतील तेव्हा मुलींना त्याने धनुष्यबाण घेऊन झाडांवर चढुन किंवा आडोसा धरुन विरोधी पक्षास निशस्त्र करण्यास सांगितलेले. मुलांना त्याने तलवार व भाले घेऊन चारी बाजुने येणाऱ्या संकाटापासुन सावध राहण्याचे काम दिले होते. सगळ्यांना आपली काम सांगुन त्याने सुयुध्दला सर्वात महत्वाची कामगिरी दिली होती. दिशा व मायावी जाल शोधण्याची व रोखणाची. त्यांची चर्चा सुरु असताना अजिंक्य गुरुजींनी मंचावर येऊन सर्व गटातील शिष्यांना तलावाच्या काठाशी यायचा आदेश दिला.

तलावाच्या एका बाजुला सर्व गटातील शिष्यांना उभे करण्यात आले होते. समोर सुयुध्दला जंगल दिसत होते. सुयुध्दच्या अंगात एक वेगळाच उत्साह भरुन आला होता. पहिल्यांदाच तो अशा कोणत्या सामन्यामधे भाग घेत होता. मल्हारी गुरुजी सामना सुरु करण्यासाठी शंख घेऊन आले. गुरु विश्वेश्वर टेकडीलगतच्या वडाच्या झाडाजवळ उभे होते. त्यांनी बोलायला सुरुवात केली.

" आज होणारा सामना हा आपल्या नेहमीच्या सामन्यांपेक्षा वेगळा आहे. ह्या सामन्याचे काही नियम आहेत ते तुम्हाला पाळायचे आहेत. कोणालाही घायाळ करायचे नाही. शस्त्रांचा वापर विरोधी निशस्त्र होईस तोवरच करायचा. मायावी शक्तीने कोणाच्या जिवास धोका होईल असे काही करायचे नाही. हे तीन नियम जर तुम्ही पाळले नाहीत तर त्या गटास सामन्यांमधुन बाद करण्यात येईल. यापुढे तुम्हाला काय करायचे आहे ते मल्हारी गुरुजी सांगतील."

मल्हारी गुरुजी तलावाच्या काठावर सर्व शिष्यांकडे पाहत उभे होते. त्यांनी बोलायला सुरुवात केली.

" मी शंख फुकताच तुम्हाला तलाव पार करायचा आहे. दुसऱ्या बाजुला शस्र व तुमच्या गटाचे ध्वज भेटतील. ते घेऊन तुम्ही जंगलामधे शिरताच तुम्हाला दिशा शोधत व अनेक बाधा पार करत ध्वजखांबापर्यंत जायचे आहे. ध्वज खांबा जवळ तुमच्या गटाचे प्रमुख असतील. तुम्हाला आपला ध्वज तुमच्या गटप्रमुखास देताच एक कोडे दिले जाईल ज्यात ध्वज मिळवण्यासाठीचे उत्तर आहे ते कोडे सोडवताच तुम्हाला खांबावरचा ध्वज प्राप्त करुन ह्या वडाच्या झाडाशी यायचे आहे. जो गट सर्व नियमांचे पालन करुन प्रथम इथे येईल त्याला विजयी घोषीत केले जाईल."

एवढ बोलुन मल्हारी गुरुजींनी त्यांच्या हातातला शंख तोंडाशी लावुन फुंकला. शंखाचा आवाज ऐकताच सुयुध्दने तलावात उडी मारली. त्याच्या सोबतच सगळ्यांनी तलावात पोहायला सुरुवात केली होती. सर्वजण आपापल्या परिने प्रयत्न करत होते. पोहत पोहत तो तलाव पार करुन दुसऱ्या बाजुस पोहचला. त्याने शस्त्र ठेवलेल्या पेटाऱ्याजवळ चैतंन्य गुरुजींना उभे पाहिले त्यांच्या बाजुलाच निळ्या ध्वजाने भरलेली एक पेटी ठेवली होती. त्याने ध्वज घेतला व समीरला बाजुला येताना पाहिले. त्याच्या गटातील सर्व जण येईस तोवर त्याने वाट पाहीली. निलमध्वजचे सर्व शिष्य एका ठिकाणी जमले होते. सौरभने त्यांना काय करायचे ते सांगितले व सर्वांनी आपापली शस्र घेतली. सुयुध्दने त्याच्या सोबत त्याची मेघराज तलवार सकाळीच घेतली होती जी अजुनही त्याच्या कमरेला लटकत होती. आपल्या गटानुसार सर्व जंगलाच्या आत शिरले. आत गेल्यावर हळूहळू प्रत्येक गटाचे शिष्य वेगवेगळ्या दिशेला निघुन गेले. समीर ने सुयुध्दला एका ठिकाणी थांबवुन विचारले.

" कोणत्या बाजुला जायचे?"

सुयुध्दने आजुबाजुला पाहिले जिथे नजर जाईल तिथे झाडं झुडपं होती. एका मोठ्या झाडाच्या खाली सावलीत सर्वजण सुयुध्दला पाहत उभे होते. सुयुध्दने एक क्षण विचार करत भुमिज्ञान विद्या वापरण्याचे ठरवले. डोळे मिटुन तो ध्यान लावु लागला. त्याला दिशा कळाली होती त्याने खाली जमिनीला हात लावला व एका त्याच्या उजव्या दिशेला बोट दाखवत म्हणाला.

" आपल्याला ह्या दिशेला जायचंय."

सुयुध्दच्या भरोशावर सर्वजण त्याने सांगितलेल्या दिशेला निघाले होते. दाटी वाटीच्या जंगलातुन त्यांना अजुन कितवर लांब जायचे होते हे त्यांना माहित नव्हते. जंगलातला हा सामन्यांचा अनुभव सुयुध्दला आवडत होता. सगळीकडे नजर ठेवत पावला पावलाला आवाज ऐकुन कानोसा घेत ते जंगलात अजुनच आत शिरत चालले होते.

क्रमशः

पुढचा भाग लवकरच…..
________________________________________________

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आज पण आमची उत्सुक्ता तुम्ही 'सलाईन' वर लावली...., येवढा त्रास देउ नका हो....!! दिवसेदिवस तुमची कथा 'इन्टरेस्टीन्ग' होत आहे....!!! हा भाग खुपच आवडला...!!! पुढील भागाच्या प्रतिक्षेत...!!!

आई शप्पथ एकदम भारी....! आता पुढचा भागात काय होईल ह्याची उत्कंठा अजुन वाढलिये....विनंती आहे की पुढचा भाग लवकर लिहा....सूयोग सर...मध्येच अधांतरी टाकुन लटकवु नका.

अब्दुलजी सलाईन लावल्याशिवाय पेशंटला बरं कसं वाटणार...नाय का? कथेत तुमचा इंटरेस्ट टिकुन राहण्यासाठीच कथा लवकर पोस्ट करत आहे. तुमच्या भावना मला कळतं आहेत... but a little twist and suspense adds a great test to the story...

संदिपजी आपली उत्कंठा कायम राखण्याचे मी अथक प्रयत्न करेन... वाचत रहा.

आपल्या प्रतिसादा साठी खुप खुप धन्यवाद...!

सुयोग सर हा भाग खुपच भारी जमला...तुम्ही लय भारी लिहिताय... मला तर चैनच पडत नाही पुढे काय होईल हे जाणल्या शिवाय...!

म्हणजे सुयुध्दचा सामना चालु झालाय खरा पण पुढे काय होणार हे माहित नसल्याने अजुनच उत्कंठा होत आहे...

मी समजु शकतो संदिप जी पण पुढचा भाग येईस तोवर तुम्हाला वाट पहावीच लागणार...

माझी कथा तुम्हाला इतकी आवडली आहे हे जाणून आनंद झाला..

वाचत रहा...

पुढचा भागात काय होईल
ह्याची उत्कंठा अजुन वाढलिये....
विनंती आहे
की
पुढचा भाग लवकर लिहा....
सूयोग सर...

नविन भाग कधी येणार? सुयोग सर...
उत्कंठा वाढत चालली आहे. तुम्ही पुढचा भाग पोस्ट केला का नाही हे पाहण्यासाठी दररोज मायबोलीचे चक्कर मारतोय...
लवकर लिहा...

वाचकहो, एक वेगळाच प्रतिसाद देत आहे ... झेपला नाही तर कानाआड टाका. सगळ्या लिखाणात शुद्धलेखनाचा अभाव प्रकर्षाने जाणवला. अलीकडे मराठी लिखाणाला व्याकरणाचे नियम लागू होत नाहीत की काय? बोलीभाषा वेगळी असते. वाचकांनी लिहिलेले प्रतिसाद मराठी मधे नसून प्र्रकृत किंवा अर्धमागधीमधे लिहिल्यासारखे वाटले.

उद्या संध्याकाळ नंतर पुढचा भाग सादर असेल...लिखाण चालू आहे. आपली उत्कंठा जास्त ताणुन नाही धरणार उद्या पुढचा भाग येणारच...
आपल्या प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद...ऍना.

बालम माझ्या लिखाणातही काही चुका दिसत असतील तर जरुर सांगा...

नविन भाग लवकर लिहा.... पुढच्या भागात काय होईल
ह्याची उत्कंठा अजुन वाढत चालली आहे. ..

नविन भाग लवकर लिहा.... पुढच्या भागात काय होईल
ह्याची उत्कंठा अजुन वाढत चालली आहे. ..

आपल्या सर्वांची मी माफी मागतो. उशिर होण्याचे कारण माझा अपघात झाला होता. हाताला व पायाला इजा झाली होती. आता मी बरा आहे. कथा पुढे लिहित आहे दोन दिवसात पुढचे भाग सादर असतील.