देह देवाचे मंदिर.

Submitted by Suyog Shilwant on 9 September, 2016 - 17:37

लहान असल्यापासुन ते म्हातारं होई पर्यंत आपल्या धर्मामधे इतक्या छान छान गोष्टी सांगितलेल्या आहेत. मी लहान असताना माझ्या आईने एक श्लोक शिकवला होता. जेवायला बसलो कि म्हण असं ती म्हणायची तेव्हा मी कटकट करायचो. काय तो तोच तोच श्लोक म्हणायचा मला इथे भुक लागलेय समोर घोडा का शेरा दिसतोय पण आई आपली म्हणतेय अम्म्म्म पहिले म्हण आई हातावर फटका मारुन श्लोक म्हणवुन घ्यायची.

" वदनी कवलं घेता नाम घ्या श्री हरी चे,
सहज हवन होते नाम घेता फुका चे||
जिवन करी जिवित्वा अन्न हे पुर्ण ब्रह्म ,
उदर भरणं नोहे, जानियेजे यज्ञ कर्म || "

हा श्लोक म्हंटल्या नंतरच आम्हाला आई जेवायला द्यायची. ह्या श्लोकाचा जर अर्थ कळला तर आपल्या लक्षात येतं कि भगवत गितेमध्ये हेच श्री कृष्णाने संस्कृतमध्ये सांगितले आहे.
" अहम वैश्वानरो भुत्वा प्राणीनाम देहमाश्रीत: |
प्राणापान समायुक्त पचामिन्यम चतुर्विधम || "

श्रीकृष्ण सांगतो अरे अर्जुना अरे पार्था अरे सामन्यजिवा तुझ्या देहा मधे भुकेच्या रुपाने अग्निनारायणाच्या रुपाने मी साक्षात परब्रह्म परमस्वरुप परमेश्वर राहतो आहे. तु जे अन्नाची आहुती 'कवल म्हणजे घास' हा घास जो देतोयेस तोच घास आहुती म्हणुन दे. ' उदर भरणं नोहे ' पोटाची खळगी भरतोयस या भावनेनं देऊ नकोस. एक होमकुंड पेटलेलं आहे तुझ्या देहामध्ये भुकेच्या रुपाने आणि तिथे जो अग्नि प्रज्वलित झालेला आहे. त्या अग्निच्या शिखेवरती मी साक्षात वैश्वानर ह्या नावाने हा अग्निनारायण हा परमेश्वर राहतोय. तु दिलेल्या अन्नाची आहुती तो स्विकारतोय. प्रसन्न होऊन विचारतोय. "बोल बेटा तुझे क्या चाहिये" पर हम सुनते ही नही हैं | हम सिर्फ खाना खाते है और जल्दी जल्दी मे जाते है | क्युँ...? क्युँ की मंदिर बंद हो जाएगा |

अरे मंदिर को मारो गोली...! भगवान तुम्हारे अंदर है |
कारण काय… देह देवाचे मंदिर आहे. जसा माझा देह नसुन ते एक मंदिर आहे त्या मंदिरामध्ये परमेश्वर भुकेच्या रुपाने राहतो. तसच आपण देवळात जातो. देवळाच्या बाहेर भिकारी बसलेले असतात. आम्ही त्यांना भिकारीच समझतो आणि एक रुपया, दोन रुपये, पाच रुपये देतो. फारच कधी उदार झालो तर दहाची नोट पण देतो आणि आत जातो. खरा परमेश्वर बाहेर बसलेला असतो. त्याच्या पोटामधे धगधगत्या भुकेच्या रुपाने अग्निनारायण प्रज्वलित झालेला असतो. पण आम्ही आमच्या पेढ्यांचा डब्बा त्याला नाय देत. त्या भिकाऱ्याला काय भिक घातली कि मिळवलं पुण्य...फारच राजा कधी उदार झाला तर....सव्वा किलो पेढे मात्र आम्ही देवाला चढवणार...देव फक्त कुत्सितपणे हसतो. म्हणतो अरे गाढवा बाहेर मी बसलो होतो रे तुझी वाट बघत पण तु त्याच्या समोर भिक टाकलीस दहा रुपयाची. आता हे पेढे नको मला तुझे. जा घेऊन जा बाळा.

तर ही जी अन्न खाण्याची जी प्रक्रिया आहे. ती तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या देहामध्ये घडतेय. ती घडत असताना जे आपण अन्न खायोय. मग ते भले चकली असु दे, शेव बटाटा पुरी असु देत अगदी तुमच्या पुण्यातली वैशालीची एस बी डि पी असु देत, नायतर आणि कुठल्या खास होटेल मधल्या कोंबडीची तंगडी असु दे. का मासा असु दे. का तुमचं काय अजुन काय नोनव्हेज खाणं असु दे. अन्न हे पुर्णब्रह्म आहे आणि हे पुर्णब्रह्म स्विकारताना त्याच्याकडे एक क्षणभर फक्त थांबुन बघायचं असतं. त्याला एकदा नमस्कार करायचा असतो मनोमन आणि म्हणायचं " हे परब्रह्मा ह्या देहाला ज्या काय कमतरता आहेत. जे काय माझ्या देहाला कमी पडतय. ती कमी पुर्ण कर. हे परब्रह्मा तु समर्थ आहेस. मी तुला नमस्कार करतो आणि तुला लागणारी आहुती मी अग्निनारायणाला देत आहे ती स्विकार कर."

ही साधी प्रार्थना करुन आपण जर अन्नाचं ग्रहण केलं. गिळलं नाही ग्रहण केलं. तर आपल्याला कोणत्याही देवळात जायची कधीच गरज भासणार नाही.
त्
असा चांगला संस्कार आपल्या साधु संतानी आपल्यावर केला आहे. तो साबुत रहावा अशी ईश्वर चरणी प्रार्थना...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान!!! आवडलं!!! आपण अन्न हे पूर्णब्रह्माचे केलेले विवेचन आवडले आणि पटलेही. आपण फार कळकळीने लिहिल्याचे जाणवले.
तसेच अन्नाचे शांतपणे सेवन करताना नेहमी मनाची एकाग्रता राखणे आणि चित्तवृत्ती उल्हसित रहातील याची काळजी घेणे आवश्यक आहे. ज्यायोगे भगवान अग्निणारायण आपण दिलेल्या आहुतीचा आनंदाने स्वीकार करतील.