पुस्तक

वृक्षगान

Submitted by टीना on 6 February, 2017 - 14:59

कालचं डॉ. शरदिनी डहाणूकर यांनी लिहिलेलं पहिलंवहिलं पुस्तक 'वृक्षगान' वाचुन काढलं.
येथे असलेल्या निसर्गप्रमी माबोकर शांकलीकडून याबद्दल ऐकलं होत आणि वाचायच पक्क केलं.
सुंदर, अप्रतिम अनुभूती.

'इज पॅरीस बर्निंग?' ...जेव्हा एक पुस्तक परत भेटतं!

Submitted by ललिता-प्रीति on 6 February, 2017 - 02:52

साधारण दीड वर्षांपूर्वीची गोष्ट. कुटुंबासमवेतच्या सुट्टीनिमित्त युरोपमधे होते; त्यातही पॅरीस शहरात! मात्र तिथल्या ट्रॅफिकनं इतका वात आणला होता, की आमच्या पॅरीस-कार्यक्रमात आम्हाला काटछाट करावी लागली होती. पण कधीकधी सगळं मनाविरुद्ध घडत असतानाही एखादाच निसटता अनुभव असा येतो की त्याआधीच्या नाखुष करणार्‍या घटना आपण कधी आणि कश्या विसरून जातो ते कळत देखील नाही. पॅरीसमधल्या अखेरच्या संध्याकाळी मला असाच एक अनुभव येणार होता आणि आमची पॅरीस-भेट किमान माझ्यापुरती तरी अगदी संस्मरणीय बनून जाणार होती. त्याला कारणीभूत ठरणार होतं एक खूप जुनं इंग्रजी पुस्तक!

साहित्यिक लोकांना , जनतेच्या पैशावर फुकटची मेजवानी झोडायला मिळत नाहीए . म्हणून या लोकांनी तोडलेले तारे ..

Submitted by अभि१ on 26 January, 2017 - 09:20

डोंबिवलीत ‘निवडणूक’ संमेलन!
Maharashtra Times | Updated: Jan 24, 2017, 12:37 AM IST

वसंतलावण्य : एका जादुगाराची चित्तरकथा

Submitted by झंप्या दामले on 23 January, 2017 - 05:03

आपण सगळे अतिशय सुदैवी आहोत, कारण चित्रपट संगीताच्या माध्यमातून आपल्यावर गेली जवळपास पाऊणशे अवीट शब्द-सुरांची बरसात होत आलेली आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकार, संगीतकार, गीतकार यांच्याबद्दल सुदैवाने प्रचंड प्रमाणात हिंदी व इंग्रजी साहित्य उपलब्ध आहे.

सुयुध्द त्रिनेत्री आणि एक भयानक गुहा. भाग - १२

Submitted by Suyog Shilwant on 22 January, 2017 - 21:30

मुलांसाठी वाचन गट

Submitted by अल्पना on 19 January, 2017 - 23:43

आम्ही काही मैत्रिणी गेल्या काही दिवसांपासून मुलाच्या मित्र-मंडळींसाठी एखादा वाचनगट सुरु करण्याच्या विचारात आहोत. शाळेत असा काही उपक्रम नाही आणि जवळपास वाचनालयही नाही.
मुलांचा वयोगट ७-८ वर्षे आहे. सध्या तरी चार मेंबर तयार आहेत. उपक्रम सुरु झाल्यावर अजून मुले तयार होतिल.
वाचनाची आवड असणारी, रोज काही ना काही वाचायला हवे असणारी, कधीतरी वाचणारी आणि अजिबात न वाचणारी अशी सगळ्या प्रकारची मुले आजूबाजूला आहेत.
सगळ्यात मोठी अडचण पुस्तकांची येईल. आम्हाला माझ्या घरी असणाऱ्या आणि मी वाचनालयातून आणलेल्या पुस्तकांचा वापर करावा लागेल. एका पुस्तकाच्या अनेक आवृत्त्या मिळणार नाहीत.

शब्दखुणा: 

कथा विवेकानंद शिलास्मारकाची

Submitted by झंप्या दामले on 18 January, 2017 - 14:20

स्वामी विवेकानंद म्हणजे ऊर्जा, चैतन्य, विचार यांचे तेजस्वी प्रकटीकरण. पूर्वेच्या वंगभूमीत जन्मलेला, वाढलेला हा तरुण या राष्ट्राच्या शोधासाठी घराबाहेर पडला, निरीक्षण, संवाद, अभ्यास, चिंतन करत करत देश पालथा घातला आणि सरतेशेवटी भारताच्या दक्षिणतम टोकावर जाऊन त्यांनी सर्व अनुभवांचे मनन केले तेव्हा त्यातून त्यांना त्यांच्या पुढील आयुष्याचे उद्दिष्ट गवसले. अशा ऐतिहासिक ठिकाणी साठ वर्षांनी एका समर्पित कार्यकर्त्याच्या पुढाकाराने 'देशाचे गौरवस्थान' असा लौकिक मिळवेल असे भव्य शिलास्मारक उभे राहिले. त्या स्मारकाच्या जन्माची थक्क करणारी गाथा म्हणजे प्रस्तुत पुस्तक !

सुयुध्द त्रिनेत्री आणि एक भयानक गुहा. भाग - १०

Submitted by Suyog Shilwant on 12 January, 2017 - 15:27

मैदानात जमा झालेल्या मुलांच्या घोळक्यात सुयुध्द लढत असलेल्या त्या दोन शिष्यांना अतिशय एकाग्रतेने पाहत होता. ते दोन्ही शिष्य एक गरुडध्वज तर दुसरा निलमध्वज गटाचे होते. गरुडध्वजच्या शिष्याच्या हातात तलवार होती तर निलमध्वज शिष्याच्या हातात भाला होता. अतिशय कुशलतेने ते दोघे एकमेकांशी लढत होते. प्रत्येक वार प्रत्येक डाव विचार करुन आणि वारंवार सराव केल्याने अचुक होता. त्या दोघांना लढताना पाहुन सांगणं कठिण होतं की नक्की कोण जिंकेल. सुयुद्ध अगदी बारकाईने त्यांच्या प्रत्येक हालचाली कडे लक्षपुर्वक पणे पाहत होता. ते करत असलेल्या हालचाली सुयुध्द एकेक करुन लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत होता.

देव चालले : स्थित्यंतराची गोष्ट

Submitted by झंप्या दामले on 31 December, 2016 - 07:48

‘चरैवेति, चरैवेति’ हे मनुष्यप्राण्याच्या प्रवासाचे सूत्र आहे. तो कुठून आला आहे याची त्याला एका मर्यादेबाहेर कल्पना नसते आणि पुढे कुठे चालला आहे याबद्दल नजिकचा भविष्यकाळ वगळता खात्रीही नसते. पण तो चालायचा थांबत नाही. इच्छा, नशीब, भावना, संकट, संधी यांपैकी कुठल्याही कारणांनी तो एकीकडून दुसरीकडे जात राहतो. जाताना सोबत आकांक्षा, स्वप्ने, नैराश्य, वासना, भावना, सवयी आणि यासगळ्या गोष्टी ज्यात बांधलेल्या आहेत ते संस्कृती किंवा परंपरा या नावाचं गाठोडं असतं. त्यात कुठेतरी त्याचा देवसुद्धा असतो.मध्येच कुठेतरी श्रांत होऊन विसावतो. शिदोरी उलगडतो.

विषय: 

पर्याय (कथा)

Submitted by चैतन्य रासकर on 12 November, 2016 - 01:59

"आमच्या खेळाचे नाव आहे "विकल्प". विकल्प म्हणजे पर्याय, या खेळात तुमच्या समोर तीन पर्याय आहेत आणि तुमच्यासाठी सर्वात चांगला पर्याय आम्ही आधीच निवडलेला आहे, तो पर्याय तुम्ही ओळखायचा, बाकीचे पर्याय फक्त भुरळ घालतील पण हा एकच पर्याय तुम्हाला यशस्वी करू शकतो"

"मी परत एकदा या खेळाचे नियम सांगतो, सोपे आहेत"

१) या खेळात, तुमच्या समोर तीन माणसे आहेत, त्यांची नावे आहेत "ए", "बी" आणि "सी"

२) त्यातला एक खरे बोलतोय आणि बाकीचे दोघे खोटे बोलत आहेत.

३) जो खरे बोलतोय त्याला पैशाची सर्वात जास्त गरज आहे.

Pages

Subscribe to RSS - पुस्तक