प्रकरण दुसरे
रक्तमासांचा पोशाख
डिजिटल स्वर्गाचा त्याग करणे ही केवळ एक तांत्रिक निवड नव्हती; ती एका अनंत शांततेतून स्वतःला अशांततेच्या खाईत लोटून देण्यासारखी कृती होती. अथर्व आणि संवेद्या यांनी जेव्हा 'री-कॉन्स्टिट्युशन' (पुनर्गठन) कक्षात प्रवेश केला, तेव्हा तिथली हवाच जणू काहीतरी वेगळं सांगू पाहत होती. तिथे मानवी शरीराचे साचे उभे होते, हाडे, स्नायू आणि मज्जासंस्थेचे ते केवळ जड सांगाडे होते.
प्रस्तावना
एक लाख वर्षांचा काळ! आकड्यांच्या खेळात हा काळ सुखावह वाटत असला, तरी कल्पनेच्या पलीकडे गेलेला हा एक अथांग आणि निर्जळी प्रवास आहे. आज जेव्हा मी हे शब्दांकित करायला घेतोय, तेव्हा सभोवताली ना निसर्ग उरलाय, ना निसर्गाचं कौतुक करणारी ती रक्तामांसाची माणसं. सगळं कसं... स्वच्छ, नितळ आणि तितकंच 'भयानक' शांत!
प्रकरण आठवे न्यासाच्या उपवनातील रंगमंच
प्रकरण सातवे अंधारपोकळीतील भास
प्रकरण सहावे अगोरा टेकडीवरचे मंदिर
प्रकरण पाचवे ज्ञानगर्भ सभामंडप
प्रकरण चौथे एल्युसिसचे अरण्य
----------------------------------------------------------------------------------------------------------------
पुन्हा एकदा आम्ही स्मिथच्या दारात उभे होतो. महत्वाचं म्हणजे, यावेळी त्यांच्या दाराला कुलुप नव्हतं. जोसेफने दारावरची बेल वाजवली, स्मिथनी दार उघडलं. स्मिथ आता विश्रांती घेऊन बरे झाले होते आणि बॅग घेऊन तयारी करून आमचीच वाट पाहत बसले होते. आम्हीही आपापल्या खांद्यावर काही जुजबी सामान घेऊन पुढच्या मोहिमेच्या तयारीत होतोच.
प्रकरण तिसरे एडविनचे पलायन
----------------------------------------------------------------------------------------------------------------
“आता काय करायचं ? या स्मिथनी तर मोठाच गेम केला आपल्यासोबत.”, जोसेफ चिडून म्हणाला.
तशी काहीअंशी कल्पना होतीच आम्हाला, कारण आमचा हस्तक्षेप दोघांनाही आवडला नव्हता. नाईलाजाने आमच्यासमोर संमती दाखवल्यासारखे भासवून आमच्या मागे त्यांनी आपला हेतू पूर्ण केला होता.
“ मला वाटते त्यांना पुढील रहस्यभेद झाला असावा. ”, मी म्हणालो.
प्रकरण दुसरे बारा देवता आणि कृष्णवर्णीय नोकर
प्रकरण पहिलेमिस्टर स्मिथ यांचे पत्र