Collection of historical e-Books (Digitized by Google) of South & Central Asian History, Geography.
Includes various reference books, journals, photographs.
Also has maps (.jpg & KML).
Available here - http://pahar.in/books/
Shared from Reddit India.
शाळा सुटल्याची बेल वाजली. सर्व मुले धावत बाहेर पडत होती पण सोहम मात्र रेंगाळतच शाळेबाहेर पडला. खरं तर त्याला घरी जाण्याची सुद्धा इच्छा नव्हती.
"सोहम, जरा थांब, माझी मम्मा आज तुला पण घरी सोडणार आहे" पाठीमागून शर्वरी बोलत होती. "अग कशाला, ड्राइव्हर काका आले आहेत."
"अरे हो पण मम्मानेच सांगितल आहे, तुला सांगायला. ती सोडणार आहे आज"
"अग पण....."
"ते काही नाही, तू ड्राइव्हर काकांना सांग तुम्ही पुढे जा"
"सोहम, मी बोलले आहे तुझ्या ड्राइव्हर काकांशी ते गेलेत घरी, चल आपण पण निघू" - सारिका टीचर बोलल्या.
पद्मजा फाटक या लेखिका म्हणून आणि एके काळी दूरदर्शनवर सुंदर माझे घर सादर करणाऱ्या म्हणून बऱ्याच जणांना आठवत असतील. त्यांना वयाच्या सत्तेचाळीसाव्या वर्षी अचानकपणे ग्लुमेरेलो नेफ्रायटीस नावाच्या एका असाध्य रोगाला सामोरे जावे लागले. या आजारामध्ये किडन्या पूर्णपणे निकामी होतात. डायलिसीसवर किंवा किडन्या पुनर्रोपण करून आयुष्य वाढवता येते. पण ते असते सर्वसाधारणपणे २-३ वर्षाचे. अश्या अचानक उद्भवलेल्या जीवघेण्या आजाराशी त्यांनी १० वर्षे सर्व शक्तीनिशी झुंज दिली. या झुंजीची कहाणी त्यांनी ‘हसरी किडनी अर्थात अठरा अक्षौहिणी’ या पुस्तकात शब्दबद्ध केली आहे.
माझ्या वडिलांनी बरेच अभंग लिहून छोटे पुस्तक छापले आहे. त्या पैकी काही इथे देत आहे .
१. भेटीची आस मोठी जिवाला !
कधी भेटीशी पांडुरंगा मला !!१!!
रात्रंदिवस जीव तळमळत आहे !
काही केल्या अुगी न राहे !! २! !
काय वृत करु कोणती साधने !
मन स्थिरावेल काय ती विधाने ! ! ३! !
संकल्प केला सिद्धि न जाये !
मनासारखे काही न होये ! ! ४! !
अंतःकरणातुनी पाचारीतो तूला !
लवकरी येई बा विठ्ठला ! ! ५! !
विठ्ठल दासा लागली तळमळ !
पांडुरंग भेटला गेली मळमळ ! ! ६!!
२. पूर्ण माझे मनोरथ झाले ! कामही सिद्धि गेले ! ! १! !
जे जे द्रुष्टी पड़े ! ते ते दिसे राम रुपडे ! ! २! !
पु.लं.च्या गोळाबेरीज या पुस्तकात 'शांभवी, एक घेणे' हा एक नाट्यांश आहे. पहिल्यांदा वाचला तेव्हा त्याचा फारसा अर्थबोध झाला नाही. तो कुठल्यातरी दुसर्या नाटकावर आधारित आहे असे कळले. तर मग त्यासंबंधी कुणाला माहिती असल्यास सांगू शकाल का? किंवा नुसता अर्थ विशद करून सांगितला तरी चालेल. धन्यवाद!
आपल्या जीवनावर पुस्तक, व्यक्तिरेखा, जवळची माणसे, घडलेल्या घटना, परिस्थिती आणि अनुभव खुप खोल वर प्रभाव टाकतात. लहानपणी महाभारता वर गोष्टी ऐकल्या होत्या. मला कर्णाचे प्रण, प्रतिज्ञा, जीवन, अगतिकता, झुंजार योद्धे पण, त्याचा पदोपदी झालेला अपमान आणि त्यामधून त्यांनी काढलेला मार्ग.त्यातून कर्णा बद्दल खुपच उत्सुकता वाढली. कथेतील ऐतिहासिक व्यक्ति, पुस्तकातील व्यक्तिरेखा, किवां एखादे पुस्तक वाचल्या नंतर त्यांचा आपल्या मनावर खुप खोलवर परिणाम होतो. नकळत तुम्ही त्या व्यक्तिच्या विचाराशी जोडले जाता किंवा त्याच्या विचाराचा अनुभव घ्यावासा वाटतो.
बाणा,...
जुना बाणा,नवा बाणा
यात फरक असु शकतो
जशी वेळ येईल तसा
हा फरक दिसु शकतो
कधी-कधी मात्र स्वार्थासाठी
बाणा सुध्दा अडलेला असतो
कठोर बाणा अन् नरम बाणा
एकमेकांनाच जोडलेला असतो
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
ठाव मना-मनाचे,...
कुणासाठी ठाव असतो
कुणासाठी घाव असतो
वेग-वेगळ्या मनामध्ये
वेग-वेगळा भाव असतो
जसे मनं बदलतील तसे
कधी अर्थ बदलु शकतात
कुण्या मनात उचलणारे
कुणा मनी आदळू शकतात
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
वनवास, शारदा संगीत सारखी मराठी साहित्यातील अभिजात कलाकृती लिहिणारे लेखक प्रकाश नारायण संत (भालचंद्र दिक्षित) यांच्या पश्च्यात त्यांच्या पत्नीने, सुप्रिया दीक्षित (पूर्वाश्रमीच्या सुधा नंदगडकर) यांनी लिहिलेले हे आत्मचरित्र.
अमलताश हे एका झाडाचे हिंदी नाव आहे. त्याला मराठीमध्ये बहावा असं म्हणतात.लेखिका सुप्रिया आणि त्यांचा नवर्याच्या आवडीचे हे झाड. इंदिरा संत यांची हि थोरली सून. पुस्तकात सुप्रिया यांचे बालपण, तरुणपण, डॉक्टरकीचे शिक्षण, प्रकाश नारायण संत यांच्याबरोबरचे भावविश्व, त्यांचे कौटुंबिक जीवन आणि आयुष्यात आलेले चढउतार या सर्वाचा प्रवास आहे.
हे पुस्तक माणसातल्या मेंदुवरच नाही तर मेंदुतल्या माणसावरच आहे. म्हणजे पुस्तकाच स्वरुप हे रोजच्या व्यवहारातल मेंदुविज्ञान अस आहे. रंजकता व सुलभीकरण हे वैज्ञानिक आशयाला बाधा आणणारे असते असा गैरसमज जो असतो तो या पुस्तकाने नक्की दूर होतो. पुस्तकाची शैली ही वाचकाभिमुख आहे. चांगले नातेसंबंध जपण्यासाठी आणि निरोगी जीवन जगण्यासाठी विज्ञान हे एक साधन आहे अशी लेखकद्वयांची धारणा आहे. को॓हम् हा प्रश्न अध्यात्मात जेव्हढा गहन आहे तेवढाच विज्ञानात. माझ्या जगण्याचे प्रयोजन काय? जाणीव म्हणजे काय? आकलन म्हणजे काय? याची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न आपापल्या परीने वैज्ञानिक व तत्वज्ञ करीत आलेले आहेत.