साहित्य

९० डिग्री साऊथ - १२

Submitted by स्पार्टाकस on 12 May, 2014 - 04:29

३० मार्चला अ‍ॅटकिन्सन आणि कोहेन कॉर्नर कँपवर पोहोचले होते. वाटेत टेडी इव्हान्सची स्लेज त्यांना आढळून आली होती. वा-याचा जोर वाढतच होता. तापमान घसरत चाललं होतं. हिवाळा तोंडावर आला होता. सर्व परिस्थितीचा विचार करुन अ‍ॅटकिन्सनने परत फिरण्याचा निर्णय घेतला. तो म्हणतो,

विषय: 

९० डिग्री साऊथ - १०

Submitted by स्पार्टाकस on 10 May, 2014 - 05:23

टास्मानियाच्या किना-यापाशी येऊन पोहोचल्यानंतरही फ्रामपुढच्या समस्या अद्याप संपल्या नव्हत्या. होबार्ट बंदराभोवतीच्या परिसरात वादळाचा धुमाकूळ सुरू होता ! हवामान सुधरल्यावर ते होबार्ट बंदराजवळ पोहोचत असतानाच जोरदार वा-याने फ्रामला पुन्हा खुल्या समुद्रात आणून सोडलं ! जालांड म्हणतो,

" होबार्ट बंदरात प्रवेश करणं अत्यंत कठीण होत होतं. शेवटी एकदाचे आम्ही तिथे पोहोचलो तर वादळाने पुन्हा आम्हाला सागरात हाकललं ! फ्रामचं एक शिड फाटलं होतं !"

विषय: 

९० डिग्री साऊथ - ९

Submitted by स्पार्टाकस on 9 May, 2014 - 05:25

स्कॉट दक्षिण धृवावर पोहोचला असताना अ‍ॅमंडसेन ८१'३०'' अक्षवृत्त गाठलं होतं. दिवसाला ३५ मैलांच्या वेगाने तो झपाट्याने फ्रामहेमकडे धाव घेत होता. अंटार्क्टीका सोडण्याची आणि दक्षिण धृवावरील विजयाची बातमी सर्वप्रथम जाहीर करण्याची त्याला घाई झाली होती. त्या मानसिक अवस्थेत आपल्या सहका-यांशी क्षुल्लक कारणावरुन त्याचे खटके उडत होते. काही कारणावरुन त्याने हॅन्सनशी अबोला धरला होता !

विषय: 

आश्रमातील कुरापती भाग-2

Submitted by शेषराव on 9 May, 2014 - 03:33

शाळेत येवून मला महिना होत आला होता. होस्टेलच्या जेवनाची हळु हळु सवय होवू लागली होती. तिथलं जेवन म्हणजे ज्वारीची भाकरी आणि पाणचटशी भाजी असो त्याबद्दल पुढे माहिती येईलच. अजुन आमच्या कुरापती चालु झाल्या नव्हत्या कारण आमची एकमेकाशी मैत्री अजुन झाली नव्हती आणि आमचा शाळेतील पहिलाच वर्ष होता. आमच्या कुरापतीला सुरुवात झाली इयत्ता नववी पासुन. माझा एक मीत्र होता आठविला, करन नावाचा. आमची मैत्री फक्त बोलण्या चालण्या पुरतीच मर्यादीत होती. माझा आठविला पहीला नंबर आला होता. माझी टक्केवारी ऐंशीच्या वर होती त्यामुळे मला शिक्षक वर्गात मित्रात चांगलाच मान होता.

हरवलेली कवितांची वही ...

Submitted by दुसरबीडकर on 8 May, 2014 - 17:39

हरवलेली कवितांची वही...
एकदा...दोनदा..तिनदा त्यानं डोअरबेल वाजवली,पण आतून
कसलीही चाहूल नाही..!तो वैतागला..''झोपली असेल
महाराणी,साडेसात वाजताच..तरी म्हणतं होतो,आईला चार-
आठ दिवस आणावं....पण सालं ह्या ऒफीसच्या कामानं
सगळा घोळ घातला..!!' असं मनातल्या मनात
पुटपुटत,तणतणत,आपला पुरुषी अहंकार थोडासा बाजुला ठेवत
त्यानं खांद्यावरच्या बॅगमधून त्याची चावी काढली व
दरवाजा उघडला.रागाने लाल झालेले डोळे तिचाच शोध घेत
होते..
लग्नाला अजून वर्ष झालेलं नव्हत..संसारात
तिखटमिठाची फोडणी ह्याच्या तापट स्वभावाने वारंवार
व्हायची..ती गरीब गाय होती..त्यात तिन

९० डिग्री साऊथ - ८

Submitted by स्पार्टाकस on 7 May, 2014 - 08:53

स्कॉटच्या तुकडीची धीम्या गतीने प्रगती चालू होती. बर्फातून स्लेज ओढताना त्यांना अपार कष्ट पडत होते. दिवसाला ११ - १२ मैलांच्या पलीकडे मजल मारणं त्यांना अशक्यं होत होतं. १५ डिसेंबरला त्यांनी ८४ अंश दक्षिण अक्षवृत्त ओलांडलं. पृष्ठभागावरील बर्फाचा थर आता कमी होत होता. मात्रं त्या दिवशी संध्याकाळी कँपच्या नियोजीत जागी पोहोचण्यापूर्वीच पुन्हा बर्फवृष्टीला सुरवात झाली. निरुपायाने त्यांना थांबणं भाग पडलं. स्कॉटने निराशेने आपल्या डायरीत नोंद केली,

विषय: 

जसे कंबरेवर तुझे हात..

Submitted by वैवकु on 7 May, 2014 - 02:53

असावीत त्यांच्या नशीबात दु:खे
पडावीत माझ्याच प्रेमात दु:खे?

मला भेटणार्‍या भिकारी सुखांनो
लुटा आज माझी अतोनात दु:खे

कितीवार त्यांची करू चौकशी मी
कथेनात काही खरी बात दु:खे

दिवाळेच काढून रब्बी निघाला
पुन्हा पेरली मी खरीपात दु:खे

उदासीन हा जीवनाचा उकाळा
नि गवती चहाची सुकी पात दु:खे

तुझ्या आणि माझ्या बखेड्यात दु:खे
तुझ्या आणि माझ्या सलोख्यात दु:खे

असा घालती घट्ट् विळखा मनाला
जसे कंबरेवर तुझे हात.. दु:खे

शब्दखुणा: 

९० डिग्री साऊथ - ७

Submitted by स्पार्टाकस on 6 May, 2014 - 02:51

३० नोव्हेंबरला अ‍ॅक्सेल हेइबर्ग ग्लेशीयरवरुन वाटचाल करता अ‍ॅमंडसेनची तुकडी बर्फाच्या टेकड्या आणि त्यांना लागूनच असलेल्या खोल द-या अश्या परिसरात येऊन पोहोचली. या प्रदेशातून मार्ग काढणं अतिशय जिकीरीचं होतं. कित्येकदा वेगवेगळ्या दिशांनी मार्ग काढण्याचे त्यांचे प्रयत्न निष्फळ होत होते. अखेरीस एका टेकडीवरुन जाणारा बर्फाचा पूल त्यांना आढळला. एकावेळी जेमतेम एक स्लेज जाऊ शकेल इतक्याच रुंदीचा तो पूल होता ! दोन्ही बाजूला खोल द-या पसरलेल्या होत्या. अ‍ॅमंडसेन म्हणतो,

विषय: 

अभंगगाथा - परम अर्थाची एक वाक्यता - अर्थात तुकोबा "वन लायनर" (भाग ३)

Submitted by पुरंदरे शशांक on 5 May, 2014 - 01:42

अभंगगाथा - परम अर्थाची एक वाक्यता - अर्थात तुकोबा "वन लायनर" (भाग ३)

सूर्य जेव्हा आकाशात अक्षरशः जळत असतो तेव्हा कुठे आमच्या अंगात जगण्याइतकी धुगधुगी निर्माण होते तसे संत जेव्हा मोक्षस्पर्शी वैराग्य बाळगून असतात तेव्हा कुठे आमच्यात संसारतारक वैराग्य निर्माण होऊ शकते - असे आचार्य विनोबांचे एक वचन आहे.

तुकोबांसारखे संत हे आपणा सर्वसामान्यांचे कल्याण व्हावे या एकाच हेतूने बोलतात. आपले पांडित्य जगाला दिसावे, आपल्याला खूप मान - सन्मान मिळावा याकरता काही ते लिहित नाहीत.

'आम्हाला मातृभूमी नाही'

Submitted by आशयगुणे on 4 May, 2014 - 14:49

मी आणि प्रसाद एकाच कॉलेज मधले. पहिल्या दिवशीच्या पहिल्या लेक्चरला एक शांत मुलगा चौथ्या -पाचव्या बाकावर येउन बसला आणि एक मितभाषी मुलगा अशी त्याची पहिली छाप माझ्यावर पडली. मी देखील फार बोलकी वगेरे नाही. पण ओळख आणि मैत्रीची खात्री पटली की मी अगदी मनापासून गप्पा मारते. हळू हळू कॉलेज मध्ये सर्वांशी ओळख होत होती आणि मित्र-मैत्रिणी ह्यांची संख्या वाढत होती. पण ह्याचे मितभाषी असणे अजूनही तसेच होते. जे काही शिकवले जायचे ते मात्र अगदी व्यवस्थित वहीत उतरवून घ्यायचा तो. आणि एके दिवशी 'फौंडेशन कोर्स' नावाचा विषय आम्हाला शिकवला जाणार हे कळले. एकंदर सामाजिक भान वाढविण्यासाठी हा विषय होता.

Pages

Subscribe to RSS - साहित्य