साहित्य

विषय क्र. १- स्वप्नातला 'राज'कुमार

Submitted by Manaskanya on 26 August, 2012 - 19:10

शाहरुख हा माझा आवडता हिरो. अगदी 'फौजी' ह्या TV सीरिअल पासून. तेव्हा फक्त दूरदर्शन हे एकाच channel होत. आम्ही त्या अभिमन्युसाठी अगदी डोळ्यात प्राण आणून वाट बघत असायचो. तो केव्हा सिनेमात येतो अस झाल होत ते सीरिअल बघून. 'दिवाना' हा त्याचा पहिला सिनेमा. पण मध्यंतरापर्यंत शाहरुख ची एन्ट्रीच झाली नाही. त्या रोल मध्ये तो फारसा आवडला नाही. मग आला 'बाजीगर'. शाहरुख भावला पण ते कॅरक्टर मात्र आवडल नाही. नंतर १९९५ मध्ये आला 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' आणि शाहरुखचा 'राज' खूप खूप आवडला. अजूनही तितकाच आवडतो. एक तर मला यश चोप्रा/ आदित्य चोप्रा चे सिनेमे खूप आवडतात.

शब्दखुणा: 

वासंती भाटकर आणि स्त्री-मुक्ती

Submitted by ज्योति_कामत on 25 August, 2012 - 12:21

बर्‍याच वर्षांपूर्वीची हकीकत आहे. तेव्हा मी प्राथमिक शाळेत जात होते आणि रत्नागिरीजवळच्या बसणी नावाच्या एका खेड्यात रहात होते. हे इतकं लहान खेडेगाव होतं, की रत्नागिरी फक्त ५ मैलांवर असून तिथे जायला थेट रस्ता नव्हता. मधे साखरतरची खूप मोठी खाडी होती. रत्नागिरीला जायचं तर आधी बैलगाडीने तरीपर्यंत जायचं, मग तरीने खाडी ओलांडायची आणि मग बस मिळायची. गावात दुपारी १२ वाजता वगैरे पेपर यायचा. म्हणजे महाराष्ट्र टाईम्स. सगळ्यात मोठी करमणूक म्हणजे रेडिओवरची खरखरत्या आवाजातली सुशील दोशीची कॉमेंट्री नाहीतर सिलोन रेडिओवरची बिनाका. त्यासाठी आम्ही बुधवार रात्रीची वाट बघायचो.

ईशान्य उपनिषद – जगण्याचा मार्ग.

Submitted by विवेक पटाईत on 24 August, 2012 - 10:00

.

ॐ पूर्णमद: पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते.
पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते.
(शांतीपाठ)

ईशा वास्यमिद्ँसर्व यत् किंच जागत्यां जगत.
तेन त्यक्तेन भुन्चीथा मा गृध: कस्य स्विद् धनम्.

कुर्वन्नेवेह कर्माणि जिजीविषेच्छत्ँसमाः.
एवं त्वयि नान्यथेतोऽस्तिण कर्म लिप्यते नरे.
[ईशोपानिषद (मंत्र १ & २)]

भोलागडी.......................! भाग २

Submitted by श्रीमत् on 23 August, 2012 - 12:13

http://www.maayboli.com/node/37250 (भोलागडी भाग १ वाचण्यास येथे टिचकी मारा.)

दिवसभराची काम आटपुन दिवेलागणीच्या सुमारास आबासाहेब घरी आले. त्यांच्यापाठोपाठ अशोकही घरी आला. "या अशोकराव तुमच्यासाठी खुशखबर आहे. काय झाल आबा?. " अरे काही नाही सकाळी्च पेन्शन आणायला गेलो होतो ना तेव्हा तसाच जिल्हा परिषदेच्या ऑफिसात जाऊन आलो लवकरच आपल्या शाळेला अनुदान आणि शिक्षक मिळणार आहे. त्यात यात्रा दहाच दिवसांवर आली आहे.
एक दोन दिवसात मिटिंग घेऊन सर्व तयारी केली पाहीजे.

विषय: 
शब्दखुणा: 

मन्नी मन्नी आमची माऊ

Submitted by पुरंदरे शशांक on 22 August, 2012 - 01:17

मन्नी मन्नी आमची माऊ
येताय का कडे भुर्र जाऊ

कश्शी खुलली कळी आता
भुर्रचं नुस्तं नाव काढता

हात पसरुन लगेच तयार
मन्नी आमची कस्ली हुशार

थांब जरा बदलुंदे फ्रॉक
लग्गेच नकोय नाकावर राग

वाजता सँडल बघते कश्शी -
'नेणारे मला का निघ्घाली तश्शी '....

दिवाली अन्कात लेखन

Submitted by स्वेता२५ on 21 August, 2012 - 14:04

दिवालि अन्कात लेख कसा पाथवावा या विशई माहिति हवि आहे.मला ज्योतिश विशयावर लेख पाथवायचा आहे, सध्या भारतात मि नाहि त्यामुले मदत हवि आहे....

ज्ञानेश्वरीतील लौकिक सृष्टी - म. वा. धोंड

Submitted by वरदा on 21 August, 2012 - 12:32

ज्ञानेश्वरी. मराठी साहित्यातला सर्वोच्च मानदंड! अगदी आबालवृद्धांना माहित असलेली त्यातील असंख्य उद्धरणे, साहित्यात परत परत वापरले गेलेले त्यातले दृष्टांत, त्यातलं पसायदान, लहानपणी डोळ्यात पाणी आणून ऐकलेली ज्ञानेश्वरांची आणि त्यांच्या भावंडांची गोष्ट आणि शाळेत-कॉलेजमधे अभ्यासाच्या पुस्तकात उल्लेखलेली ज्ञानेश्वरीच्या रचनेने केलेली सामाजिक क्रांती. फारतर आळंदीला जाऊन समाधीचे आणि नेवाशाला जाऊन घेतलेले पैसाच्या खांबाचे दर्शन आणि त्याने मनात उठलेले अननूभूत भावतरंग. आपल्या सर्वसामान्यांना ज्ञानेश्वर-ज्ञानेश्वरीबद्दल असलेल्या माहितीचा हा ढोबळमानाने लसावि!

तिच्या हाताचे हाड (Reloaded)

Submitted by Kiran.. on 20 August, 2012 - 12:56

तिच्या हाताचे हाड
=============

"हे बघ गड्या, गडबड नाय पायजे. कुनी बगितलं म्हंजी आपुन कामतून गेलू समज."
"नाय गडबड नाय हुनार. म्या डोळ्यानी बगितलय. मुसलमानाची बायकूच गेली. आन ती पोटूशी व्हती."
"लई ब्येस. आता त्वांड वाईच गप ठिवायचं. कुणाला कसला शकबी नाय आला पायजे.. काय ? "

राम्याच्या या प्रश्नावर म्हाद्याने मान डोलावली.

विषय क्र. १ - "हरिश्चंद्राची फॅक्टरी" - माझ्या चष्म्यातून....

Submitted by पुरंदरे शशांक on 20 August, 2012 - 07:15

विषय क्र. १ - "हरिश्चंद्राची फॅक्टरी" - माझ्या चष्म्यातून........

मराठी सिनेमाचा अगदी धावता आढावा घेतला तर पौराणिक, संतपट, तमाशा, सामाजिक, समाजप्रबोधन, वास्तव, विनोदी अशा वळणावळणाने जात असता अचानक समोर येतो तो या सगळ्यांपासून आपले वेगळेपण दाखवणारा - श्री . परेश मोकाशी दिग्दर्शित "हरिश्चंद्राची फॅक्टरी" हा चित्रपट - एखाद्या जलाशयावर असलेल्या अनेक पक्ष्यांच्या गर्दीत एखादा डौलदार राजहंस सहज अलगद उतरताना आपले लक्ष वेधून घेतो ते कुठल्याही अभिनिवेशाशिवाय, आपल्या अंगभूत सौंदर्यानेच.... तसाच हा चित्रपट ......

शब्दखुणा: 

"भोलागडी"

Submitted by श्रीमत् on 18 August, 2012 - 07:47

“ बोरणे” सातारा जिल्ह्यातील छोटेसे खेडे पण आज आदर्श ग्राम पुरस्कारामुळे जिल्ह्यात नावारुपाला आलेलं. गाव तसं छोटसच पणं निसर्गरम्य. परळी पासुन पुढे घाट रस्त्याने सज्जणगडला वळसा मारुन गेल की रस्त्यावरच बोरण्याची वेस खुणावते. गावात जेमतेम ८०-९० घरं. त्यात गाव दोन आवाडात विभागलेल. वरच आवाड आणि खालच आवाड. रस्त्याला लागुनच जिथुन एसटी वळते तिथे पिठाची गिरणी जिच्या चिमणीचा सतत होणारा कुक्क कुक्क आवाज गावच्या निरामय शांततेत एक वेगळाच नाद ऊमटवत असतो. तर वरच्याच बाजुला पाण्याची टाकी आणि तीसं एक घरं तिथुनच अजुन वर गेल की डोंगराच्या घळीतच विसावलेल ऋषी आईच देवस्थान.

विषय: 
शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - साहित्य