लघुकथा

मोरूचा बाप!

Submitted by सुरेशकुलकर्णी on 14 March, 2021 - 23:45

"मोरू उठ! आज शनिवार! बरीच कामे पडली आहेत!" मोरूचा बाप मोरूला म्हणाला.
"बाबा झोपू द्या ना. विकेंड आहे. रोज सकाळीच उठाव लागता ना? आणि रात्री तसही प्रोजेक्टमुळे जागरण पण झालाय!" मोरू पांघरुणात घुसमटत म्हणाला.
"मोऱ्या, बापाला शानपन शिकवायचं नाही! उत्तिष्ठ! म्हणजे उठ!"

विषय: 
शब्दखुणा: 

कुटुंब!

Submitted by सुरेशकुलकर्णी on 9 March, 2021 - 02:23

शांतारामने समोरच्या आरश्यात आपल्याच प्रतिबिंबावर नजर टाकली. अंगावरचा सफारी, त्याच्या पोक्त वयाला शोभून दिसत होता. त्याने समाधानाने मान डोलावली.
या सफारीच काम तंबाकू सारखं असत, तंबाकू जशी लग्नाच्या मांडवापासून ते मसणवट्या पर्यंत कुठेच वर्ज नसते, तसेच सफारीच असत. सफारी घाला डोक्याला, फेटा बांधून वरातीत नाचा, नाहीतर टापशी बांधून मयतीत सामील व्हा! सगळीकडे शोभून दिसते. म्हणून शांताराम कामगिरीवर निघताना आवर्जून सफारी घालतो.

विषय: 
शब्दखुणा: 

पुरून उरिन! ('माझ्या नेटक्या गोष्टी'तुन."

Submitted by सुरेशकुलकर्णी on 1 March, 2021 - 03:24

खंडूआण्णा म्हणजे बारा बोड्याचा माणूस. खप्पड गाल, चेहऱ्यावरचं मास झडून गेलेलं, त्यामुळे कोरड्या कवटीला जून कातडं घट्ट चिटकवल्या सारखा तो दिसायचा. अंधारात काय, उजेडात सुद्धा, नवखा माणूस घाबरून जायचा. वय जनरीतीला धरून, वर्षात मोजल तर पासष्ठीला एक वर्ष कमी, आणि त्याला विचारलं तर---! नका ना विचारू त्याला.
का?
पहा विचारून!
'किती असेल हो तुमचं वय?'
' कशाला? पोरगी लग्नाची आहे का? माझी तयारी आहे! तिला विचारून ये!'

विषय: 

मदतनीस!

Submitted by सुरेशकुलकर्णी on 28 February, 2021 - 22:09

त्यांनी सभोतालच्या पुस्तकावरून नजर फिरवली. अभिमानाने! आणि का नसावा अभिमान? इतकी संपदा लिहायला, इतर लेखकांना चार जन्म घ्यावे लागतील! पाच पन्नास 'चारोळ्या' किंवा 'कविता' लिहल्या कि, यांचं 'कवित्व' कोरड पडत. चार मासिकात (हो, या जमान्यात दिवाळी शिवाय कोणी छापत नाही. सगळं ऑन लाईन!) दोन कथा आल्याकी शेफारून जातात! 'मी लेखक - मी लेखक' म्हणून ढोल पिटून घेतात. आपल्या सारख्या शेकड्याने कथा आणि चाळीशीच्या आसपास कादंबऱ्या लिहणाऱ्या, लेखकाने 'अभिमान' बाळगू नये तर काय करावे?

विषय: 

डिकोस्टा!

Submitted by सुरेशकुलकर्णी on 14 February, 2021 - 03:27

परदेशातला, बहुदा त्यागराजचा हा शेवटचा प्रोजेक्ट होता. तो सध्या वयाच्या पन्नाशीच्या टप्यात होता. हिंदी महासागरात श्रीलंकेच्या आजून दक्षिणेला, श्रीलंकेच्या आधिपत्यातल्या, एका नगण्य बेटावर, तो प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून आला होता. या खडकाळ आणि डोंगराळ बेटावर काही ब्रिजेस बांधायची होती. भारतातल्या कॉन्स्ट्रक्शन कंपनीने त्याला पाठवले होते. याला दोन कारणे होती. एक तर तो सडाफटिंग होता. कुटुंब बायका पोर! काही पाश नव्हते. कारण त्याचा 'कुटुंब' व्यवस्थेवर अजिबात विश्वास नव्हता. आजाद पंछी! सुख पैशात खरेदी करता येतात, हे याच जगाने, त्याला शिकवले होते. आणि दुसरे कारण त्याची भटकंतीची हौस!

रघु अण्णांचा उद्योग!

Submitted by सुरेशकुलकर्णी on 7 February, 2021 - 08:04

रघु अण्णांचा उद्योग!

कोकणच्या एका आडबाजूच्या वाडीतील, रघु नाईकचा वाडा आज मोठा प्रसन्न दिसत होता. अन का दिसू नये? चार दिवस झाले होते, त्याची लेक, जावई आणि बिट्ट्या, गोड नातू आले होते. एरवी गोदाआक्का आणि रघुआण्णा दोघेच रहायचे. त्यामुळे एक उदासवाणी शांतता तेथे नांदायची.

हिरव्या पोपटी शालूवर, एखादी केशरी आंगठी ठेवावी तस वाड्याचं कौलारू छत, लांबून दिसत होत.

विषय: 

पाव बाबाचा शाप!---वेताळ कथा

Submitted by सुरेशकुलकर्णी on 31 January, 2021 - 06:48

नाना झिपऱ्या म्हणजे, आडवं डोकं होत! सरळ साधी गोष्ट सुद्धा, वाकड्या मार्गाने करण्यात, याला काय आनंद मिळतो, ते त्यालाच माहित. पण झिपऱ्या हा एक जिवंत माणूस आहे, आणि जिवंत माणसाला अनंत इच्छा असतात. झिपऱ्याला पण आहेत. त्याच्या स्वभावाप्रमाणे, त्याने प्रामाणिक कष्टाच्या मार्गा ऐवजी, वाकडा मार्ग निवडला होता. आपल्या असणाऱ्या आणि भविष्यात उदभवणाऱ्या, सगळ्याच इच्छा पूर्ण करण्यासाठी, त्याला एकच 'सुपर वर' हवा होता! 'वेताळ' प्रसन्न करून, त्याच्या कडून हवा असलेला 'वर' मागून घेण्याचा झिपऱ्याने घाट घातलाआणि आता झेंगट होऊन बसलं.

विषय: 

कथा काळोखाची!

Submitted by सुरेशकुलकर्णी on 12 January, 2021 - 08:31

महाराज कृष्णकुंभांनी राजकुमारी कृष्णाकडे नजर टाकली. आज काहीतरी बिनसल्याचे त्यांच्या लक्षात आले होते. त्यांना काय समस्या आहे हे त्यांनीच विचारावे हि महाराजांची अपेक्षा होती. म्हणून ते वाट पहात होते. कृष्णा उद्याच्या, या महाकाय सामराज्याच्या एकमेव उत्तराधिकारी होत्या. त्याना तीक्ष्ण बुद्धीचे वरदान मिळालेले होते. पण अजून पोर वयाचं. अनुभव नगण्यच होता.
महाराजांना पोरींचा उदासवाणा चेहरा बघवेना. त्यांनीच आपला हट्ट सोडला.
"राजकुमारी कृष्णा, अशा आमच्या समीप या."
कृष्णा जवळ आली.

विषय: 

एक वेगळा दिवस!

Submitted by सुरेशकुलकर्णी on 12 January, 2021 - 03:31

"डॅड, तू त्या लॅपटॉप वर नक्की काय करतोस? माझं एक काम आहे!" अकरा वर्षाच्या शशांकने, आपल्या कसल्याश्या मोठ्या कंपनीत बॉस असलेल्या आपल्या बापाला विचारले.

बापाने घाई घाईत आपला ती 'ऑफिसचे काम' वाली विंडो बंद केली. आणि कम्पनीच्या ऑडिटची pdf फाईल ओपन केली. रात्रीचे आकरा वाजले होते, आणि चिरंजीव जागेच होते! त्यात नवल काहीच नव्हते. रात्री उशीर पर्यंत, ऑन लाईन रहाणे, हा त्या घरातील पुरुषांचा, डिजिटल हक्क होता!

विषय: 

किचन गुरु!

Submitted by सुरेशकुलकर्णी on 10 January, 2021 - 23:24

आता मी किचनमध्ये बऱ्या पैकी रूळलोय. पण एक काळ होता मला आणि झुरळांना आमच्या किचनमध्ये अवतरण्यास बंदी होती. बायको डकन्या हातात असेल त्याने, दिसले झुरळ कि, त्याचा निकाल लावते! (आता तुम्हीच सांगा, जी बाई झुरळाला सुद्धा भीत नाही, ती नवऱ्याला काय जुमानणार? अन त्यातही रिटायर झालेल्या?)
माझ्या किचन बंदीला, मीच जवाबदार होतो म्हणा. खरेतर तो एक अपघात होता. झालं काय कि, एकदा ती कणिक मळत होती. त्याच वेळेस गॅसवरचे दूध उतू जाण्याच्या बेतात होते, आणि माझ्या दुर्दैवाने मी जवळच होतो.

विषय: 

Pages

Subscribe to RSS - लघुकथा