साहित्य

कैकेयी

Submitted by भारती बिर्जे.. on 15 April, 2014 - 07:29

कैकेयी

अयोध्या अजूनही निद्रिस्त होती. दूर शरयू नदीचं पात्र निळसर धुक्यात मंद उजळून शहारत होतं. सौधावर गार बोचऱ्या झुळुका सुटल्या होत्या. युवराज राम सौधाच्या अगदी कडेला रेलून उभा होता. अंगावर सैलसर शाल पांघरून शरयूपैल हरवलेल्या नजरेने पाहत होता.उत्तररात्रीचा प्रहर. राजप्रासादाला अजून जाग यायला बराच अवकाश होता.

‘’ रामा ! राजकन्या सीतेपेक्षा शरयू नदी सुंदर आहे की काय ?’’ त्या खट्याळ किणकिणत्या स्वरातल्या शब्दांनी त्याची तंद्री भंग पावली. दचकून त्याने मागे वळून पाहिलं तर धाकटी राणी कैकेयी सौधाच्या दरवाजात उभी होती.. नि:स्तब्ध शांततेत दोघे एकमेकांकडे क्षणार्ध बघत राहिले.

विषय: 
शब्दखुणा: 

हुंदका उरातच गोठवायचा आहे

Submitted by वैवकु on 14 April, 2014 - 13:25

हुंदका उरातच गोठवायचा आहे
हा त्रास मला कोळून प्यायचा आहे

चालला कुठे हा कळप झुरत हरणांचा
का , पुढे 'सुखांचा झरा' यायचा आहे

कोरंट तरी आपली फुलुन येते का
अन् तुला नवा फुलबाग घ्यायचा आहे

"नागरीक"चा एवढा अर्थ आहे की
हा देश मलाही वाचवायचा आहे

तो समोर ठेविल वेगवेगळ्या इच्छा
तू तुझा इरादा ओळखायचा आहे

बोलवेन तेव्हा काम टाकुनी ये तू
बस् तुला ....एक झोकाच द्यायचा आहे

लागेल मला ज्या क्षणी झोप जन्माची
विठ्ठला तुला 'पाळणा' गायचा आहे

___________________________________________________________

९० डिग्री साऊथ - १

Submitted by स्पार्टाकस on 14 April, 2014 - 01:27

प्राचीन काळापासून माणसाला अज्ञात प्रदेशाचं आकर्षण राहीलं आहे. नवीन भूमीचा शोध घ्यावा, त्यावर आपलं स्वामित्वं प्रस्थापीत करावं ही मानवाची आस अनादी-अनंत कालापासून चालत आलेली आहे. युरोपीयन आणि मुस्लीम आक्रमकांनी यालाच धर्मप्रसाराची आणि व्यापाराची जोड दिली आणि व्यापाराच्या माध्यमातून अनेक वसाहतींचं साम्राज्यं उभारलं.

विषय: 

आज कुछ तुफानी करते है….भाग १

Submitted by बोबो निलेश on 13 April, 2014 - 22:48

साठी झाली की बुद्धी नाठी होते असं म्हणतात ते कदाचित खरं असावं.
परवाचाच अनुभव घ्या ना. आबा - म्हणजे दूरच्या नात्यातले आजोबा आमच्याकडे राहायला होते. ते नुसते रहात होते तिथपर्यंत ठीक होतं. एरव्ही त्यांचं वागणं नॉर्मल होतं, पण नंतर एके दिवशी मला जाणवलं त्यांना काहीतरी बोलावंसं वाटतंय. त्यांच्या मनात काही तरी आहे असं मला वाटलं. म्हाताऱ्या माणसांशी बोलावं, जर गप्पा माराव्यात म्हणजे त्यांना जर बरं वाटतं, असं म्हणतात म्हणून मी सहज त्यांना विचारलं,"आबा, अलीकडे थोडे गप्प वाटता. काय झालं?"

शब्दखुणा: 

कि...र्र...र्र...तन

Submitted by शाबुत on 11 April, 2014 - 07:56

एका किर्तनात एक बाबा सांगत होता की
जग हे असेच आहे....
... ते बदलायला निघालेले कितीतरी बदलेले,
(..कारण ते मुळ प्रवाहात सामिल झाले.)
... कारण बोलणे सोपे - करणे अवघड! हे त्यांनाही माहिती आहे,
.... तरीही ते बोलत आहेत, अगदी वेगवेगळ्या पध्दतीने,
.... त्यांना वाटते की आम्ही काहीही बोललो तरी
.... त्यावर लोक विश्वास ठेवतात, कारण ते माना हलवतात,
(...आता माना हलविणारे रोजाने मिळतात.)
.... कारण ते भ्रमात जगतात, नाईलाजाने जगतात,
(...काहींना फक्त जिवंत राहायचं आहे... तेही दुसर्‍याच्या जिवावर.)
.... खरे तर जिवनाची तत्वे आम्हालाच ठाऊक आहेत,
.... असे ते म्हणतात!

मराठी पाठ्यपुस्तकांतील धड्यांची चर्चा

Submitted by गजानन on 10 April, 2014 - 04:59

मराठी पाठ्यपुस्तकातील धड्यांची चर्चा करण्यासाठी एक धागा जुन्या मायबोलीत होता.

आता इथल्या दुसर्‍या एका बाफावर अशी चर्चा सुरू झाली आणि त्या धाग्याची आठवण झाली, म्हणून हा धागा काढला.

जुन्या धाग्यावरही बरीच चर्चा आहे. तीही जरूर वाचा.
जुन्या धाग्याचा दुवा: http://www.maayboli.com/hitguj/messages/46/4554.html

तर ती चर्चा इथे चालू ठेवू. Happy

अभंगगाथा - परम अर्थाची एक वाक्यता - अर्थात तुकोबा "वन लायनर" (भाग २)

Submitted by पुरंदरे शशांक on 7 April, 2014 - 00:06

संपादित - नेट गंडल्याने चुकून तीनदा प्रकाशित झाले आहे हे ........ ... ....... .
..............

अभंगगाथा - परम अर्थाची एक वाक्यता - अर्थात तुकोबा "वन लायनर" (भाग २)

Submitted by पुरंदरे शशांक on 7 April, 2014 - 00:05

अभंगगाथा - परम अर्थाची एक वाक्यता - अर्थात तुकोबा "वन लायनर" (भाग २)

सर्व मराठी भषिकांना तुकोबाच अगदी जवळचे, आपल्या नात्यातलेच का वाटतात -

१] बुवांनी त्यांच्या अभंगातून जी उदाहरणे दिली आहेत ती मुख्यतः संसारातीलच आहेत.

२] बुवांचे अभंग हे फार विद्वतप्रचुर भाषेतील नसून आपल्या बोली भाषेतील आहेत.

३] बुवा त्यांच्या अभंगातून कधी कधी जे कोरडे आपल्यावर ओढतात तेही आपल्याला अज्जिबात लागत नाहीत कारण - अरे कारट्या, छळवाद्या - म्हणून उच्चरवाने करवादणारी माऊलीच त्या लेकराला जशी स्वतःच्या मांडीवर घेऊन त्याचे लाड करते - तसेच बुवांचे प्रेम, आंतरिक कळवळा हेच कायम आपल्याला जाणवत असते.

घरट्यात माझीया ... (भाग २)

Submitted by शांकली on 6 April, 2014 - 06:46

घरट्यात माझीया .... (भाग २) (http://www.maayboli.com/node/48076 - भाग १)

दिलखुलास व्यक्तींमुळे रंगलेला दिलखुलास कार्यक्रम : कै. सुचेता जोशी काव्यस्पर्धा

Submitted by अ. अ. जोशी on 5 April, 2014 - 09:28

कै. सुचेता जोशी काव्यस्पर्धा या वेळीही मोठ्या उत्साहात पार पडली. यंदाचे वर्ष स्पर्धेचे 5 वे वर्ष होते. यावर्षी प्रेम या विषयावर आधारीत कविता पाठवून महाराष्ट्रातील 104 कवी-कवयित्रींनी या स्पर्धेत सहभाग घेतला. या सर्व कवींनी पाठविलेल्या कवितांच्या काव्यलेखनाचे परीक्षण गझलकार श्री. दिपक करंदीकर, कवयित्री सौ. रश्मी तुळजापूरकर यांनी केले. त्यातील निवडक 22 कवींनी दिनांक 30 मार्च 2014 रोजी झालेल्या अंतिम फेरीत सहभाग घेतला. काव्यसादरीकरणाचे मुख्य परीक्षण कवयित्री श्रीमती जयश्री घुले आणि कवी श्री. सारंग भणगे यांनी केले.

Pages

Subscribe to RSS - साहित्य