साहित्य

लक्ष्मीबाई धुरंधर आणि उकडलेली अंडी - भाग २

Submitted by दिनेश. on 2 July, 2014 - 08:07

तर मी चक्क उकडलेली अंडी का इथे मांडलीत ? मी अंडी खात नाही.. ( त्याच्यामागे मोठा इतिहास आहे.
मी ५ वर्षांचा असताना माझे एका कोंबडीवर प्रेम बसले होते. पण तिची योजना ज्या कारणासाठी झाली
होती, त्याच कारणासाठी घरातच तिची कत्तल झाली.. मेल्यावरही तिच्या पोटात अंडे सापडले. त्या तिच्या

लक्ष्मीबाई धुरंधर आणि उकडलेली अंडी - भाग १

Submitted by दिनेश. on 2 July, 2014 - 07:33

लक्ष्मीबाई धुरंधर यांचे " गृहिणीमित्र किंवा हजार पाककृती " असे पुस्तक माझ्या आईकडे होते. त्या पुस्तकाच्या
लेखिका लक्ष्मीबाई धुरंधरच होत्या का ते मला खात्रीने सांगता येणार नाही पण त्या पुस्तकात त्यांचा फोटो होता,
आणि आमच्या घरात त्या पुस्तकाचा उल्लेख तसाच होत असे.

विषय क्रमांक २ - भुजंग आप्पा

Submitted by किश्या on 30 June, 2014 - 13:56

"मालक घ्या तुरीच्या शेंगा आणल्याती तुमच्यासाठी तुम्हास्नी खुप आवडत्यात नं"

आजही हे वाक्य गावकडे गेलं आणि कापुस वेचनीचा दिवस असला की हमखास आठवतं,आणि आठवतो तो रानात काम करुन काळपट झालेला चेहरा , डोक्यावर लाल पटका, हातात एक छोटीशी कुर्‍हाड, अंगात मातीत राबुन राबुन काळपट झालेली बंडी, बंडीच्या खिशात कोंबडा छाप बिडी आणि एक माचीस , त्याच रंगाच धुरकट झालेल धोतर, आणि पायत गावातल्याच चांभाराने शिवलेला गाडीच्या टायर पासुन बनवलेला एक जोडा. भुजंग आप्पा.

विषय क्र, २ - जनाकाका

Submitted by आशूडी on 29 June, 2014 - 09:15

लहानपणी आम्ही आमच्या कसबा पेठेतल्या वाड्यात राहयचो. घर आणि शेजारी यांच्यातला फरक आम्हाला कधी जाणवला नाही असा आमचा वाडा. आजूबाजूलाही तेव्हा बरेच वाडे होते. या सगळ्या वाड्यांना एक विचित्र शाप होता. प्रत्येक वाड्यात एकतरी अर्धवट डोक्याची म्हणजे वेडसर व्यक्ती होती. म्हणजे त्या व्यक्तीच्या कुटुंबातल्या सर्व आयुष्यांना मिळून जोडलेलं आणखी एक सामायिक आयुष्य. अस्तित्व? नव्हे. तो माणूस काय करतो , काय खातो याकडे अभावानेच लक्ष दिलं जायचं पण तो काय करत नाही याचा पाढा मात्र सर्वांना तोंडपाठ असायचा.

तो पाणी भरत नाही.
तो पूजा करत नाही.
तो फुलं आणून देत नाही.
तो स्वच्छ राहत नाही.

काय ज्वाळेतून केव्हा धूर येतो रे धुराड्या

Submitted by वैवकु रीटर्न्स on 28 June, 2014 - 11:02

गेले काही दिवस झाले एका माणसाने वात आणलाय माबोच्या गझल सदरात . पण असो दु:ख त्याचे नाही ह्याचे आहे की त्या माणसामुळे इतरांच्या चांगल्या गझलांवर अत्यल्प किंवा शून्यच प्रतिसाद देणार्‍या अनेक आयडीज गझल आणि गझलकारांवर तोंडसुख घेत सुटले आहेत आकृतीबंधातच न बसणार्‍या रचना गझलेच्या धाग्यावर पडत आहेत..तरी मी आता ज्या गझलकारावर राग काढत आहे आहे खरेतर हा माझा पिंड नव्हेच वगैरे ब्लाब्लाब्लाब्ला ....तरीही मी जी रचना केलीये त्यास हिजो असे परदेशी भाषेत वगैरे ब्लाब्लाब्ला वगैरे
माबोवर हल्ली या प्रकारास ड्युझल असेही वगैरे वगैरे ब्लाब्लाब्ला
असो

अविस्मरणिय रुखवत.

Submitted by सुभाषिणी on 28 June, 2014 - 05:50

सुंदरसे रुखवत
देण्याघेण्यावरुन अनेक नवविवाहीतांना खुप छळ सहन करावा लागतो. अगदी बाई नवविवाहीत असते तेंव्हा पासुन ते तीच्या पोराबाळांच्यालग्नात सुध्दा तिच्या लग्नातल्या देण्याघेण्याचा उध्दार केला जातो. आज मात्र काही वेगळेच ऐकले.

विषय: 

विषय क्रमांक २ - केइजी ताकाहाशी

Submitted by सावली on 26 June, 2014 - 05:21

मी नव्या कंपनीत मुलाखतीसाठी पोहोचले तेव्हा रिसेप्शनवर कुणीच नव्हतं. आधीच सांगितल्याप्रमाणे एकशे नव्व्यणव एक्स्टेन्शन नंबरवर फोन केला आणि मी रिसेप्शनजवळ आल्याची वर्दी दिली. काही सेकंदात जपानी नियमाप्रमाणे काळा सुटबुट घातलेला एक अगदी तरुण जपानी मुलगा माझ्याशी बोलायला बाहेर आला. वयाने लहान, अगदी टिपिकल जपानी चेहेरा आणि केसांची स्टाईल, तुकतुकीत जपानी त्वचा, दिसायला देखणा पण जरा बुटका.

विषय क्र. २ जॅमी

Submitted by नंदिनी on 25 June, 2014 - 22:34

“मी जेव्हा कधी मरेन ना, तेव्हा प्लीज जॅमी आल्याशिवाय मला आग लावू नकोस” रात्री अडीच वाजता डोळ्यांत पाणी आणून मी नवर्‍याला झोपेतून उठवून सांगितलं. नवरा कंप्लीट गोंधळात. त्याला संदर्भच समजत नव्हता. जॅमी नुसता खदाखदा हसत होता. “पण तुला आगच लावायची असेल तर आताच लावून टाकू” या त्याच्या वाक्याने नवरा ताडकन जागा झाला. जॅमीची नईनवेली बायको मात्र “हे चाललंय काय?” मोडमध्ये होती. तसंही जॅमीशी लग्न झाल्यापासून ती कायम याच मोडमध्ये आहे आणि राहील. कारण, जॅमी ही व्यक्तीच तशी आहे.

विषय: 

माझ्या मनातले घर कोंदट. .

Submitted by दुसरबीडकर on 25 June, 2014 - 06:58

माझ्या मनातले घर कोंदट..
अन तू अख्खे घर धडधाकट...!!

तुझ्या प्रितीचे औषध व्हावे...
मरणावरी उतारा दसपट..!!

मौन तुझे मज बोलत असते..
व्यर्थ कशाला आदळआपट..!!

वसतिगृहावर मला सोडुनी..
हळवा होतो 'बाबा' तापट..!!

सुगी संपली स्वप्नांमधली..
मागे आठवणींचे धसकट..!!

असे जगू की तसे जगू मी...
आयुष्याची नुसती फरपट..!!

विहिर मनाची भरली नाही..
यंदा झाला पाउस हलकट..!!

डोळ्यामधले कळते तुजला..
उगीच का तू म्हटली...'चावट.'.!!

सुखाचीच पडझड झाल्यावर..
डागडुजी दुख करते दणकट...!!

भूक

Submitted by निशदे on 23 June, 2014 - 12:55

गारपिटीचा मारा असह्यच होता. उभं पीक जेमतेम १० मिनिटांच्या कालावधीमध्ये पूर्णपणे आडवं झालं होतं. गुडघ्यात डोके घालून धर्मा शेताकडे तासन्तास बघत राही. कर्जाच्या डोंगराखालि दबून गेलेला धर्मा आताशी कुठे वर यायची स्वप्ने बघू लागला होता. आणि या आक्रिताने त्या स्वप्नांची धूळधाण उडवली होती.

गारपीटग्रस्तांना मदत घोषित झाल्यावर धर्माला आशेचा किरण दिसला. आमदारसाहेबांनी स्वतः गावात येऊन २ शेतकर्‍यांना मदतीचे चेक स्वहस्ते दिले. मामलेदार कचेरीत जाऊन आता फक्त चेक घेऊन आले की आपल्याला कसलीच काळजी राहणार नाही अशी त्याची खात्रीच पटली.

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - साहित्य