भाषा
देव भक्त
देव भक्त
पहाटेस झाडलोट
सडा घालूनी अंगणी
रखुमाई लगबगी
शेण्या लाविते चुल्हाणी
पाणी अाणी कावडीने
धारा काढी अावडीने
विठू हरखे अंतरी
संतसंगाच्या ओढीने
दिंडी येता पंढरीस
विठू धावला वेशीत
प्रेम भक्तांचे अद्भुत
ओढी संतांना कुशीत
देवसंतांचे मिळणी
येत भाविका उधाण
गेला गेला जीवभाव
एकमेका लोटांगण
भक्तीसुखे लोभावला
देवे त्यागिले वैकुंठ
युगे अठ्ठाविस उभा
भक्तांलागी तो तिष्ठत...
ती तुझीच चूक होती ..!
"ती तुझीच चुक होती ..."
सोडून जेव्हा तू गेली तेव्हा
वाटलं माझी चूक होती..
पण पाहून आज तुला वाटलं
ती तुझीच चूक होती ...
प्रेमाचे वारे वाहत होते
माझ्याच मनामध्ये ..
तुला मात्र फ़क्त ती
झुळुक वाटत होती ..
पण पाहून तुला आज वाटलं
ती तुझीच चूक होती ..
पावसाच्या थेम्बांमध्ये सुद्धा
तुझीच चित्रं रंगवीली होती..
पाऊस उत्तरल्यावर आता
तू आठवणीत हरवून बसती ..
पण पाहून तुला आज वाटलं
ती तुझीच चूक होती ...
भाषा आणि संस्कृती
जगात भाषा कितीतरी आहेत पण सर्वात जवळची असते ती आपली मातृ भाषा. ती आपल्याला सर्वात प्रिय असते. आपुलकीची वाटते. आपण किती हि इंग्रजी फाडली तरी शिव्या मात्र मातृ भाषेतच देणार. त्यात जी मज्जा असते ती कुठेच नाही.
थोड्या दिवसांपूर्वी मी फिरायला म्हणून युरोप ला गेली होती. पाच ते सहा देश फिरली. प्रत्येक युरोप च्या देशाची वेगळी भाषा. छोटे छोटे देश आणि त्यांचे लहान लहान अप्रतिम, अविस्मरणीय ठिकाण. तिथे मला आपल्या कानावर भरपूर वेगवेगळे शब्द ऐकू आले.
खेळिया
खेळिया
खेळ मांडूनि पुढ्यात
गेला कळेना कोणास
खेळामधे दंग सारे
माथी एक कासाविस
कधी हासूनी मजेत
कधी रडती जोरात
त्याच सार्या विवंचना
एकरूप त्यात मस्त
धन्य धीराचे ते कोणी
खेळ देती भिर्काऊन
विचारती अांत अांत
कोण खेळिया महान
खेळियासी ओळखता
मनी कौतुक दाटले
रूप मनींचे अाघवे
उभे पुढ्यात ठाकले
खेळियाने विचारले
कोण व्हावे सांगा फक्त
हासोनिया संत बोले
देव तूचि, मी तो भक्त....
प्रेमतीर्थ
प्रेमतीर्थ
कर कटावरी । उभा तो पंढरी । भक्तांसी हाकारी । प्रेममूर्ति ।।
भक्तांसी केवळ । वाटतो निर्मळ । गोड प्रेमजळ । मुक्त हस्ते ।।
होवोनी सुस्नात । पावन तीर्थात । भक्त अानंदात । विरालेचि ।।
भक्तांची मिराशी । एक प्रेमराशी । प्रपंच विनाशी । नाठविती ।।
देव सुखावला । भक्तांसी फावला । प्रेमभाव भला । अासमंती ।।
सत्संगे अाकळे । येरव्ही नाकळे । भक्तांसी सोहळे । प्रेमतीर्थी ।।
जय हरि विठ्ठल जय जय विठ्ठल....
मिराशी - परंपरागत हक्क
सगुण ब्रह्म
सगुण ब्रह्म
वारकरी होऊ चला
तुळशीच्या कंठी माळा
तुका—माऊली साथीने
निघे गोपाळांचा मेळा
भावे गाऊया भजने
एकमेका लोटांगणे
नामघोष सप्रेमाने
टाळ वीणा संकीर्तने
धन्य संत संगतीत
दोष गेले, शुद्ध चित्त
विठू मावेना मनात
येतो अापैसा वाणीत
चंद्रभागा उचंबळे
भक्त सागर हेलावे
ब्रह्म सगुणता पावे
युगे अठ्ठावीस उभे.....
शब्दकोशांच्या मनोरंजक विश्वात
माध्यमिक शाळेत असताना आम्हाला रोजच्या वेळापत्रकात दोन मधल्या सुट्या असायच्या – एक लहान १५ मिनिटांची तर दुसरी मोठी ४५ मिनिटांची. मोठ्या सुटीमध्ये शाळेच्या ग्रंथालयात आमच्यासाठी वाचनाची सोय केलेली असे. तिथे बसून वाचताना समोरच्या भिंतीवर नजर जाई. तिथे मोठ्या व आकर्षक अक्षरात ‘ग्रंथ हेच गुरु’ हे वचन लिहिलेले होते. वाचनाच्या आवडीतून त्या वचनाची सत्यता पटत गेली, यात शंकाच नाही. मोठे होता होता मी विविध प्रकारचे तीन भाषांतील साहित्य वाचत गेलो आणि एका निष्कर्षाप्रत येउन ठेपलो. तो म्हणजे, या सर्व ग्रंथरूपी गुरूंचे गुरु म्हणजे शब्दकोश!
पेरुला चला!
आरंभम भाग - ३
"सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची..
गजाननाची आरती चालू होती. पुण्यात आल्यापासून दररोज मी गजाननाची आरती करत असे व त्यांनतर माझं दिवसाच कामकाज सुरू होई."
'तसंही मला जास्त काम नसे. श्वेता टेक्नॉलॉजीे फक्त मोठ्या बिजनेसलाच टेक्नॉलॉजी पुरवत असे आणि त्यामुळे काम कमी आणि पैसा जास्त असं सूत्र होतं. तसही काही असेल तरी आमची २४ जणींची टीम आपापल्या क्षेत्रात पूर्णपणे पारंगत होती. जरी मी एम डी असले तरीही आमच्यात सलोख्याचे संबंध होते."
"आमचा नफा खूप जास्त होता. पण आम्ही त्यातील फक्त १० टक्के भाग ठेवत असू आणि बाकी सर्व विधवा परितक्त्या महिलांसाठी दान करत असू."