Submitted by पुरंदरे शशांक on 7 July, 2017 - 04:59
खेळिया
खेळ मांडूनि पुढ्यात
गेला कळेना कोणास
खेळामधे दंग सारे
माथी एक कासाविस
कधी हासूनी मजेत
कधी रडती जोरात
त्याच सार्या विवंचना
एकरूप त्यात मस्त
धन्य धीराचे ते कोणी
खेळ देती भिर्काऊन
विचारती अांत अांत
कोण खेळिया महान
खेळियासी ओळखता
मनी कौतुक दाटले
रूप मनींचे अाघवे
उभे पुढ्यात ठाकले
खेळियाने विचारले
कोण व्हावे सांगा फक्त
हासोनिया संत बोले
देव तूचि, मी तो भक्त....
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
शब्द अपुरे पडताहेत . शेवट
शब्द अपुरे पडताहेत . शेवट भक्तीचा परमोच्च बिंदू . तुमची प्रतिभा अगाध आहे . धन्यवाद .
हा भक्तीचा महिमा की प्रतिभेचा
हा भक्तीचा महिमा की प्रतिभेचा....
खरच कळत नाही......
अप्रतिम, अप्रतिम, अप्रतिम रचना....
__/\__
अप्रतिम
अप्रतिम
धन्य धीराचे ते कोणी
धन्य धीराचे ते कोणी
खेळ देती भिर्काऊन>>> खुप सुरेख.
सुर्रेख!
सुर्रेख!
अप्रतिम!
अप्रतिम!
वा, सुंदर
वा, सुंदर
काय सुरेख लिहलय.
काय सुरेख लिहलय.