आई

सय

Submitted by यतीन on 31 August, 2019 - 08:49

आज वर्षपूर्ती निमित्ताने.............

पिंपळाच्या पानावर श्वास माझा अडकला
आठवणींना उजाळा देऊन गंध ओला झाला।

आखेरच्या क्षणांना मोकळा मार्ग दावून
लुकलुकत्या ता-याला पूर्ण विराम दिला।।

आज माय जाऊन एक वर्ष झाले त्या निमित्ताने.............

*यश*

शब्दखुणा: 

अश्रु..

Submitted by मन्या ऽ on 8 July, 2019 - 07:00

अश्रु..

तुझ्या डोळ्यांतील
अश्रु पाहुन
आई!..जीव माझा
कासावीस झाला
नेमका काय असेल
अर्थ तयाचा
तो आज उमगला

माझ्या प्रत्येक
वाटचालीसाठीची
तुझी होणारी
तगमग
आज मज जाणवली
अशा अजुन किती
वेदनांची अश्रुफुले
तु माझ्यासाठी सांडवली

तुझ्या नयनांतील
हे अश्रु
नसतील आता
वेदनेचे
ते अश्रु
असतील आता
आनंददायी क्षणांचे
तो टिपुन घेता तु
अलगद तुझ्या करांने
सफल होईल माझे
अवघे जीवन
तुझ्या पोटी
जन्मल्याचे!..

(दिप्ती भगत)

शब्दखुणा: 

आई

Submitted by amolpayghan on 24 April, 2019 - 22:32

'आई' या कवितेचे राहिलेले दोन कडवे

काय जादू असते
ममतेत कोण जाणे
'आई' म्हणुनी त्याने
हाक मारली नव्याने

आवाज ऐकुनी त्याचा
ती माता सुखावली
या मृत्युलोकात ती
पुन्हा द्विज झाली

शब्दखुणा: 

आई

Submitted by amolpayghan on 24 April, 2019 - 11:27

आई

दुखणे जरी बाळाचे
जळते मातेच्या काळजात
डोळ्यास झोप नाही
चिंतेत जगली रात

पसरून पदर देव्हाऱ्यात
स्वतःचे गार्हाणे मांडते
कर बरे बाळास माझ्या
म्हणुनी देवाशीच भांडते

लेकरास दुःखात पाहून
आज ती खचली होती
धरुनी छातीशी कोकराला
उपाशीच निजली होती
-अमोल

शब्दखुणा: 

आई

Submitted by विनोद. on 22 January, 2019 - 08:56

आई

तुच का ती जीने घडवला शिवा
तुच का ती जीने नीपजला शंभु छावा
ती जिजाऊ तुच तर ग...माता त्याची
इतिहासाच्या पानापानावर ख्याती ज्याची

तुला पाहुन त्या आठवतात... अंबा आणि काली
तुझ रुप पाहुन नजरेसमोर चंडीका आली
तुच तर घडवलास हा सारा इतिहास
या धरेवर तुला मान आहे खुप खास

तुच होतीस ना ती झाशीवाली
अग तुच तर ती रणमैदा झुंजाया आली
तुझेच डोळे रुद्र झाले
तुझ्याच गर्जने लोक उचली भाले

तुच आहेस ती जी जन्म देते
ठेच लागता उराशी घेते
तुलाच म्हणतात ना ग आई
लेकरासाठी जीचा जीव तळमळत राही

शब्दखुणा: 

अनमोल नथ

Submitted by मनीमोहोर on 30 November, 2018 - 11:10

माझ्या आईच्या पश्चात इतके वर्ष बहिणीने संभाळलेली तिची नथ अलीकडेच फार मोठ्या मनाने तिने मला दिली. त्याबद्दल तिचे खूप खूप आभार. मला स्वतःला नथ घालणे खरं तर आवडत नाही पण तरी ही आईची नथ तिने मला दिली हा मला माझा सन्मानच वाटला. त्यावेळी मला काय वाटलं ते शब्दात सांगणं कठीण आहे.

विषय: 

सांग मी काय करू ?

Submitted by Malkans on 9 September, 2018 - 22:04

प्रिय आईस ,
आई --- उतू गेलेल्या दुधावरची साय .... प्रेमाची सर्व नाती जपणारी ..... गेले कित्येक वर्षात तुझा स्पर्श तर नाहीच पण तुझी माझी साधी भेटही नाही. तुझ्या भेटीसाठी मी व्याकुळ ,मनातील तळमळ , या वेदना कुणाला सांगू , राहवलं नाही , निदान अश्रूंची शाई करून कागदावर लिहून मन मोकळं करावं

आई

Submitted by वृन्दा१ on 20 April, 2018 - 15:14

आमच्या लहानपणच्या खोड्या
तुझ्या डोळ्यांत हसल्या कितीदा
माझ्या हरवलेल्या बाहुल्या
तुझ्या कौतुकात सापडल्या कितीदा
तगमग तगमग होते जीवाची
मग धावत येतात तुझे भास
अवघ्या अस्तिवालाच लागते गं मग
तुझ्या भासांचीच वेडी आस

विषय: 
शब्दखुणा: 

आई

Submitted by वृन्दा१ on 5 April, 2018 - 09:53

जागं असण्याची भीती वाटते
झोपायची भीती वाटते
तू लवकर परत ये ना
मला सगळ्या जगाची भीती वाटते

विषय: 
शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - आई