मुक्तस्रोत(Open Source)

कॅनव्हास

Submitted by मन्या ऽ on 29 August, 2019 - 09:47

कॅनव्हास

रंगेबेरंगी दुनिया
चौफेर ;
आपले रंग कोणते
ओळखावे कसे?
आपले रंग
ते निवडावे कसे?

रंगेबेरंगी दुनिया
चौफेर ;
त्या रंगात एकरुप
व्हायचे ते कसे?

एकरुप झाल्यावर
स्वतःच स्वतःला
ओळखायचे ते कसे?
आपले रुप-गुण
दाखवावे ते कसे?

प्रश्न आहेत असे
अनेक ;
त्यांस उत्तर
ते द्यायलाच हवे?
कि काही प्रश्न
हे अनुत्तरीतच बरे?

प्रिये मी मोर झालो तुझ्यासाठी

Submitted by सिद्धेश्वर विला... on 28 August, 2019 - 04:28

प्रिये मी मोर झालो तुझ्यासाठी

प्रिये , मी श्वान झालो तुझ्यासाठी

भुंकत राही अवती भवती

रागाची गंगा अन शिव्यांची लाखोली

तुच वाहिली अन हाणली काठी

तरी भुंकत राही अवती भवती

प्रिये मी श्वान झालो तुझ्यासाठी

मोर होवुनी काय जाहले

होते नव्हते धुळीस मिळाले

श्वान होवुनी काय जाहले

होत ते पण मन पोळले

वेडा म्हणुनी ख्याती जाहली

शिव्यांची शिदोरी वाढत गेली

{{ सिद्धेश्वर विलास पाटणकर }}

शब्दखुणा: 

द्वंद्व..

Submitted by मन्या ऽ on 27 August, 2019 - 14:52

द्वंद्व..

होकार-नकाराच्या
खेळात नकाराचा
विजय झाला
बुद्धी आणि मनाच्या
द्वंद्वात बुद्धीचा
विजय झाला

विजय झाला असला
तरी मन घायाळ
झाले; आठवांरुपी
मनावर आज
ओरखडे उमटुन गेले

विजय नसे तो बुद्धीचा
विजय आहे तो
लोकांच्या विचित्र
नजरेचा-त्यांच्या
विकृत मनोवृत्तीचा..

(Dipti Bhagat)

काण्याला सुंदरी मिळाली देवाघरी

Submitted by सिद्धेश्वर विला... on 27 August, 2019 - 09:33

त्याच्याबद्दल फक्त ऐकून होतो

वाटलं एकदा परखून पाहावं

म्हणूनच गेलो त्याच्या दारी

तो शांत उभा होता पाषाणात

मागितली एक सुंदरी , कुणालाही न पटणारी

थेट सांगितलं त्याला निक्षून

खरा असशील तर हीच गळ्यात दे बांधून

पूर्ण दिवस मंदिरात, उभा राहीन मी काणा बनून

लगेच तिथे घंटा वाजली

अर्थात , धोक्याची होती ते नंतर समजली

दुसऱ्याच दिवशी निकाल लागला

सुंदर धोंडा आपोआप गळ्यात पडला

सुतासारखी सरळ वाटत होती

गळ्यात पडल्यावर मात्र सारखी गरळ ओकत होती

माझ्या प्रत्येक सवयीत उभीआडवी ठोकत होती

शब्दखुणा: 

सुख-दुःख

Submitted by मन्या ऽ on 23 August, 2019 - 05:38

सुख-दुःख

आज आनंदीआनंद
झाला,दुःखामागे
सुख धावते; हा
विश्वास ठाम झाला

दुःख असतेच मुळी
पारिजातकाप्रमाणे
मन हळवे करुन जाते
जाता जाता
आयुष्याला आठवांचा
दरवळ देऊन जाते

सुखापेक्षा करावी
दुःखाची आराधना
दुःखाचाच सोबती असे
सुखाचा अनमोल ठेवा

दुःख आहे ते
आभाळ; पण
सुखाच्या
नक्षत्रांनी सजलेले
अन् सुर्याच्या
तेजाने व्यापलेले

(Dipti Bhagat)

अबोला..

Submitted by मन्या ऽ on 22 August, 2019 - 07:11

अबोला..

अबोला होताच मुळी
दोघांचा जीवघेणा छंद
तरी प्रेमज्योत
तेवत होती मंद

तुझ्या आठवणींनी
गर्दीतही एकटी होते
तुझ्या आठवणींनी
एकटी असुनही
एकटी नव्हते

वादातुन साधले
नवे चांगले
प्रेमाच्या रोपाला
फुटले नवे धुमारे

शब्दाशब्दांत झाले
आज प्रेम साजरे
माझ्या-तुझ्या
वादातले प्रेम गहरे

(Dipti Bhagat)

शोध स्वतःचा.

Submitted by मन्या ऽ on 12 August, 2019 - 16:02

शोध स्वतःचा..

शोध घे तु स्वतःचा
नको घेऊस आता
तु आधार कुणाचा
प्रश्न आहे आता
तुझ्या अस्तित्वाचा

खुप झालं आता
मुसमुसत तुझं ते रडत
अंधारात चाचपडणं
आणि खुप झालं ते
दुसर्यांकडे मदतीच्या
आशेने केवीलवाणं बघणं

उठ आणि उभी राहा
तु हिंमतीनं
रखरखत्या उन्हात
आज पोळशील
काचर्या पावसात
आज भिजशील

आज सारंकाही
सहन करशील तेव्हाच
तर उद्याच्या सुर्याला तु
तुझ्या नजरेत पाहशील

स्वाभिमाननं जगायला
अन् खंबीरपणानं
दुनियेला तोंड
द्यायला शिकशील

विषवल्ली ! -9

Submitted by अँड. हरिदास on 8 August, 2019 - 13:34

राजेश वाड्यात पोहचला..वाड्याच बाह्य रूप काळ्या अंधारात एखाद्या घात घालून बसलेल्या सैतानासारख वाटत होत. तो जसा आता आला तसा त्या गुप्त खोलीत दाखल झाला. जंगम वकील त्याठिकाणी आधीच हजर होता. विधीची बहुतेक तयारी पूर्ण झाल्याचे दिसत होते. होम मांडल्या गेला होता. विधीचं साहित्य एकाबाजूला ठेवलं होतं. कोपऱ्यात हात बांधलेल्या अवस्थेत एक सोळा-सतरा वर्षाची मुलगी बेशुद्धवस्थेत पडलेली होती. राजेश आला तसा होमच्या एका बाजूला जाऊन बसला. त्याच्या समोर कोण्यातरी अघोरी देवतेची मूर्ती स्थापित केली होती. निर्विकारपणे राजेश मूर्तीच्या समोर येऊन बसला. आजूबाजूच्या परिस्थितीची त्याला कुठलीचं जाणीव नव्हती.

विषवल्ली ! - 8

Submitted by अँड. हरिदास on 8 August, 2019 - 10:35

राजेशला वाड्यात धोका असल्याचे माहीत असूनही लक्ष्मी ताईंनी घटनात प्रत्यक्ष दखल देण्याचा आपला बेत रद्द केला, आणि त्या परत घरी आल्या. मात्र त्यांचे चित्त ठिकाणावर नव्हतं. आल्या आल्या त्यांनी देव्हारा गाठला आणि अनुष्ठान मांडलं. प्रत्यक्षरीत्या नाही तर किमान मानसिक पातळीवर त्या राजेश पाठराखण करणार होत्या..! अनुष्ठांन लागलं..मनाची सगळी दार उघडी झाली. त्या राजेशच्या मनाचा वेध घेण्याचा प्रयत्न करू लागल्या. मात्र वाड्याची दरवाजे त्यांच्यासाठी बंद होती. मानसिक तरंगलहरीद्वारे वाड्यात घुसण्याचा त्यांनी अनेकदा पर्यंत केला मात्र यश मिळालं नाही.

विषवल्ली ! -7

Submitted by अँड. हरिदास on 7 August, 2019 - 23:10

राजेश शुद्धीवर आला तेंव्हा आपण नेमकं कुठं आहोत, हेचं क्षणभर त्याला उमगलं नाही. कशाचेच संदर्भ आधी जुळले नाही... पण एक-एक सेकंद उलटत गेला तसे सर्व प्रसंग त्याच्या मनपटलावर साकार झाले. भय, आश्चर्य आणि हुरहूर अश्या भावनांचे विचित्र मिश्रण त्याच्या अंगात उद्भवले..काही वेळापूर्वी घडलेल्या घटनांनी त्याच्या अंगावर काटे उठत होते. तो ज्या खोलीत होता तिचे तापमान इतके कमी जरी नसले तरी आपल्या हाडांना थंडी वाजत असल्याची जाणीव राजेशला होत होती. जरा वेळाने त्याच्या मनातील भीतीचा जोर ओसरून गेला. काहीसे विचार करण्याच्या अवस्थेत आल्यावर त्याने लक्षपूर्वक खोलीची पाहणी केली.

Pages

Subscribe to RSS - मुक्तस्रोत(Open Source)