अस्तित्व
----------------------------------------------------------------------------------------------------------------
लोहगडाच्या पायथ्याशी वसलेलं आमचं गाव . आमच्या छोट्याशा गावच्या छोट्याशा शाळेत एक पाहुणे आले होते. आबा . आम्हां मुलांना भेटायला. शिक्षणातून आयुष्य कसं घडवता येतं , यावर त्यांचं भाषण होतं . शिक्षणाच्या माध्यमातून ते समाजसेवा करत होते .
पावसाचे दिवस.पण पाऊस काही नव्हता.त्यामुळे आम्ही शाळेच्या मैदानातच होतो . लाल मातीमध्ये बसलेलो. तर आमच्या मागे, हिरवा झालेला लोहगड धुक्याची तलम पांढरी ओढणी पांघरून बसलेला.
तुझ्या अस्तित्वाबद्दल काय बोलावे
तुझ्या तेजापुढे वाटावे आकाश ही ठेंगणे....
तुझ्यामुळेच आहे सृष्टी तील पाना-फुलांची हिरवी झालर
तू नसल्यास कुठून येईल आकाशने पांघरलेली निळी चादर
आमच्या आशेच्या किरणांचा सूर्योदय पण तुझ्यामुळे
स्वर्गाचे ही घडते दर्शन तुझ्याच सूर्यास्था मुळे
इतका कोण कसा असू शकतो निस्वार्थी कर्मयोगी
स्वतः तळपत राहून ठरतो जगाचा तू माऊली
सागरच्या अथांगाचे कारण पण तू ठरतोस
चंद्राच्या अस्तित्वासाठी स्वतः मात्र रोज मावळतोस
आदित्या!!! तुझ्या अस्तित्वाबद्दल काय बोलावे
तुझ्या तेजापुढे वाटावे आकाश ही ठेंगणे....
अस्तित्व ते तुझे..
धुक्यासम अस्तित्व ते तुझे
अलवार मिठीत तुझिया मी येई
त्या मिठीत मी विरताना
तुझे अस्तित्व विरुन जाई
मृदुगंध अस्तित्व ते तुझे
नव्याने फुलणारे
दरवळ दाटला आसमंतात
जीवन सुगंधी करणारे
तुला श्वासात भरु पाहता
मजला भुल देणारे
अस्तित्व ते तुझे
धुसर दर्पणाप्रमाणे
ओळख नजरेत असुन
मज सदैव अनोळखी भासणारे
अस्तित्व ते तुझे
ओल्या रेतीत उमटणाऱ्या
पाऊलखुणेप्रमाणे
नोंद मनात होताच
सागराने पुसून टाकलेले
कॅनव्हास
रंगेबेरंगी दुनिया
चौफेर ;
आपले रंग कोणते
ओळखावे कसे?
आपले रंग
ते निवडावे कसे?
रंगेबेरंगी दुनिया
चौफेर ;
त्या रंगात एकरुप
व्हायचे ते कसे?
एकरुप झाल्यावर
स्वतःच स्वतःला
ओळखायचे ते कसे?
आपले रुप-गुण
दाखवावे ते कसे?
प्रश्न आहेत असे
अनेक ;
त्यांस उत्तर
ते द्यायलाच हवे?
कि काही प्रश्न
हे अनुत्तरीतच बरे?
शोध स्वतःचा..
शोध घे तु स्वतःचा
नको घेऊस आता
तु आधार कुणाचा
प्रश्न आहे आता
तुझ्या अस्तित्वाचा
खुप झालं आता
मुसमुसत तुझं ते रडत
अंधारात चाचपडणं
आणि खुप झालं ते
दुसर्यांकडे मदतीच्या
आशेने केवीलवाणं बघणं
उठ आणि उभी राहा
तु हिंमतीनं
रखरखत्या उन्हात
आज पोळशील
काचर्या पावसात
आज भिजशील
आज सारंकाही
सहन करशील तेव्हाच
तर उद्याच्या सुर्याला तु
तुझ्या नजरेत पाहशील
स्वाभिमाननं जगायला
अन् खंबीरपणानं
दुनियेला तोंड
द्यायला शिकशील