द्वंद्व..(सुधारित)

Submitted by मन्या ऽ on 30 August, 2019 - 03:26

द्वंद्व..(सुधारित)

द्वंद्व..
www.maayboli.com/node/71219

होकार नकाराच्या
खेळात; नकाराचा
विजय झाला
बुद्धी आणि मनाच्या
द्वंद्वात; बुद्धीचा
विजय झाला

विजय झाला असला
तरी मन घायाळ
झाले; आठवांरुपी
मनावर आज
ओरखडे उमटुन गेले

होते घुसमट
या मनाची
कोणी ठेवेल का
कधी जाण याची?

अपेक्षांचा बोजवारा
वाहताना
किती द्यायची ती
उत्तरे त्या छळणार्या
विखारी नजरांना

विजय नसे तो
बुद्धीचा
विजय आहे तो
लोकांच्या विचित्र
नजरेचा; त्यांच्या
विकृत मनोवृत्तीचा

या नजरेला सहन
करायचे ते किती?
या विकृतीला
खतपाणी घालायचे
तरी किती?

उठून समक्ष
उभे ठाकायचे
त्यां विकृत नजरांना
नजर देऊन
आपले द्वंद्व
आपणच लढायचे

शेवटच्या श्वासापर्यत
आपल्या निर्णयांवर
ठाम राहायचे
आपले द्वंद्व
आपण लढायचे

(Dipti Bhagat)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह.....