काण्याला सुंदरी मिळाली देवाघरी

Submitted by सिद्धेश्वर विला... on 27 August, 2019 - 09:33

त्याच्याबद्दल फक्त ऐकून होतो

वाटलं एकदा परखून पाहावं

म्हणूनच गेलो त्याच्या दारी

तो शांत उभा होता पाषाणात

मागितली एक सुंदरी , कुणालाही न पटणारी

थेट सांगितलं त्याला निक्षून

खरा असशील तर हीच गळ्यात दे बांधून

पूर्ण दिवस मंदिरात, उभा राहीन मी काणा बनून

लगेच तिथे घंटा वाजली

अर्थात , धोक्याची होती ते नंतर समजली

दुसऱ्याच दिवशी निकाल लागला

सुंदर धोंडा आपोआप गळ्यात पडला

सुतासारखी सरळ वाटत होती

गळ्यात पडल्यावर मात्र सारखी गरळ ओकत होती

माझ्या प्रत्येक सवयीत उभीआडवी ठोकत होती

काय करू नि काय नको ? असे होऊन गेले

इचार मनात येऊन येऊन डोके *ऊन गेले

जास्तच लागायला लागल्यावर

ते मंदिर पुन्हा आठवले

पायरी चढताचक्षणी तयाची

वाटलं जणू त्या देवासकट माझ्यावर हसले

नाक रगडले , क्षमा मागितली

तरी माझी लागायची नाही थांबली

कशीबशी मग मलाच माझी

ती नवसयाचना आठवली

सुरु झाले यत्न पुन्हा ते

डोळे ठेवले नजरेत स्थिर

नजर रोखता दुखु लागली मध्यभागाची शीर

काणा बनण्यापायी अर्धा दिवस उडून गेला

झक मारली नि कुठे घातली , कुठला विचित्र नवस केला ?

प्रयत्नांती यश मिळते हे जाणून पुरता होतो

रोज वेळ काढुनी , थोडा काणा बनत होतो

सवय इतकी लागली कि हळूहळू

डोळे कायमचे झाले तिरळे

जो तो येता जाता मजला

काणा काणा चिडवे

तुझ्यासंग मी अशक्य राहणे

बोलून पळाली ती खविस सुंदरी

या काण्यासंगे आता कोण राहणार ?

काणा निघाला डोळे सरळ कराया पुन्हा त्याच मंदिरी

{{ सिद्धेश्वर विलास पाटणकर }}

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

परत डोळे सरळ करू नका.
नाही तर परत यायची ती
काणा काणा आन पडी मै तेरे द्वार म्हणत.

काणं यडंच दिस्तंय. तीला असं खूष ठिवायचं की, " ओ मेरे काणा रे काणा.. दे दूंगी सबकूच तूम्हे.. ओ मेरे काणा.. जूदा मत होना.. ओ मेरे काणा.." असं म्हणत रायली अस्ती सुंद्री.

कसलं आलंय ओ ,, आजकालच्या सुंदऱ्या द्वाड बघा .. त्यांना गाडी बंगला नोकर चाकर असलं तर लुळ्या पांगळ्याशी किंवा म्हाताऱ्याशीपण लगीन करतील .. पण हा आमचा काना आधीच दीडशहाना त्यात त्याने असला विचित्र नवस मागून ठेवला आणि फेडता फेडता नाकीनऊ आणले .. ते म्हणतात ना तेलही गेले तूपही गेले हाती आले धुपाटणे ...

तस काय नाय. स्त्री पुरुषाचे मन बघते, रुप नाय बघत. आनेक गोऱ्यागोमट्या, देखण्या बाया दिसायला कुरुप पुरुषांबरुबर संसार कर्ताना पहात आहे.