प्रेम की crush?

Submitted by प्रिया खोत on 20 October, 2019 - 10:03

सुकन्या पाचवीला असताना मध्यातच सहा माही नंतर एका मुलाचं शाळेत तिच्याच वर्गात ऍडमिशन होत. नवीन ऍडमिशन असल्यामुळे आणि तेही वर्षाच्या मधेच आल्यामुळे शिक्षक त्याच्यासाठी थोडे उजवेच होते. सर्वं वर्गाशी त्याची ओळख करून दिली, त्याच कौतुक केलं.
"तर हा आहे ओंकार पाटील खूप हुशार आहे वडलांची बदली मुंबईत झाली म्हणून तो गावावरून मुंबई ला आला,आणि आता आपल्या शाळेत आला आहे त्याला अभ्यासात मदत करा आणि त्याचे मित्र मैत्रिणी बना" अस खुद्द मुख्याध्यापक बाईंनी येऊन वर्गात सांगितलं.
त्याला बघितल्या पासून सुकन्याला तो थोडा वेगळाच वाटायचं अगदी स्पेशल कोणी असल्या सारखाच. सुकन्या थोडी लाजाळू घाबरट ना खूप हुशार ना ढ अशी मुलगी. ती त्याच शाळेत पहिली पासून असल्यामुळे तिचे खूप मित्र मैत्रिणी होते.
प्रेम म्हणजे काय हे तर तिला माहित नव्हतच पाचवीच्या मुलीला प्रेम माहिती तरी असेल का? तिला त्याच्याशी बोलायची भीती वाटायची ती त्याच्या सर्व मित्रांशी ( त्याच्यासाठी नवीन असलेल्या पण तिचे आधी पासूनचे मित्र) बोलायची पण तो समोर आला की ती गप्प.
सहावी ला असताना इकदा तर तिने( सुकन्याने) खुप साध्या गोष्टीवरून वरून एका मुलींशी भांडण केलं खर कारण तर ती मुलगी ओंकारशी चांगली बोलायची म्हणून तिला राग होता.
सहावी सातवी असच त्याच्याकडे बघत निघून गेले पण त्यात तिला एक गोष्ट जाणवली ती म्हणजे दोघांची विचारसरणी वेगळी होती. शाळेत एकदा बाईंनी अर्धा ग्लास पाण्यानी भरला आहे की रिकामा हे विचारल असता तिच्यासाठी तो ग्लास भरलेला आणि त्याच्यासाठी अर्धा रिकामा होता.बाईंनी तीच आणि अजून ५-६ जणांचं ज्याचं मत सारख होत त्यांचं त्या वेळी कौतुक ही केलं होतं.
सातवी ला असताना ओंकार चा पहिला क्रमांक आला आणि म्हणून त्यांनी सेमी- इंग्लिश घेतलं आणि आठवी ला तो ब तुकडीतून अ तुकडती गेला तस सुकन्याचा ही चौथा क्रमांक आला होता पण तिला इंग्लिश चि खूप भीती वाटत असल्यामुळे तिने सेमी इंग्लिश नाही घेतलं आणि ती ब तुकडीतच राहिली.
आठवीला असताना त्याची तुकडी बद्दलली, तस तो तिला दिसायचा ही कमी किंबहूना बंदच झालं तरी कधीतरी तो दिसेल याची ती नेहमीच वाट बघत असायची. या काळात सुकन्याचा स्वभाव पण बदलला लाजाळू आणि घाबरट असलेली सुकन्या आता बिनधास्त झाली होती .ती ओंकार ला विसरली न्हवती.
दहावीला असताना अ तुकडी आणि ब तुकडी समोरा- समोर आले आणि पुन्हा त्या दोघांचा आमना- सामना चालू झाला. ते दोघेही रोजच एकमेकांच्या समोर यायचे. आता तो ही तिच्याकडे बघून हसायचा. मधल्या सुट्टीत डब्बा खायच्या आधी हाथ धुवुन यायची वेळ दोघांची एकच झाली होती. जणू काही रोजचाच दिनक्रम झाला होता.
शाळेत शिक्षक दिनानिमित्ताने दहावीच्या मुलांना शिक्षक बनून शिकवण्याची संधी मिळायची, त्यात इतर मुलांप्रमाणे ओंकार आणि सुकन्यानी सुद्धा भाग घेतला होता. ओंकार ला सकाळची बॅच आणि सुकन्याला दुपारची बॅच आली होती. त्या दिवशी ओंकार सकाळी त्याची सुट्टी झाली असतानाही दुपारी पण थांबलेला आणि फक्त थांबलाच न्हवता तर काहीं काम नसताना सुध्दा सुकन्या वर्गात शिकवत असताना वर्गात आलेला काय चालू आहे ते बघायला. बघितलं आणि थोडं थांबुन गेला.
ओंकार सुकन्याच्या सर्व मैत्रिणींशी बोलायचा फक्त सुकन्याशी नाही बोलायचा आणि सुकन्या पण ओंकार च्या सर्व मित्रांशी बोलायची पण ओंकार शी नाही. कित्येक वेळा ते एका ग्रुप मध्येच असायचे पण एकमेकांशी बोलायचे नाही.
एकदा तर गम्मतच होते, शाळेत मधल्या सुट्टीत काही माझी विध्यार्थी येतात एक मुलींचा ग्रूप असतो. तेव्हा त्या ग्रुप मध्ये एक मुलगी असते तिने जीन्स टी-शर्ट घातलेला असतो. तो टी-शर्ट थोडा तोकडा नवीन फॅशन चा असतो. ती मुलगी पुढे तिच्या मागे ओंकार आणि ओंकार च्या मागे सुकन्या आणि तिची मैत्रीण असे क्रमात असतात. त्या वेळी ओंकार एकदा त्या मुली कडे बघत असतो आणि एकदा सुकन्या कडे बघून फक्त हसत असतो.
दहावीला ओंकार ला "बेस्ट स्टुडंट ऑफ द इयर" च बक्षीस मिळत सुकन्या खूप खूष असते. शिक्षक तर त्याचे गुण गाणं गाऊन थकायचे नाहीत आणि सुकन्या घरी त्याचे गुण गाणं करन थकायची नाही.
सुकन्या खुप बडबड करायची तिच्या पोटात काही राहायचं नाही असं म्हटलं तरी चालेल ती घरी आणि तिच्या एक मैत्रिणी सोबत जी तिच्याच बाजूला राहायची नमिता सोबत ओंकार विषयी खूप बोलायची. नमिता आणि ती एकत्रच लहानाचे मोठे झाले नमिता 3 वेला नापास झाली म्हणून मागच्या वर्गात राहिली पण एकाच शाळेत होते आणि नेहमी एकत्रच असायचे.
दहावी ला ओंकार चा शाळेतून दुसरा न. येतो सुकन्या तिच्या वर्गातून चौथी येते. ओंकार शाळेतून पाहिला येईल अस वाटलं पण दुसरा आला आणि सुकन्याला तिला इतके चांगले मार्कस मिळतील अस वाटलं पण न्हवत.
दहावी नंतर ओंकार sceince मध्ये ऍडमिशन घेतो सुकन्या ची घरची आर्थिक स्थिती तितकी नसते ती commerce मधून ऍडमिशन घेते. त्या दोघांचे कॉलेज वेगळे होतोत भेटण दिसणं ही बंद होत. तरी ती त्याच्यातच रमलेली असते.
ती घरात तिचा मोठा भाऊ बाबा आणि आई असतात अचानक तिचा मोठा भाऊ तिला विचारतो "तुझं आणि ओंकार च affair चालू आहे का?" तिला धक्काच बसतो अचानक तिला अस विचारलं म्हणून ती घाबरते पण स्वतः ला सांभाळते आणि अस का विचारलं ते आधी विचारते, त्यावर तिचा भाऊ सांगतो अर्पणानि पूर्ण चाळीत अस पसरवल आहे की तीच आणि ओंकार च affair चालू आहे. तिला खूप रडू येत असत पण ती सावरते स्वतःला आणि घरी सांगते त्यांचं affair चालू नाही ते दोघे एकमेकांशी बोलत सुद्धा नाहीत. सर्व तिच्यावर विश्वास ठेवतात आणि विषय तिकडेच थांबवत. त्या दिवशी सुकन्या खूप रडते पण कोणाला सांगत ही नाही.
अर्पणा म्हणजे तिची सख्खी चुलत बहीण. एकाच चाळीत राहत असतात पण पक्क्या दुष्मन असतात. कोणीही त्यांच्यातील भांडणं मिटवण्याचा प्रयत्न सुद्धा करत नाही.
अर्पणा चे आणि सुकन्या एकाच ठिकाणी राहत असल्यामुळे दोघींच्या मैत्रिणी एकच असतात.
सुकन्या नमिताला जाऊन विचारते अर्पणाला कस समजलं ओंकार च नाव? नमिता तिला सांगते " तू एकदा बोलता बोलता एका कार्ड वर ओंकार च नाव लिहिलं होत आणि ते अर्पणाला मिळालं होतं." त्यावर सुकन्या तिला सांगते नाव लिहिलं पण ते खोडून काढल होत याची आठवण देते, सुकन्याला वाटत नमितानेच तिला ओंकारच सांगितलं असत पण सुकन्या तिच्याशी जास्त वाद घालत नाही कारण वाद घालण्यात काही अर्थ न्हवताच.
सुकन्या एव्हाना जवळपास रोजच रडायला लागली होती कारण ओंकारा भेटून त्याच्याशी बोलणं शक्य न्हवत तो तिला दिसतही न्हवता आणि दुसरीकडे घरी खूप प्रयत्न करून सुद्धा ओंकारच नाव सुद्धा काढू शकत न्हवती तसा प्रयत्न केला तर घरात एकदम शांतता पसरायची, भयानक शांतता.
खूप प्रयत्न करूनही ती ओंकारला विसरू शकत न्हवती कॉलेज मध्ये खूप मित्र असताना ही तिच्या मनातुन आणि डोक्यातून ओंकार जाताच न्हवता.
ती खूप दुखावली होतो, कदाचित खूप खोलवर दुखावली होती पण ती फक्त रडत न्हवती ती इंडेपेनडेंट बनली होती अगदी 18 वर्षे झाली आणि कामाला जायला लागली होती. कॉलेज जॉब पूर्ण दिवस स्वतः ला कामात व्यस्त ठेवायची .
ती 21 वर्षांची असताना तिला तिची आई विचारते तुला कोणी आवडत का? खर तर तिच्या आईला ओंकार विषयी विचारायचं होत पण तिने स्पष्ट विचारलं न्हवत पण सुकन्या ला ते समजल होत तिने पुन्हा नाही सांगितलं. इतक्या वर्षात तिचा आणि ओंकारचा काहीच संपर्क झाला न्हवता ती सांगणार तरी काय होती. ओंकार ने तिला इतकं व्यापल होत की त्याच्याशिवाय ती कोणाचा विचार करूच शकत न्हवती.
तिच लग्न 22 व्या वर्षी होत मनात ओंकार असला तरी लग्न दुसऱ्यासोबतच होत. तिही लग्नाला तयार होते कारण ओंकारची वाट बघण्याचं काही कारण न्हवत तिच्याकडे.
खोटा आनंद दाखवण्यात ती हुशार असतेच. ती लग्न करते आणि खूष राहण्याचा प्रयत्न ही करते.
लग्नाच्या दीड वर्षानी ती गरोदर असतांना त्याच्या शाळेत ल्या मित्रांचा get together होत त्यात पुन्हा ते दोघे भेटतात पण आता उशीर झाला असतो. तरीही ते एकमेकांकडे बघातही नाहीत बोलणं तर लांबच.
आज तिच्या लग्नाला ६-७ वर्ष झालीत तिला एक मुलगा आहे पण तरीही त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी ती आठवणीने त्याला massege करते . आजही ओंकार अविवाहित आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Ek awyakt prem kahani... itkech mhanen. Jya tya weli vyakt vhawe hech khare. Pan kahi karnanmule anekda ase zale nahi tar... just go with the time Happy

Yes Atul time is best solution for some problems