मुक्तस्रोत(Open Source)

असेही एकदा व्हावे..

Submitted by मन्या ऽ on 6 August, 2019 - 18:37

असेही एकदा व्हावे..

असेही एकदा व्हावे
स्वप्नांना एक
मुक्त आभाळ मिळावे

असेही एकदा व्हावे
इच्छां-आकांक्षाना
महत्वाकांक्षी होण्याचे बळ मिळावे

असेही एकदा व्हावे माणसांच्या मनातले
गुज न सांगता कळावे

असेही एकदा व्हावे
वेदना उमजुन पापणीने
डोळे अलगद टिपावे

असेही एकदा व्हावे
सुखाने दुखाःस
आपले जिवलग मानावे

असेही एकदा व्हावे
दुसर्यासाठी जगणे
हे जीवनाचे ध्यास बनावे

असेही एकदा व्हावे
जीवन-मृत्युचे रेषाखंड तोडुन दोन जीव
एक श्वास व्हावे ..

विषवल्ली ! - 6

Submitted by अँड. हरिदास on 6 August, 2019 - 04:47

रात्रीचे जेवण उरकल्यावर राजेश आणि ताई काही वेळ व्हरांड्यात बोलत बसले होते. पण, राजेशचं कशातचं लक्ष लागत नव्हतं. क्षणाक्षणाला त्याच मन जास्तचं बेचैन होत होतं. 'या घरातून बाहेर पडावं!' असं त्याला प्रकर्षाने वाटू लागलं. त्याने स्वतः ला आवरण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु मनाला रोखणे आता त्याला शक्य होत नव्हतं. त्याची चलबिचल ताई लक्षपूर्वक न्याहाळत होत्या.' काहीतरी गडबड असल्याचे त्यांच्या लक्षात आले. पण, त्या बोलल्या काहीच नाही. शेवटी असह्य झाल्याने "जरा फिरुन येतो.." म्हणत राजेश उठला आणि बाहेर आला. रस्त्यावर येताच त्याला मोकळं मोकळं वाटू लागलं. तो रस्त्याने सहज फिरू लागला.

विषवल्ली - ५

Submitted by अँड. हरिदास on 5 August, 2019 - 07:57

दुपारी चार वाजेच्या सुमारास लक्ष्मी ताई ची गाडी जंगम वकिलाच्या घरासमोर उभी राहिली. गाडीतून उतरतांनाचं ताईला त्या जागेचा संशय यायला लागला. तिथं काहितरी चुकीचं असल्याची त्यांना जाणीव झाली. शोध घायला आता वेळ नव्हता. ऍड जंगम त्यांच्याकडेचं बघत उभा होता. तो नुकताच कामावरून परत आल्याचे दिसत होते. कुठलीही औपचारिकता न पाळता लक्ष्मीताई आणि राजेश जंगम वकिलाच्या कार्यालयात दाखल झाले. राजेश आणि त्याच्यासोबत आलेल्या बाईला बघून ऍड. जंगमच्या चेहऱ्यावर नापसंतीची आठी आली. त्याची पर्वा न करता ताई थेट विझीटिंग चेअरवर जाऊन बसल्या.

विषवल्ली -४

Submitted by अँड. हरिदास on 5 August, 2019 - 00:11

विषवल्ली -४

वाड्यातील विषारी विकारांची लागण झाल्याचा परिणाम राजेशसमोर आला तेंव्हा तो हबकून गेला. जी गायत्री आपली मदत करण्यासाठी निघाली होती; तिच्यावरचं अतिप्रसंग करण्याचा आपण प्रयत्न केला..! पश्चाताप आणि संतापाने त्याचे मन भरुन आलं.

विरह..

Submitted by मन्या ऽ on 1 August, 2019 - 03:18

विरह..

चंद्र-तारकांनी भरलेले आभाळ हे आज
रिते आहे
मनातल्या विचारांचे
मळभ हे आज
आभाळातही दाटले आहे

तुझ्यासवे जगायचे होते
आयुष्य हे सारे
आणाभाका- वचनंही
दिलेली एकमेकांस
ते सारे धुक्यात
आज विरले आहे

आषाढघन होऊन
तु बरसुन गेलास
मनात नव्या जाणिवा
पेरुन गेलास
त्याच जाणिवांआधारे
जगते आहे
पण आता मी एकटी
कमी पडते आहे
दिले वचन मोडते आहे

शब्दखुणा: 

राहुन गेले..

Submitted by मन्या ऽ on 29 July, 2019 - 13:54

राहुन गेले..

तुझ्यासवे अवखळ
बालपणीचे ते क्षण
पुन्हा एकदा
वेचायचे होते
ते क्षण वेचणे
राहुन गेले

तुझे जीवनगीत
ऐकत तुझ्या
कुशीत रातभर
जागायचे होते
ते जागणे आता
राहुन गेले

तु शिकवलेस
मज चालावयास
तुला आधारासाठी
हात देणे राहुन गेले

तुझ्याकडुन अजुन
जगरहाटीचे नियम
शिकायचे होते
पण ते नियम
शिकणे राहुन गेले

शब्दखुणा: 

विषवल्ली ! -3

Submitted by अँड. हरिदास on 16 July, 2019 - 05:09

ऍड. जंगमची हकीकत ऐकल्यावर राजेश संभ्रमात पडला. पटवर्धनांचा वाडा सामान्य नव्हता, हे स्पष्ट झालं होतं. त्यामुळे आता काय करावं? हा विचार त्याला बेचैन करत होता. काहीच न सुचल्याने राजेश आपल्या जुन्या घरी आला. गेल्या रात्री झोप पूर्ण झाली नव्हती. त्याचे डोळे चुरचुरत होते. त्यामुळे काही वेळ झोप काढण्यासाठी तो आडवा झाला.

झोप लागली खरी पण आत कोठेतरी खोलवर विचार चालूच असले पाहिजे. त्यामुळे निद्रित मनासमोर स्वप्नं तरळत आली.जागतेपणी त्यास न आठवलेल्या - किंवा त्याने जाणूनबुजून दूर ठेवलेल्या श्रुत-स्मृत-कल्पित अनुभवांची त्यात भर पडत होती..!

विषवल्ली ! -2

Submitted by अँड. हरिदास on 16 July, 2019 - 03:21

प्रत्येक घटनेमागे काही ना काही कारण हे असतंच..काही वेळा समोर दिसतं, काही वेळा अज्ञात असतं. पण,कारणाशिवाय काहीही घडत नाही. आपण घटनाक्रमाकडे कोणत्या दृष्टीने बघतो यावर सर्व काही अवलंबून असतं असतं. राजेशला अर्धजागृत अवस्थेत आलेला अनुभव बऱ्याच अर्थाने सूचक होता. पटवर्धनांच्या वाड्यात कोणते प्रकार चालायचे; किंबहुना, पटवर्धनांचे व्यक्तित्व कसं होतं. हे दर्शवणारा तो एक इशारा होता. राजेश ने तो समजून घेतला असता तर कदाचित पुढच्या घटना रोखता आल्या असत्या.. ? कुणी सांगावं? कदाचित हा घटनाक्रम अगोदरच निश्चित झाला असावा..!

कधीकधी मी हळवा होतो , बघुनी देव दानवांत

Submitted by सिद्धेश्वर विला... on 11 July, 2019 - 05:43

कधीकधी मी हळवा होतो

बघुनी देव दानवांत

का उगविली हि बीजे तू ?

अर्धपोटी मानवात

कधीकधी मी कठोर होतो

बघून साऱ्या वेदनांना

भळभळ त्या वाहत असतात

पण पुन्हा करतो सुरुवात

कधीकधी मी हळहळतो

कोमेजल्या कळ्या बघुनी

नव्या उमलताना बघून

त्याला करतो कुर्निसात

कधीकधी मी बिथरतो

भविष्यकाळ चिंतूनि

कल्पनांच्या माध्यमातून

पेटवतो नवी वात

कधीकधी मी शोधतो

हरवलेली जुनी वाट

मिट्ट काळोख दूरदूर

आता हीच माझी वहिवाट

हीच माझी वहिवाट ....

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - मुक्तस्रोत(Open Source)