मुक्तस्रोत(Open Source)

आव्हान

Submitted by मी_अनामिक on 3 July, 2019 - 12:24

संपव तु वटवृक्षाच अस्तित्व माझं
तरीही लहानस बीज होईन म्हणतो...

गाड मातीत मला क्रूरतेने
होऊन अंकुर इवलसं उगवीन म्हणतो...

कर आभाळाचे घाव तू
पोलादी छातीवर झेलीन म्हणतो...

घेऊनी त्यांनाच पदाखाली
तयावर उभा राहीन म्हणतो...

उधळले कैक हजार डाव जरी तू
आणिक एक खेळीन म्हणतो...

पडेन कितीदा मोजणार नाही
नेटानं पुन्हा उभा राहीन म्हणतो...

काट्या-कुट्यांच खाच-खळग्यांच घेणं नाही
त्याच पथावर अविरत चालीन म्हणतो...

असशील तू विधीलिखित जरी
तुलाच आव्हान देईन म्हणतो...

स्वैराचार !

Submitted by अँड. हरिदास on 2 July, 2019 - 11:21

images_1.jpg
स्वैराचार..!

मनासारखं लबाड काहीही नाही. सर्व प्रसंगांना सोयिस्कर वळण देण्यात ते मोठं तरबेज असतं. प्रत्येक गोष्टीचा आपल्याला हवा तसा अर्थ लावून घेणं मनाकडून शिकावं. मन कधी डोळ्यावर पट्टी बांधून खरा देखावा लपवून टाकतं, तर कधी पट्टी सोडून वास्तविकता समोर आणतं..! 
मनाचा हा खेळ समजून घेतांना भल्याभल्यांची फसगत होते. 'जिथं मोठमोठे विचारवंत मनाचा ठाव घेण्यात अयशस्वी ठरतात, तिथे चार वर्ग शिकलेल्या 'सिद्धी' ची काय कथा..?

बाळाचं नाव सुचवा : ध्येयवादी - संस्कृत मध्ये सुचवलं तर अधिक उत्तम

Submitted by cvijayn on 1 July, 2019 - 19:51

आम्हाला बाळ होणार आहे, एकाच नाव असा सुचवा कि मुलगा किंवा मुलगी ला बोलता येईल असं २ किंवा ३ अक्षरी नाव सुचवा किंवा छानस बाळाचं टोपण नाव सुचवा, नाव संस्कृत मध्ये सुचवलं तर अधिक उत्तम, हि विनंती

गुप्तधन -४

Submitted by अँड. हरिदास on 1 July, 2019 - 14:34

"सखाची अवस्था पाहून पुरुषोत्तम, अघोरी आणि प्रभाकरच्या चेहऱ्यावर स्मित झळकले....!!!"

****

इतकं सारं सोनं पाहून सखा आवक झाला..आनंदाने आपण वेडे होणार की काय? असं त्याला वाटू लागलं. इतक्या सोन्याचं काय करायचं..? सोनं विकायचं कुठे?? पाहिले तर घर घ्यायचं...!

या कपड्यात सर्व धन घे..! आणि हो, उचलताना गाठोडं पाठीवर नाही तर थेट डोक्यावर घ्यायचं.”

अघोरीच्या बोलण्याने सखाची तंद्री भंगली. त्याने पटापट सर्व सोनं अघोरीने दिलेल्या त्या केसरी कपड्यात टाकलं, गाठ मारली आणि गाठोडं डोक्यावर घेतलं.

अघोरीने पुढीची सूचना दिली.

शब्दखुणा: 

गुप्तधन - 3

Submitted by अँड. हरिदास on 1 July, 2019 - 08:38

माणसाचं आयुष्य म्हणजे एखादी आखून दिलेली पायवाट नाही, तर तो नदीचा एक प्रवाह आहे. जिकडे वाट सापडेल आणि, जिकडे उतार दिसेल तिकडे ते वाहवत जाते..!
गुप्तधनाच्या लालचेच्या उतारावरून प्रभाचं आयुष्यही असंच वाहत्या पाण्यासारखं वाहायला लागलं.
आजवर जीवनात आणि व्यवहारात हिशोबी वृत्ती जोपासणाऱ्या सखाणे पाच लाखाच्या जुळवाजुळवीसाठी सगळे व्यवहारीक पथ्यपाणी गुंडाळून ठेवले. बायकोच्या दागिन्यापासून ते अडीनडीला लावून ठेवलेला पैसाही त्याने या नादात डावावर लावला. तेवढ्यात भागले नाही म्हणून सावकाराकडून तीन लाखाचं कर्ज काढून पाच लाखाची बॅग भरली.

गुप्तधन - 2

Submitted by अँड. हरिदास on 1 July, 2019 - 07:32

*भाग दुसरा*

'पुरूषोत्तम'
नाव 'उत्तम' असलं तरी हा पुरुषोत्तम नावाचा प्राणी मोठा पाताळयंत्री होता. बाई बाटली आणि पैश्यासाठी कुठल्याही थराला जायची त्याची तयारी होती.
प्रभाने सखाला त्याच्याकडे नेऊन सगळी गोष्ट सांगितल्यावर त्याला जणू काही हर्षवायू झाला. प्रत्यक्षात त्याने गंभीरपणाचा आव आणला. परंतु आतून तो भलताच खुश झाला होता.

पुरुषोत्तमने गंभीरपणे सखाला न्याहाळत बोलायला सुरुवात केली..!

“ नशीबवान आहेस..!, लोकांचे जन्म जातात पण त्यांना एक तोळा सोनं घेता येत नाही.. तुला तर आयताच खजिना मिळण्याचे संकेत आहेत.”

'सखा खुश झाला'

शब्दखुणा: 

गुप्तधन

Submitted by अँड. हरिदास on 1 July, 2019 - 03:26

दुपारी 12 ची वेळ..सखा आपल्या दुचाकीवरुन शहराच्या रस्त्याने जातोय..एक गाव सरलं, आता घाट उतरला की आठ किलोमीटर वर शहर..
'पटकन काम करायचं आणि लवकर परत यायचं.' सखाने मनाशी निश्चय केला.
घाट उतरला आणि एका मोठ्या आंब्याच्या झाडाची सावली पाहून सखाने आपली मोटरसायकल उभी केली..सवयीनुसार डिक्कीतील पाण्याची बॉटल काढून दोन घोट पाणी पिले आणि लघुशंका करण्यासाठी तो रस्त्याच्या कडेला थोडा खाली उतरला..
कडक उन्हाच्या पाऱ्यात समोरचं काळ भोर शेत चमकत असल्याचा त्याला भास झाला..
आपल्याच्या नादात रमलेल्या सखाला शेतात काहीतरी पिवळं पिवळं चमकताना दिसलं.

शब्दखुणा: 

सलमान करतो ती श्टाईल

Submitted by सिद्धेश्वर विला... on 27 June, 2019 - 10:36

सलमान करतो ती श्टाईल

त्याने चड्डी घातली काय

नि तो उघडा फिरला काय

कुणीच काय बी बोलायचं नाय

सलमान हाय भाय त्यो सलमान हाय

बोलायचं काय बी काम नाय

जिथं तिथं असतो त्याचाच बोलबाला

इथं कोण इचारतंय आम्हाला

साधं कुत्रं ओळखत नाय साला

मी पण एकदा अंगावरती

नाव कोरलं सल्लू

शर्ट काढूनि फेकून दिल्ल्ल

नि बाहेर पडलो हल्लू

वाटलं कुणीतरी आयटम साल्ली

बॉललं हन्नी हन्नी

बोलताक्षणी फिरवू तिल्ला

गल्लीबोळी वन्नी

फिरून चटकून गाव हुंगलं

नाय भेटली कुणी मन्नी ,

शब्दखुणा: 

वटवटसावित्री

Submitted by सिद्धेश्वर विला... on 17 June, 2019 - 01:52

हे देवी वटसावित्री

मी पण पूजेन तुला

लपून छपून फेरे घेईन

उद्या पौर्णिमेच्या रात्री

माझे सर्व काळे धंदे

अव्याहतपणे चालू देत सदैव

कधी नजरेत येऊ नको देउ तिच्या

नाहीतर होतील माझे वांदे

मी साधाभोळाच राहू देत तिच्यासाठी

फार कठीण गं , झेलणं तिला

ती आहे एक सुशील गृहकृत्यदक्ष

पण दुर्दैवाने वटवटसावित्री

वटवट करूनच मारते

माझ्या नावाने फेरे

नेहेमी मागते देवाकडे

मिळू देत याचे सर्व धागेदोरे

इतकी वर्षे लोटली

कळला नाही तुझा महिमा

आज तुला मी शरण जातो बघ

थांबव माझी दैना

शब्दखुणा: 

मी पण अमिताभ बनलो असतो भाय

Submitted by सिद्धेश्वर विला... on 4 June, 2019 - 07:25

मी पण अमिताभ बनलो असतो भाय

पण आपल्याला रोलच कधी मिळाला न्हाय

" अय साला " करून, डिट्टो करतो हाणामारी

स्टाईल आपली बघून येड्या होतात साऱ्या पोरी

बिग बी ची ऍक्टिंग म्हणजे खाऊ वाटलं काय

उंची सोडली तर बाकी इथं सर्व ठीक हाय

मी पण अमिताभ बनलो असतो भाय

पण साला तसा रोलंच मिळाला न्हाय

शहेनशहा बनुन बाहेर पडलो एका काळ्याभोर रात्री

चमकणारा हात बघून लागली भरपूर मागे कुत्री

लटपट लटपट धावत होतो जणू अग्निपथावरती

जंजीर धरुनी दिवार चढलो मग पडलो तोंडावरती

तोंड फुटुनी पार सुजले , आला गळ्यात माझ्या पाय

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - मुक्तस्रोत(Open Source)