द्वंद्व..

Submitted by मन्या ऽ on 27 August, 2019 - 14:52

द्वंद्व..

होकार-नकाराच्या
खेळात नकाराचा
विजय झाला
बुद्धी आणि मनाच्या
द्वंद्वात बुद्धीचा
विजय झाला

विजय झाला असला
तरी मन घायाळ
झाले; आठवांरुपी
मनावर आज
ओरखडे उमटुन गेले

विजय नसे तो बुद्धीचा
विजय आहे तो
लोकांच्या विचित्र
नजरेचा-त्यांच्या
विकृत मनोवृत्तीचा..

(Dipti Bhagat)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पाटील प्रतिसादासाठी खुप खुप धन्यवाद! सगळ्यानांच कमी जास्त प्रमाणात द्वंद करावं लागतं.काहीजण त्यावर मात करतात तर काहीजण त्यातच भरडले जातात. Happy Happy

मन्या, माझा प्रतिसाद विचार करण्यासाठी नसून बदल करण्यासाठी होता.. द्वंद हा शब्द चुकला आहे, त्याचं दंद्व करा असं म्हणायचं होतं, पण तुमचा सकारात्मक विचार आवडला!

अर्रर! पाटील, तुम्ही बदल सुचवला माझ्या लक्षात नाही आला.असो. Lol
बदल केला आहे.आवर्जुन पुन्हा सांगितलंत खुप आभार! Happy

सुपु, खुप खुप धन्यवाद! Happy