जे लोक जॉब करत असतील त्यांना जाणवत असेल कि जॉब करण्याच्या नादात आपण जगणं विसरून गेलोय.
खूप काही करायचं पण तेवढा वेळ मिळत नाही त्यामुळे बऱ्याच गोष्टी सुटतायेत. आपण समाजासाठी काही करत नाही असे नाही पण कोणत्यातरी फौंडेशन द्वारा मदत करण्यापेक्षा स्वतःहून सहभाग घेऊन केलेली मदत वेगळीच..नाही का ?? ज्या लोकांना असा प्रश्न पडतो त्यांच्या मनात विचारांचे द्वंद्वा चालू होत असले पाहिजे. मग आपण छोट्या छोट्या गोष्टीत लोकांना मदत करून मिळणाऱ्या आनंदावर जगात राहतो.
हि ख़ुशी छोटी असली तरी चिरकाल टिकणारी आणि निरागस असते.
नाहीतर जीवन काय आहे ??....पैसे देणारे खूप लोक असतात पण दुसऱ्यला वेळ देणारे फार कमी लोक असतात. अशाच काही विचारांचे द्वंद्वा माझ्या मनात सुरु असताना स्वतःची जोपासलेली मूल्ये आणि तत्वे आपल्याला कशी मदत करतात हे व्यक्त करण्याचा प्रयत्न मी केलेला आहे.
.........गर्दीतून चालताना........
गर्दीतून चालताना विसरून जातो मी मला
स्वतःमध्ये डोकावायला आता वेळ कसला ??
डोळ्यासमोर वाईट घडत असताना
तरीही असहाय्य वाटताना
पाहतो माझ्यातील मी मरताना
गर्दीतून चालताना.............
आजोबा रास्ता ओलांडण्यासाठी
माझ्याकडे पाहत असताना
बस सुटेल म्हणून
पाहतो मी स्वतःला दुर्लक्ष करताना
गर्दीतून चालताना..........
अपघात झाला तरीही
मदतीऐवजी विडिओ काढताना
पाहतो मी लोकांना
आपल्याला काय करायचेय म्हणतांना
गर्दीतून चालताना.........
मग मी आणि लोक
हे द्वंद्व सुरु होताना
त्यांच्यापेक्षा आपण वेगळे आहोत
हे मनाला पटवताना
पाहतो मी स्वतःला हरताना
गर्दीतून चालताना.............
मग पाहतो मी अंतर्मनाला
बंड करून पेटून उठताना
मूल्ये आणि तत्वे जोपासण्यासाठी
द्रुढ निस्श्चय करताना
गर्दीतून चालताना.............
दुसऱ्या दिवशी सकाळी पाहतो मी स्वतःला
आनंदाने आजोबांसाठी बस सोडताना
लोकांमध्येही विधायक शोधताना
फक्त दृष्टीकोन बदलण्याची गरज होती
हे जाणवताना ......
गर्दीतून चालताना......
तेच लोक, तोच मी,
पण आता फरक एवढाच
पाहतो मी मला जगताना
गर्दीतून चालताना.......
मस्तच..पण ट्रान्स फॉर्मेशन ची
मस्तच..पण ट्रान्स फॉर्मेशन ची फेस जरा अजून हायलाईट करायला हवी होती असं वाटलं.
धन्यवाद... पुढच्या वेळी
धन्यवाद... पुढच्या वेळी चांगल्या ट्रान्स फॉर्ममेशनचा प्रयत्न करीन....
खूपच चांगले विचार आहेत.
खूपच चांगले विचार आहेत.
धन्यवाद....
धन्यवाद....
जबरदस्त!
जबरदस्त!
माणुसकीचे अस्तित्व
ते फिकट होते
गर्दीतुन चालताना
माणसातला माणुस हरवतो गर्दीतुन चालताना
पण
तुमच्यासारखे काहीच
असतात
जे प्रवाहाविरुद्ध जगतात इतरांना प्रेरित करतात
धन्यवाद @मन्या S ... मी पण
धन्यवाद @मन्या S ... मी पण प्रयत्न करतो प्रवाविरुध्ध जगण्याचा ... प्रत्येक वेळी यशस्वी होतो असे नाही...
खूपच चांगले लिहिले आहे
खूपच चांगले लिहिले आहे
छानच ! आवडली कविता
छानच !
आवडली कविता
धन्यवाद ...प्रतिसादाबद्दल
धन्यवाद ...प्रतिसादाबद्दल आभारी आहे.... तुम्ही मला सुधारणा पण सांगू शकता कारण आताच लिहायला सुरुवात केलीय खूप सुधारणा करायच्यात....
सुंदर. गर्दीत असतानाही जागृत
सुंदर. गर्दीत असतानाही जागृत असलं पाहिजे, सकारात्मक असलं पाहिजे हे पटलं. पु.ले.शु.
धन्यवाद.....
धन्यवाद.....
.
.