तळ्याकाठी...

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

जलरंग वापरून केलेला हा प्रयत्न.

तुमच्या काही सूचना / सल्ले असतील तरी बिनधास्त लिहा.

प्रकार: 

छानच. अभिनंदन.
<< तुमच्या काही सूचना / सल्ले असतील तरी बिनधास्त लिहा.>> झाडांचं प्रतिबिंबही साधारण त्याच आकाराचं, त्याच रंगाचं/ तितक्याच गडद रंगाचं असतं तर अधिक मजा आली असती असं वाटलं. [ मला त्यातलं कांहीं कळत व जमत नसलं तरी असा आगाऊपणा करायची वाईट खोडच आहे !]

गजानन, प्रयत्न चांगला आहे. कंपोझिशन कडे थोडे लक्ष द्या. झाडं सुट्सुटीत काढल्याने चित्राचा येकसंध परिणाम कमी होतो . रिफ्लेक्शन अजुन चांगले होऊ शकेते. मी कालच नॅशनल पार्क मधे असेच येक चित्र केलेय.
1414389069746.jpg

धन्यवाद सगळ्यांना. Happy

भाऊ, अजय, मी लक्षात ठेवतो तुमच्या सूचना.
अजय, वेट इन वेट करताना अजून थोडी तारांबळ उडते. (पाहिजे तो इफेक्ट आणण्याच्या नादात एकाच कोणत्यातरी भागावर लक्ष केंद्रीत होते आणि तोपर्यंत बाकीचा भाग सुकून जातोय याचे भान राहात नाही.) अधूनमधून चित्रे काढत राहिल्यामुळे काय केल्यावर काय होतेय, ते लक्षात येतंय. एकसंधपणाचे लक्षात ठेवतो. धन्यवाद.

<< अजय, तुमचे चित्र भारी आहे. >> हें तर आहेच ! पण गजाननजी, त्या दिशेने चाललेली तुमची वाटचालही खरंच कौतुकास्पदच आहे !!

मस्तच गजाभाऊ, workshop चा परीणाम दिसतोय Happy

एक सूचना, reflections defined काढायचा प्रयत्न करू नकोस. overall shape घेतला कि तिथेच थांब. अजयच्या चित्रातले पाहा म्हणजे लक्षात येईल.

धन्यवाद, बी, बस्के, असामी. Happy

असामी, लक्षात ठेवतो. प्रतिबिंबांचा मनात धरलेला परिणाम साधण्यासाठी कागदावर नेमका किती ओलसरपणा टिकलेला असावा याचा अंदाज बांधायला जमले की मग फारशी डागडुजी करावी लागायची नाही असे वाटतेय.

छान! Happy

पाटलांचंं चित्र तर नेहेमीप्रमाणेच सुंदर .. Happy

एव्हढी गर्द झाडी कुठे दिसते का हल्ली नॅशनल पार्क मध्ये? (मला शेवटचं जाऊन बरीच वर्षं झाली पण एव्हढं गर्द तिकडे काही बघितल्याचं आठवतंच नाही ..)

गजानन चित्र अप्रतिम आहे. पाहिल्या पाहिल्या डोळे सुखावले एकदम.
फक्त एक ठळक गोष्ट जाणवली ती सांगितल्याशिवाय राहवत नाहिये.
तळं निट डिफाईन झालेलं नाही असं वाटत य.

काठ दिसत नाहिये.

गजानन, सुंदर चित्र .. दक्षिणा म्हणतेय तसंच.
पाटील.. क्या ब्बात है.. मुळात सुंदर नसलेल्या जागा तूम्ही सुंदर करून टाकता चित्रांतून !

सुंदर आहे फक्त गजानन यांच्या चित्रात "किनारा" हा स्पष्ट नाही आहे. हा एक मुद्दा त्यांनी ठळक केला पाहिजे होता. पाटील यांच्या चित्रात नेमका त्यावरच भर दिल्याने झाडे आणि तळातले पाणी यात एक सीमारेषा आखली गेल्याने चित्र उठावदार झाले आहे.
बाकी चित्र सुंदर झाले आहे