गजानन यांचे रंगीबेरंगी पान

फ्लेमिंगो गटग - १३ फेब्रु २०११

Posted
7 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
7 वर्ष ago

गेला महिनाभर शक्य तेवढ्या बाफांवर मुंबईतल्या हितगुजकरांनी काळा घोडा नाच नाच नाचवला. १२ फेब्रुवारीला काळाघोडा फेस्टीवलात सगळ्यांनी भेटायचं असं पुन्हा पुन्हा सगळ्यांनी ठरवलं. १२ तारीख जवळ यायला लागली तशी आमच्या या वरातीतली एकेक सोंगटी माघार घ्यायला लागली आणि अकराच्या संध्याकाळपर्यंत तर घोड्याने मुलुंडबाफावरच बसणे पसंत केले. Proud

मुलुंडावरूनच घोषणेची सुरुवात होऊन तिथेच ती विरून जावी.... यापेक्षा..... असो.

प्रकार: 

इंटरनेटवर भूमिती

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago

हा दुवा पहा: http://www.mathopenref.com/index.html

तुमची मुलं माध्यमिक वर्गांत शिकत असतील तर या दुव्यावरील विविध अ‍ॅनिमेशनं त्यांच्या अभ्यासक्रमातल्या भौमितिक संकल्पना स्पष्ट करण्यास / त्यांची विषयातील रुची वाढवण्यास मदत करतील.

ही काही उदाहरणे बघा.

वर्तुळाचा केंद्रबिंदू शोधणे :
http://www.mathopenref.com/constcirclecenter.html

दिलेल्या बिंदूतून दिलेल्या रेषेवर लंब काढणे :
http://www.mathopenref.com/constperplinepoint.html

दिलेल्या रेषेला समांतर रेषा काढणे :
http://www.mathopenref.com/constparallel.html

विषय: 
प्रकार: 

मराठी मोजमापे

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago

धान्य मोजण्याची मापं :

दोन नेळवी = एक कोळवे
दोन कोळवी = एक चिपटे
दोन चिपटी = एक मापटे
दोन मापटी = एक शेर
दोन शेर = एक अडशिरी
दोन अडशिर्‍या = एक पायली
सोळा पायल्या = एक मण
वीस मण = एक खंडी

सोने-चांदी-औषध मोजण्याची मापं :

गुंज तुम्हाला माहीतच असेल. नसेल तर इथे पहा : गुंज
आठ गुंजा = एक मासा
बारा मासे = एक तोळा

अंक :

१ - एक
१० - दहा
१०० - शंभर
१००० - हजार
१०००० - दहा हजार
१००००० - लक्ष

प्रकार: 
शब्दखुणा: 

राजाशी खेळणार?

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
4 वर्ष ago

Rajashi_Khelanar.JPG

हा माझा सवंगडी... खेळणार आमच्याशी?

माझी भाताची सुगी

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
4 वर्ष ago

टपोर्‍या भरलेल्या भाताच्या लोंब्या उभ्या पातीला पेलवेनाश्या झाल्या आणि दाण्यांसह पानंही सोन्यागत पिवळी पडायला लागली, म्हणजे समजायचे की आता भात काढणीला आले आहे.
bs1.jpg

मग गडी जमवून भातकापणीला सुरुवात होते. भातकापणी म्हणजे भाताची रोपं अगदी मुळालगत कापायची.
bs2.jpg

कापत कापत पुढे सरकू तसे नीट जुळवून जागोजागी त्याचे ढीग करत जायचे. हे ढीग म्हणजे 'यंगा'.
bs3.JPG

प्रकार: 

आमी लुशलोय

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
4 वर्ष ago

Image_969__1.jpg
(रुसल्यावर बोलायचे नसते मग कमीत कमी दहा शब्द कुठले आणायचे?)

विषय: 

पिवळी पडलेली कात्रणे - गीतरामायण

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
7 वर्ष ago

आज बर्‍याच दिवसांनी कपाट झाडायला घेतल्यावर, सगळा पसारा काढून वर्गवारी करताना नेहमीप्रमाणे काय ठेवायचे आणि काय टाकायचे अशा यक्षप्रश्नाने गाठले. शिंप्याकडची कोपर्‍यात अडकवून ठेवलेली चिंध्यांची पिशवी समोर पालथी केल्यावर जसे नाना रंगाचे, नाना आकाराचे, नाना प्रकारच्या नक्षीकामाचे कपड्यांचे तुकडे लक्ष गुंतवून ठेवतात तसे हा पसारा काढल्यावर माझे होते.

विषय: 
प्रकार: 

ज्योतिबाची सासनकाठी

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

ही काही क्षणचित्रं माझ्या गावाच्या ज्योतिबाच्या यात्रेची आम्ही घेतलेली. Happy
(मी, माझ्या आतेभावाने आणि त्याच्या मित्राने)

Palakhi.jpgsasan11_0.jpgsasan12.jpg

आज

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

पहाट झाली. पावणे तीन वाजले. अजून कुणाला जागही आली नाही. खाली 'सुपा'तलेही अजून साखरझोपेत आहेत. सगळीकडे गारेगार! हवाही अन् हालचालही. ही डोक्यावरची उजव्या बाजूची 'साठ रुपये किलो'ची पाटीच काय ती हवेसोबत अधूनमधून गिरक्या घेतेय.

विषय: 

बाहुली

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
6 वर्ष ago

त्या खोलीत फारसा उजेड नव्हताच. बाहेर आभाळ चांगलंच अंधारून आलं होतं. काळसर हिरवट भासणारं उदास वातावरण, गडद हिरव्या रंगांची गाद्यांची आवरणं आणि कांबळी. या सगळ्यांचं त्या खोलीत एक प्रकारचं विचित्र मिश्रण झालं होतं. ती बाहुली एका मखमली आच्छादनाच्या खुर्चीत पडली होती. अन् तिथल्या त्या उदास रंगछटेत ती बेमालूमपणे मिसळून गेली होती. हिरव्या मखमली कपड्यांत अन् टोपीत आपल्या रंगवलेल्या मुखवट्यासह ती अस्ताव्यस्त लांब पसरलेली वाटत होती. पण लहान मुलं जिच्यावर 'भावली' म्हणत झेपावतात, तशी ती नव्हतीच मुळी! एखाद्या कळसूत्री बाहुलीसारखी दिसायची.

विषय: 
प्रकार: 

Pages

Subscribe to RSS - गजानन यांचे रंगीबेरंगी पान