बहावा
Submitted by Asu on 18 April, 2019 - 10:31
माझ्या मनावर सोनपिवळं गारूड घालणारा 'बहावा' माझ्या 'निसर्गभाव' या काव्यसंग्रहातून -
बहावा
हिरवी हिरवी गार
साडी नवरी नेसली
सोनपिवळ्या फुलांची
अंगी हळद माखली
भर उन्हात उभी
कुणी सखी साजणी
प्रेमभाव मनीचे
पक्षी गातात गाणी
थंड वाऱ्याची येता
मंद झुळूक वनी
पिवळ्या धम्म फुलांचे
डूल डुलती कानी
अंगठा रुतून भूमीत
लाजता ही नारी
वाटे आली जणू
नवरदेवाची स्वारी
शब्दखुणा: