सिंगापूरच्या गप्पा

Submitted by admin on 1 May, 2008 - 00:18

सिंगापूरबद्दल मायबोलीकरांच्या गप्पा

विषय: 
प्रांत/गाव: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

riksha1.jpg

या वर्षीच्या 'मराठी भाषा दिवस' कार्यक्रमात उत्साहाने भाग घेऊन कार्यक्रम यशस्वी करा..
संपूर्ण माहितीसाठी खालील धाग्यावर पहा-
मराठी भाषा दिवस- स्पर्धा आणि कार्यक्रम
धन्यवाद,
संयोजक_संयुक्ता

नमस्कार लोकहो !

आपल्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय - सिनेमा ! आपण अगदी तासन्तास चित्रपटांबद्दल, त्यातल्या गाण्यांबद्दल, कलाकारांबद्दल, आवडत्या/नावडत्या प्रसंगांबद्दल भरभरुन बोलत असतो. कित्येक वर्षांनंतरही त्यातले संवाद आपल्याला तोंडपाठ असतात, कलाकारांच्या चेहेर्‍यावरचे भाव आठवणीत असतात, एखादा प्रसंग आठवून आपल्या चेहेर्‍यावर हसू पसरतं.

भारतीय सिनेमाला १०० वर्षं पूर्ण होताहेत. त्यानिमित्त मायबोली देत आहे संधी चित्रपटांविषयीचं आपलं प्रेम शब्दरुपात साकारण्याची !! बक्षीसं तर आहेतच पण लाखो वाचकांना तुमच्या आठवणी सांगून तुम्ही त्या अजरामर करणार आहात.

Poster-mod.jpg गाथाचित्रशती लेखन स्पर्धेचं स्वरुप, विषय, नियम आणि अटी वाचा आणि सरसावू द्या लेखणी !!!

नमस्कार सिंगापूरकर्स Happy

थोडी माहिती हवी होती....

डिसेंबर मधे सिंगापूरला २ दिवस येणार आहोत.आम्ही नवरा-बायको आणि सोबत आमची ५ वर्षांची लेक आहे त्यामुळे एक दिवस युनिव्हर्सल स्टुडिओज आणि एक दिवस झू ला जायचा प्लॅन आहे. आम्ही सिटी मधेच रहाणार आहोत.

सिटीतुन स्टुडिओज ला जाण्यासाठी बेस्ट ऑप्शन कोणता? टॅक्सी, रोप वे, फेरी की अजुन काही?

तसेच झू ला जाण्यासाठीही कोणता पर्याय चांगला?

२ दिवसात एव्हढेच बघुन होइल हे महित आहे पण सिटीच्या जवळपास अजुन कहि बघण्यासारखे / अनुभवण्यासारखे आहे का?

प्लिज माहिती द्या Happy

झूला जाण्यासाठी टॅक्सी हा सगळ्यांत चांगला पर्याय. कारण ते जरा आतल्या भागात आहे. त्याच्याजवळ 'नाईट सफारी' आहे ज्यात पुन्हा प्राणीच आहेत. Proud बाकी मग जवळ काही नाही.

युनिव्हर्सल स्टुडिओला जायला बक्कळ पर्याय आहेत. एम आर टी वा बसने विवोसिटी मॉलापर्यंत जाऊन तिथून छोटी ट्रेन पकडून जाता येतं. केबलकार स्टेशन संतोसामध्ये आहे. त्यासाठी 'माउंट फेबर' टेकडीपर्यंत टॅक्सीने जाऊन संतोशापर्यंत जाऊन मग युनिव्हर्सल स्टुडिओकडे येता येईल. मात्र युनिव्हर्सलमध्ये तुमची मुलगी कितपत एंजॉय करू शकेल याचा अंदाज आधी घ्या. तिच्याजोग्या फार राईड नसप्या तर तुम्ही संतोसा बेटावर जास्त मजा करू शकाल. विवोसिटीत परतून शॉपिंग करता येईल.

बाकी डाऊनटाऊन भागात रॅफल्स हॉटेलाजवळ 'मिंट म्यूझियम ऑफ टॉईज' आहे. त्याच भागात चालण्याच्या अंतरावर मर्लायन आहे. 'मरिना बे सँड्स'च्या स्कायपार्काला भेट देता येईल. तिथे साधारण संध्याकाळी जाऊन अंधार पडेपर्यंत थांबावं.

अजून काही माहिती हवी असल्यास सांगा.

लाजो,
Universal Studios मधे जाण्यासाठी Harbour Front MRT station means train station ला यायचे. तेथून अगदी ५ मिनिटाच्या अंतरावर Universal Studios आहे. चालताना दोन्हीकडची हिरवळ, समुद्र, आणि उंच इमारती बघण्यात वेगळाच आनंद मिळेल.

सिंगापूर झू आणि नाईट सफारी हे एका दिवशी करता येईल. कारण दोन्ही ठिकाणे एकाच जागेवर आहे. Ang Mo Kio train station means MRT station पासून झूसाठी थेट बस आहे. किंवा कॅबनी झू पर्यंत जाऊ शकता.

माझा नंबर ९१८१ ८९५७ आहे. आलीस की भेट.

बी आणि श्रद्धाला अनुमोदन.मरीना बे स्कायपार्कला अवश्य भेट द्या. झूमधे वेट प्लेग्राउंड आहे..लेकीला खुप मजा येइल तिथे(extra dress जवळ ठेवा) जमल्यास गार्ड्न बाय द बे ला पण जावा. नविन चालु झाले आहे.काही शो पण आहेत तिकडे...अजुन काही माहीती हवी असेल तर विचार्..तुला संपर्कातुन फोन नं कळवते

लाजो टॅक्सी फार स्वस्त आहे सिगांपूरमध्ये, मागच्या वर्षी आम्ही सिगापूरला आम्ही मोस्टली टॅक्सीनेच फिरलो Happy देव लहान होता हे पण कारण होतच Happy

आणि मुस्तफा मॉल २४/७ ओपन असतो Wink

maayaboli ganesha.jpg

उद्या, म्हणजे भारतीय वेळेनुसार, १९ सप्टेंबर २०१२ रोजी सकाळी ६:०० वाजता मायबोलीच्या गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. भाविकांनी दर्शनाचा जरूर लाभ घ्यावा.

जाहीर सूचना

आमचे अशील मायबोली लेखनस्पर्धा संयोजक (राहणार 'लेखनस्पर्धा २०१३', नोड ४४०१०) या नोटिशीद्वारे सर्व मायबोलीकर लेखकांस, टीपीकरांस, लेख लिहिणार्‍यांस, लेख लिहिण्याचा विचार करणार्‍यांस, लेख लिहायला तयार असूनही वेळ नसणार्‍यांस, आधीच्या 'निबंधस्पर्धा' टायटलामुळे घाबरलेल्यांस खालील जाहीर निवेदन देत आहेत.

लेख पाठवण्याची अंतिम मुदत वाढवण्यात आली आहे. अंतिम तारीख २५ ऑगस्ट २०१३ आहे.

सदर स्पर्धेसाठी मायबोलीवर इतरत्र आढळणार्‍या लेखांसारखेच लेख अपेक्षित आहेत. लेखांचे विषय अतिशय सोपे असून ते खाली दिलेप्रमाणे. सदर विषय व त्यांसदर्भातली अधिक माहिती स्पर्धेचे मुख्य कार्यालय नोड ४४०१० येथेही बघावयास मिळतील.

लेखनस्पर्धेचे विषय भारतातील स्वातंत्र्योत्तर काळाशी निगडित आहेत.

१. स्वातंत्र्योत्तर काळातील घटना ज्यांचा सकारात्मक परिणाम झाला किंवा होऊ शकेल.

२. स्वातंत्र्योत्तर काळात ज्यांनी महत्त्वाचे कार्य केले आहे अशी व्यक्ती वा संस्था व त्यांचे कार्य. या विषयांतर्गत तुम्ही तुमचे आवडते अभिनेते, कवी, लेखक, गायकगायिका, शास्त्रज्ञ, खेळाडू, समाजसेवी संस्था इत्यांदीबद्दल लिहू शकता.

३. स्वातंत्र्योत्तर काळातील एखादी लक्षवेधी कलाकृती. भारतीय भाषेतली, भारतात तयार झालेली आणि भारतीय कलावंतानं साकारलेली हवी. या विषयांतर्गत तुम्ही तुम्हांला आवडलेलं कुठलंही पुस्तक, चित्रपट, गाणं, कविता, शिल्प यांबद्दल लिहू शकता.

वरील तीन विषयांवर एरवीही मायबोलीकर लिहीत असल्याने व वाचणारे सर्व मायबोलीकर मित्र असल्याने त्यांनी टेन्शन, दडपण, भीती, कंटाळा न बाळगता स्पर्धेत लिहिणे आवश्यक ठरते.

वर दिलेल्या माहितीनुसार सदर लेखनस्पर्धा अतिशय सोपी असल्याचे नि:संशय सिद्ध होत असल्याकारणे मायबोलीकरांनी लेख लिहिण्यास घ्यावे, असे जाहीर केले.

नोटीस क्रमांक - एमबीएलपी४४०१०/२५०८/२०१३

patralekhan-1_neelampari.jpg

मायबोलीकर मित्र-मैत्रिणींनो, तुमच्या छोटुकल्यांना जसं बाप्पाला पत्र लिहायचं आहे, तसंच तुम्हालाही (मात्र वेगळे नियम असलेलं पत्र) लिहायचं आहे.

लिहिताय ना मग? Happy

नियमावलीसाठी येथे पहा. http://www.maayboli.com/node/44947

"शिरीन, झालीस का तयार?"

"आलेच मी प्रीतम, जस्ट वन मिनीट"

"चला आटपा लवकर. सगळे जमले असतील"
.
.
.

आठवतोय का दुनियादारी? आठवतच असेल म्हणा. मैत्रीचा उत्सव म्हणजे दुनियादारी.

आणि उत्सव साजरा करण्याचं ठिकाण म्हणजे एसपीचा कट्टा

ह्यावर्षी आपल्या मायबोलीकरांच्या मैत्रीच्या उत्सवालाही लाभलाय असाच एक एसपीचा कट्टा

मग येताय ना आपल्या मैत्रीचा उत्सव साजरा करायला? आम्ही वाट बघतोय.

कसं यायचं म्हणताय?

मग वाचा की इथे पूर्ण आणि आत्तापासूनच लागा यायच्या तयारीला.

नमस्कार, मी सध्या singapore ला राहतो, ईथे बाकीच्या गोष्टी जास्ती डिसकस केलेल्या दिसता आहेत...

...