गुगल

२६ मे ला काय होणार

Submitted by नितीनचंद्र on 22 April, 2019 - 20:45

२०१९ चा डंका वाजत आहे २०१४ मधे गुगल वर सर्च करणारे कमी होते. आता एक्झीट पोल सोबत हे गुगल चे निरीक्षण पहा.

२०१९ च्या निवडणुकांच्या बाबतीत गुगलचा रिपोर्ट काय दाखवतो हे पहाण्यासाठी १ तास काढा.https://m.facebook.com/story.php?story_fbid=853004728382235&id=222267095...

विषय: 

अर्धा-दशक लहान बायको - भाग २

Submitted by आशयगुणे on 2 October, 2015 - 04:02

आम्ही आता घरी आलो होतो. एकमेकांची सवय होऊ लागली होती आणि हळू हळू स्वभाव देखील समजू-जाणवू लागले होते. अर्थात निश्चित स्वरूपात नाही. पण एक अंदाज येऊ लागला होता एवढं मात्र खरं! काही वेळेस त्यामुळे खटके देखील उडायचे.जेवण झाल्यावर गाणी ऐकायची मला लहानपणापासून सवय. त्यात 'जो जीता वोही सिकंदर' किंवा 'दिलवाले दुल्हनिया जायेंगे' मधली गाणी अगदी विशेष आवडीने. कधी कधी 'अच्छा सिला दिया तुने मेरे प्यार का' होऊन जायचं. अधून मधून ८० च्या दशकातील आर.डी बर्मन ची गाणी किंवा त्याचीच '१९४२ - अ लव्ह स्टोरी' मधली गाणी असायची. कधी कधी 'तेझाब', 'बेटा' वगेरे सिनेमे हजेरी लावायचे.

प्रांत/गाव: 

अर्धा-दशक लहान बायको - भाग १

Submitted by आशयगुणे on 2 October, 2015 - 04:00

प्रत्येक पुरुषाच्या आयुष्यात एक असा दिवस येतो जेव्हा त्याची चौकशी आणि उलटतपासणी एकदम होते! आणि साहजिकच तो दिवस त्याला स्वच्छ आठवतो. म्हणूनच ह्या गोष्टीची सुरुवात 'तो दिवस मला स्वच्छ आठवतो' ह्याच वाक्याने करतो आहे. अनेक मुलीकडल्यांच्या - पोलिस स्टेशनच्या पायऱ्या चढाव्या तशा - पायऱ्या चढून आणि तिथे 'चौकशी' शिवाय काहीही हाती न लागून आम्ही ह्या घराचे दार वाजवले. आधी एवढे अनुभव घेतल्यामुळे आमच्या घरच्यांचे चेहरे 'इथे तरी न्याय मिळेल काय' असे झाले होते. मी मात्र 'आता पुढे काय' असे भाव ठेवून होतो.

गुगल पुरस्कृत उपक्रमात मायबोलीचा सहभाग

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

जगातल्या बहुसंख्य प्रगत देशात इंटरनेवरचं स्त्रियांचं प्रमाण ५०/५० (किंवा जवळपास आहे). पण भारतात मात्र हे प्रमाण ३०% पेक्षा कमी आहे. जास्तीत जास्त भारतीय स्त्रियांनी इंटरनेटचा वापर करावा, त्यांना सुरवातीला येणार्‍या अडचणी दूर करता याव्यात म्हणून गुगल या कंपनीनं hwgo.com (Helping Women Get Online) हा सार्वजनिक हिताचा एक खूप चांगला उपक्रम सुरु केला आहे. इंटरनेटबद्दलची माहीती आणि महत्व सोप्या भाषेत सांगणं, इंटरनेटवरचा महिलांंना उपयुक्त वाटेल असा मजकूर दाखवणं, प्रत्यक्ष फोनवरून मदत करणं (Handholding) असं या उपक्रमाचं स्वरूप आहे.

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

गूगल पेज-रँक पद्धती

Submitted by गामा_पैलवान on 1 April, 2013 - 05:49

वाचकहो,

पेजरँक पद्धती हे गूगलच्या शोधप्रणालीचे नाव आहे. आपण सगळे गूगल वापरण्यात पटाईत आहोत. पण शोधपद्धती कशी चालते हे कुणास फारसे ठाऊक नाही. यावर एक अतिशय रंजक लेख मिळाला (इंग्रजी दुवा).

लेख जुना आहे, तरीही ही माहिती बर्‍याच जणांसाठी नवीन आहे. लेख इंग्रजीत असल्याने इथे कॉपीपेस्ट करू इच्छित नाही. वाचकांनी लेखाचा मुळातून लाभ घ्यावा ही विनंती.

डेविड

Submitted by आशयगुणे on 30 September, 2011 - 13:16

मागच्या महिन्याची गोष्टं! मी भारतात चाललोय हे बर्याच लोकांना माहिती होते. जाणे एका आठवड्यावर आले होते. तेवढ्यात 'फेसबुक' वर ह्याचा संदेश आला. 'गेले बरेच दिवस आपण ठरवतोय.....एकत्र मैफल करायची आहे...कधी करूया? आता तर तू चालला आहेस!' मी म्हणालो ह्या एका आठवड्यात कधीतरी जमवुया. लगेच दुसऱ्या दिवशी ह्याने परत उत्तर पाठवले 'शुक्रवारी दुपारी जमेल का? माझा सकाळी क्लास झाला, की मी मोकळा आहे...दुपारी दोन वाजेपर्यंत आहे...तू ६०३ नं ची बस पकड....माझ्या घराच्या समोर थांबते! जाताना ८.०० वाजता तुला परत घरी जायला बस आहेच! आणि खाली त्याने त्याचा पत्ता पाठवला. मी लगेच होकार कळवला.

गुलमोहर: 

मग गुगलवर मराठीच का नाही?

Submitted by निनाद on 19 July, 2011 - 20:31

गुगलने गुजराती पासून कन्नड पर्यंत भाषांच्या भाषातराची सोय केली आहे पण त्यातून मराठीला वगळण्यात आले आहे. याविरुद्ध दाद मागण्यासाठी भरत गोठोसकर यांनी एक ऑनलाईन याचिका बनवली आहे. याद्वारे किमान काही आवाज तरी निर्माण होईल अशी आशा आहे.

आपल्या लेखात भरत म्हणतात, 'भारतीय भाषांमध्ये प्रथम हिंदीला २००८ साली या सेवेत समाविष्ट करण्यात आले. या देशातील अन्य भाषांना यासाठी तीन वर्षे वाट पाहावी लागली. आता गुगलने उर्दू, बंगाली, तेलुगू, तमिळ, कन्नड व गुजराती या भाषांनाही सामील करून घेतले आहे. मराठी मात्र वळचणीला टाकली आहे!'

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - गुगल