नोकरी-व्यवसाय

घरगुती मसाले व्यवसायासाठी मार्गदर्शन हवे आहे

Submitted by आकांशा on 26 November, 2015 - 04:05

मी सध्या एका प्रायवेट कंपनी मध्ये नोकरी करतेय. २-३ महिन्यापासुन मी घरगुती मसाले व चटण्या तयार करु लागले. घराजवळ्च्या, ओळखीच्या लो़कांच्या ऑर्डर येतात. पण मला आता हाच व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालु करायचा आहे.
तरी कृपया मार्केटिंग आणि सेल कसा करावा या संबधित मार्गदर्शन करावे.

तडका - आमचे संविधान

Submitted by vishal maske on 25 November, 2015 - 22:03

आमचे संविधान

स्वातंत्र्य समता बंधुत्वाचा
चरा-चरात मिळतो मान
अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा
इथे मिळतो हो बहूमान

धर्मनिरपेक्षता समाजवादी
आहे एकात्मतेचा प्राण
मानवतेच्या कल्याणासाठी
जगात भारी आमचे संविधान

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

बोट - वादळवारा

Submitted by स्वीट टॉकर on 13 November, 2015 - 00:49

नोकरीसाठी गेल्यावर सायकोमेट्रिक परीक्षा घेतात त्यात असे प्रश्न असतात – लाल रंगाची वस्तू सांगा म्हटल्यावर तुमच्या मनात खालील चारपैकी कुठली वस्तु आधी येते?
लाल गुलाब, ट्रॅफिक सिग्नल, रक्त, आगीचा बंब.

यात बरोबर/चूक असं उत्तर नसतंच. पण तुमच्या उत्तरावरून तुमच्या विचारधारेची कल्पना येते (असं म्हणतात तरी).

शब्दखुणा: 

तडका - बोनस

Submitted by vishal maske on 5 November, 2015 - 08:55

बोनस

जेवढा घेण्यामध्ये असतो
त्याहून जास्त देण्यात असतो
वाटला गेलेला आनंद हा तर
आपुलकीच्या मनात असतो

दिला गेलेला बोनस जरी
मुल्यांकनात भेटला जातो
त्याने भेटलेला आनंद मात्र
किंमत बाह्य थाटला जातो

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

बोटीवरील जीवन

Submitted by स्वीट टॉकर on 4 November, 2015 - 03:40

जर तुम्हाला कोणी म्हणालं की उद्यापासून तुमच्या आयुष्यात पाण्याचा तुटवडा असणार नाही, लाइट जाणार नाही, हवा आणि पाणी यांचं प्रदूषण असणार नाही, ट्रॅफिकची कोंडी असणार नाही, भ्रष्टाचार असणार नाही, मराठी - अमराठी किंवा जात - धर्माचा भेदभाव असणार नाही, त्याचं राजकारण असणार नाही, कोणीही रांग मोडणार नाही, थुंकणार नाही, दारू पिऊन कामावर येणार नाही, सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणार नाही, जोरात संगीत लावून दुसर्‍याची झोपमोड करणार नाही, कचरा खिडकीतून बाहेर अथवा रस्त्यावर फेकणार नाही, “हे माझं काम नाही” असं कोणी म्हणणार नाही, तुमचं घर चुकून उघडं राहिलं तरी कोठल्याही वस्तूची चोरी होणार नाही, प्रत्येक जण दि

शब्दखुणा: 

तडका - पैसा

Submitted by vishal maske on 18 October, 2015 - 21:20

पैसा

पैशासाठी जगतात लोक
पैशासाठी मरतात लोक
पैशांसाठी तर कधी-कधी
माणसांनाही मारतात लोक

पैसे मिळवण्या माणसांमध्ये
नको ती हिंमत आली आहे
माणसं झालेत कवडीमोल
पैशाला किंमत आली आहे,.?

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

असाही एक क्लायंट

Submitted by स्वीटर टॉकर on 7 October, 2015 - 07:09

माझी मुलगी दुसर्‍या यत्तेत जाऊन शाळा सबंद वेळ सुरू झाल्यावर मी काही उद्योग करावा असं ठरवलं. बी.एस्.सी. (फिजिक्स) असल्यामुळे जनरल शिक्षण होतं पण उद्योगधंद्याला पूरक असं काही नव्हतं. मग परत कॉलेजला प्रवेश घेतला, सिंबायोसिसमधून D.C.A. केलं आणि डी.टी.पी. आणि छपाईचा व्यवसाय सुरू केला.

परत चावडी

Submitted by mi_anu on 27 September, 2015 - 05:43

"निल्या हल्ली फेसबुकावर नाही का? त्याला परवा टॅग करायचा होता तर सापडलाच नाही."
"अरे जाम घोळ झाला रे. निल्या त्याच्या जर्मन साहेबाच्या बायकोच्या बरियलला गेला होता त्याचे रिकामटेकडे रुममेट घेऊन.त्याला ग्रुप टिकेट काढून पैसे वाचवायचे होते.तर म्हणाला तुम्हीपण चला. त्यांना तिथे काही उद्योग नव्हता त्यांनी त्या रम्य दफनभूमीत पंचवीसेक फोटो काढले आणि त्यात टॅग केला ना निल्याला 'फिलींग हॅप्पी अ‍ॅट रोझेनहाईम ग्रेव्हयार्ड' म्हणून. त्याला २५० लाईक मिळाले आणि निल्याचा साहेबच होता फ्रेंडस लिस्ट मध्ये. निल्याने आता कानाला खडा लावून फेसबुक संन्यास घेतलाय काही दिवस."

तडका - यश मिळवताना

Submitted by vishal maske on 22 August, 2015 - 11:11

यश मिळवताना

यश मिळवायचं असेल तर
प्रयत्न हे करावे लागतात
ध्येयपुर्तीचे ध्येय वेडे
मनामध्ये भरावे लागतात

ध्येयही त्यांचेच पुर्ण होतात
ज्यांची इच्छाशक्ती प्रबळ असते
मात्र इच्छा हिन माणसांकडून
उदासिनतेचीच खळबळ असते

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

Pages

Subscribe to RSS - नोकरी-व्यवसाय