सन्गणक

स्टोरेज मिडीयावर माहिती साठवल्यावर SAFE EXIT होणे आवश्यक आहे का ?

Submitted by उदय on 12 September, 2016 - 10:10

सन्गणकाची साफ-सफाई करताना त्यात असलेली सर्व माहिती एका पोर्टेबल स्टोरेज डिव्हाईस मधे ठेवली होती. सर्व फाईल्स / डेटा कॉपी झाला असावा हे 'गृहित' धरले आहे. USB बाहेर काढताना सरक्षितपणे बाहेर पडण्याची कळ वापरली नाही. या आधी असे हजारदा केले आहे त्यामुळे तपासण्याची तसदी घ्यावी असे वाटले नाही, कारण कधिच त्रास झाला नाही. डिव्हाईस मधे आधिचा डेटा माहिती खुप आहे.

आता कुठल्याही सन्गणकावर हे पोर्टेबल स्टोरेज डिव्हाईस उघडत नाही.
https://www.amazon.com/Passport-Essential-Portable-External-Silver/dp/B0...

क्यु.ए.चा जॉब ( क्वालिटी अ‍ॅनॅलिस्ट)

Submitted by टीपापाकर on 25 March, 2016 - 11:03

मी सध्या अमेरिकेत Quality analyst च्या जॉबच्या शोधात आहे, माझ्याकडे भारतातल्या पदवी आणि मास्टर्स अशा दोन्ही डिगरी आहेत पण सुर्वातिला इच्छा असुन एच-४ मग मुल लहान, नवर्‍याची सतत फिरतिची आणी बरिच बिझी नोकरी त्यामुळे करिअर ला ब्रेक लागला ...आता चित्र बरच बदललय स्थिरावलय, व्हिसा वैगरे प्रोब्लेम पण नाही बॅक टु वर्क च्या प्रयत्नात आहे...
अगदी अ‍ॅन्ट्रि लेव्हल पासुन सुर्वात करावी लागणार आहे, माझ्या एका मैत्रिणी ने सुचवल्यावर मागचे ३-४ महिने guru99 वर foundaton level चा अभ्यास करुन परिक्षा दिलिय ..certificate ही आहे.

मदत/ माहिती हवी आहे

Submitted by रश्मी. on 11 September, 2014 - 07:29

हॅलो मला एक मदत हवी आहे. माझ्या मैत्रिणी च्या भावाने, जो सन्गणक शिकत आहे,नवीन हार्ड डिस्क बसवण्याकरता जुन्या हार्ड डिस्क मधुन बॅक अप घ्यायला सुरुवात केली. पण काही कारणामुळे जुन्या डिस्क मधल्या बर्‍याचश्या फाईल्स/ डॉक्युमेन्ट्स उडुन गेले. जे होत असते.

दुर्दैवाने त्यातली गाणी आणी काही नवीन गोष्टी तो सिडी वर कॉपी करायचा विसरला. त्याने नेटवरुन सर्च केला, पण काही समजत नाहीये.

याला काही उपाय आहे का? की जेणे करुन त्याला त्या फाईल्स परत बघता येतील?

वाटलं आता तरी थोडं काम करावं....

Submitted by चिखलु on 5 July, 2012 - 15:33

सुस्तावलेल्या कि बोर्ड वरची
धूळ झटकली
आणि फडकं मारलं स्क्रीनवर
वाटलं आता तरी थोडं काम करावं....

बटन म्हणाले आता तरी बदड आम्हाला
कधीचं वाट बघतोय
माउस म्हणाला शी बाबा
हा भलताच आळशी प्राणी आहे
मला ऑपरेट करणारा

स्क्रीन म्हणाला
बघतोस काय डोळे फाडून
मल्लिका शेरावतला साडीत
पाहिल्यासारखं

डीवीडी रीडर म्हणाला
कधीपासून वाट बघतोय
काहीतरी वाचायला मिळेल
आणि हा ठोम्ब्या तर काहीच वाचू देत नाही.

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - सन्गणक