समाजात सगळ्यांनी सैनिकी शिक्षण घेतले पाहिजे व सैन्यसेवा सक्तीची केली पाहिजे असे कित्येक लोकांना वाटते. अशाने जागरूकता येईल, शिस्त वाढेल व त्याच बरोबर तरुणांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होण्याची शक्यता आहेच. पण लोकांना जरी वाटले तरी ते शक्य होणारे नाही कारण सरकारी तिजोरीत सगळ्यांना पगार देण्याइतके पैसेच नाहीत.
माझ्या जन्म झाला तेव्हा माझी जन्मपत्रिका काढली गेली. ती जन्म झाल्यावर लगेच काढली की दोनचार वर्षांनी ते आता आईला विचारावे लागेल. ती कुठली पद्धत वापरून काढली, कोणी काढली याची मला कल्पना नाही. पण जेव्हा जेव्हा घर आवरताना ती आईला सापडली तेव्हा तेव्हा मी ती कौतुकाने जरूर वाचली. प्रत्येकवेळी हेच लक्षात आले की त्यात जे जे लिहिले होते तेच जवळपास माझ्या आयुष्यात घडलेय.
उदाहरणार्थ, भावंडांचे फार सुख नाही.
आणि हो, खरेच की! मी एकुलता एक आहे
चांगला बाजारभाव असणारे एखादे कौशल्य स्वत:मधे निर्माण करणे, असलेले अद्यतन करणे हा आर्थिक समृद्धी खात्रीने वाढवण्याचा मार्ग आहे.पण हे करताना आपल्या कौशल्याचा स्तर कोणता आहे हे मोजता आले तर? म्हणजे समजा क्ष नावाची व्यक्ती आहे. ती संगीताच्या क्षेत्रात गाण्यांना चाली लावण्याचे काम करते त्याशिवाय तीच व्यक्ती चित्रकारही आहे, तीच व्यक्ती गायकही आहे असे समजू. आता गाण्यांना चाली लावतो म्हणजे तो संगीतकार आहे. पण त्याची लेवल किंवा स्तर किती आहे याचे नेमके मापन कसे करणार? म्हणजे तो ए.आर. रहमानच्या तोडीचा संगीतकार आहे की अनु मलिकसारखा बाजारात मागणी ते पुरवू वाला संगीतकार आहे? हे कसे मोजणार?
सध्या कोरोनाप्रतापामुळे अनेकांच्या नोकर्या जात आहेत.कंत्राटी कामे मिळेनात.कधीतरी कोरोना अगदी नगण्य उरेलच; किंवा संपुष्टातसुद्धा येईल. त्यावेळी पुन्हा नोकरी संशोधन किंवा नवे कंत्राटी काम मिळवायला लोक बाहेर पडतीलच.
खाजगी नोकरी शोधताना किंवा नोकरी करत असताना किंवा कंत्राटी कामे मिळवताना काही वेळा असे निदर्शनास येईल की आपण पात्र असूनही आपल्याला संधी मिळालेली नाही किंवा प्रमोशन मिळालेले नाही.उलट आपल्याला डावलून ज्याला संधी दिली गेलीय त्याला नक्की काय पाहून त्या पदावर काम करण्याची संधी दिली गेली असावी किंवा नक्की काय तपासून कंत्राट दिले गेले असावे अशी शंका येते.
मागील लेख
https://www.maayboli.com/node/66038
https://www.maayboli.com/node/66224
रेस्युमे मध्ये काही सर्वसामान्य माहिती द्यावी लागते. या माहिती ने नोकरी मिळण्यात फरक पडत नाही ( बर्याच अंशी ) पण हि माहिती देण्याची गरज असते , तसेच हि माहिती प्राथमिक डेटाबेस बनवायला उपयोगी असते त्यामुळे द्यावी लागते .
हे आहे
१)नाव ( पूर्ण) - हे मोठ्या फॉन्ट मध्ये बोल्ड करून लिहा
नोकरी संबंधी क्षेत्रात नोकरी केल्यामुळे अनेकांनी नोकरी मिळवण्यासाठी काय काय करावे लागते हे मला अनेक लोकांनी विचारले . स्वत: वर हि नोकरी शोधायचा प्रसंग अनेकदा आल्याने अजून भरपूर अनुभव हि होताच. अगदी चांगल्या संस्थेत शिक्षण झाले तरी नोकरी कशी शोधावी हे कोठेच शिकवले जात नाही. त्यामुळे अनेक गोष्टी चुकत माकतच शिकाव्या लागल्या. त्या साठी काही लेखांची मालिका लिहिण्याचा विचार आहे . ( या लेखा मध्ये अस्थानी लेखक - हेमंत वाघे असे येईल - हा माझा वॉटरमार्क असेल. )
जॉब कन्सल्टन्ट / रिक्रुटिंग एजंट / प्लेसमेंट कन्सल्टन्सी / सर्च कन्सल्टन्ट
प्रशांतीने आपलं मोजकंच सामान एकत्र केलं. मुलाचा फोटो, त्याने काढलेली एक दोन चित्र, हरीचा आणि तिचा फोटो. फार नव्हतंच. एका तासात तिला सगळं आवरायचं होतं. जेमतेम तीन महिने एकत्र काम केलेल्या सहकार्यांचा निरोप घ्यायचा की नाही हे तिला समजत नव्हतं. त्यांना ठाऊक असेल? काय म्हणतील? प्रश्न, सल्ले आणि सहानुभूती... नकोच. काय कळायचं ते इथून गेल्यावरच कळलेलं बरं. पण ती नक्की का सोडून जाते आहे ते कुणाला ठाऊक असण्याची शक्यता तिला वाटत नव्हती. काय करावं? सामान पाहिलं की सर्वांच्या नजरा वळणारच. तिला रडायला यायला लागलं. डोळ्यातले अश्रू कसेबसे आवरत ती सामान भरत राहिली.
मी सध्या अमेरिकेत Quality analyst च्या जॉबच्या शोधात आहे, माझ्याकडे भारतातल्या पदवी आणि मास्टर्स अशा दोन्ही डिगरी आहेत पण सुर्वातिला इच्छा असुन एच-४ मग मुल लहान, नवर्याची सतत फिरतिची आणी बरिच बिझी नोकरी त्यामुळे करिअर ला ब्रेक लागला ...आता चित्र बरच बदललय स्थिरावलय, व्हिसा वैगरे प्रोब्लेम पण नाही बॅक टु वर्क च्या प्रयत्नात आहे...
अगदी अॅन्ट्रि लेव्हल पासुन सुर्वात करावी लागणार आहे, माझ्या एका मैत्रिणी ने सुचवल्यावर मागचे ३-४ महिने guru99 वर foundaton level चा अभ्यास करुन परिक्षा दिलिय ..certificate ही आहे.