'बाळ! तू मोठेपणी कोण होणार?' हा प्रश्न मला वाटतं बालपणी कोणालाही चुकलेला नाही. घरी आलेले पाहूणे सहज कौतुकाने बाळांना विचारत. आणि बहुतेक बाळांचे ह्यावर ठरलेले उत्तर असायचे. "मी ना! डाकतल होणार आणि सर्वांना टोची टोची कलणाल" नाहीतर "मी ना! अमिता बच्चन होणार आणि ढिशुम ढिशुम कलणाल" ह्यावर पाहुणे बाळाचा गालगुच्चा घेऊन "हो का रे लब्बाडा!" असे म्हणत बाळाची प्रेमाने पापी घेत. आणि तिकडे बाळाच्या आईवडिलांनाही आपल्या बाळाला कुठे ठेऊ आणि कुठे नको असं होऊन जाई. काही बाळांना मोठेपणी 'परी' तर काहींना 'बाप्पा' व्हावेसे वाटे.
मी २०१२ सालापासून अंगोलात आहे. आणि एवढ्या काळात मी सहा घरे बदलली. ( पण घाबरू नका, त्यापैकी प्रत्येकी दोन दोन, एकाच एरियात होती, म्हणून दोन दोन चे गट करून लिहितो. )
११ आणि १२ ग्राफानिल, व्हीयाना, लुआंडा - साल २०१२
अंगोलात आल्याबरोबर पहिल्यांदा नऊ महिने मी ग्राफानिल या भागात राहिलो. प्र्त्येक मजल्यावर दोन फ्लॅट्स असलेली २ मजली बिल्डींग आमच्या कंपनीने घेतली होती. त्यात आम्ही सहा जण रहात होतो. दोन बेडरुम्स्चा
सुंदर फ्लॅट होता तो.
ग्राफानिल असे भारदस्त नाव असले तरी ते एक खेडेगाव होते. सर्व बैठी घरे होती. ही बैठी घरे हि खास अंगोलन
ज्या घरात किमान १ महिना वास्तव्य झाले ते माझे घर, अशी सुटसुटीत व्याख्या केली तर मी
आज माझ्या १९ व्या घरात राहतोय. यापैकी फक्त ३ अपवाद सोडले तर हि सर्व घरे मी, स्वतः
मॅनेज केलीत. मॅनेज केलीत म्हणजे घराची साफसफाई, सामान भरणे, वीज पाणी, आला गेला,
पै पाहुणा... पण तरीही मी घरांना संभाळले, असे मी म्हणणार नाही. त्यांनीच मला संभाळले.
त्यातल्या वास्तव्य काळातच नव्हे तर नंतरही माझे मन त्यात गुंतून राहिले. घर, सभोवताल, शेजारी
यांच्या आठवणी अजूनही मनात ताज्या आहेत. जेव्हा जेव्हा शक्य झाले, तेव्हा तेव्हा मी या घरांना परत भेटी दिल्याच,
मी मायबोली वर मल्टीपल इंटेलिजन्स वर मागे लिहले आहे. http://www.maayboli.com/node/39215 मल्टीपल इंटेलिजन्स चा वापर आजवर फक्त लर्निंग स्टाईल च्या शोधासाठी होत होता. याच छोटस उदाहरण द्यायच झाल तर समजा आपल्या मुलाचा निसर्ग विषयक बुध्यांक जास्त आहे. अश्यावेळी तो निसर्गात जास्त रमतो असे समजले. आपल्याला त्याला गणीत शिकवायचे आहे तर ३ फुलपाखरे अधिक २ फुलपाखरे बरोबर पाच फुलपाखरे असे चित्रमय शिक्षण केले तर अश्या मुलाला शिकणे सोपे होते.
डिस्क्लेमर: ही पोस्ट मी ऑफिसमध्ये जाऊन कशा 'पाट्या' टाकते यावर नाहीये.
पुढच्या आठवड्यात आमचे ऑफिस नविन बिल्डिंग मधे शिफ्ट होणार आहे. सध्याची बिल्डिंग बॉस्टन डाउनटाऊन मध्ये आहे. तिथल्या जुन्या बिल्डिंग, चर्च, दुपारच्या वेळी असणारी वर्दळ हे सर्व नक्कीच खास आहे. तरीही या ऑफिसबद्दल खूप आस्था अशी वाटलीच नाही, एक वर्ष होऊन गेलं तरी. कदाचित तिथले धूळ भरले, एकमेकांना लागून असलेले छोटे डेस्क असेल. किंवा चुकूनही ओठांवर हसू न येणारे लोक असतील. अर्थात हे सर्व बदलेल असे नाही पण नवीन ठिकाणी काय असलं हे बघायची उत्सुकता नक्की आहे.
मागच्या आठवड्यात माझा एक मित्र माझ्याकडे मलेशिया विषयी काही माहिती आहे का विचारायला आला होता . मी त्याला कशासाठी म्हणुन विचारलं तर त्याने सांगितलं ' PETRONAS ह्या मलेशियन कंपनीकडुन त्याला जॉब ऑफर आलीय आणि पॅकेज खुप मस्त आहे .' त्याने पासपोर्टची कॉपी , आणि इतर खाजगी माहीती भरुन पाठवली होती. इंटरव्यु वगैरे सगळं व्यवस्थित पार पडलेलं होतं. आणि त्यांनी आता मलेशियातल्या त्यांच्या बॅरिस्टर शी कॉन्टॅक्ट करायला सांगितलं होतं. वीजा , वर्क परमिट वगैरे सगळं त्या वकिलाचं ऑफीस करणार होतं . फक्त सुरवातीच्या पेपरवर्क साठी फी भरावी लागणार होती , त्याने फी भरावी लागेल म्हणताच माझी घंटी वाजली.
नमस्कार
मी पुढील वर्षी एच वन-बी विसा साठी अर्ज करणार आहे. मी आधी एकदाही परदेशी कामानिमित्त प्रवास केला नाही. सध्याच्या नियमांनुसार कुणीतरी स्पॉन्सर असावा लागतो जो तुम्हाला अमेरिकेत नोकरी देईल. एक मार्ग म्हणजे आपण ज्या कंपनीत काम करतोय तीच कंपनी विसा फाइल करते आणि त्याच कंपनीतर्फे अमेरिकेत काम करणे. यात विसा प्रोसेसिंगचा सगळा खर्च कंपनीच करते. उदा. Infy/TCS/Cognizant यातील कर्मचार्यांना मिळणारी संधी.
दुसरा मार्ग म्हणजे स्वतः पैसे खर्च करुन अर्ज करणे, ज्यात एक भरवशाचा कन्सल्टंट शोधणे, नंतर त्याच्या मदतीने आपल्याला तिकडे नोकरीची संधी देणारा स्पॉन्सर शोधणे असा आहे.
तीनेक वर्षांपूर्वी माझ्या मैत्रिणीने रंगवलेल्या पणत्यांचे फोटो पाहिले आणि आपणही काहीतरी करावं असं वाटायला लागलं. उत्साहाने जाऊन कुंभारवाड्यातून पणत्या आणल्या, रंगही घेतले आणि एका पाठोपाठ एक पणती रंगवण्याचा सपाटा लावला. मी आणि संदीपने मिळून १००-१२५ पणत्या रंगवल्या. त्यात प्रत्येक वेळी नवीन रंगांचे मिळून बनणारे जे सुंदर चित्र शेवटी दिसायचे त्याचा जणू ध्यासच घेतला. मान मोडेपर्यंत त्या पणत्या रंगवल्या. आता त्या करायच्या काय? मग आम्हाला कल्पना सुचली आपण सर्वांना दिवाळीला पणत्याच भेट म्हणून दिल्या तर? मग आम्ही हिशोब काढला आणि अजून पणत्या, रंग घेऊन आलो.
दादर माटुंगा बांद्रा माहिम या परिसरातील समुपदेशकांबद्दल माहिती हवी आहे. जवळच्या नात्यातील एका व्यक्तीला डिप्रेशन सिंड्रोम्स दिसत आहेत. कृपया कोणाला एखाद्या चांगल्या समुपदेशकाबद्दल माहिती असल्यास सांगा. धन्यवाद.