उपयुक्त संगणक प्रणाली

ChatGPT: विचारा तर खरं

Submitted by अतुल. on 11 December, 2022 - 03:33

सध्या ChatGPT चा बराच बोलबाला आहे. हे खूप मोठ्या माहितीस्त्रोतावर प्रशिक्षण दिलेले कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित मॉडेल आहे. याची बुद्धिमत्ता खरेच वाखाणण्याजोगी आहे. म्हणून तर सध्या ते फार चर्चेत आहे. ज्यांची उत्तरे वर्णनात्मक आहेत किंवा ज्या समस्या सोडवायला अनेक पायऱ्या (steps) असतात अशा प्रश्नांची उत्तरे सुद्धा तो देतो. संगणकाचे अल्गोरिदम लिहिण्यापासून कविता करण्यापर्यंत अनेकविध प्रश्न आपण त्याला विचारू शकतो आणि त्याची तो उत्तरे देतो. अनेकांनी आजवर असे प्रश्न त्याला विचारलेलेही आहेत.

आर्टिफिशिअल ईंटेलिजन्स कि कॉम्प्युटर इंजिनिअरिंग कि रोबोटिक्स

Submitted by रानभुली on 14 June, 2022 - 21:34

एका विद्यार्थिनीसाठी तातडीने माहिती हवी आहे.
एका ठिकाणी आर्टिफिशिअल इंटेलिजन्स / रोबोटिक्स / काँप्युटर इंजिनियरिंग अशा तीन शाखांपैकी एकीची निवड करायची आहे. आर्टिफिशिअल इंजिनिअरिंग अशी स्पेशलायझेशन असलेली पहिलीच बॅच असणार आहे. तिकडे प्रवेश घ्यावा कि रेग्युलर कंप्युटर इंजिनिअरिंग करून आर्टिफिशिअल इंजिनिअरिंगचे कोर्सेस करावेत किंवा पीजी करावे ? आर्टिफिशिअल इंजिनिअरिंग करून ज्या संधी मिळणार आहेत त्या कंप्युटर इंजिनिअरिंग करूनही मिळू शकतात का ? मी या क्षेत्राशी संबंधित नाही . त्यामुळे प्रश्न विचारताना चूक झाली असेल तर समजून घ्यावे.

तू माझा कैवारी.

Submitted by केशवकूल on 15 March, 2022 - 09:59

तू माझा कैवारी.

सात साडे सात वाजले असावेत. सावंतांची एस टी फलाटाला लागली होती. पण कंडक्टर ड्रायवर चहा प्यायला गेले होते. साधी लाल गाडीच होती. त्यामुळे कुणाला काही घाई नव्हती. प्रवासी तसे थोडकेच होते. खिडकीपाशी बसायला मिळावे म्हणून सगळ्यांची गाडीत घुसण्याची घाई, पण बसचा दरवाजा काही उघडेना.

“दरवाजा लॉक झाला जणू”. कोणीतरी रिमार्क टाकला.

“अहो उघडेल की. जरा हैय्या म्हणून जोर लावा.”

“सगळा अनागोंदी भोंगळ सरकारी कारभार. साधा एस टीचा दरवाजा...... ”

“रायटिंग मध्ये तक्रार करायला पाहिजे. साल्यांना ##त लाथा घालायला पाहिजेत.”

विंडोज ११ laptop

Submitted by इवाना on 10 January, 2022 - 00:03

Windows 11 preinstalled laptop बाजारात आता आताच आले आहेत. Hp ,15inch, 45 हजाराला सुरू आहे. ओफिससूट लाईफटाइम आहे, काही android apps आहेत असं दुकानदारकाका बोलले.
तर विंडोज ११ स्टेडी झाली का, घ्यावा की थांबावे? घरच्यासाठी पहिलाच laptop घेत आहे. ओफीसमध्ये तिथले वापरायची सवय आहे पण ते त्यांच्या कामासाठी लॉक्ट असतात. गेमिंगसाठी नकोय.
कुणाला काही अनुभव, सूचना आहेत का?

धन्यवाद.

शब्दखुणा: 

लॅपटॉप साध्या कामासाठी - Laptop for Basic Work

Submitted by हेमंतसुरेशवाघे on 6 March, 2021 - 00:58

लॅपटॉप घेताना अनेक जण गोधळतातयात अनेकांना फार साधी कामे करायची असतात.
आणि तरीही गरज नसतील तर उद्या लागेल म्हणून प्रचंड ताकदीचा लॅपटॉप घेतला जातो - वस्तूत: हि ताकद कधीही वापरली जात नाही - किंवा फार क्वचित वापरली जाते .
अनेकदा दुकानदार तुम्हाला अति ताकदवान लॅपटॉप उद्या लागेल म्हणून विकतो , वस्तूत: तितकी ताकद कधीही लागत नाही, ताकदवान प्रोसेसर हे महाग असतात आणि त्याचे दुकानदाराला अधिक फायदा मिळतो .

सोसायटी मेंटेनन्स बिलिंगविषयी

Submitted by विक्षिप्त_मुलगा on 25 October, 2020 - 14:09

मी राहत असलेल्या रहिवासी सोसायटीचे दरमहा मेंटेनन्स बिल्स (प्रत्येक सदनिकाधारकाला देण्यासाठी) बाहेरून एका व्यक्तीकडून तयार करून घेतले जाते. तेव्हा माझ्या मनात असे आले की, आपल्या सोसायटीचे मेंटेनन्स बिल्स आपणच बनवावे, म्हणजे सोसायटीचे थोडेफार पैसे वाचतील आणि आपल्या सोसायटीचे काम नीट जमू लागले की मग आजूबाजूच्या इतर सोसायट्यांचेही काम घ्यावे, म्हणजे अधिकचे चार पैसे कमावता येतील.

तर या कामाविषयी थोडी माहिती हवी आहे.

१. अशा प्रकारच्या सेवेला काय संबोधले जाते? म्हणजे जर उद्या मला जाहिरात करायची असेल तर नेमकी काय service देत आहोत असे जाहिरातीत द्यायचे??

चला आता मायक्रोफोन मध्ये बोलून टायपिंग करू या

Submitted by नितीनचंद्र on 27 July, 2020 - 09:40

चला आता मायक्रोफोन मध्ये बोलून टायपिंग करू या

बरेच दिवस टायपिंग चा त्रास कसा कमी करता येईल याचा विचार मी करत होतो दोन चार दिवसापूर्वी मला असे ऐकायला मिळाले आता गुगल मी मराठी भाषा केली आहे तर मायबोली वरचे कसे मायक्रोफोन वरती बोलून टाईप करता येतील याचा विचार करताना मला सापडली

गुगल डोक्स ओपन करा. आपला मायक्रोफोन सुरु करा. जिथे मायक्रोफोन दिसतोय सेटिंग आहे त्यामध्ये जाऊ मराठी भाषा सेट करा आपण बोलायला लागला आज मराठी टायपिंग होऊ लागेल. थोडे एडिटिंग करावे लागेल

आता टायपिंग केलं आहे ते कॉपी-पेस्ट करा मायबोली वर

सुरु सुद्धा न होणारा (Bricked) सॅमसंग एंड्रॉईड फोन मी असा दुरुस्त केला

Submitted by अतुल. on 8 July, 2020 - 05:39

ऐन लॉकडाऊनच्या काळात सर्व भिस्त फोन आणि इंटरनेटवर असल्याने फोन बंद पडणे म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. माझ्या भावाचा फोन असाच बंद पडला. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे मागच्या काही वर्षात वेळोवेळी साठवला गेलेला अतिशय महत्वाचा डेटा त्यात होता. थोडाथोडका नव्हे तर जवळजवळ ६४ गिगाबाईट!

शब्दखुणा: 

मिरजमध्ये कुठली इंटरनेट सर्व्हिस घ्यावी?

Submitted by बोकलत on 7 December, 2019 - 04:38

मी काही महिने (जास्तीत जास्त 5 ते 6) मिरजमध्ये राहायला जातोय. कंपनीच्या कामासाठी मला एक चांगल्या इंटरनेट कनेक्शनची गरज आहे. तर त्या भागात कोणतं कनेक्शन जास्त चांगलं आहे? अनलिमिटेड असेल तर बरं होईल.

Pages

Subscribe to RSS - उपयुक्त संगणक प्रणाली