नोकरी-व्यवसाय

नायजेरियन विचित्र कथा - २ - बाबूल मोरा..

Submitted by दिनेश. on 1 February, 2015 - 09:40

हि घटना आहे १९९६ ची. मी त्यावेळी नायजेरियामधल्या पोर्ट हारकोर्ट या भागात होतो. हा भाग खनिज तेल समृद्ध आहे. पुढे हे शहर अपहरणासाठी कुप्रसिद्ध झाले. मी होतो त्या काळातही ते सुरक्षित नव्हतेच.

मी एका फ्रेंच कंपनीत नोकरीला होतो. आमच्या कंपनीत मी सोडल्यास दुसरा कुणीही भारतीय नव्हता. ४० फ्रेंच, १ इतालियन, १ जर्मन, १ ब्रिटीश आणि एक साऊथ आफ्रिकन होता. माझ्यासोबत ब्रिटिश आणि इतालियन माणूस रहात असे. आम्ही रोज एकत्रच कामावर जात असू.

घर ते ऑफिस अंतर फार नव्हते, पण तिथल्या "गो स्लो" ( गो स्लो म्हणजे नायजेरियन ट्राफिक जाम ) मूळे

घरपोच भाजीपाला व्यवसाय- सल्ला हवा आहे

Submitted by टोच्या on 28 January, 2015 - 06:17

बहुतांश लोक दारावर जो येतो तो भाजीपाला घेतात किंवा तो खरेदी करण्यासाठी बाजारात किंवा मंडईत जावे लागते. बहुतांश वेळा हा भाजीपाला दुय्यम दर्जाचा असतो. कारण प्रथम दर्जाचा माल बाजारसमितीतून इतर राज्यांत किंवा परदेशांत जातो. त्यामुळे जो मिळेल, तोच भाजीपाला बहुतेकांना खावा लागतो. यासाठी माझ्या डोक्यात गेल्या सहा-सात वर्षांपासून शेतकऱ्यांकडून घेऊन ताजा भाजीपाला ग्राहकांना घरपोच देण्याची कल्पना आहे आणि यात जम बसल्यास हाच व्यवसाय पुढे वाढविण्याची इच्छा आहे. सध्या माझ्याकडे अर्धा दिवस वेळ असतो. पुढे मी पूर्णवेळ त्यात उतरण्याचे ठरविले आहे. कारण भविष्यात भाजीपाल्याची मागणी कधीच कमी होणार नाही.

आपला कट्टा चर्चा निष्कर्ष संकलन

Submitted by शांताराम कागाळे on 7 January, 2015 - 09:13

१ ले चर्चा सत्र :

विषयः मोदींना पर्याय काय, मोदींना पर्याय का नाही, मोदींना पर्याय निर्माण होणे आवश्यक आहे की नाही!
दिवसः ७ जानेवारी २०१५

१. मोदींसारख्या नेत्यांना पक्षांतर्गत व पक्षबाह्य असे दोन्ही ठिकाणी समर्थ पर्याय निर्माण होणे एका देशासाठी आवश्यक आहे.

२. काँग्रेसने तूर्त नवीन चेहर्‍यांचा विचार करावा व पक्षबांधणीवर फोकस ठेवावा. ज्योतिरादित्य शिंदे हे नांव दोन सदस्यांनी सुचवले.

ईसीस ! जगासाठी नविन खतरा !

Submitted by शांताराम कागाळे on 13 December, 2014 - 13:21

शिया आणि सुन्नी यांच्यातील ईराक, ईराण आणि सिरीया या देशातील अंतर्गत युद्धात भाग घेण्यासाठी ३०,००० सैनीक तयार केले जायचे होते. त्यातले काही तरुण या अगोदरच ईराक मध्ये पोहोचले आणी त्यांनी

स्त्रीभृणहत्या - जबाबदार कोण? (पुन्हा इथे टाइप केलेले. लिंक नव्हे.)

Submitted by स्वीटर टॉकर on 7 November, 2014 - 12:43

स्त्रीभृणहत्या - जबाबदार कोण?

अय्या, हा कसला बावळट प्रश्न? उत्तर सरळ आहे. पति, कधी कधी पत्नी, त्यांच्यावर दबाव आणणारे सासू सासरे आणि याचा फायदा उठवणारे डॉक्टर !

मात्र ‘उत्तर’ आणि ‘समाधान’ यात फरक असतो. राजकीय पुढार्‍यांकडे आपल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर असतं. समाधान मात्र नसतं. कारण समाधान होण्यासाठी खोलात जावं लागतं. वरवरचा विचार पुरत नाही. या हत्येत प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे सामील होणार्‍यांवर घणाचे घाव घातले पाहिजेत यात शंकाच नाही. त्याचबरोबर अशी परिस्थिती येणारच नाही यासाठी पावलं उचलली पाहिजेत.

अमेरीकन expats

Submitted by BS on 13 October, 2014 - 11:08

मायबोलीवर कोणी american expats आहेत का? तुम्ही कुठल्या देशात राहताय सद्ध्या आणि तुमचा अनुभव ईथे लिहू शकाल का? Online शेकडो blogs आहेत तसे पण देशी american perspective वाचायला आवडेल.

फ्रेंन्ड अ‍ॅण्ड कलीग्ज !

Submitted by ऋन्मेऽऽष on 27 September, 2014 - 16:13

साधासाच किस्सा. पण तुमच्या आमच्या रोजच्या कॉर्पोरेट जीवनातही घडत असेल. तुमच्याशी बोलून मोकळे व्हावे आणि यासंदर्भात तुमचेही विचार आणि अनुभव समोर यावेत या हेतूने शेअर करतोय.

__________________________________________________

उदयोन्मुख शेफ व हवाईसुंदरी तेजल देशपांडे : संयुक्ता मुलाखत (सार्वजनिक धागा)

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 25 September, 2014 - 08:37

सध्याच्या तरुणाईत स्वतःच्या हिमतीवर शिकण्याची व स्वतःच्या पायांवर उभे राहून आपल्या आवडत्या कार्यक्षेत्रात पुढे काम करण्याची प्रवृत्ती वाढीस लागलेली दिसते. हे चित्र निश्चितच सुखावह आहे. याच पिढीच्या एका एकवीस वर्षांच्या तरुणीशी माझी काही दिवसांपूर्वी ओळख झाली. तेजल देशपांडे! एक हसतमुख, प्रसन्न व्यक्तिमत्त्व. पंचतारांकित हॉटेलमधील कामाचा अनुभव गाठीशी असलेली ही एक उदयोन्मुख शेफ, पर्यटन विषयातील पदवीधर आणि काही दिवसांतच एका आंतरराष्ट्रीय एअरलाईन्समध्ये रुजू होणारी हवाईसुंदरी. शिवाय हे सर्व शिक्षण तिने स्वतःच्या हिमतीवर, 'कमवा व शिका' या तत्वावर घेतले आहे हे विशेष!

इतर देशातील नोकरीविषयी संधी

Submitted by श्रीनिका on 11 September, 2014 - 09:31

नमस्कार,

मला इतर देशात IT नोकरी संदर्भात माहिती हवी होती.
भारतातून कसं Apply करता येऊ शकेल?

माझ्या नवर्‍याला interest आहे आणि त्याचा Canada or Australia PR घ्यायचा विचार चालू आहे पण मला PR घेऊन मग Job search करणं risky वाटतयं.. मला प्लीज कुणी नीट माहिती द्या.

Profile : team lead, 6+ expr.
Skill set : Informatica, Oracle

धन्यवाद

Pages

Subscribe to RSS - नोकरी-व्यवसाय