सीबीएससी चे जाणवलेले फायदे

Submitted by हेमंतसुरेशवाघे on 16 May, 2023 - 01:42

हा हा माझ्या मागील सीबीएससीच्या लेखाचा उपसंहार आहे - भाग 2

जुन्या लेखाची लिंक

https://www.maayboli.com/node/78241

मागे मी लिहिले होते की सीबीएससी चे नक्कीच काही फायदे आहेत. आता कन्या सीबीएससी झाल्यामुळे - आणि ती फारसा अभ्यास करीत नसल्याने मला त्यातील काही फायदे अधिकचे दिसले . यात कुठल्याही बोर्डाची भलावण वगैरे नाही पण फायदे असतील तर ते कळणे हे आहे आणि त्याचबरोबर ज्यांची मुले जाणार आहेत किंवा ते विचार करतात त्यांना काही माहिती मिळावी आणि योग्य निर्णय घेता यावा ही इच्छा.

पुढील १०-१२ वर्षात अर्थात यात काही गोष्टी बदलतील

तर जेव्हा कन्या सीबीएससी झाली म्हणजे शेवटची परीक्षा दिली आणि रिझल्ट लागला तेव्हा काही फायदे लक्षात आले

शेवटच्या परीक्षेला फक्त दोन भाषा आणि त्यात हि हिंदी मराठी नाही!

सहावी पासुंन मुलीला मराठी सोडता , आणि आठवीपासून मराठी . सीबीसीची फायनल परीक्षा ही फक्त दोन भाषांची होती - इंग्लिश प्रथम भाषा आहे आणि मुलीने फ्रेंच घेतले होते.
तिला सहावी पासून फ्रेंच होते त्यावेळी तीन भाषा होत्या - मराठीच्या ऐवजी फ्रेंच घेतले होते . आठवी नंतर हिंदी किंवा फ्रेंच हा पर्याय . एक मोठा फायदा झाला की मराठी आणि हिंदी सारख्या निरुपयोगी भाषा सोडून थोडीफार उपयोगी होईल खास करून उच्च / विदेशी शिक्षणासाठी वगैरे अशी फ्रेंच भाषा घेऊन परीक्षा देता आली
( आताच्या बॅच ला हि सुविधा नाही असे ऐकले आहे - खात्री करून घ्यावी )

फक्त ५ विषय -

त्याच्याच बरोबर शेवटच्या वेळी सीबीएससी ला फक्त पाच विषय असतात मुख्य भाषा इंग्लिश दुसरी भाषा एक गणिताचा पेपर एकच शास्त्रांचा पेपर आणि एकच समाजशास्त्र इतिहास भूगोल नागरिकशास्त्र अर्थशास्त्र यांचा पेपर आणि आपण एसएससी महाराष्ट्र बोर्ड पाहिले तर समाजशास्त्र शास्त्र आणि गणित यांचे दोन पेपर असतात त्यामुळे हा ॲडिशनल वैताग आहे

दोन पेपर मध्ये व्यवस्थित सुट्टी

परीक्षा झाली त्यावेळेला दोन पेपर मध्ये व्यवस्थित गॅप होता ते काही वेळेला पाच आणि काही वेळात आठवण दिवसांचा गॅप मिळाला त्यामुळे झाले काही की तयारी करायला सर्वांना व्यवस्थित वेळ मिळाला इम्पॅक्ट जर तुमची तयारी झाली नसेल एक थोडेसे मार्क पाहिजे असतील तर या दिवसात सुद्धा तयारी करता आली असती एस एस सी चा टाईम टेबल पाहिलं तर त्यामध्ये फार कमी गॅप होती पेपर जास्त आणि गॅप कमी हा वैताग होता.
सीबीएससी ला किमान ४ ते कमाल १० दिवसांची गॅप होती

अंतर्गत २० मार्क

एसएससी ला नक्की माहित नाही किंवा इतर बोर्डांचे पण पण सीबीएससी मध्ये 80 मार्काचा पेपर असतो 20 मार्क शाळा देते. तुम्ही चांगले वर्तन ठेवले, अभ्यास केला, थोडाफार वह्या पूर्ण ठेवल्या फार शाळेत उचापती केल्या नाहीत - तर विसात वीस मार्क दिले जातात. अगदी १५ दिले तरी बाकीच्या पेपर मध्ये पास व्हायचे असेल तर 80 मध्ये २० मिळवण्याची जबाबदारी राहते त्यामुळे तिकडे पण फायदा आहेत
बऱ्याच मुलांना वीस मार्क दिले जातात त्यामुळे त्यांना साधारण मार्क काढायचे आहेत त्यांना फार लोड येत नाही

सोपे गणिताचा पेपर

हे परत एच एस सी ला आहे का माहित नाही पण अनेक विद्यार्थ्यांना गणित कठीण जाते आणि सायन्स आर्किटेक्चर वगैरे जायचे नसेल तर गणिताचा उपयोग नसतो. सीबीएससी एक तुलनेने सोपे असलेला लोअर मॅथ्स चा पर्याय देते .
कन्येचा कला शास्त्र , इंजिनिअरिंग कडे नाही आणि तिला गणित कठीण जाते हे हे कळले तेव्हा आम्ही बेसिक मॅथ्स घ्यायचे ठरवले तिच्या शाळेत तरी याचा वेगळा वर्ग नव्हता किंवा वेगळी ट्युशन नव्हती तसेच क्लासही नॉर्मल मॅथ्स चा होत होता तर त्यामुळे अभ्यास नॉर्मल मॅथ्स आणि पेपर लोवर मॅथ्सचा याचा तिला पेपर सोपे जाण्यात फायदा झाला.

झटपट रिझल्ट आणि त्याची फार हवा नाही

यावर्षी रिझल्ट १२ मे ला लागला आणि आम्हाला तरी फार हवा नव्हती. काही दिवस आधी काही साईट वर माहिती येत होती पण त्या अफवा वाटल्या .
१२ मे ला सीबीएससी च्या बारावी चा रिझल्ट आला आणि ऑनलाईन झटपट एक दोन तासात दहावीचा आला . एसएससी सारखे तारखेचा अंदाज , त्याला बराच वेळ , काही वेळा थोडा पुढे ढकलणे असे झाले नाही.

आयसीएसई हा बहुदा अधिक लोकप्रिय बोर्ड आहे - त्याचे फायदे कोणी लिहिले तर बरे होईल
अतिशय थोडे जे निकाल ऐकले त्यात आयसीएसई ला अधिक मार्क मिळाले असे वाटले

जाता जाता

नवी मुंबईत फार आर्ट्स ची ची चांगली कॉलेज नसल्याने आम्ही एक सीबीएससी शाळेला संलग्न असलेल्या सीबीएससी आर्ट्स कॉलेज मध्ये मुलीला टाकले .ह्यांची बारावी सीबीएससी बोर्ड ची. फार पर्याय नव्हते

मला आयसीएसई / सीबीएससी च्या अकरावी बारावी बद्दल फार माहीत नव्हते
तिकडे पण दिसले कि सीबीएससी अकरावी बारावी ला महाराष्ट्र बोर्ड विषय कमी आहेत - महाराष्ट्र बोर्ड ला ७ विषय त्यात २ भाषा तर सीबीएससी ला ५ विषय त्यात एकच इंग्लिश भाषा

कोणाचे कोणी जर सीबीएससी मधून आर्ट्स केले असेल तर ते किती सोपे / कठीण आहे - त्यात फार लोड न घेता भरपूर मार्क मिळतात का / कसे मिळवावे याच्या माहितीच्या प्रतीक्षेत आहे

अजून एक - आय जी सी एस इ या इंटरनॅशल बोर्ड चा एक प्रॉब्लेम कळलं आहे - त्यांना गणितासाठी scintific calculator चालतो - आणि अकरावी बारावी लोकल बोर्ड, इंजिनिअरिंग - आर्किटेक्चर - इतर प्रवेश परीक्षेत चालत नसल्याने त्याचा त्रास होतो . काही जणांना यासाठी क्लास लावावे लागले आहेत

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

<< मराठी आणि हिंदी सारख्या निरुपयोगी भाषा सोडून थोडीफार उपयोगी होईल खास करून उच्च / विदेशी शिक्षणासाठी वगैरे अशी फ्रेंच भाषा घेऊन परीक्षा देता आली. >>

ही फार महत्त्वाची माहिती सांगितलीत तुम्ही. मराठी/हिंदी शिकल्यामुळे आणि फ्रेंच न शिकल्यामुळे माझे फार फार नुकसान झाले हे मला आज कळले आणि माझे डोळे तुम्ही खाडकन उघडलेत, याबद्दल तुमचा आभारी आहे.

राव माबोवर यता... मराठी लिवता...अन मराठी निरुपयोगी म्हणता...तशी आपली आईही म्हातारी होते म्हणून निरुपयोगी होते का?

सीबीएसई गणित , विज्ञान, समाजशास्त्रे यांचा ८० गुणांचा प्रत्येकी एकेक पेपर घेतं. तेच राज्य बोर्ड हे पेपर विभागून घेतं. म्हणजे ४०-४० गुणांचे प्रत्येकी दोन पेपर. प्रत्येक दोन पेपरमध्ये एक आणि रविवार वा सार्वजनिक सुटी आल्यास अधिक दिवसांची गॅप. म्हणजे अभ्यासाला मिळणारा वेळ तसा सारखाच. पेपर लिहायला मिळणारा वेळ जास्त असावा. गणित विज्ञान ४० गुणांसाठी दोन तास असावेत.
राज्य बोर्डाने तिसरी भाषा वगळली तर चालावे. तीन किंवा चार वर्षे शिकलेले हिंदी व्यावहारिक वापरासाठी पुरेसे आहे.
राज्य बोर्डातही बोर्डाचा पेपर ४०/८० गुणांचा असतो. भाषांसाठी २० गुणांच्या तोंडी परीक्षा. विज्ञानात प्रात्यक्षिक. गणित , सामाजिक शास्त्रात चाचणी परीक्षांचे गुण. त्यामुळे दहावीला नापास होणं जवळजवळ अशक्य असतं.
एके वर्षी पेपर १०० गुणांचे आणि त्यातले २० गुणांचे प्रश्न नववीपर्यंतच्या अभ्यासक्रमावर आधारित असे होते. पण बहुतेक बोर्डाची परीक्षा व्हायच्या आधी तो पॅटर्न रद्द केला.
पण दहा किंवा अकरा (५०-५० गुणांचं हिंदी + अन्य भाषा घेतलं तर) पेपर्स (कॉम्प्युटर सायन्स ५० गुण . यात बहुतेक फक्त ग्रेड देतात.) त्यात मध्ये सुट्या म्हणजे परीक्षा खूप दिवस चालते. पण तुम्ही म्हणताय तसं सीबीएसई दोन पेपर्सच्या मध्ये अधिक सुट्या देते , त्यामुळे तीही प रीक्षा खूप दिवस चालते.

>>>राव माबोवर यता... मराठी लिवता...अन मराठी निरोपयोगी म्हणता...तशी आपली आईही म्हातारी होते म्हणून निरोपयोगी होते का?
नवीन Submitted by दत्तात्रय साळुंके on 16 May, 2023 - 11:38>>
+ ९९९

साधारण मार्क काढायचे आहेत त्यांना फार लोड येत नाही>>> माझा तीनही बोर्डाच्या अभ्यासक्रमाशी संबंध आला आहे. साधारण मार्क काढायला कुठल्याच बोर्डात लोड येत नाही. अगदी अभ्यास न झालेल्या मुलालाही.

भाषेचा उपयोग फक्त पुढचे शिक्षण, करियर या दृष्टीने केला तर पाच सहा वर्षे ती शिकलेली पुरेशी आहे. पण त्या भाषेतल्या साहित्याची अधिक ओळख व्हावी इ. हेतू असेल तर ती आणखी काही वर्षे अभ्यासक्रमात हवी. आणि भाषा विषयाच्या पाठ्यपुस्तकातून सामाजिक भान यावं असा मजकूर अधिक असतो. मराठी शिकला नाहीत तर संतांपासून आतापर्यंतच्या साहित्यिक प्रवाहांची ओळख कशी होईल? वेगवेगळ्या प्रदेशांची , सामाजिक स्तरांची ओळख कशी होईल?

माझा मुलगा दहावी पर्यंत CBSE आणि ११,१२ वी Maha state board मधे शिकला. मला तरी फारसा फरक जाणवला नाही. काही मुद्दे बरोबर आहेत. जसे
दोन पेपर मध्ये व्यवस्थित सुट्टी >> हे १२वी ला जाणवले. P,C,M मधे फक्त १ दिवसाचा गॅप आणि IT साठी १२ दिवसांचा गॅप होता.
झटपट रिझल्ट आणि त्याची फार हवा नाही>> महाराष्ट्रात नसेल पण दिल्लीत फुल टु हवा असायची.
अंतर्गत २० मार्क>> हे तर सगळ्या बोर्डात असतात
आठवी नंतर हिंदी किंवा फ्रेंच हा पर्याय . एक मोठा फायदा झाला की मराठी आणि हिंदी सारख्या निरुपयोगी भाषा सोडून थोडीफार उपयोगी होईल खास करून उच्च / विदेशी शिक्षणासाठी वगैरे अशी फ्रेंच भाषा घेऊन परीक्षा देता आली>> हे तितके खरे नाही. माझ्या मुलाचे Spanish होते. पण ह्या सगळ्या 2, 3rd languages अशाही वरवरच शिकवतात. त्याचा उपयोग फक्त scoring साठी.
CBSE चा फायदा हा राज्या / देशाबाहेर नोकरी बदलताना होतो. मुलं लवकर adjust होतात बोर्ड न बदलल्यामुळे. असे मला वाटते. माझा अनुभव उलटा आहे Happy CBSE to state board पण फारसा फरक पडला नाही.
तर CBSE भारी State board बेकार असे काही नसते.

जसे लोकांचे किंमत विरुद्ध मूल्य ह्यात ज्ञान कमी पडते तसेच ह्यांचे उपयोग आणि फायदा ह्या बाबतीत झाले आहे.

मराठी, हिंदी निरुपयोगी भाषा - अत्यंत जबाबदारीने सांगतोय हे साफ चुकीचे आहे. मराठी भाषेचे झालेले संस्कार खूप फायदेशीर आहेत. माझी मातृभाषा वेगळी असली तरी मी स्वतः ला भाग्यवान समजतो की मराठी मला शिकायला मिळाली.

हा नाम्याची खीर चाखतो
चोखोबांची गुरे राखतो

ह्याचा He tastes Namu's sweets and keeps Chokhoba's cattles एवढाच अर्थ नाही.

माझी मातृभाषा वेगळी असली तरी मी स्वतः ला भाग्यवान समजतो*१००
माझी मातृ नाही पण पितृभाषा अमराठी. पण भाग्य आहे आमुचे आम्ही बोलतो मराठी.

मराठी आणि हिंदी सारख्या निरुपयोगी भाषा सोडून>>>

आपली भाषा निरुपयोगी आहे हे आता लक्षात आले!

यांचा फार मोठा गैरसमज आहे.... मराठी निरुपयोगी...
ज्याला मातृभाषा उत्तम येते तो इतर कोणतीही भाषा सहज अवगत करतो.

माझी सीबीएससीची पोरे उचलून मी आयसीएसई काय असते त्या शाळेत घातली. कारण ती घरासमोर होती. त्याआधी मी पोरांना स्टेट बोर्डात पाठवायचा विचार करत होतो. कारण तेव्हा वाशीला फादर ॲग्नेलच्या शेजारच्या गल्लीत राहायचो. मॉरल ऑफ द स्टोरी फार लोड नाही घ्यायचा बोर्डाचा. सरळ सोयीची आणि घराजवळची चांगली शाळा निवडायची. आधीच बोर्ड वगैरे बाबत आग्रही राहणे म्हणजे आपली पोरे टिपिकल मार्गाने शालेय शिक्षण घेऊनच आपले करीअर सेट करणार हे गृहीत धरल्यासारखे झाले.

सद्ध्या बोर्ड कुठलाही असो activity based learning सगळीकडे सुरू झालंय. तसा शासनाने नियम केलाय बहुतेक. प्रिस्कुल शिक्षण इकडून तिकडून सारखंच. गाणी म्हणत. इंग्लिश मिडीयम म्हणाल तर बहुतांश शाळांनी पहिलीपासून सेमी इंग्लिश सूरू केलंय. पूर्ण मराठी शाळा अगदी बोटावर मोजता येतील इतक्याच आहेत. म्हणजे प्रायव्हेट स्कूल्स. तिथेही स्पोकन इंग्लिश घेतातच. जुजबी हिंदी सुद्धा. आता मराठी आणि हिंदी अजिबात शिकायचं नसेल तर कोणती शाळा निवडावी हे बघावं लागेल. पण माझंही हेच मत आहे की मातृभाषा नीट येत असेल तर इतर भाषा शिकताना फार अडचण येणार नाही. त्याहीपेक्षा मूल ज्या ठिकाणी पुढची १५-२० वर्षे राहणार आहे तिथे समजणारी भाषा न येऊन कुठलीही फाॅरेन भाषा जुजबीच शिकून किती फायदा होईल? त्यामुळे फक्त भाषा हा मुद्दा CBSC ला better नाही ठरवू शकत. अभ्यासक्रम ही एक जमेची बाजू ठरू शकते. आवाका स्टेट बोर्ड पेक्षा जास्त आहे. म्हणजे मी ११-१२ वी किंवा अगदी इंजिनिअरीला शिकलेल्या बर्याच गोष्टी तिथे ८-९वी मध्ये शिकवल्या जातात. शाळा बदलल्याने अभ्यासक्रम न बदलणे हा अजून एक फायदा.
आम्ही राहतो तशा छोट्या शहरात CBSC हे स्तोम आहे. पालकांना फार कल्पनाही नसते की CBSC म्हणजे नक्की काय आहे आणि आपल्या मुलांना त्यातून काय साध्य होणार आहे. त्याची पोरं जातात मग माझी पण जाणार. बर्याच मुलांना पेलत नाही तो अभ्यासक्रम पण ऑप्शन नसतो.

सर्व महत्वाच्या उच्च शिक्षणासाठी प्रवेश देताना entrence exam च द्यावी लागते.
त्या वर तुम्हाला प्रवेश मिळतो.
12 वी पर्यंत च्या शिक्षणात .
मुलाचं व्यक्तिमत्त्व develop व्हावे,सर्व विषयाचे बर्या पैकी प्राथमिक ज्ञान मिळावे.
जगाचा इतिहास,राज्य व्यवस्था,
ह्यांची माहिती असावी.
भाषा आत्मसात व्हाव्यात.
इतकाच हेतू 12 वी पर्यंत असतो

सर्व मायबोलीकर मायबोलीकरपणाला जागतात हे मात्र नक्की खरे Wink
प्रश्नकर्ता एक वाक्य थोडं चुकीचा काय बोलला की सर्वजण त्यावरच कोट करता करता लेखाचा मूळ प्रश्नच विसरून गेल्यासारखे वाटते.

असं कसं म्हणता, अतिशय योग्य वाक्य आहे ते.

जर्मन, फ्रेंच वयाच्या २०-२५ वर्षांनंतर शक्य झाले तर तिकडे गेल्यावर चाटायला उपयोगी पडतात की , नाही जमले तर झूम वरूनच...

मराठी, हिंदी चाटायला निरुपयोगीच.

काय राव... इतकं सोपं आहे ते

आपण फार तात्त्विक विचार करीत आहोत का? प्रत्यक्षात गावोगावी इंग्रजी माध्यमाच्या शाळांना मागणी आहे हे वास्तव आपण विसरतो आहोत का? ही मागणी का आहे? हे सगळे लोक मेंढ्यानच्या कळपाप्रमाणे खड्ड्यात उडी घेत आहेत काय?

उच्च शिक्षण आणि त्या मध्ये प्रावीण्य मिळवणे ह्या मध्ये कोणत्या mediam मधून प्राथमिक शिक्षण घेतले आहे त्या मुळे काही फरक पडत नाही.
हे नक्की.
आता पर्यंत जे संशोधक,उद्योजक,नेते, डॉक्टर्स झाले आहेत आणि खूप यशस्वी पण झाले आहेत ते इंग्लिश मिडीयम मधून सर्वच शिकलेले नाहीत

सामान्य दर्जाच्या नोकऱ्यांमध्ये इंग्लिश येत असल्यामुळे महानगरात फायदा होतो. call centres, मॉल मधले विक्रेते, आतिथ्य उद्योग, विमानसेवा काऊंटर अशा ठिकाणी.
अत्युच्च बुद्धिमत्ता असलेल्या miniscule गटातल्यांची उदाहरणे सर्वसामान्यांना लागू करू नयेत.

भाषा शिकण्यासाठी किती वर्ष लागतात?
जेव्हा मुल बोलायला लागते तेव्हा ते मातृभाषा शिकते.
वय दोन वर्ष..
७ वर्षाचे मुल होते तेव्हा ते भाषा लीहण्यास पण शिकते.
त्या साठी आटापिटा करायची काही गरज नाही.
भारतात सर्व मार्केट काही मर्यादित नोकऱ्या सोडून सर्व लोकल भाषेत च चालते.. हिंदी,मराठी बाकी भाषा खूप गरजेच्या आहेत.
फ्रेंच शिकून भारतात काही फायदा नाही.
फ्रेंच शिकून फ्रान्स मध्ये नोकरी मिळण्याची शक्यता अत्यंत कमी आहे

मराठी भाषा शिकणे आणि मराठी माध्यमात शिकणे ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. वरती जे मातृभाषेत संकल्पना चांगल्या समजतात म्हणत आहेत, त्यांना मराठी माध्यम अपेक्षित आहे, भाषा हा विषय नाही. लेखात भाषा ह्या विषयाबद्दल लिहिलं आहे.

हिंदी मराठी ह्या निरुपयोगी - हे मला पटलं नाही, पण त्याला विरोधी अर्गुमेंट मराठी माध्यमाबद्दल देऊन चालणार नाही. भाषा म्हणून त्या कशा उपयोगी आहेत? त्या शिकून आयुष्य का समृद्ध झालं? याबद्दल बोलायला हवं. फ्रेंच शिकलेल्या किती जणांना त्या भाषेमुळे चांगले जॉब्स मिळाले, जे मराठी हिंदीमुळे मिळाले नसते, ह्याची काही आकडेवारी हवी. त्याशिवाय सरसकट अमुक भाषा निरुपयोगी आणि तमुक उपयोगी असं म्हणू शकत नाही. (आकडेवारी तशी सापडल्यास मी प्रांजळपणे मान्य करायला तयार आहे).

अहो मराठीला निरुपयोगी म्हणणारे महोदय.. ते CBSE आहे, CBSC नव्हे.

तुमचीच अशी अवस्था असेल तर पाल्य म्हणतील, घरचं झालय थोडं आणि व्याह्याने धाडलंय घोडं.

बरं तुम्ही हे मायबोलीवर येऊन लिहू पाहता म्हणजे अस्वलाच्या आंडाला केसाचा दुष्काळच म्हणायचा कि.

स्पॅनिश आणि फ्रेंच! आधी मराठी तर नीट येऊ द्या, का उगाच आपलं उठा रेटा आणि गा*ला गोटा करायचं?

मान्य आहे कि मराठी हि कॉर्पोरेट कल्चरला धरून चालणारी भाषा नाही, पण म्हणून काय तिचे महत्व कमी होईल? उलटपक्षी आपणच मराठीचा झेंडा वर न्यायला हवा.. जपानी लोकांनी जसं परकीय भाषांना दूर सारून स्वभाषेचा आग्रह धरल्यामुळे आज आपल्यासारख्या देशात रोजगार मिळावा म्हणून लोक जपानी भाषा शिकत आहेत तिथे आपण का मराठी सोडायची?

(अवांतर)
फ्रेंच भाषा एक गंमत म्हणून शिकायची आहे,यूट्यूबवर खूप विडिओज आहेत ते डाऊनलोड करून ओडिओ केले आहेत. फ्रेंच भाषेची टेक्स्ट बुकस ओनलाइन फ्री डाऊनलोड करता येतील का? (बालभारतीची करू शकतो तशी?)

Pages