"सर" लांबून कुठूनतरी लहान मुलीचा आवाज कानावर पडल्यासारखं वाटलं त्याला. फळा पुसता पुसता त्याने मागे वळून पाहिलं. मुलांच्या नजरा फळ्यावर होत्या. भास झाला असेल असं वाटून पंकजने हाताने खडूची पावडर झटकली. तो हात पाठीमागे बांधून बाकांच्या मधून फिरत राहिला. मुलांच्या चेहर्यावरचा कोवळेपणा निरखून पाहता पाहता त्याला बिल्वाची आठवण येत होती. कशी दिसत असेल? १४ वर्षाची असेल आता. म्हणजे जवळजवळ याच मुलांएवढी. ओळखेल? स्वीकारेल? तिला मुळात आपल्याबद्दल काही माहीत असेल? मनात येणार्या प्रत्येक प्रश्नाबरोबर त्याच्या फेर्यांचा वेग वाढत होता. आपण वर्गात आहोत. बाकांच्या मधून फेर्या मारतोय.
"एक मिनिट वेळ आहे का?", फोन वर मोना विचारत होती. खरतर मी जरा घाईतच होतो. लवकर काम संपवून मित्रांना भेटायचं होतं.
"Urgent?" मी वैताग लपवायचा प्रयत्न करत विचारलं.
" Yes, it's personal. Please?" मोना जरा गंभीरच वाटत होती. काहीतरी तसच कारण असणार.
"OK. Come "
आता मात्र मला थोडी काळजी वाटायला लागली. मोना घाईतच आत शिरली आणि लगेच दरवाजा बंद करून माझ्या समोर बसली. तिचा चेहरा बघून मला जरा टेंशनच आलं. काय असेल बरं? हीचा काही प्रॉब्लेम? पण मग ही शमा कडे, माझ्या बायकोकडे का नाही बोलली? मी तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघत असतानाच माझी नजर चुकवत मोना बोलायला लागली.
सकाळी आश्विन दचकून जागा झाला असं म्हणता येणार नाही.
रात्रभर त्याचा डोळ्याला डोळा लागलाच नव्हता. झोप नव्हती, तर जाग येण्याचा प्रश्न कुठे उद्भवतो?
पण अशा प्रसंगी कोणाच्याही मनात यावी तशी स्वाभाविक शंका आश्विनच्या मनात आली – तो जागा आहे? की स्वप्नात आहे?
पण त्याला एकदम जाणवतं की नाही, हे स्वप्न नाही.
दु:खाचे ते सगळे क्षण आश्विनला आठवतात.
तो मुकाट्याने उठतो. सवयीने आंघोळ उरकतो. तो तयार होतो तेव्हा रोजच्याप्रमाणे सकाळचे साडेसहा वाजलेले असतात.
||श्री||
नाती असतात श्वासाची,
नाती असतात ध्यासाची.
काही नाती कधी कधी होऊन बसतात त्रासाची .
नाती असतात रुजलेली,
नाती असतात बुजलेली.
मनाच्या तळाशी पडून असतात काही नाती विझलेली!
नाती असतात जातीची,
नाती असतात मातीची.
अन काही नाती असतात संभाळायच्या रीतीची.
नाती अंतर सांधणारी,
नाती मने बांधणारी
जगण्याला चैतन्य देतात नाती धुंद करणारी.
नाती धीराची असतात,
नाती वैराची असतात.
जीवन रणांगण मानेल त्यांची नाती वीराची असतात.
मी उदास आहे म्हणूनी
तू मला बोलवावे
डोळ्यात रोखूनी काही
लटकेच रागवावे
मी उगाच टाळूनी जावे
संवाद साचलेले
तू ही न जाणवू द्यावे
ते भाव वाचलेले
शब्दा विना ही काही
नाती अशी रुजावी
सर ओसरुनी जाता
पापण्यांत जी भिजावी
मी उदास आहे म्हणूनी
तू मला बोलवावे
अन जाताना हळवे
क्षण हासरे करावे
शमा
मुंबईच्या 'फ़ाइव गार्डन' ह्या माटुंगा मधील भागात बरीच वर्दळ असते. गार्डन म्हटलं तर टांगे, छोटे पाळणे, भेळवाले, चणे-दाणे वाले आणि तत्सम विक्रेते असतात. लोकं आपल्या पोरांना घेऊन गार्डन मध्ये फिरायला येतात. कुठे दहा-बारा संघ वेगवेगळ्या खेळपट्ट्या पकडून एकाच मैदानात क्रिकेट खेळायची कसरत करीत असतात तर कुठे कुणीतरी संध्याकाळी तिथल्या कट्ट्यांवर योग किंवा कराटेचे 'क्लासेस' घेत असतात! जवळच २-३ कॉलेज असल्यामुळे तिथल्या जोडप्यांनी गार्डन मधील अंधारे कोपरे बऱ्याच चतुराईने शोधलेले असतात.
मध्यंतरी रझा ऍकॅडमीने चालवलेल्या विरोध प्रदर्शनाच्या वेळेस मुंबईच्या आझाद मैदानावर जेव्हा तोडफोड झाली त्यात एक फोटो प्रामुख्याने आपल्या मनाला ठेच लावून गेला. आझाद मैदानावर असणाऱ्या हुतात्मा स्मारकाला एक इसम तोडतानाचा तो फोटो होता. हा फोटो पाहून बऱ्याच जणांना राग आला असेल, व काहींना तर अगदी आताच ह्या इसमाला पकडून हाणायला पाहिजे असे वाटले असेल.
खूप वर्षांपूर्वीची गोष्ट. माणूस जेव्हा एकटा रानावनात रहात होता
तेव्हाची.माणूस मुळातच बुद्धिमान होता.आपले जीवन समृद्ध करण्यासाठी तो
अनेक प्रयत्न करत होता. लवकरच इतर सर्व प्राणिमात्रांहुन तो प्रगत होत
गेला, आणि वेगळा ठरला. परंतु तरीही एकटेपणा त्याला भेडसावत होता.त्याला
आयुष्यात कसलीतरी उणीव भासत होती.मग त्याने देवाची मनापासुन प्रार्थना
केली आणि सांगितले की देवा जीवनात यशस्वी होण्याची कला तर तु मला
जन्मजातच दिली आहेस, परंतु आता मला असे काहीतरी दे की ज्यामुळे माझ्या
आयुष्याला अर्थ लाभेल. मग देवाने प्रसन्न होवुन त्याला नात्याचे अनमोल