मुंबई

पायल इनामदार- भाग १

Submitted by आशयगुणे on 16 January, 2012 - 03:39

आमच्या बिल्डींगच्या चौथ्या मजल्यावर ती राहायची. सदैव आपल्या विश्वात. मी तिला बिल्डींगच्या इतर सदस्यांशी बोलताना कधी बघितलं नाही. तसेच बिल्डींग बाहेरचे कुणी तिच्या ब्लॉक मध्ये आल्याचे देखील मला स्मरत नाही. सकाळी ९ च्या सुमारास ती घरून बाहेर पडायची. बहुदा कामाला जात असावी. आणि संध्याकाळी ७ च्या सुमारास पायऱ्या चढताना दिसायची. पण त्या दिवसात तिने एकदाही माझ्याकडे पाहिले नाही. सदैव मान खाली घालून जात असे. जिन्यातच काय पण बिल्डींगच्या आवारात देखील ती कधीही कुणाकडे पाहून हसल्याचे मला आठवत नाही. एक मात्र होते. ती समोरून गेल्यानंतर वातावरणात एक अस्वस्थ शांतता पसरायची.

गुलमोहर: 

पुस्तक परिचय : '२६/११ मुंबईवरील हल्ला'

Submitted by ललिता-प्रीति on 27 November, 2011 - 06:15

दि. २७ नोव्हेंबर २०११ रोजी लोकसत्ता-लोकरंग पुरवणीत प्रकाशित झालेला पुस्तक-परिचयपर लेख.
मूळ लेख इथे वाचता येईल.

----------

२६/११बद्द्ल सर्वकाही

विषय: 

ओम ब्रह्मांड साई गोविंदा पथक मालाड वेस्ट

Submitted by सचिन राव on 13 October, 2011 - 07:13

Om Brahmand Sai Govinda Pathak-Malad W(Thane 8Thar) 03.jpg ओम ब्रह्मांड साई गोविंदा पथक ८ थर ठाणे नवी मुंबई Om Brahmand Sai Govinda Pathak-Malad W(Thane 8Thar) 03_0.jpg ओम ब्रह्मांड साई गोविंदा पथक ८ थर ठाणे नवी मुंबई

गुलमोहर: 

धमाका

Submitted by तायड्या on 15 July, 2011 - 02:02

धमाका

इतिहास सांगितला जातो
स्टॅटिस्टिक दाखविले जाते
चर्चा होतात चौकशी होते
बातमी हळूहळू भूतकाळातजाते
पण
कुठेतरी भयाण सन्नाटा असतो
तिथे वर्तमान सुन्न असतो
भूतकाळ छळत असतो आणि
भविष्याकाळ भेडसावत असतो

आम्ही मात्र निबर धमाका एक खबर फक्त एक खबर

सुदैवी ज्यांचे प्राण गेले
दुर्दैवी , जिवलग शोधत फिरले
हे असे कलियूग आले
जीवन फार स्वस्त झाले

अश्वत्थाम्याच्या जखमेची भळभळ लाखो वर्षे माणुसकीची तळमळ जखमेची भळभळ

गुलमोहर: 

दहशतवाद : मी काय करणं अपेक्षित आहे?

Submitted by गजानन on 14 July, 2011 - 02:56

मुंबईच्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, शहरातली/देशातली ही परिस्थिती सुधारून असे हल्ले टाळण्यासाठी एक नागरिक म्हणून तुमच्या मते 'मी' काय करणं अपेक्षित आहे?

'मी' म्हणजे भारत देशातला एक सामान्य नागरिक.

कविता करणं
ललित/लेख लिहिणं
शासनाला दोष देणं
चरफडत बसणं
मिडियाला शिव्या देणं

या व्यतिरिक्त.

मला प्रामाणिकपणे हे जाणून घ्यायचे आहे.

विषय: 

मुंबईवरील अतिरेकी हल्ला आणि "आम्ही"

Submitted by dr.sunil_ahirrao on 14 July, 2011 - 02:27

पुन्हा एकदा मुंबईत तीन ठिकाणी बॉम्बस्फोट होऊन २१ जणांचा बळी गेला.१५ दिवसांपूर्वीच गुप्तचर यंत्रणांनी तशी पूर्वसूचना दिली होती.आता "माहिती मिळूनही सुरक्षा यंत्रणा पुनः एकदा निष्पापांच्या हत्या रोखण्यात अपयशी ठरली आहे.हे वारंवार होणारे बॉम्बस्फोट आमची सुरक्षा व्यवस्था किती कुचकामी आहे,आणि भारतावर हल्ला करणे किती सोपे आहे,तेच साऱ्या जगाला दाखवून देत आहेत".असे आरोप आमच्यावर होतच असतात त्यात काय विशेष? निषेध व्यक्त करण्यापलीकडे आपण काय करू शकतो?बदला घेण्यासाठी आम्ही काही अमेरिका वगैरे थोडेच आहोत !

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

पुनर्विकास - घराचा आणि आपलाही!

Submitted by kanchankarai on 2 July, 2011 - 04:48

रिडेव्हलपमेंट अर्थात पुनर्विकास! पण हा पुनर्विकास माझ्या घराचा नाही. माझी आई ठाण्याच्या वर्तक नगरला ज्या इमारतीमधे रहाते त्या इमारतीच्या पुनर्विकास प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. ती इमारत आता नाहीशी होऊन त्याजागी २२ मजल्यांची टोलेजंग इमारत उभी रहाणार आहे म्हटल्यावर आधी मनात प्रचंड निराशा दाटून आली. निर्जिव भिंतींमधूनसुद्धा जाणवारा मायेचा तो स्पर्श आता अवघी दोन एक वर्षेच सोबत रहाणार होता. पण नंतर आनंदही वाटला की आईला, भावाला रहाण्याकरिता एक नवीन छानसं घर, आहे त्याच जागी, विशेष कष्ट न करता मिळणार आहे.

राणीच्या बागेत एक फेरफटका

Submitted by जिप्सी on 7 April, 2011 - 01:39

पूर्वी एकेकाळी नव्याने मुंबई बघायला येणार्‍यांच्या लिस्टमध्ये हमखास असलेले एक ठिकाण म्हणजे वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान अर्थात राणीची बाग. आजसुद्धा आबालवृद्धांना तितकेच आकर्षित करणारे आणि कमी खर्चात सहज बघता येण्यासारखे मुंबईतील एक लोकप्रिय ठिकाण. "राणीची बाग" नावाने प्रसिद्ध असलेली हि बाग १८६२ साली राणी व्हिक्टोरीया यांच्या सन्मानार्थ मुंबईच्या नागरिकांना समर्पित करण्यात आली. त्यानंतर एक वर्षाने त्यात प्राणिसंग्रहालयाची स्थापना झाली.

गुलमोहर: 

काळा घोडा कला महोत्सव २०११,मुंबई.

Submitted by रोहित ..एक मावळा on 13 February, 2011 - 11:11

मुंबई ... एक स्वप्नांचे शहर,
धकाधकीचे शहर,
घड्याळ्याच्या काट्यावर धावणार शहर,
कधी वाहतुकीचा खोळबा
तर कधी पुरात बुडालेली मुंबापुरी
तर कधी अतिरेकींच्या हल्ल्याने होरपळलेली ,
बॉम्सस्फोटात जखमी झालेली मुंबई .

पण मुंबईने असे बरेच दु:ख पचविलेत.त्याला कारण आपला मुंबईकर.. सर्व संकटावर मात करत तो नेहमी जोशाने,नेटाने उभा राहिलाय.ही सळसळणारी उर्जाच मुंबईची शक्ती आहे.सण,उत्सव यातुनच त्याला उर्जा मिळते.खर म्हणजे ती आपली संस्कृती आहे.मग गणेशोत्सव असो वा गोपाळकाला,मॅरेथॉन असो वा दांडिया मुंबईचे एकजुटीचे दर्शन घडते.

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - मुंबई