माहीम चा हलवा (फोटोसह)

Submitted by डॅफोडिल्स on 15 November, 2012 - 14:31
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

100_5889 (640x468).jpg

बारीक रवा किंवा मैदा १/२ वाटी
साजुक तुप १/२ वाटी
साखर १ वाटी
थंड दूध १ वाटी
बदाम पिस्त्याचे काप आणि वेलची दाणे ऐच्छीक
वेगळे स्वाद आणि रंग यासाठी खाण्याचे रंग, मँगो पल्प, चॉकलेट सिरप आवडी प्रमाणे

क्रमवार पाककृती: 

एका जाड बुडाच्या पॅन मध्ये तुप, मैदा, (किंवा बारिक रवा जे घेतले असेल ते) साखर आणी दूध घालून ढवळून, गुठळ्या मोडून चांगले एकत्र करावे.

मग स्टोव्ह मिडियम हाय वर उकळायला ठेवावे. उकळी येताच लगेच आच कमी करून मिश्रण शिजवावे. एकसारखे ढवळावे लागते नाहीतर खाली मिश्रण लागु शकते. साधारण पंधरा विस मिनिटे लागतात.

एकीकडे अ‍ॅल्युमिनियन फॉइल ला तुपाचा हात फिरवून प्लॅटफॉर्म वर पसरवून ठेवावी.

जरा मिश्रण बाजूने सुटून जवळ येउ लागले की त्यात अर्धा चमचा तुप टाकावे. तुम्हाला जर रंगीत हलवा हवा असेल तर ह्या स्टेज ला मिश्रणात रंग अथवा इसेन्स घालावा. मी बदाम पावडर घातली.

मिश्रणाचा गोळा व्ह्यायला लागला की.. म्हणजेच.. ज्या चमच्याने तुम्ही मिश्रण धवळत आहात, त्या भोवती गोळा जमून आला कि स्टोव्ह वरुन पॅन उतरावे.

लगेच तुप लावलेल्या फॉईल वर पसरून. वरुन प्लॅस्टीक शीट टाकून भराभर पापडासारखे लाटून पसरावे.

mahim1.jpg

मध्ये एकदा प्लॅस्टीक शीट उचलून हलव्यावर वेलची दाणे, काजू बदामाचे काप पसरवुन टाकावे. पुन्हा पॅस्टिक टाकून निट लाटून हलवा एकसारखा पातळ करावा.

प्लॅस्टिक काढून थोडा थंड करावा. मग हव्या त्या आकाराचे काप कापून. मध्ये मध्ये बटर पेपर टाकून ठेवावा.

100_5876 (640x486).jpg

वाढणी/प्रमाण: 
५" बाय ५" चे ८ भाग (वाटीच्या आकाराप्रमाणे कमी जास्त)
अधिक टिपा: 

लाटायचे काम भराभर आणि पापडासारखे ताकद लाउन करावे लागते.
असा मस्त हलवा खायला थोडी एक्सरसाईझ हवीच ना Wink

सुरवातीला जरा नरम वाटला तरी थंड झाल्यावर एकदम खुटखुटित मस्त होतो अगदी माहीम सारखा.

वर लिहिल्या प्रमाणे दोन तीन बॅच केल्या तर मॅन्गो, चॉकलेट, किंवा रंगीबेरंगी माहीमचा हलवा बनवता येईल.

माहितीचा स्रोत: 
मायाजाल
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फोटो सुंदर! सुबक प्रकार आहे.

शेवटला फोटो बघून हॅलापिन्योयुक्त माँट्रेजॅ़क चीजस्लायसेसची आठवण झाली. Happy

याला माहिमचा हलवा का म्हणतात... एनी हिस्टॉरिकल रेफरन्स???? >> आधी मूळात हलवा का म्हणतात हेही कोडेच आहे.

वॉव!! सुग्रणीचेच काम दिसतेय! मला लईच्च आवडतो पण जमेल असं वाटत नाहीये! Biggrin

रच्याकने, मा ह गव्हाच्या चिकापासुन बनवतात असं काहीतरी मला आठवतयं! खखो दिनेशदा जाणोत! Happy

आधी मूळात हलवा का म्हणतात हेही कोडेच आहे.>>>> सिक्सर Lol

साध्या गोड शिर्‍याला हे लोक सुजीका हलवा म्हणतात ! तसेच कुणीतरी ठेवले असेल ह्याचे नाव. Happy

वॉव हा प्रकार घरी करता येतो हे माहित नव्हते, मला प्रऽचंऽड आवडतो माहीमचा हलवा.
डॅफो फोटो एकदम मस्त आले आहेत. लगेच तुकडा तोंडात टाकावासा वाटतोय.

मला अजिबातच आवडत नाही पण पाककृती मस्तच!

मला वेगळा हलवा वाटला होता, आता जागूच्या लेखनात शोधून येतो.

एकदम वॉव दिसतोय...दिवाळीची मिक्स मिठाई यायची त्यात हमखास असायचा.

मला एक प्रश्न आहे गरम मिश्रणावर प्लास्टिक ठेऊन लाटायचं तर प्लास्टिक थोड्फार वितळून त्याचं केमिकल पोटात जाणार नाही का? त्याला पर्याय म्हणून काय वापरता येईल? बटर पेपर?

जबरदस्त..

बी, या हलव्याला माहिमचा हलवा असे फक्त नाव आहे. या परिसरातील कोळी समाजात तो फार लोकप्रिय आहे.
त्यांच्या लोकगीतात पण याला स्थान आहे. ( दोन पैसे दोन पैसे दे गो मला, माहीमचा हलवा आणीन तूला... )

सपाट लाकडावर पण लाटता येतो.

वॉव मस्तच आहे कृती. फोटो लै खतरा दिसताहेत.

सोनहलवा पण साधारण असाच करतात का? सोनहलवा म्हणजेच टर्किश डिलाईट का? तो ही मस्त लागतो आणि त्याहूनही मस्त दिसतो, एकदम रंगीबेरंगी!!! Happy

मामी, तो तर बदामी हलवा ना?? कॉर्नफ्लावर चा करतात बहुतेक... लाल/ हिरव्या रंगात मिळतो... अजिब्बात आवडत नाही....चिक्कट चिक्कट चिकटतो....

टर्किश डिलाईट त्याचाच भाऊ / बहिण Lol

Pages