निर्सगाच्या गप्पा (भाग १३) या धाग्यावर दिनेशदा, हीरा, नंदिनी यांनी मुंबईबद्दल काही माहिती दिली. अशी या शहराबद्दलची छान, उपयोगी माहिती एकत्रित असावी म्हणून हा धागा.
कोणाकडे जुने फोटो, जुन्या आठवणी असल्यास सगळ्यांनाच त्यांचा लाभ घेता येईल. एखादी खास वैशिष्ट्यपूर्ण जागा असेल तर इथे नोंदवता येईल. इथे प्रकाशचित्रे टाकताना प्रताधिकाराचा भंग होणार नाही याची काळजी घेऊन टाका.
युक्ती सुचवा / सांगा या बाफचा हेतु, आत्ता मला कहितरी युक्ती सांगा किंवा आत्ता मला मदत हवी आहे असा आहे असे समजुन मी हा नविन धागा सुरु करते आहे. पुर्वी असा एक धागा मायबोलीवर होता (असे मला आठवते).
अशा पण काही टिपा (अनेकवचन ) असतात ज्या 'हँडी' सापडल्या पाहिजेत. अगदी छोटीशीच टिप असते पण काम खुप सोप्पे होते त्यामुळे.
उदा. (काजुकतली चा बाफ) काजुची पुड करण्या आधी ते थोडावेळ फ्रिजमधे ठेवावेत.
शेअर मार्केट मधील टिप्स...कितपत भरवसा ठेवावा?
ट्रेडिंग करताना आपल्याला स्वतःहून स्क्रिप्स निवडणे काही वेळेला शक्य नसते, इंटरनेट्वर बर्याच जाहिराती दिसतात जे एस एम एस द्वारे टिप्स देण्याचा उद्योग करतात.. अशा टिप्स किती भरवश्याच्या असतात? कुणाला चांगल्या टिप्स देनारा माहीत आहे का? बहुताम्शी वेलेला हे लोक इन्ट्रा डे आणि एफ एन ओ मधील टिप्स देतात.. स्पेशल निफ्टीसाठीही काही जणाम्ची सोय असते. असा काही कुणाला अनुभव आहे का? खास करुन वॅल्यु नोट्स डॉट कॉमवर बर्याच जाहिराती दिसतात.. काही ब्रोकरही अशी सुविधा पुरवतात.. त्यांचा कुणाला अनुभव आहे का?
स्वयंपाकघरातल्या अनेक युक्त्या आपण http://www.maayboli.com/node/6359 पाहिल्यात. अनेक अडचणींवर मात करायलाही ह्याच धाग्यावर शिकलो. अशाच युक्त्या एकमेकांना ह्या पुढेही सांगत राहू, आता इथे ह्या नव्या धाग्यावर.
इथे काही विचारण्याआधी, मात्र हा आधीचा धागा पहायला विसरू नका.