देशापरदेशात भटकताना, काही ठिकाणी प्रवाशांना गंडवण्याचे जाणून-बुजून प्रयत्न केलेले दिसतात. किंवा काही ठिकाणी पहिल्यांदा भेट देणार्या प्रवाशांना तिथल्या काही खास टिप्स माहिती नसतात. या गोष्टी अगदी छोट्या छोट्या असतात. पण त्यामुळेच कोणी कोणाला सांगायच्या भानगडीत पडत नाहीत. किंबहुना या सांगायला हव्यात असंही आपल्या डोक्यात येत नाही. 'प्रवासात झालेला तात्पुरता मनस्ताप' या सदराखाली टाकून आपण त्या विसरून जातो. पण या गोष्टींमुळेच इतर काही प्रवाश्यांना फायदा होईल की.
थंडी संपून वसंत ऋतू आणि उन्हाळा आल्यावर बर्याच जणांनी शनिवारी-रविवारी शहराच्या आसपास भटकंती सुरु केली आहे. अटलांटा आणि नॉर्थ जॉर्जिया परिसरात एक किंवा दोन दिवसांत जाऊन येण्यासारखी काही छान ठिकाणं आहेत. ह्यांपैकी काही बघितली असल्याने माहिती संकलनाच्या दृष्टीने ’जॉर्जिया’ ग्रूपमध्ये जसं जमेल तसं ह्या ठिकाणांबद्दल लिहिण्याचा विचार आहे. बाकीच्यांनीही आपले अनुभव, आवडलेल्या / न आवडलेल्या गोष्टी लिहा. तसंच कोणाला इतर कुठल्या ठिकाणांबद्दल लिहायचं असेल तर वेगळा धागा काढून लिहू शकता. अटलांटा बाफवर तसं नमूद करा.
-----------------------------------------------------------------------------------
एका घरगुती समारंभासाठी गोव्यात जायचं ठरत असतांनाच बाबांनी हळूच एक पुष्टी जोडली- '..त्या समारंभाच्या दुसर्या दिवशी रथसप्तमी आहे. दरवर्षी परुळ्याला जायचं म्हणतोस, यंदा जमेल बघ..!' येस्स्स्स! ठरलं!! की, या वर्षी परुळ्याच्या श्रीदेव आदिनारायणाच्या रथसप्तमी उत्सवाला जाणे'च' आहे. पंचमी-षष्ठी-सप्तमी असा ३ दिवस दणक्यात चालणारा, भरपूर मनोरंजनाचे स्थानिक कार्यक्रम स्पर्धा- किर्तन- दशावतारी नाटक वगैरेंची रेलचेल असणारा हा उत्सव आता हळूहळू मोठं स्वरुप घेऊ लागला आहे. पूर्वी उत्सवादिवशी स्थानिक आणि काही मुंबईतून अशी शेकड्यांत जमणार्या मंडळींची संख्या आता उत्सवागणिक हजारोने होत आहे.
मन आलेलं भरुन
अन रितेची हात
जसं उभं एक रोप
जणू उन्हा-पावसात
किती गेले दिस वर्ष
पाय उगाच चालत
नाही दिशा नाही वाट
काही आस नाही आत
आता अडखळे श्वास
आणी गिळवेना घास
सावळसंध्या डोळ्यामधी
दिसे अथांग ती रात
काय केले कुणासाठी
काय गेले की राहुन
सारं आयुष्य जगलो
पाणी जावं जणू वाहून
कधी वाटलं थांबावं
फुला-मुलांत रमावं
सख्या-सोयर्यांच्या संग
आपणही हसावं
पण संसाराचा भार
सदा उद्याचा विचार
सय पायांना चालीची
पुढे जाण्याचा आधार
अनेकदा आपण मित्रमंडळी/ कुटुंबियांसोबत जवळपास बाहेरगावी पिकनिक - देवदर्शन - स्थल दर्शनासाठी किंवा अन्य कार्यक्रमासाठी ट्रीप आखतो. जसजसे प्रवासी सदस्य वाढू लागतात तसतशी मोठ्या वाहनाची गरज भासू लागते.
मग प्रवासी कंपन्यांची किंवा खाजगी (भाड्याने) गाड्या देणार्या व्यावसायिकांची शोधाशोध सुरु होते.
मिनी बस/ तवेरा/ ट्रॅक्स/ इनोव्हा इत्यादीसारख्या गाड्या बुक केल्या जातात.
जुगार म्हणटले की अंगावर काटा ऊभा राहतो..
आज २ वर्षा पुर्वी असेच एकदा peoria च्या कसीनो ला (जुगार अड्डा नाही म्हणनार
) अगदी गंमत म्हणुन मित्रांसोबत रॉलेट आणी ब्लॅकजॅक खेळायला गेलो होतो.... ६० डॉ. चे नुकसान झालेच वरुन मनस्ताप/पश्चताप का काय म्हणतात तो सर्व प्रकार झाला.. तेंव्हा पासुन जुगार अर्थात कसीनोचे सर्व रस्ते बंद करुन टाकले..
अध्यात मध्यात ऑफिसमधे कुणीना कूणीतरी वेगस ला जाऊन आल्याचे कळायचे..
कसीनो मध्ये पैशे हारल्याचा प्रत्येकाचा अनुभव सारखाच होता..
सर्व साधारण वेगस ट्रीप मधे १००० डॉ. कमीत कमी खर्च येतो असे ऐकीवात होते .
म्हणजे आताचे भारतीय ४५००० रु.