कुलदैवत

Submitted by नंदिनी on 24 February, 2012 - 02:29

प्रत्येक घराण्याचे एक कुलदैवत असते. बहुतेक घरामधून लग्न मुंज अशा मोठ्या कार्यक्रमानंतर कुलदैवताला जाणे हा महत्त्वाचा भाग असतो.

इथे कृपया तुमच्या घराण्याच्या कुलदैवतेविषयी लिहा. शक्य झाल्यास त्या ठिकाणी कसे जायचे याबद्दल देखील लिहा.

लिहिताना कृपया तुमचे आडनाव्-मूळ गाव तसेच कुलदैवताचे ठिकाणाबद्दल पूर्ण माहिती लिहा. ज्या लोकाना स्वतःचे कुलदैवत माहित नाही, अथवा नक्की कुठे आहे ते माहित नाही, अश्या लोकाना या माहितीचा उपयोग होऊ शकेल.
(इथे वादविवाद अथवा श्रद्धा-अंधश्रद्धा यांची चर्चा अपेक्षित नाही. धन्यवाद)

http://maps.google.com/maps/ms?ie=UTF&msa=0&msid=203739402596125295695.0...

हा आस्चिगने बनवलेला दुवा आहे. इथे लोक आपापली कुलदैवते नोंदवू शकतात
नोंद करतांना
(१) नकाशात जागा शोधावी
(२) EDIT वर ई-टिचकी मारावी
(२) नकाशात वर डावीकडे दिसणार्‍या तीन चिन्हांपैकी मधले (पाण्याच्या थेंबासारखे दिसणारे) निवडावे
(४) योग्यजागी ते चिकटवावे (निश्चीत जागा माहीत नसल्यास शक्य तितके जवळ चिकटवावे - नंतर बदलणे शक्य आहे)
(५) Title मधे जागेचे नाव लिहावे
(६) Description मधे कुलदैवताचे नाव आणि कंसात आडनाव लिहावे
(७) OK वर ई-टिचकी मारावी
(धन्यवाद आस्चिग)

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अमि, इथे तुमच्या मूळ गाव, आडनाव इत्यादि माहिती लिहा. कदाचित तुमचे कुलदैवत कुणालातरी माहित असेल.

माझ्या माहेरकडे- (मुचखंडी देसाई) तुळजाभवानी आणि नीरानरसिंहपूरचा नरसिंह अशी कुलदैवते आहेत.

सासरकडे (काणे)- कोळिसरेचा लक्ष्मी केशव. देवीचे नाव माटलाईदेवी इतकेच माहित आहे. तिच्याबद्दल अजून काही जास्त माहिती नाही.

अमि, समजा कुलदैवत माहितच नसेल तर अंबाबाईला कुलदेवता मानावे असं ऐकलं आहे. ती आदिमाता असल्याने सर्व देवता तिच्यात सामावलेल्या असतात.

सासरचे कुलदैवत मुदाईदेवी. साता-याच्या जवळ देऊळ आहे. देवी जमिनीच्या लेवलपेक्षा खुप खाली, गुहेत आहे. तिथे जायचा दरवाजा अगदी दिड फुट बाय दिड फुट असावा, बसुनच जावे लागते. आत जाताना आपण दारातच अडकु की काय असे वाटायला लागते पण अजुन तसे कधीच झालेले नाही इती पुजारी.

माहेरची देवी थैवत असे आई म्हणते. ही कुठे आहे वगैरे मला काही माहिती नाही. आईलाही माहिती आहे का देव जाणे. विचारायला पाहिजे. कोणास माहित असल्यास सांगा.

इंटरेस्टिंग धागा, नंदे (लग्गेच माझ्या डोक्यात इथल्या डॉक्युमेन्टेशनचा मला कसा वापर करून घेता येईल वगैरे चक्रं फिरायला लागलीत :फिदी:)
माहेरची कुलदैवतं (खळदकर - मूळ गाव सासवडजवळचं पारगाव) - जेजुरीचा खंडोबा आणि शिवरीची यमाई. शिवरी हे गाव सासवड-जेजुरी रस्त्यावरच आहे. फार लांब नाही.
सासरी बंगाल्यांच्यात कुलदैवत (आणि कुळधर्म, कुळाचार, इ) वगैरे प्रकार अस्तित्वातच नाहीत. थेट कालीमाता किंवा दुर्गाबाईच!

माहेरचं श्रीलक्ष्मीकेशव, कर्ले आणि कोल्हापूरची अंबाबाई.
सासरचं नाचण्याची देवी. बाकी जास्त माहित नाही. त्यामुळे आदिमातेलाच स्मरते.

नंदिनी खूप छान धागा सुरू केला. आमच्या कुलदेवते बद्दल मला अजुन माहिति हवि होती म्हणून मी मधे एक post टाकली होती. माजरे गावच्या जुगाई देविबद्दल कुणाला जास्त माहीति असल्यास क्रुपया कळवा. सन्गमनेर तालुका. जिल्हा रत्नागिरी.

वरदा, थँक्यु.. मला खास करून कोकणातील कुलदैवतांचे डॉक्युमेंटेशन करायचे आहे. त्यासाठी हा धागा उपयोगी पडेलच.

केश्विनी, नाचण्याची देवी?? नाचणे गावाशी काही संबंध आहे का? तसे असेल तर माझ्या घरापासून चालत जाण्याच्या अंतरावर आहे हे देऊळ. तू जर कधी रत्नागिरीला आलीस तर तुला माहिती देइन. खूप सुंदर आणि शांत देऊळ आहे.

लिहिताना कृपया तुमचे आडनाव आणि मूळ गाव (माहित असल्यास) लिहा म्हणजे ज्याना कुलदैवत माहित नसेल त्यांच्यासाठी ही माहिती उपयोगी पडेल.

सामी. संगमेश्वर तालुका. माजरे गाव मला ऐकून माहित आहे. रत्नागिरीमधे बर्‍याच गावामधून जुगाई नावाच्या देवी आहेत. याविषयी मी अधिक माहिती तुला एक दोन दिवसात देते.

आमच कुलदैवत पुणे-बैंगलोर हायवेवरील कापूरहोळ गावचा भैरवनाथ आणि सासवडजवळील आतकरवाडीची पद्मावतीदेवी.

साधना >>>>> सुळशीची मुधाईदेवी का?

कुलदैवत माहित नसल्यास

श्री कुलदेवतायै: नम: |

हा जप श्रद्धापूर्वक करावा. काहीतरी सूचक (pointer) सापडतो असं म्हणतात. लिंबूकाका अधिक प्रकाश टाकू शकतीलसे वाटते.

आ.न.,
-गा.पै.

माझ्या माहेरचे तिरुपतीचा बालाजी आणि तुळजाभवानी. (देशपांडे - मंगळवेढा, सोलापूर)
सासरचे जेजुरीचा खंडोबा आणि शिरपूरची सुलाईमाता. (कुलकर्णी - अंबड, घुळे)

नंदिनी, निरा नरसिंहपूरसाठी विपू बघ.

जोतिबा, कोल्हापुर कुलदैवत.
कुलदेवी माहिती नाहिये. आज्जीच्या म्हणण्यानुसार कुलदेवी हा प्रकार आपल्यात नाहिये.
पण तुळजाभवानी असेल अस आई म्हणते.

बाय द वे, जोतिबाला (गाव) वाडी रत्नागिरी असहि नाव आहे. मी कोणत्या तरी पेपरात वाचलेलं की जोतिबाच मुळ स्थान रत्नागिरीत कुठेतरी आहे. पण तो इकडेच राहिला. ते मुळ स्थान कोठे आहे कोणाला माहित आहे का?

माहेरचि देवि - (ब्रिद (कदम)- नवलादेवि) मुळ स्थान प्रभानवल्लि - राजापुर तालुका, रत्नागिरि. कधि जाणं झाल नाहि

सासरचि देवि - (शिंदे - रामवरदायिनि)मुळ स्थान कळकवणे (दादर) - तालुका चिपळुण
अतिशय सुंदर मंदिर आणि परिसर. पण transport facility योग्य नाहि. स्व:ताच वाहन असणे चांगले

श्री कुलदेवतायै: नम: | >> Happy

अगं करमरकर कुलवृत्तांतात कळलं आणि आम्ही एकदा जाऊन आलो तिकडे काही वर्षांपुर्वी. परत कधी चिपळूण, रत्नागिरीला गेले की तुला काँटॅक्ट करते. पण मला तिकडे गेले तेव्हा कळलं २ देव्या आहेत नाचण्याला. त्यामुळे त्यातली नक्की कुठली ते कळलं नाही. एक देवी रस्त्याजवळच आहे. आम्ही गेलो तेव्हा तिथे कौल लावणं चाललं होतं. आम्ही थोडावेळ बसलो आणि नमस्कार करुन बाहेर आलो. नंतर रस्त्यावर आल्यावर कुणालातरी विचारलं तर कळलं त्या देवळाच्या मागच्या बाजूने खाली उतरल्यावर मूळ नाचणे गाव आहे आणि तिथेही एक देवी आहे. त्यावेळेस परतीची वेळ गाठायची असल्याने जाता आलं नाही. आता परत गेले की त्या खालच्या गावात जाऊन येणार. कदाचित तिथलीच देवी आमची असेल. तिथे अजून काही करमरकरांची घरं आहेत.

सासरमाहेर दोन्हीकडची कुलदेवता बर्‍याच कोकणस्थांप्रमाणे अंबेजोगाईची योगेश्वरीदेवी.

माहेरचं कुलदैवत लक्ष्मीनृसिंह (जोशी)
सासरचं कुलदैवत कोळीसरे येथील लक्ष्मीकेशव (भावे)

भगवती किल्ल्याच्या पायथ्याशी देऊळ आहे. छोटेसेच देऊळ आहे>>> वाह!! झटपट माहिती. धन्यवाद नन्दिनी. Happy
रत्नागिरीतच आहे का?? मी रत्नागिरीत फिरलो नाहिये त्यामुळे हा प्रश्न.
गणपती पुळे आणि हे मुळ मन्दीर विथ फॅमिली जाण्ञासाठी योजना डोक्यात आहेच. आता अमलात आणण्यासाठी वेग येइल Happy

सासरचं कुलदैवत कोळीसरे येथील लक्ष्मीकेशव (भावे)>> अमृता, हे नक्की का? कारण माझ्याकडे थोडी वेगळी माहिती आहे. मी तरी एकदा परत कन्फर्म करते आणि इथे लिहिते.

अश्विनी, मला ही तू म्हणतेस ती देवी माहित आहे. खालच्या नाचण्यामधे देवीची देऊळ आहे का याची चौकशी करते. गुरवीण आमच्या चांगल्या ओळखीची आहे. तिलापण याबद्दल विचारून ठेवते.

(यंदाच्या रत्नागिरी ट्रिपला एक देवदर्शन मोहीम काढावी बहुतेक Happy )

नंदिनी, भाव्यांच्या कुलवृतांतात ही माहिती आलेली. शिवाय तिथे मागे भावे संमेलन सुद्धा झालेलं.

रत्नागिरीतच आहे का?? मी रत्नागिरीत फिरलो नाहिये त्यामुळे हा प्रश्न.
>>> भगवती किल्ला रत्नागिरीतच आहे रे झकोबा. Happy

रत्नागिरीत जायच्या आधी संपर्क कर. तुला अजून थोडी माहिती वगैरे हवी असेल तर सांगेन.

आमचे कुलदैवत आंबामाता जी राजस्थान मध्ये अबुगढ ला आहे...माऊंटअबु जवळ्(४० किलोमीटर)....(दोन्हिकडची माहेर आणि सासरचीही सेम). गुजरात मधल्या पालनपुर पासुन जवळपास ५० किलोमीटर अबुगढ आहे तिथे रोप वे ने दर्शनासाठी जावे लागते.......खूप उंचावर आहे मंदिर.......अबुरोड पर्यन्त एक रेल्वेही जाते तिथे पन अजुनपर्यंत रेल्वे ने गेले नाही कधी...... Happy

अमृता, http://www.maayboli.com/node/17419 इथे बघ.

माझ्या माहितीप्रमाणे कोळिसरेला काणे/विचारे आणि शांडिल्यगोत्रोत्पन्न जोशी यांचे कुलदैवत आहे. मी पुन्हा एकदा कन्फर्म करते मात्र. Happy भावे घराण्याचे कुलदैवत लक्ष्मीकेशव असेल पण दुसर्‍या गावातील असेल. कर्ले, फणसोप अशा गावात देखील लक्ष्मीकेशवाचे मंदिर आहे. मी तरीदेखील पुन्हा एकदा कन्फर्म करते. Happy

आमच्या मुळ घराण्याचे (पाठक) कुलदैवत कन्हेरसरची यमाई देवी आणि पालीचा खंडोबा.
आजोबांना द्त्तक दिले गेले तेव्हापासुन माहूरची देवी. दत्तक घेणारे मराठवाड्यातले होते.
विदर्भ / मराठवाडा भागातल्या अनेक देशस्थ घरांचे कुलदैवत माहूर असावे.
कोकणस्थ लोकांचे कुलदैवत आंबेजोगाईची देवी कसे काय ? कारण ती तर इकडे मराठवाड्यात आहे.

Pages