काशीयात्रेबद्दल माहिती हवी आहे

Submitted by मी_आर्या on 22 November, 2012 - 02:48

नमस्कार मंडळी,

पुढच्या वर्षी साधारणतः मार्च एप्रिल मधे आई आणि वृद्ध काकुला काशीयात्रेला नेण्याचा विचार आहे. काशीबरोबरच प्रयाग आणि मिर्झापुरजवळील 'विंध्यवासिनी'देवीचं ही दर्शन करुन घ्यावे हा विचार मनात घोळतोय.
कुणी जाउन आले असल्यास, कृपया मार्गदर्शन करावे.

*काशीविश्वेश्वर आणि कालभैरव यांच्या दर्शनाव्यतिरिक्त अजुन कोणकोणती महत्वाची मंदीरं आहेत?
*धार्मिक पुजाविधी काय काय आणि कुठल्या (घाटांवर वै.)करावेत? त्यांचा जनरली रेट काय असतो?
*रहाण्याची आणि जेवणाची व्यवस्था कशी आहे? हॉटेल कशी आहेत? त्यांचे रेट कसे आहेत? आणि जमल्यास फोन नंबर द्यावे. जेवणासाठी महाराष्ट्रीयन पद्धतीचे हॉटेल्स आहेत का? कारण तिथलं जेवण मोस्टली ऑईली/तळणाचं असतं असं ऐकलय.
*तिथे महाराष्ट्र मंडळाने रहाण्याची व्यवस्था केली आहे का?

*वृद्धांना प्रवासास बरोबर नेतांना काय काय काळजी घ्यावी?
वेळ वाचवण्यासाठी, एका बाजुने विमानाने आणि येतांना ट्रेनने यायचा विचार आहे. आईचं पायाचं ऑपरेशन झालं आहे आणि काकुही अशक्त आहे. दोघींनीच काय आम्हीही आजतागायत विमानप्रवास केलेला नाही, म्हणुन विचारण्याचा सोस!

*धार्मिक यात्रा असल्याने अर्थान खरेदी नाहीच. तरीही किरकोळ खरेदी करायची असल्यास कुठे करावी?

*काशीहुन प्रयागला जाण्यासाठी प्रवासाची काय साधनं उपलब्ध आहेत्?त्यांचं बुकींग करण्याची ठीकाणं वै.

(तिकडे लुबाडण्याचे प्रकार फार घडतात म्हणुन हे सगळं विचारतेय)

धन्यवाद!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आर्या, माझी आई अशीच एका यात्रा कंपनीबरोबर हट्टाने गेली होती.. तिथे स्वच्छतेची / खाण्यापिण्याची व्यवस्था यथातथाच असते ( माझ्या आईला, स्वच्छतेचे फार वेड आहे ) ती तिथे पाणीच प्यायची नाही / खाणे पण टाळायची. तिथून आल्यावर ती खुपच आजारी पडली.. ( महिनाभर हॉस्पिटलमधे होती. )

काशीचे पुराणात कितीही गुणगान केलेले असू दे, सध्या तरी ती बकालच आहे. माझी आई मे मधेच गेली होती. भयंकर उकाडा होता. राहण्याची सोयही यथातथाच असते.

काकूंचे मत या बाबतीत वळवण्यात आले तर गोव्यात आणि कर्नाटकात, अनेक स्वच्छ मंदीरे आहेत, तिथे सर्वच सोयी खुप चांगल्या आहेत, तिथे जाता येईल. पण मे महिन्यात, तिथेही गरमच होणार.

आणखी मन वळवायचे असेल, तर माझ्या आईचा नाही तर वहीनीचा फोन नंबर देऊ शकेन.

दिनेशदा
मी हेच लिहीणार होतो. चौधरी यात्रा कंपनीचे पत्रक आणावे आणि त्याप्रमाणे स्वतःचा बेत आखावा हे उत्तम आहे.

माझ्या आई-वडिलांनी चौधरी यात्रा बरोबर चारधाम यात्रा केली आहे. त्यांची व्यवस्था तशी ठिक असते आणि आपल्याला काही बघावे लागत नाही. दरही रिझनेबल असतात. पण मुळातच तिकडच्या काही भागात चांगली हॉटेल्/लॉज फारशी नसल्याने जरा त्रास होतो.
अर्थात हे गृहित धरुन केवळ काशी यात्रा आणि दर्शनाच्या ओढीने जाणारी व्यक्ती आल्यावर फार समाधानी असते.

आम्हीही माझ्या आईसाठी ही सगळी चौकशी केली होती. पण अजूनतरी प्रत्यक्ष जाणं झालेलं नाही.
कमी लोक असतील तर सरळ टुरकंपनीबरोबर गेलेले बरे पण तुम्ही जास्त लोक आहात वाटते. तर वर सुचवलंय तसं बाकी यात्रा कं चे वेळापत्रक बघुन त्याप्रमाणे केले तर बरे पडेल. अर्थात त्यांची वाहनाची सोय, जेवन, राहण्याची जागा आधीच तयार असल्याने अगदी तसं करता आलं नाही तरी रुपरेषा ठरवता येइल.
इथे यानिमीत्ताने काशीयात्रेची माहीती जमा झाली तर बरंय.

धन्स दिनेशदा, चिंगी, किरण, माधवी! Happy

मान्य आहे तुम्हा सर्वांचं. पण हे जुने लोक किती समजावलं तरी हट्टास पेटतात. म्हणुन त्यातल्या त्यात कंफर्टेबल प्रवास होईल हे बघायचं आहे. चौधरी यात्रा कंपनीबद्दल खुप ऐकलय तसं.

अरे बाप रे! माझी आईदेखील तिच्या मैत्रिणींसोबत पुढच्या महिन्यात काशीयात्रेला जाणार आहे. तिला हे वाचून दाखवायला हवे.( धन्यवाद दिनेशदा , माझ्या आईलापण स्वच्छतेच भारी वेड आहे, तिला लगेच सांगते हे सगळं) टिकीटं काढून झालेली आहेत त्यामुळे कॅन्सल करण्याची शक्यता नाही.... निदान तिथे कोणती खबरदारी घेता येइल? तसेच खाणं काय काय सोबत ठेवता येइल ? हे सांगाल का ?

विनार्च आणी आर्या वर्षभरापूर्वी माझ्या नणदेचे चुलतसासरे जाऊन आले काशीला. ते रेल्वेनेच गेले व आले. बुकिंग केले होतेच. पण दिनेशजी म्हणतात त्याप्रमाणे बकालपणा आहेच. मात्र कसेही जायचेच असेल तर बरोबर औषधे ( तिथले पाणी हमखास बाधतेच, ते सासरेबुवा पोट बिघडल्याने हैराण झाले, आणी त्यांच्याबरोबरचे त्यांचे मित्र आल्यावर आजारी पडले ) घ्याच.

अर्थात वयोवृद्ध व्यक्ती बरोबर असल्याने त्यांची नेहेमीची औषधे, ओडोमॉस ( सर्वत्र डासांचा संचार), ग्लुकॉन -डी ची काही पाकिटे, इलेक्ट्रॉल ची पाकिटे ( जल संजिवनी ) तसेच खाद्यपदार्थांमध्ये बिस्किटे, लाडु, चिवडे ठेवाच. ताजी फळे खाणे केव्हाही उत्तम.

थोडक्यात..................
.
.काशीला व्यवस्थित प्लॅनिंग करुन नाही गेले तर नक्कीच काशी होणार....:)

धन्यवाद सर्वांना! Happy

<<अर्थात वयोवृद्ध व्यक्ती बरोबर असल्याने त्यांची नेहेमीची औषधे, ओडोमॉस ( सर्वत्र डासांचा संचार), ग्लुकॉन -डी ची काही पाकिटे, इलेक्ट्रॉल ची पाकिटे ( जल संजिवनी ) तसेच खाद्यपदार्थांमध्ये बिस्किटे, लाडु, चिवडे ठेवाच. ताजी फळे खाणे केव्हाही उत्तम.<<
धन्यवाद टुनटुन! Happy नक्की प्रयत्न करेन हे सगळं बरोबर नेण्याचा.

विनार्च, आईने पण डिंकांचे लाडू, ठेपले असे बरेच काही नेले होते, पाणी कसे नेणार ? आणि एकंदरच रस्त्यावर, देवळाच्या आजूबाजूला गलिच्छ वातावरण असते. असे म्हणणे योग्य नाही, पण उत्तरेकडच्या स्त्रियांना त्याचे काही वाटत नाही. पण आपल्या आई लोकांना तर कायम नाकावर रुमाल ठेवून वावरावे लागते.

गोव्यातील देवळे, स्वच्छतेबाबत आदर्श वाटली मला. ( अर्थात मी काही, देशभरातील देवळे बघितलेली नाहीत. )

आमच्या ऑफीसातले एक यु.पी. साईडच्या डायरेक्टरांना मी विचारले तर त्यांनी तिकडची एक कहावत सांगितली.

"रांड, सांड, सिढी, संन्यासी
इनसे बचे तो सेवे काशी"

(रांड (विधवा), सांड ( देवाला सोडलेले सांड), सिढी ( पाय-या- तिथल्या पायर्या निसरड्या आहेत या अर्थाने), संन्यासी ( काशीचे पुजारी, तिथले साधु-संन्यासी वै.))

(रांड (विधवा), सांड ( देवाला सोडलेले सांड), सिढी ( पाय-या- तिथल्या पायर्या निसरड्या आहेत या अर्थाने), संन्यासी ( काशीचे पुजारी, तिथले साधु-संन्यासी वै.))>>>>>>>>>>हे सगळ आईला आणि काकूला सांग. आणि नीट विचार करून जा ग! नाहीतर दिनेशदा म्हणाले तस गोव्याला घेऊन जा. Happy

दोघी ऐकत नाहीयेत. ५-६ वर्षांपासुन मागे लागल्यात. शेवटी आम्ही हात टेकलेत.

विधवा म्हणजे रांड? रेशिअल स्टिरीओटायपिन्ग. पॅथेटिक. असे लोक्स काशीला गेले तरी आत्म्याची उन्नती नाही होणार.

मामी...मलाही कळलं नाही, तिथे विधवांचा काय त्रास होतो लोकांना ते! पण जुनी कहावत आहे म्हणता ऐकुन घेतली. मुळात

अमा...

ही कहावत आहे ती तिकडे होणार्‍या त्रासा बद्दल आहे. काशीला अनेक नीराधार विधवा आश्रम आहेत. त्या विधवांची अवस्था फारच वाईट असते. अजुनही यु.पी. बिहार मधे विधवेला काशीला सोडुन यायची प्रथा आहे. अशा नीराधार विधवा मग भिक मागुन आपलं जीवन जगतात. त्याला उद्देशुन ही कहावत आहे. अशा अनेक विधवा बायका आपल्याला रस्तो रस्ती दिसतात.

बाकी बकाल पणा अगदी सहन न होणारा आहे. मी शाळेत असताना गेले होते. पुन्हा कधीच नाही जाणार.

गोव्यातील देवळे, स्वच्छतेबाबत आदर्श वाटली मला. ( अर्थात मी काही, देशभरातील देवळे बघितलेली नाहीत. ) >>> दिनेशदांना प्रचंड अनुमोदन. मी देशातली बरीच मंदिरं पाहिली आहेत. गोवा खरंच १ नंबर आहे स्वच्छतेबाबतीत. बाकी भारतातल्या देवळांमधली घाण पाहिली कि असलानसला सगळा भक्तीभाव आटुन जातो. केवढी ती घाण आणि किती भयानक वास असतात. लेटली आम्ही कितीही प्रसिद्ध मंदिर/देव असला तरी जाण्याचं टाळतोच. गंगेचा एक किनारा कोणत्यातरी प्रवासात बघण्यात आला. इतका यक होता. शिवाय ती माबोवर कोणी तरी दिलेली चायनाची साइट..... मी आयुष्यात गंगेचं पाणी पिणं तर लांबच, पण स्पर्शही करु शकणार नाही.

नयना, तुझ्या आणि घरच्यांच्या भावनांचा आदर आहे, पण खरंच विचार कर. माझ्या भक्तीभावामधे न्हालेल्या शेजारीण आजींनी पण काशीची फार बुराई केली होती. तरीही जाणारच असा विचार असेल तर भरपुर खाणं घरुनच ने आणि फक्त मिनरल वॉटरच दे. तिथलं पाणी पोटासाठी भयंकर धोकादायक आहे.

'वॉटर' पिक्चरमधे दाखवलं आहे ना हे सगळं. तो स्वातंत्र्यापूर्वीचा काळ आहे अर्थात. आता परिस्थिती सुधारली असावी.
अवांतरः
सॉरी 'मी_आर्या'

आर्या, वॉटर चित्रपट बघितला नाही काय ? खरं तर तो इतका थेट आहे कि त्याचे चित्रीकरण काशीला होऊच दिले नव्हते. तो केरळमधे चित्रीत झालाय.. लिसा रे, जॉन अब्राहम, सीमा बिस्वास, वहीदा रेहमान आहेत त्यात.
काशीत चित्रीकरणच न झाल्याने, तिथला बकालपणा नाही दिसत, पण त्या बायकांची परिस्थिती मात्र, अंगावर येते.

नव्हता बघितला. मधे बॅन आल्याचं कळलं होतं.
माधवी इट्स ओके. त्या निमित्ताने काशीबद्दल एकेक माहिती कळतेय.

धन्स मने! Happy

दिनेशदा
तो केरळमधे चित्रीत झालाय >> नाही तिथेही प्रॉब्लेम आला होता तर दिपा मेहताने थेट श्रीलंकेत केलं शूटिंग.
बाकी, खरचं चित्रपट पाहून अंगावर काटा येतो.

अमा, आपणांस कदाचित ठाऊक नसेल तर काशीमधे आजही अनेक तरूण विधवांना त्यांच्या घरच्यान्ना सोडून देतात अशा सोडून दिलेल्या कित्येक स्त्रिया नंतर विकल्या जातात आणि शरीरविक्रयाच्या धंद्यामधे येतात. आपल्याकडेदेखील महाराष्ट्रामधे रांड हा शब्द विधवेला वापरलेला असतोच. रंडकी सूज किंवा रांडमुंड बाई हा शब्द आजही वापरलेला असतो.

असो. विषयांतराबद्दल क्ष॑मस्व.

इकडे शब्द छल नाही. पण मराठीतही आलवणातल्या बायकांना " रांड मुंड" म्हणायची पध्दत होती. विषेशतः कोकणात. हा शब्द विधवेला उद्देशुन मी "गारंबीचा बापु" नाटक आणि "बॅरिस्टर" वर आधारित सीरीयल मधे ऐकल्याचे स्मरते. तेंव्हा माझ्या आजोबांनी सागितलेली ही शब्द व्युत्पती.

आपण हा शब्द शीवी म्हणुन खुप वेगळ्या आर्थाने ओळखतो.

आभार माधवी.. पण खरोखरीच त्याचे चित्रण अगदी संयमपूर्ण आहे. लिसा रे सारखी सुंदर अभिनेत्री असूनही, कुठेही अंगप्रदर्शन नाही. थेट समस्येचेच चित्रण आहे.

अश्विनी, तो शब्द केवळ अनुप्रासासाठी. त्यांची परिस्थिती तर त्या शब्दापेक्षाही हलाखीची. वॉटर वघाच. निदान सिडीवर तरी उपलब्ध आहे.

अश्विनी, तो शब्द केवळ अनुप्रासासाठी. त्यांची परिस्थिती तर त्या शब्दापेक्षाही हलाखीची>>>>>>>>>>बापरे Sad

Pages