प्रवास

Submitted by सौरभ उपाध्ये on 29 June, 2012 - 12:59

आपण नेहमीच्या या जगात अनेक माणसे पाहतो. पण लक्ष न देता आपण आपले पुढे जात असतो. कधी साधा विचार सुद्धा करावासा वाटत नाही कि आपल्यामध्ये आणि इतर माणसांमध्ये अशी कोणती भिन्नता आहे. तर , त्या दिवशी कांदिवली ला जाताना रेल्वे , बस असा प्रवास होणारच होता पण त्या प्रवासात एक गोष्ट अशी पाहायला मिळाली आणि लिहावसं वाटलं.
मी त्या दिवशी मुलुंड पर्यंत रेल्वे आणि नंतर बस असा प्रवास केला. रख-रखते उन त्यात असा जीव घेणा प्रवास तरी मी ठरवलंच होतं कि आपण दामायचं नाही. त्या प्रवासात लोकल मध्ये एक चिकूवाली आली. साधारण वयाने माझ्या इतकीच पण ते टोपली भरून चिकू विकणं हे चालूच होतं. मी काही लक्ष न देता मुलुंड ला उतरलो. तिकडून स्टेशनवर उभे असलेले कॉलेज मधले काहीजण दिसले. त्यांच्याशी बोलून प्रवास सुरूच ठेवला. साधारण बसने फिरून फिरून मी २ तासांनी कांदिवली ला पोहचलो.
त्यानंतर काही तासाभराने मी मावशी सोबत माझ्या कामा निम्मित बोरीवली येथे गेलो. सगळी कामे संपवून पुन्हा डोंबिवलीला परतण्याची वेळ आली. बोरीवली वरून नव्याने सुरु झालेली ७०० नंबरच्या बसने ठाणे शहर गाठले आणि परत रेल्वे स्टेशनवर आलो. कल्याण गाडी आलेली पाहून मी परत चढलो . मी खूप खूप दमलो होतो एक दिवसाच्या प्रवासाने आणि खरोखर गाडीत पेंगायला लागलो आणि पाहतो तर काय समोर पुन्हा तीच चिकूवाली सकाळच्याच प्रमाणे ओरडत होती " चिकू चिकू......"
खरोखर, मी त्या दिवशी आरामात बसून प्रवास केला तरी दमलो होतो पण त्या मुलीने त्या डब्ब्यातून किती वेळा उभ्याने प्रवास केला असेल हे देवजाणे. पण एक गोष्ट शिकायला मिळाली कि प्रवास हा प्रवास असतो असं म्हंटल तरी प्रत्येकाचा प्रवास हा वेगळाच असतो.

गुलमोहर: 
शब्दखुणा: