प्रवास

ऑस्ट्रियाची सफर.. भाग एक (व्हिएन्ना आणि बुडापेस्ट)

Submitted by सॅम on 4 October, 2009 - 18:27

आता जाउन देखिल बरेच महिने झाले... मागच्या वर्षी मे मधे आठवडाभर सुट्टी काढुन ऑस्ट्रियाला गेलो होतो. व्हिएन्नाला माझा मावसभाउ असतो. त्यामुळे संधी मिळाली की तिकडे जायचेच होते. आपलं कोणी असेल तर सगळं कसं निवांत होतं... दोन महिने आधी भावाला फोन करुन तो आहे का ते विचारुन घेतलं आणि विमानाची तिकीटे काढली. कधी नव्हे ते जाताना ऑस्ट्रियन आणि येताना एअर फ्रान्स ची तिकिटं स्वस्तात (हे महत्वाच!) मिळाली. जरा बरं वाटलं की यावेळी सामान चेक-इन करुन नेता येइल! [१] पण त्यानंतर आठवडाभराची आखणी भावावर सोडुन दिली... ते निघण्याच्या आठवडाभर आधिपर्यंत आम्ही काही म्हणजे काहीही विचार केला नाही!

लाँग ड्राईव्ह.. !

Submitted by बस्के on 31 July, 2009 - 19:24

काल स्टारबक्सला भेट द्यावी म्हणून बाहेर पडलो.. कॉफी घेतली, बरोबर कॉफी बेरी केकही घेतला.. आणि बाहेर खुर्च्यांवर गार वार्‍यात गप्पा मारत बसलो.. कॅलिफॉर्नियामधला उन्हाळा फारच सुंदर! जरा दुपारी दोन एक तास वाईट उकडतं खरं..

विषय: 

थायलंड वासियांचा उद्धटपणा

Submitted by bepositive on 9 July, 2009 - 01:34

आपल्यापैकी बरेच जण थायलंड ला जाऊन आले असतील. तसा हा देश एक उत्तम पर्यटन स्थळ म्हणून जगप्रसिद्ध आहे. स्वछ बीचेस, वॉटर स्पोर्टस, हत्ती, आणि पट्टायातील नाईटलाईफ या गोष्टी सर्वश्रुत आहेत. इथे येणार्‍या पर्यटकांमधे भार्तीयांचा भरणा लक्श्णीय आहे. भारतीयांच्या भटकंतीवरच इथला अर्धा पर्यटन व्यवसाय अवलंबून आहे असं म्हट्लं तर वावगं ठरणार नाही.

मी नुकताच माझ्या लग्नानंतर हनीमून ला थायलंड ला गेलो होतो. ६ दिवसांची आमची ही वारी होती. तिथे तसे बरेच चांगलेवाईट अनुभव आले पण हा एक मात्र अगदी शेअर करायलाच पाहिजे असा वाट्ला.

विषय: 

माझा मेक्सिको वॄत्तांत

Submitted by मो on 19 June, 2009 - 16:14

स्वाइन फ्लूचा उद्रेक होण्याच्या अगदी थोडेसे आधी आमची मेक्सिको ट्रिप पार पडली. आधी फक्त फोटो टाकण्याचा विचार होता, पण नुसते फोटो टाकण्यापेक्षा थोडीशी माहिती बरोबर टाकली तर जास्त मनोरंजक होइल असा विचार केला.

विषय: 

Pages

Subscribe to RSS - प्रवास