गोवा ट्रिप - माहिती हवी.

Submitted by मुग्धानंद on 20 October, 2012 - 02:21

दिवाळीनंतर, गोव्याला जाण्याचा प्लॅन आहे. मुक्काम bambolin beach या ठिकाणी असण्याची शक्यता आहे. तिथे जाणे-येणे बहिणीच्या कुटुंबा बरोबरच होणार, पण तिथे पाहाण्याजोगे काय?, जवळची ठिकाणे, हे ठिकाण येथे कुठे, असे अनेक बेसिक प्रश्न आहेत. तसेच लहान मुलांसाठी चांगली ठिकाणे कोणती? हॉटेल व्हेज- नॉनव्हेज इ.
जाणकारांनी कृपया माहिती द्यावी.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुग्धानंद, तुमच्या पोष्टीवरुन असे दिसते की तुम्ही गोव्याला प्रथमच जात आहात. गोवा हे मुख्यत्वेकरुन उत्तर्-दक्षीण असे पसरलेले छोटेसे राज्य आहे. त्याच्या उत्तरेला महाराष्ट्राचा सिंधुदुर्ग जिल्हा आहे. दक्षीणेला कारवार, सदाशिवगड (North Canara) हे व पुर्वेला बेळगांव असे कर्नाटकचे जिल्हे आहेत. तुम्ही जाणार आहात ते बांबोलीम हे पणजी पासून मडगांवच्या रस्त्यावर सांताक्रुझ (गोवा) जवळ आहे.
गोव्याचे मुख्यत्वे पर्यटनाच्या दृष्टीने विचार केला तर - नॉर्थ गोवा - (मांडवी नदीच्या उत्तर दिशेचे गोवा) व साऊथ गोवा असे दोन भाग आहेत.
नॉर्थ गोवामध्ये - म्हापसा, डिचोली (पोर्तुगिझ उच्चार बिचोलिम), पेडणे अशी शहरे आहेत. तेथे पहाण्यासारखे - डिचोली येथील मयेम लेक, सावर्डे येथील शंकराचे मंदिर, फोर्ट आग्वादा, बागा, कळंगुट, अंजुना व वागातोर हे बीचेस आहेत. तसेच डिचोलीहून पुढे पुर्वेला सांखळी, होंडा, धार्-बांदोडे, उसगांव असे करत बेळगाव रस्त्यावर बोंडला व मोलेम (भगवान महाविर सँक्चुअरी) ह्या सँक्चुअरीज आहेत व पुढे दुधसागर धबधबा आहे (अनमोड घाटामध्ये - एक सुचना, गोव्यात खनीज पदार्थ जसे मॅगेनीज, अ‍ॅल्युमिनीयम वगैरे मुबलक प्रमाणात मिळतात त्यामुळे खाणकाम खूपच चालेते व ते डंपरनी इकडे-तिकडे कॅरी केले जाते, त्यामुळे अनमोड घाटामध्ये डंपरची खूपच वहातुक असते व कधीकधी ट्रॅफिक जाम होऊ शकते). उसगांवहुन द्क्षीणेकडे वळुन तुम्ही पोंडामार्गे साऊथ गोव्याला जाऊ शकता.
साऊथ गोव्यामध्ये - पणजी, पोंडा, वास्को-द्-गामा व मडगांव अशी प्रसिध्ध शहरे आहेत. पोंड्याजवळ म्हार्दोळ, मंगेशी, रामनाथी, शांतादुर्गा अशी प्रसिध्ध मंदिरे आहेत. वास्को-द्-गामा येथे मुरगांव बंदर व दाबोलीम येथे एअर्-पोर्ट आहे. मडगांव येथे कोलवा व जवळच माजोर्डा असे बीचेस तसेच फुटबॉल व क्रिकेट स्टेडियम्स आहेत. पणजी येथे - दोना पावला (हे बर्‍याच हिंदी सिनेमात आहे - जसे.. एक दुजे के लिये, सिंघम वगैरे), मिरामार बीच, मांडवी नदिमधील रात्रीची बोट राईड, भव्य चर्च ई. गोष्टी पहाण्यासार्ख्या आहेत.

अतुलनीय ने माहिती दिलीच आहेत.
गोवा सरकारच्याच, नॉर्थ गोवा, साऊथ गोवा, आणि दूधसागर / तामडी सूर्ला अशा दैनिक सहली असतात. त्या घेणे फॅमिलीसाठी सोयीस्कर असते. बहुतेक महत्वाची ठिकाणे दाखवतात. पणजी रेसिडेन्सी मधे बुकिंग होते.
मोठा ग्रुप असेल तर एखादा टॅक्सीवालाही अशी सहल घडवतो. दर मात्र आधी ठरवायचा.

त्याशिवाय पणजी परिसर ( मार्केट, कला अकादमी, महावीर उद्यान, मिरामार ( पोहू नये ), मळे येथील मारुतीचे देऊळ, पणजीतले महालक्ष्मीचे देऊळ ) बघण्यासारखा आहे. हा भाग चालतही बघता येतो.

पाट्टो भागातले म्यूझियम अवश्य बघा. शाकाहारी हॉटेल्स, पणजीत बरीच आहेत.

अतिशय धन्यवाद, अतुल आणि दिनेशदा!!!
लगेच माहिती आली अपेक्षेप्रमाणे.....
माझ्या अल्प मती प्रमाणे, मग हे ठिकाण साउथ गोवा मधे येते का?

हो साऊथ गोवा मधेच. तसा काही एवढा चांगला बीच नाही हा. आम्ही गेलो होतो त्यावेळी भरपूर जेलीफिश होते, त्यामूळे जरा जपून.

गोव्यातून खरेदीसाठी खाद्यपदार्थ बरेच आहेत. पणजी बसस्टँडवरच मिळतील ते ( दोदोल, बेबिंका, केक, गावा चीज, लाडू ) म्हापश्याच्या बाजारात गूळ, पणजी मार्केटमधल्या पत्रावळ्या, बाजारात काजू चांगले मिळतील.
बीचवर कपडे बरेच दिसतील, पण ते बाहेरून आलेले असतात.
सिझनप्रमाणे फळे मिळतील, पण ती महाग असतात.
पणजीतच एक खास शंखशिंपल्यापासून शोभिवंत वस्तू विकणारे दुकान आहे. पण या वस्तू फारश्या टिकत नाहीत. काही खास विषयावरची, पुस्तके पण पणजीत मिळतील. दोन मोठ्या शोरुम्स आहेत तिथे, पुस्तकांसाठीच.

दारुच्या बाटल्या घेतल्यात, तर अनमोड घाटात चेकिंग होते, हे लक्षात ठेवा. बांद्यालाही कधी कधी असते.

अननस, रताळे, मानकुराय आंबे ( आता ताजे नसतील, पण बाटलीबंद रस मिळेल) चांगले मिळतील.

पालोलेम बीच वर जाउन या..... खुप भारी आहे!
टरफलवाले काजू मस्त मिळतात गोव्यात पण चार दुकानात चौकशी करुन घ्या..... बर्‍याचदा रेट वेगवेगळे असतात.... बर्र्‍याचशा बीचेस वर ट्रेंडी ज्वेलरी खुप मस्त मिळते.... गिफ्ट द्यायला घ्यायला भारी.... कारपेट्स आणि लेदरवर्कच्या वस्तू पण खुप ठिकाणी दिसतील... हॅप्पी जर्नी Happy

सिदा दे दे गोवा मस्त रिझॉर्ट आहे. ते टूर्स पण ऑर्गनाइज करतात. किंवा कार घेता येते. खरेदी पेक्षा खरे सांगू का खादाडी, आवडत असल्यास अल्कोहोल आणि समुद्रात मस्ती असा कार्यक्रम ठेवावा. किंवा दुसरा मार्ग गोव्यातील सुरेख मंदिरे बघावीत दर्शना साठी. यू कॅन रिअली चिल आउट. नदीवर क्रूज नक्की घ्या आणि कसिनो पण आहे तिथे. धमाल करा. मुंबईत सर्व मिळते. Happy

पणजीत १८ जून रोडला समांतर असलेल्या रस्त्यावर द पेस्ट्री शॉप म्हणून दुकान आहे. अप्रतिम पेस्ट्रीज, सॅंडविचेस इत्यादी. अगदी बेकर्स बास्केट, बर्डीजच्या व्यवस्थित थोबाडात मारेल अशी चव आणि व्हरायटी. प्लस किमती यांच्या निम्म्याने.

शाकाहारी असाल तर पणजीत ते मोठे कॅथेड्रल आहे त्याच्या समोरच्या भागात जे कामत आहे तिथली थाळी ओरपा. अहाहा महान आहे.

ब्रेफाला उगाच ब्रेड बटर खात बसू नका. Wink
उसळ पाव, टमाट मिक्स पाव असा नाश्ता मेनू य हाटेलांच्यात कायम उपलब्ध असतो. बरोबर मिरचीचे भजे मिळते. टमाट मिक्स-पाव हा लै म्हणजे लैच्च भारी ऑप्शन.

बांबोळीचा बीच ठिकठाकच आहे. तिथे बीचवरचंच हॉटेल (बांबोळी बीच रिसॉर्ट) असेल तर माझा त्या हाटेलाचा रूम्सच्या स्वच्छतेच्या बाबतीतला अनुभव बरा नाही. चादरी बिदरी पण बदललेल्या नव्हत्या आम्ही चेक इन केलं तेव्हा. तिथेच मुळीच जेवू नका. त्यांच्याकडे पंजाबी आयटेम्सशिवाय काहीही नाही व्हेजमधे. आणि नवर्‍याच्या म्हणण्याप्रमाणे मच्छी पण धड नव्हती.

मासे खायचेच तर छोटसं खोपटंवजा हाटेल शोधायचं आणि मच्छी ताट घ्यायचं. तरच ऑथेन्टिक आणि निर्मल आनंद मिळेल Wink

वेळ मिळालाच तर चोर्ला घाटात फेरफटका मारून या. अप्रतिम निसर्गसौंदर्य.

बाकी टूरिस्टी गोष्टी वरती आल्याच आहेत.

ताई माझ्यासाठी काय आणणार??????
बर्र्‍याचशा बीचेस वर ट्रेंडी ज्वेलरी खुप मस्त मिळते.... गिफ्ट द्यायला घ्यायला भारी>>
चालेल मला...

त्या पेस्ट्री शॉपमधला 'आंबा मावा केक' लई म्हणजे लईच भारी असतो.

नी, आम्ही केवळ एक संध्याकाळ मडगावात असणार आहोत, तेव्हा तिकडे काय फिरण्या/पाहण्यासारखे आहे? तसेच मडगावातील (जेवणासाठी) हॉटेलं सुचवणे.

शाकाहारी असाल तर पणजीत ते मोठे कॅथेड्रल आहे त्याच्या समोरच्या भागात जे कामत आहे तिथली थाळी ओरपा. अहाहा महान आहे. >> ++++१. आणि समोर असेलच तर पान घ्या. तिथे एक पानाची हातगाडी टाईप होती. बघून जरा हिरमुसले, पण पान खाऊन त्यातल्या गुलकंदासारखी मीपण विरघळून गेले! Wink मस्त चव!

आणि देवदर्शन असेल तर म्हार्दोळची महालसा, मंगेशीचा मंगेश. जवळजवळ आहेत दोन्ही. म्हार्दोळपासून पुढे गोपाळगणपती. आणि वेलिंगची शांतादुर्गा. कवळ्याची प्रसिद्धा शांतादुर्गा वेगळी. वेलिंगला सकाळी लवकर गेलात तर बहुतेक वेळा देवळाच्या बाहेरच्या टपरीवर आंबोळी मिळते नाश्त्याला. किती खाऊ असं झालं होतं मला!

सिदा-दे-दि-गोवा मस्त! बीचवर डुंबा भरपूर!

तर असो! Proud

द पेस्ट्री शॉप म्हणून दुकान आहे. >> वा वा, काय ती आठवण काढलीत. Happy

मासे खायचेच तर छोटसं खोपटंवजा हाटेल शोधायचं आणि मच्छी ताट घ्यायचं. तरच ऑथेन्टिक आणि निर्मल आनंद मिळेल >>> बरोबर. सोबत आजूबाजूला गोवन कोकणी गप्पा हव्यातच.

धन्यवाद दोस्तांनो,
काय माहिती दिलीत....
नी, तु मला अहो-जाहो करते आहेस का?
आणि मी शाकाहारी हे रेन फॉरेस्ट, पल्याडचे बाक, या पत्त्यावरुन कळालेच असेल....

पणजीत एक खुप जूने दुकान आहे. त्याच्याकडे केक, चिप्स, भजी वगैरे प्रकार उत्तम मिळायचे. छोटेसेच आहे पण रांग असायची नेहमी. मला आता नाव आठवत नाही.

शाकाहारी जेवणासाठी पणजीत श्रावण हे पण एक चांगले हॉटेल आहे अमर्याद थाळी असते. मोती महालात क्वांटिटी कमी असायची.

अरे रे! Sad

मी सप्टेंबर च्या शेवटच्या आठवड्यात गोव्याला जायचे होते त्याच्या आधी पिकनिक च्या धाग्यावर गोवा ट्रीप बद्दल विचारणा केली तेव्हा मोजक्या लोकांकडून उत्तरे आली. 'प्रत्येक ठिकाणासाठी नवीन धागा नको' अशी तडी आली तर? ह्या भीतीने नवीन धागा उघडला नव्हता. Sad ह्या धाग्याची लिंक आता तिकडे देते.

नी, तु मला अहो-जाहो करते आहेस का? <<<
असं मी का करेन बरे Wink
तुम्ही = तुम्ही सर्वजण (ट्रिपेत सामील असलेले सर्व सदस्य Happy )

३ वर्षे तिथे राहिलोय मी, मनमुराद भटकलो... ( पण मी शाकाहारी आहे आणि अल्कोहोल पासून दूर राहतो )

http://ferfatka.blogspot.in/2011/04/blog-post.html
या ब्लॉगवर गोव्यातल्या एका मत्स्यालयाचा उल्लेख आहे. ब्लॉगकर्त्याला त्याचं नाव आठवत नाही असं तिथे दिलं आहे.
कुणाला माहिती आहे का याविषयी?

Namaskar . Govyachya javalpass ajun kai ahe ka pahanyasarkhe?

Ami 1 varshapurvi gelo hoto govyala tar hotel kadun gadi hoti tyani 2 divas selective point dakhvle . Pan mala te apurn vatle . Tar detail goa pahaych asel tar kay karav ? Plz kunitari reply kara . . . .

Pages