रस्ते, अपघात आणि आपण

Submitted by श्यामली on 25 December, 2012 - 00:16

काल घडलेली अतिशय सुन्न करणारी घटना.
आनंद अभ्यंकर, अक्षय पेंडसे आणि त्याच्या दोन वर्शाच्या मुलाचं पुणे मुंबई एक्सप्रेस वे वर झालेलं अपघाती निधन.

या आधीपण अशा कितीतरी मंडळींना अपघातात आपला जीव गमवावा लागला आहे. हे फक्त एक्सप्रेस वे वर होतं आहे असं नाही, पुण्यात रोज एकतरी अशी बातमी असते. मुंबईत हिट & रन केस असतेच असते.

याबाबत आपण काय करु शकतो? सरकारनी काय करायला हवय. हा अवेअरनेस गरजेचा नाही का? आज रस्त्यावर चालायच म्हटल तरी जीव मुठीत धरुन चालाव लागत. रस्ता ओलांडायचा म्हणजे अरे बाप रे... वाटावं अशी परिस्थिती. मुलांना सायकल्/दुचाकी घेऊन रस्त्यावर जाऊ द्यायला भिती वाटावी अशी परिस्थिती. आपल्यापैकी कुणी प्रवासात असेल तर ती व्यक्ती सुखरुप घरी येईपर्यंत जीवात जीव येत नाही.
घरातून बाहेर पडताना, रस्त्यावरच्या या दहशतीचं काय करायच?

हे सगळं कुठे तरी नीट व्हायला हवं म्हणून ही चर्चा आवश्यक वाटते.

मला सुचलेले मुद्दे लिहिते आहे

आर टि ओ च ढिसाळ रस्ता नियोजन - व्यवस्थापन
लायसन्स देताना योग्य प्रशिक्षणाची आणि कडक निकषांची गरज आहे
आपल्या वाहनाची योग्य ती काळजी आपण घेतो का?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आपले वाहन एवढ्या मोठ्या रस्त्यावर एवढ्या वेगानी जाण्याच्या योग्यतेच आहे का?

छोट्या छोट्या हॅच कार मुळात एक्सप्रेसवेवर या स्पीड नी एक्सप्रेसवेवर जाणं हेच मला इथे खटकत आहे. छोटी वाहनं सिटी-कार म्हणून बाजारात आलेली असतात आणि आपण पार गोवा, बंगलोर अशा काहीच्या काही दूरवर या गाड्या घेऊन जातो. त्या गाडीमधे तेवढे सेफ्टी फिचर आहेत का? हे आपण बघतो का?

मधे कोणाच्या तरी स्टेटसमधे वाचलं की नॅनो घेऊन कोकण दौरा करुन आलो Uhoh अरे नॅनो ती तीचा जीव केवढा? तुम्ही करताय काय? देवाच्या कृपेनी काही झालं नाही पण झालं असतं तर? जीवाला काहीच मोल नाही?
सध्याच्या घडीला जीव एवढा स्वस्त झाला आहे?

सहज नोंदवलेल एक निरिक्षण.

इथे(दुबईत) गाडी विकत घेतानाच आधी सेफ्टीफिचरवर लक्ष दिलं जात. गाड्यांचे ब्रँडससुद्धा मार्केंटिंग साठी सेफ्टी फिचर फ्लॅश करत असतात. आणि भारतातल्या गाडीच्या जाहिरातीत अमुक गाडीचा एसी पॉवरफुल ऑ!!!!

श्यामली ६०० सीसीची गाडी किती किलोमीटर्स जाऊ शकते यावर काही गाईडलाईन्स आहेत का ? असल्यास कृपया शेअर करणे.

सेफ्टी फिचर्सचा मुद्दा आवडला. ते कम्पलसरी असावेत. कंपन्यांच काय, त्या विकलं जाईल तेच हॅमर करणार. अपली मानसिकता बदलणं गरजेचं आहे.

आर टि ओ च ढिसाळ रस्ता नियोजन - व्यवस्थापन
लायसन्स देताना योग्य प्रशिक्षणाची आणि कडक निकषांची गरज आहे

हे २ महत्वाचे मुद्दे आहेतच पण आपल्याइथे ९९.९ टक्के लोकांना गाडी चालवताच येत नाही. म्हणायला त्यांच्याकडे लायसन्स असते पण नियमांची बोंब...

इथे(दुबईत) गाडी विकत घेतानाच आधी सेफ्टीफिचरवर लक्ष दिलं जात. गाड्यांचे ब्रँडससुद्धा मार्केंटिंग साठी सेफ्टी फिचर फ्लॅश करत असतात. आणि भारतातल्या गाडीच्या जाहिरातीत अमुक गाडीचा एसी पॉवरफुल ऑ!!!!
>>>

अगदी अगदी.. मी ३ वर्षापुर्वी गाडी घेतली होती तेंव्हा सर्व सेफटी फिचर्स पाहून घेतली होती. पैसे खूप वाढतात त्याने. कदाचीत त्याच कारणाने आपल्याइथे त्याकडे दुर्लक्ष होत असेल... नको त्या गोष्टीत पैसे हवे तसे उधळतील पण सुरक्षेच्या नावाने नाही!!!

सेफटी बेल्ट नको लावायला... लावला तरी तो मुख्य रस्त्यावर किंवा टोल नाक्यावर पोलिसाला दाखवण्यापुरता... :रागः

लाल सिग्नल लागल्यावर थांबावे हे समजण्याकरता पूर्ण वाढ झालेल्या माणसाला वरच्या कोणत्याही गोष्टीची गरज नसते.

बदलायची गरज आहे ती मानसिकता.

मधे कोणाच्या तरी स्टेटसमधे वाचलं की नॅनो घेऊन कोकण दौरा करुन आलो अरे नॅनो ती तीचा जीव केवढा? >>>टेक्निकगोष्टूटी माहित नाहीत पण सध्याची टिव्हीवर लागणारी नॅनो ची जाहीरात अशीच आहे की नॅनो घेऊन कुठेही, कितीही लांब पल्ल्यात फिरा असा संदेश देणारी.

बाबु, गाडी किती लांब जाईल, तर त्या त्या ब्रँडनी दिलेल्या मर्यादेपर्यंत नक्कीच जाईल, पण ही गाडी किती स्पिडला स्टेबल राहू शकते. हेही बघायला हवं ना? Happy

तांत्रिक गोष्टिंवर मी बोलू शकणार नाही, पण समजून घ्यायला नक्की आवडेल.

नॅनो घेऊन फिरलेल्यांनाही काही अडचणी आलेल्या ऐकल्या वाचलेल्या नाहीत. गाडी किती लांब जाईल यावर ब्रॅन्ड्सनी मर्यादा घातलेल्या ऐकीवात नाहीत, माहितीतही नाहीत. जर हाच हिशेब लावायचा झाला तर ११० सीसीच्या बाईक्स हायवेवर दिसताच कामा नयेत.

गाडी किती स्पीडला स्टेबल रहाते यावर ती किती पल्ला गाठू शकते हे अवलंबून नसते. ज्या स्पीडला ती स्टेबल राहू शकत नाही त्या वा जास्त स्पीडला चालवू नये हे ड्रायव्हरला समजते की नाही हा मुद्दा आहे.

नॅनोसंदर्भातले स्टेटमेन्ट गाडीची अ‍ॅन्टीपब्लिसिटी करणारे वाटले.

रोहन
हे २ महत्वाचे मुद्दे आहेतच पण आपल्याइथे ९९.९ टक्के लोकांना गाडी चालवताच येत नाही. म्हणायला त्यांच्याकडे लायसन्स असते पण नियमांची बोंब...>>>>गाडी चालवतानाच नाही, चालतानाही काही नियम पाळायचे असतात हे इथे माहित आहे की नाही असं वाटावं इतपत वाईट अवस्था आहे.

सिंहगड रोड ला राजारामपुलाकडे जायच्या सिग्नलला, हिरवा सिग्नल लागलेला दिसतोय तरी पादचारी रस्ता ओलांडत असतात. अरे आधीच तो सिग्नल काही सेकंदाचा त्यात तो उलटमोजणी करणारा शेवटचे १० सेकंद उरले की समोरची वाहन भॉ करत घुसणार अलिकडच्यांनी जायच कधी? मग अपघात झाले म्हणून ओरडायला आपणच मोकळे.

पादचा-यांसाठी कुठेही सिग्नल्स नाहीत हे ही फार महत्वाच आहे.

बाबु म्हणूनच तो मुद्दा खाली प्रतिसादात आहे, मूळ पोस्टमधे नाही.
आणि नॅनो हे केवळ उदाहरण आहे. मुद्दा ब्रँडचा नव्हे, हे लक्षात घ्या

पादचार्‍यांसाठी सिग्नल असतातच. मुळात गाड्यांना हिरवा सिग्नल असेल तो चालणार्‍यांकरिता लाल हे साधे गणित आहे. पण त्यातही हात दाखवत रस्ता ओलांडणारे मुर्ख सर्वत्र आहेतच.

चालणार्‍यांना वाटते की गाडीवाले माजोरडे.. आणि गाडी वाल्यांना वाटते की चालणारे माजोरडे... एकंदरीत बाबु म्हणतोय तशी मानसिकता बदलली गेली तर काहीतरी शक्य वाटते. पण हे बदल अजुन कित्येक वर्ष होणार नाहीत हे ही तितकेच खरे आहे... Sad

तुम्हाला नियमाने, शिस्तित गाडी चालवायची असेल तरी आजु-बाजुने जाणारे चालवू देणार नाहीत ह्याची खात्रा बाळगायची असते इथे.

नॅनो १०० च्या वेगाला पळाली तरी धन्य...

मी प्रथम नॅनो पाहिली मुलुंडला... तेंव्हाचा किस्सा...

हायवेवर मी ठाण्याहून दादरच्या दिशेने जातोय. मी दुसर्‍या लेन मध्ये होतो. पहिल्या लेनमध्ये पिवळ्या रंगाची चित्र-विचित्र रिक्षा दिसली. जवळ गेल्यावर कळले की ती नॅनो आहे. ती गाडी ८०+ वेगात पहिल्या लेनला होती. बहूदा आजच त्या गाडीचा पहिला दिवस होता. बॉनेटवर रिबिन चमकत होती. ड्रायव्हर जोशात होता. बाजुला एक व्यक्ती बसलेली असावी. त्याच्या माण्डीवर एक मुलगा बसलेला होता.(घ्या. पहिला नियम मोडला).

मागच्या सिटवर एक बाई दुसर्‍या एका लहान मुलाला मांदीवर घेउन बसली होती. शेजारी अजून एक पुरुष आणि एक बाई बसल्या होत्या. पुरुशाच्या मांडीवर अजुन एक लहान मुल होते. म्हणजे एकूण संख्या ३+५=८ Proud

हे सर्व मी ३ सेकंदात पाहिले.. नाहीतर म्हणाल. गाडी चालवताना कुठे बघायचे हे ठावुक नाही आणि इतरांचे लिहितायेत... Proud

शक्यतो रात्री हायवेवर प्रवास करू नये. - चाळीशीनंतर, फॅमिली बरोबर, घरचे वयस्क बरोबर असताना टायगर गिरी टाळावी. कोणतेही शेड्यूल/ डेडलाइन बाजूला ठेवावी.

टायर मधील हवेचे प्रेशर चेक करावे. पूर्ण गाडी लांबच्या प्रवासाच्या आधी चेक करावी.
दारू पिऊन गाडी चालवू नये. अगदी एक ग्लास बीअर सुद्धा.
मोबाईल वर बोलू नये गाडी चालवताना
लायसन्स नसलेल्या तरूण मुलांच्या हातात ( १५- १७ वय) मोठ्या गाड्या जसे स्कोडा, स्कॉर्पिओ,
किंवा कोणतीच गाडी कौतुकाने देखील देऊ नये. काल व परवा दोन अपघात अश्या मुलांनी केले आहेत.
महाग पॉवरफुल बाइक्स मुलांना घेऊन देऊ नयेत. दिल्यास प्रॉपर ट्रेनिन्ग द्यावे.
मुंबईत एका १६ वयाच्या मुलग्याला लँबोर्गिनी घेऊन दिलेली आहे. पण चालक चालवतो. कंपनी तो वयात आला की त्याला ट्रेनिन्ग देऊन लायसेन्स आल्यावरच गाडी त्याच्या हातात देणार आहे.
गाडी चालिवताना सिगारेट ओढू नये. , गरम कॉफी, कोक बीअरचा कॅन पायात धरून चालवू नये.
अनवधानाने सांडल्यास अपघात होईल.

सीट बेल्ट लावावाच.

मुलांना कारसीट मध्ये , मागे बेल्ट लावून बसवावे.
स्पर्धात्मक हाय स्पीड रेसेस हायवेवर खेळू नये.

यावेळी मी महाबळेश्वर, पाचगणी ला सुट्टीवर आलेले लोकं अल्कोहोलिक ड्रिंक्स घेऊन बिंदास गाडी चालवताना पाहिले . इतकं धस्सं झालं ना.. एव्हढ्या वाढलेल्या लोकांना स्वतःची नाहीतरी दुसर्‍या लोकांचीही अजिबात पर्वा असू नये या गोष्टीची भयंकर चीड आली..
याव्यतिरिक्त मुंबई,पुणे,कोल्हापूर्,सातारा.. या शहरांना भेट दिली असता लक्षात आलं लहान,थोर, ड्रायवर,मालक,पादचारी, शिक्षित, अशिक्षित सर्वच प्रकारचे लोकं, वाहतुकीचे नियम हे जणू मोडायलाच असतात या एकच भावनेने पिछाडलेले दिसले.. Sad वरून ते मोडल्याचा त्यांना कोण अभिमान वाटतो वरून ते चारचौघात फुशारकीने सांगतात .. Sad Sad
अश्विनीमामी +१००

वाहन चालवण्याचा परवाना तसंच रस्त्यावर वाहतूक नियमांची अंमलबजावणी (विशेषतः वेग आणि मद्यपान) संदर्भातला ढिसाळपणा (हायवे वर क्वचित patroling होतं) आणि भ्रष्ट्राचार हे प्रमुख कारण समजलं जातं.

आज भारत रस्ते-अपघाताबाबत जगात प्रथम स्थानावर आहे. खाली दिलेली लिंक याबाबतची आकडेवारी दाखवते.

http://autoraiders.com/2012/07/a-statistical-analysis-of-road-accidents-...

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बऱ्याचदा अपुरी आणि गैरसोयीची पडते. सेफ्टी-फिचर असलेली वाहने महाग आहेत आणि शहरात वापरासाठी बोजड आहेत. शहरात एक आणि हायवेवर दुसरी मोठी गाडी ही चैन सगळ्यांना परवडत नाही. त्यातून असे अपघात घडतात.

छोटी गाडी असूनही आपण सतर्क राहून अपघात काही प्रमाणात टाळू शकतो उलट सेफ्टी-फिचर वाली गाडी असलेला बेफिकीर आणि गाफील राहून अधिक धोक्यात घालू शकतो. आपण सगळे नियम पाळून आणि काळजी घेऊनही अवजड वाहन चालवणारे अर्धशिक्षित आणि मद्यपान केलेले चालक त्यांच्या बरोबर आपल्याला खड्ड्यात घालू शकतात, त्यामुळे नियमांची कठोर अंमलबजावणी करण्यासाठी शासनयंत्रणेला भाग पडल्याशिवाय अपघातांचं प्रमाण खाली येऊ शकणार नाही, पण त्यासाठी 'आपण बरे आणि आपलं काम बरं' हा मध्यमवर्गीय बाणा झुगारण्याची गरज आहे. कारण आता तो आपल्याला वाटतो तसा सुखानी जगू देत नाहीये हे स्पष्ट दिसतंय.

गाडीचे सेफ्टी फिचर्स, सीट बेल्ट लावणे महत्त्वाचे आहेच पण वाहतुकीचे नियम न पाळले जाणे हे जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागण्याचे एकमेव कारण आहे. वाहतुकीचे नियम पाळण्यासाठी भरपूर ऐसपैस जागा, मोठे आणि चांगले रस्तेच उपलब्ध असावे लागतात हा मोठा गैरसमज आहे. गरज आहे ती स्वयंशिस्त आणि जबाबदारीची जाणीव असण्याची आणि ती जाणीव लोकांमध्ये नसेल तर कडक नियम बनवण्याची.

एक्प्रेस वे वर ८० किमी ची स्पीड लिमिट असेल तर बर्‍याचश्या गाड्या अक्षरशः वाट्टेल त्या स्पीडने जात असतात. ८० ची स्पीड लिमिट म्हणजे ८० हाच मिनिमम स्पीड पाहिजे असाच अलिखित नियम आहे जणू. एवढा टोल भरतो आपण आणि जिथून निसटून, पळून जाणे शक्य नाही त्या रस्त्यावरही स्पीड ओलांडणार्‍यांना पकडणे हे का घडत नाहीये ? आठवडाभर धडाधड दंड वसूल करा. आपोआप लोकं नियम पाळायला लागतील.
स्पीडव्यतिरिक्त लेनची शिस्त न पाळणे, वाईट प्रकारे ओव्हरटेक करणे, पुढच्या गाडीत आणि आपल्यात सुरक्षित अंतर न राखणे, रस्त्यांवर सिग्नल नीट न पाळणे आणि इतर अनेक ....

आपण अत्यंत चांगल्या प्रकारे गाडी चालवली तरी सुरक्षित नाही ही जाणीव भयावह आहे. सरकारला काही पडलेलीच नाही कारण लाल दिव्याची गाडी पाहिली की आजूबाजूचे आपोआप गाडी नीट चालवणार. रस्त्यावर शिस्त हवी ह्याची निकड त्यांना भासतेय कशाला Angry

अगो.. प्रामाणिकपणे सांगायचे तर मुंबई-पुणे हायवेवर ८० हा स्पिड तसा कमी आहे. इथे गाड्या अधिक वेगाने पळणे अपेक्षित आहे. पण दुर्दैवाने शिस्त नसल्याने अपघात होतात आणि म्हणूनच वेग मर्यादा ८०.

८०+ च्या वेगाला तर गाड्या ईस्टन एक्सप्रेस हायवेवर सुद्धा धावतात.

रोहन, प्लीज एक गोष्ट लक्षात घे. मुद्दा हा नाहिये की ८० चं लिमिट बरोबर आहे की कमी, मुद्दा हा आहे की ८० चं लिमिट असतानाही लोकं त्यापेक्षा जास्त वेगाने गाडी दामटवतात.

मान्य आहे. मला वाटते की लोक हे बोर्ड वगैरे काही जुमानत नाहीत. ते त्यांचे स्वतःचे लिमिट ठरवतात आणि गाड्या दामटवतात.

श्यामली,

आनंद अभ्यंकर प्रवास करत असलेल्या गाडीला विरूद्द दिशेने येण्यार्या टेंपोने धडक दिली !
हा ड्रॅयवरचा टेंपो वरील ताबा सुटला, टेंपो रस्ता ओलांडून समोरून येणार्या आंनदच्या गाडीला अगदी
समोरुन धडकला.
हा अपघात नसुन मर्डरच आहे.

मुंबै पुणे एक्स्प्रेस वे वर कमाल वेग म र्यादा ८० किमी आहे पण गाड्या किमान १०० च्या
वरच धावत असतात.

ह्या अपघाताने बरेच प्रश्न उभे रहातात.

अगो.. प्रामाणिकपणे सांगायचे तर मुंबई-पुणे हायवेवर ८० हा स्पिड तसा कमी आहे. >>> असे तुम्हाला वाटते. रस्त्यांवरची स्पीड लिमिट ही सगळ्या प्रकारची ( नॅनोसकट ) वाहने लक्षात घेऊन बनवलेली असते हे आपण विसरतो. शक्तीशाली गाडी असेल आणि ( थोड्या ) जास्त वेगाने जायची गरज वाटली तर त्यासाठी फास्ट लेन वेगळी असते. म्हणजे परत नियम पाळणे आलेच.

बाबु, 'रस्ते, अपघात आणि आपण' म्हणताना आपण गाड्यांच्या सेफ्टी फीचर्सबद्दल जास्त चर्चा करतो हे मला खटकते. गाडी दणकट असणे आणि सीट बेल्ट लावणे ही सेकंडरी सेफ्टी आहे. वाहतुकीचे नियम पाळून गाड्या चालवणे ही 'प्रायमरी सेफ्टी' आहे. प्रायमरी सेफ्टी पाळूनही दुर्दैवाने अपघात झालाच तर आपल्याला इजा होऊ नये ह्यासाठीची ती तरतूद आहे. पण म्हणून नॅनो, रिक्षा, दुचाकींनी रस्त्यावर उतरुच नये का ? ट्रक, टेंपो, व्हॉल्व्हो आणि इतर पॉवरफुल गाड्यांनी 'ठोकलं तर आपलं काय जातं' असं म्हणत बेछूट गाड्या चालवाव्या का ?

* ह्याचा अर्थ मी गाडीमधल्या सेफ्टी मेझर्सना महत्त्व देत नाही असे प्लीज समजू नका. उद्या भारतात आल्यावर गाडी घेताना पहिला विचार मीही त्याचाच करेन. पण एक सामाजिक प्रश्न म्हणून नियम पाळून ड्रायव्हिंग करण्याबाबत जागृती कशी करता येईल ह्यावर आपला फोकस हवा असे मला वाटते.

अगो,

बाई मी तेच सांगतोय. सेफ्टी ईज विदीन अस. बाकीच्या गोष्टी फक्त अपघाताने होणार्‍या नुकसानाची तीव्रता कमी करु शकतात.

यावेळी मी महाबळेश्वर, पाचगणी ला सुट्टीवर आलेले लोकं अल्कोहोलिक ड्रिंक्स घेऊन बिंदास गाडी चालवताना पाहिले . <<<
मायबोलीवरसुद्धा दारू पिऊन गाडी चालवण्याचं समर्थन करणारे आहेतच की.

इकॉनॉमी कार्समधे अनेक सेफ्टी फिचर्स नसतात. मायलेज हा आपला मेन क्रायटेरिया असल्याने गाडीची बॉडी लाइटवेट बनवलेली असते. लोकांनी हायवेसाठी आणि सिटीसाठी दोन गाड्या घ्याव्या असे कुणीच सांगत नाही पण मग अश्या वेळेला इंजिन उत्तम असल्याने गाडी १२०-१४० ला सहज पळू शकत असली तरी गाडीची कुवत बघूनच स्पीडचा निर्णय घ्यायला हवा. तुमच्या गाडीला १२०-१४० ला अपघात झाल्यास गाडीचा चक्काचूर होईलच पण तुमचा जीव वाचण्याची सुतराम शक्यता नाहीये हे तुम्हाला माहिती पाहिजे. गाडीची कुवत माहिती हवी.

इकॉनॉमी कार्स अस्तित्वात आहेत कारण त्यांना मार्केट आहे. मार्केट आहे कारण प्रत्येकाला गाडी हवी असते. गाडीमालक या संज्ञेच्यामागे असलेलं वलय गाडी बनवणार्‍यांनी बरोब्बर हेरलंय. प्रश्न असा आहे की सेफ्टी फिचर्स नसलेली गाडी खरेदी करून आपण वलय विकत घेतोय का?

हायवेला ड्रायव्हिंग ही आपली गरज आहे तर आपल्या जीवापेक्षा काही महत्वाचं नाही. मग लोक क्ष रूपयात घेत असतील एखादी गाडी आणि तुम्ही सेफ्टी फिचर्ससाठी अजून दोन रूपये देऊन क्ष + २ रूपयाची गाडी घेतलीत तरी हरकत नाही. क्ष पैसा जमवलाय तर +२ ला पण जमतील की.

उलट सेफ्टी-फिचर वाली गाडी असलेला बेफिकीर आणि गाफील राहून अधिक धोक्यात घालू शकतो. <<<
अत्यंत असहमत. सेफ्टी फिचर्स असलेली गाडी म्हणजे गाफिल आणि निष्काळजीपणे गाडी चालवायचा परवाना नसतो.

मला क्लास बायस वगैरे काहीही म्हणा पण टेम्पो आणि ट्रक ड्रायव्हर्सनी लेन डिसिप्लिन पाळणे, मालकांनी वाहन योग्य त्या कंडीशनमधे ठेवणे (ब्रेक, दिवे, आरसे, पी यू सी आणि रिफ्लेक्टर्स) हे अनिवार्य करणे गरजेचे आहे.

हायवेवर थांबू नये असा नियम आहे. गाडी बंद पडणे, गाडीतल्यांची मेडिकल इमर्जन्सी अश्या शक्यता सोडल्यास हा नियम पाळला जायला हवा. पण हे होते का?
मुं-पु एक्स्प्रेस हायवे पुण्याकडून हायवे सुरू व्हायच्या जस्ट आधी हॉटेल्स आणि स्वच्छतागृहे आहेत. हायवे सुरू झाल्यापासून पहिले फूड मॉल जास्तीत जास्त २० मिनिटांनी येते. नंतर १०-१५ मिनिटांनी घाट उतरायच्या आधी लोणावळ्याची एक्झिट येते. त्यानंतर घाट उतरून पुढचे फूड मॉल २५ मिनिटे. त्यानंतर टोलनाका ओलांडून हायवे संपेतो परत २५ मिनिटे. हायवे संपल्यावर लगेच हॉटेल्स व स्वच्छतागृहे आहेत.
असे असतानाही एक्स्प्रेस हायवेवर गाडी थांबवून बाजूला आपले विधी उरकणारे भरपूर असतात. आपल्याला जर सतत जायची गरज पडते तर या प्रत्येक ठिकाणी थांबता येण्याची सोय आहे. ते न करता रस्त्याच्या कडेला गाडी उभी करून तिथेच जाणे आणि स्वतःचा, गाडीतल्या इतरांचा जीव धोक्यात घालण्यात काय अर्थ आहे?

गाडी दणकट असणे आणि सीट बेल्ट लावणे ही सेकंडरी सेफ्टी आहे. वाहतुकीचे नियम पाळून गाड्या चालवणे ही 'प्रायमरी सेफ्टी' आहे. प्रायमरी सेफ्टी पाळूनही दुर्दैवाने अपघात झालाच तर आपल्याला इजा होऊ नये ह्यासाठीची ती तरतूद आहे.

>> नक्कीच.

आणि नॅनो घेउन लोक एक्सप्रेसवर जातात? जातही असतील माहित नाही.

नीरजा चांगली पोस्ट..

उलट सेफ्टी-फिचर वाली गाडी असलेला बेफिकीर आणि गाफील राहून अधिक धोक्यात घालू शकतो. <<<
अत्यंत असहमत. सेफ्टी फिचर्स असलेली गाडी म्हणजे गाफिल आणि निष्काळजीपणे गाडी चालवायचा परवाना नसतो.

>>> मलाही हे मान्य आहे पण अगोने फक्त शक्यता वर्तवली आहे. तु, मी नाही पण असेही चालक असु शकतात. नक्कीच.

आणि नॅनो घेउन लोक एक्सप्रेसवर जातात? <<
हो भरपूर. नॅनोमधे बसून आपल्या समोरच्या स्कोडाला ब्लिंकर मारून पुढे जायला बघणारेही असतात.

मधल्या लेनमधे अत्यंत मूर्ख ट्रक ड्रायव्हर्स ४० च्या वेगाने जातायत त्यामुळे तुम्ही फास्ट लेनमधे येता. बाकायदा इंडिकेटर देऊन वगैरे. तुम्ही येता तेव्हा रेअर व्ह्यू मधे कुठल्याही गाडीचा मागमूसही नसतो. अचानक मागून ब्लिंकर्स दिले जायला लागतात. मधल्या लेनमधे तुमच्या डाव्या साइडला अजून एक ४० च्या वेगाने जाणारा ट्रक असतो त्यामुळे मधल्या लेनमधे गेल्यास तुम्ही त्यावर आदळणार हे नक्की असते. तुमच्याकडे पर्याय असतो की तुम्ही त्या ट्रकच्या इनफ पुढे जाऊन मग मधल्या लेनला येऊन मागच्या गाडीला जागा द्या. तुम्ही तेच करायला जात असता. पण मागच्या वाहनचालकाला बहुतेक घाईची शी लागलेली असते आणि तो हॉर्न-ब्लिंकर्स याने तुम्हाला पिडू लागतो. त्याचा स्पीड असा असतो की आता बाजूला गेला नाहीत तर तो तुम्हाला उडवणार.
अश्या वेळेला जर नवीन गाडी चालवणारा असेल तर तो बिचकू शकतो आणि भांबावून जाऊन काहीतरी चुकीची कृती करू शकतो ज्यातून त्या चालवणार्‍याचे आणि इतरही अनेकांचे प्राण निश्चितपणे जाऊ शकतात.
बहुतेकदा पुढची हॅचबॅक असते आणि मागची टाटा सफारी, स्कॉर्पिओ, टवेरा, इनोव्हा, महिंद्र एक्सयूव्ही ५०० वा तत्सम मोठी गाडी.
(हा माझा अनुभव आहे)

तुम्ही जर पुढच्या वाहनाचे चालक असाल तर असे घाईची शी लागल्यासारखे हॉर्न वा ब्लिंक करणार्‍यांकडे लक्ष न देता तुमची सेफ्टी पहिल्या महत्वाची हे लक्षात घेऊन डोकं शांत ठेवून योग्य वेळीच लेन बदलून मग पुढे जाऊद्या. मागच्या गाडीतल्या माणसाने कितीही शिव्या मोजल्या तरी त्या त्याच्या गाडीतल्या गाडीतच फिरतात. तुमच्या अंगाला भोके पडत नाहीत. (मी हे करते)

तुम्ही घाईची शी वाले चालक असाल तर जरा परत विचार करा. आपण काय करतोय याचा. तुम्ही नवीन असताना हे तुम्हाला कुणी केले असते तर तुम्ही काय केले असते आणि काय झाले असते?

Pages